मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT
आकाश मेहता, माझा बालपणीपासुनचा मित्र. एकत्र शिकलॊ, खेळलो, आयुष्यात आपापल्या पायावर उभे राहीलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा माझा मित्र, आम्ही मात्र विनाचमच्याचे. प्लास्टीकचे त्यावेळी प्रस्थ नव्हते, नाही तर मी पांढरा चमचा घेऊनच आलो असतो. मी परिस्थिती बघून संगणकी शिकलो. तो मात्र builder and jeweler झाला. व्यवसायाच्या बोटाला धरुन अमेरीकेत आलो. सुटीला भारतात गेलो की नेहमी भेटतो. आम्ही दिवस-रात्र एकत्र असतो. मागे अशाच एका सुटीला त्याचा वाढदिवस होता. पार्टी पुण्याच्या एका आलिशान pub मध्ये होती. pub मध्ये पैसा उडवण्याएवढे कमवायला लागलो तर अमेरीकेत आलो त्यामुळे आयुष्यात भारतीय pub बघायची संधी प्रथमच. पार्टी झकास होती. अमेरीकेतल्या pub प्रमाणे कमी कपड्यातल्या आणि दारुच्या नशेतल्या मुली तिथेही. अजुन लग्न झाले नव्हते. त्यामुळे ते कायम एक प्रोत्साहन असायचे. इंग्रजी गाणी आणि त्यावर थरकणारे बघुन मी पण हलत होतो. आकाशला म्हटले, अरे हिंदी लावा रे. तो आणि आणखी चार जणांचा चेहरा उतरला जणू काहि सगळेजण म्हणत होते "न जाने कहां कहां से चले आते हैं।". शेवटी माझ्यासाठी आकाशने "It's the time to disco" लावायला लावले.

नेहमी भारतात जातो आणि घाबरतो. गावाकडे दहावी पास झाल्यावर मुंबई बघायला आलेल्या मुलासारखी माझी अवस्था होते. नवे रस्ते flyovers हे सारे ठीक आहे. पण अमेरीकन जेवणाची आवड, नवे मॉल्स, अमेरीकन गाण्याची रेलचेल. सारे मला नवे. जणू काही सगळेच अपरिचित. भारताने पुढे जावे, पण दुसरयाचे बघुन नको. आपले काहीच नाही? शेखर कपूर म्हणे भारताचा Spielburg? लिसा रे म्हणजे भारतीय अंजेलिना जोली? ह्यांना भारतीय व्यक्तित्व नाही?

पुण्या-मुंबईची अमेरीका होते आहे. अमेरीकेत योगा जसा अगदी अमेरीकन झाला आहे. त्याप्रमाणे भारतात इतर गोष्टी भारतीय बनून का येत नाहीत? प्रत्येक गोष्ट अनुकरणीय नसते हे अजुन आपण शिकायचे आहे. सध्या जे चालु आहे ती आंधळी कोशिंबीर आहे. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर न्युयॉर्कर मध्ये दोश्यासारखा burrito खाणारे वाढत आहेत, पण त्यांना खरा burrito माहीतच नाही. बहुतेक तो मेक्सीकन आहे हे पण माहीत नसते. ती फक्त क्रेझ आहे. लोकांना या अनुकरणाचे तोटे अजुन माहीत नाहीयेत. हे सगळे परिवर्तन अमेरीकेत पण झाले. पण त्याचे नुकसान २०-३० वर्षांनी दिसते आहे. इथे घराला घरपण नाही. मुले आई-बापाचे तोंड बघायला नको म्हणतात. सुनेला सासुसासरे म्हणजे "devils" वाटतात. (अजून तरी भारतात ते नकोसेच वाटतात, ही पण वेळ येईल). मी माझ्या एका अमेरीकन मैत्रीणीला म्हटले, "मला भारतात जाऊन आजीला भेटायचे आहे", ती वेडीच झाली. तीला स्वतःची आजी कशी दिसते हेच आठवत नव्हते. तीच्या मते तिची आजी म्हणजे एक "Bitch" होती. हे मला मात्र नवीन होते. वयाच्या अठराव्या वर्षानंतर स्वतःचे स्वतः बघा अशा संस्कृतीत वाढलेल्यांना मी अजुनही आई-वडिलांबरोबर राहतो, आणि माझे तीर्थरुप अजुनही माझ्या आजी बरोबर राहतात हे जगातले दहावे आश्चर्य वाटते.

अमेरीकेतील भारतीय आपली मुले मोठी व्हायच्या अगोदर त्यांना भारतात पाठवतात हे किती जणांना माहित आहे? परिस्थितीच अशी आहे इथे. त्यांना भीती वाटते ती या अमेरीकन हवेची, ती एकदा डोक्यात गेली की मुले कामातून जातात असे ते म्हणतात. मुलांचे स्वातंत्र्य आणी काय काय !! इथे "Child Privacy Law" आहे. पालक मुलांच्या सगळ्या गोष्टीत दखल देऊ शकत नाहीत. आपण मात्र या सगळ्याचे आंधळे अनुकरण करतो आहोत.

भारतात असताना मला ही हे पटत नव्हते. सकाळ मध्ये फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे लेख यायचे. मनाला भोक पाडतील असे दाखले असायचे. त्यावेळी नाही पटले पण आज ते दिसतात इथे. ते खरे मानावे लागतात आता. मला मात्र ते भारतात बघवणार नाहीत. अमेरीकेत सगळेच वाईट नाही. इथे पण लोक सुसंस्कृत आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि अजून कमी होत आहे.
आजकाल मी फीरतीवर आहे. दर सोमवार ते गुरुवार शिकागोत आणि बाकीचे दिवस क्लिव्हलॅंड मध्ये. Consultant चे आयुष्य असेच हो. दररोज १० तास पाटया टाकायच्या, ४० झाले की घरी परत. दररोज नवीन उपहारगृह शोधावे. देसी मिळाले तर उत्तमच. Starbucks च्या ताझो चायवर झोप टाळावी, कधी कंटाळ्लो तर समोरच्या सीअर्स इमारती भोवती एक चक्कर टाकावी. बरेच घाई गडबड असते ती काम-धंद्यावाल्यांची, पर्यटक मात्र सारे निवांत असतात. दूरुन सीअर्स कसा दिसतो, आणि त्याची छायाचित्रे घेण्यात मग्न असतात. मध्येच कोणी भिकारी जेवणासाठी डॉलर मागतो. लोक सहजतेने दुर्लक्ष करतात. सुना-मुलींच्या बाळंतपणाला आलेले एखादे म्हातारे जोडपे बघुन न बघितल्यासारखे करत कुजबुजतात, "अमेरीकेत पण भिकारी?". मुलगा किंवा सून म्हणते, बरेच असतात. पण आजोबांना आश्चर्य वाटते डॉलरची भीक म्हणजे ५० रुपये. एवढ्या श्रीमंत देशात पण कुणी बेघर असू शकतो. भारतात जाऊन मित्रांना सांगण्यासाठी मानसिक नोंद करतात.

अशाच एका मंगळवारी काम संपले, निघताना Chipotle मध्ये Burrito घ्यायचा ठरवला. उपवासाचा दिवस, घराबाहेर असताना पण पाळ्तो, शाकाहारी खाऊन सोडतो. बाकी काही पाळणे होत नाही. निघताना कुठुन तरी एक गोरी बाई सामोरी आली आणि हात पसरुन म्हणाली, "जेवायला काही घेऊन द्याल का?, मला घर नाहीये". पट्कन तोंडातुन नाही निघून गेले. मनात काहीतरी चुकले. आई म्हणायची जेवायच्या वेळेला कोणी मागितले तर नाही म्हणू नये, उपवासाच्या दिवशी तर दिल्याशिवाय स्वतः जेवू नये. मागे वळलो तो पर्यंत ती बाई जशी आली तशी गायब झाली होती. आईची शिकवण वापरायची संधी जशी आली तशी गेली. हुरहुर बराच वेळ राहीली, ही वेळ परत येईल त्यावेळी देवू असा विचार करत पाय उचलते घेतले. राहायच्या ठिकाणापर्यंत चालत जाताना, भूतकाळ डोळ्यांसमोरुन धावू लागला, चालता चालता आठवला रसिकलाल त्रिवेदी. ठाण्याला मोल्डींगचा व्यवसाय करणार मारवाडी माणूस. वडलांचा मित्र, तो त्याच्या ऎन चाळीशीत. मुंबईत मुरलेला. स्वभावाने रगेल आणि रंगेल. मी मात्र १५-१६ वर्षांचा. त्याच्या गाडीतुन जाताना सिग्नलवर एक म्हातारी भीक मागत होती. नेमकी आमच्या गाडीला लाल बत्ती मिळाली. "बेटा, वडापाव के लिये दो रुपॆ दे दे". रसिकलाल म्हणे, "आगे जाओ, पॆसा लेके दारु पियेगी". म्हातारी काही ऎकेना, दारु नाही पीत म्हणाली. रसिकलाल पण पेटला. तिला गाडीत बसवून वडापावच्या स्टॉलपाशी घेऊन गेला, दुकानदाराला म्हणे, हि जेवढे खाईल तेवढ्याचे पॆसे मी देतो. म्हातारी काही खाईना, तीला दोन रुपयेच हवे. नंतर रसिकालाल मला म्हणाला "अरे, आजकल भिक मांगना भी एक धंदा हॆ। दो मॆंसे एक रुपीया बुढी उसके ठेकेदार को देगी, एक में मस्त दारु पिके फुटपाथ पे सोयेगी". खरे किती खोटे किती देव जाणे. मी मात्र पुढची संधी न सोडण्याचा निर्णय घेतला.

अमेरीकेन सरकार असे भिकारी काही शहरातुन हाकलुन लावते. त्यांची काही संघटना नसल्याने जावे तर लागतेच. आधीच घर नाही. मग एका ठिकाणाहुन निघतो आणि दुसरीकडे तो उभा राहतो. पण शेवटी हा भिकारी आणि तुळजापूरचा भिकारी सारखाच. दोघे पोटाला मागतात्त. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीथे जास्त दिसतात. सगळे जण मात्र भारताला वाईट म्हणतात. जगात सगळीकडे भूक मात्र सारखीच असते, कोणी देवचे नाव घेऊन हात पसरतो, कोणी नुसतेच पोटाला मागतो. कधी कधी वाटते, ही लोक भुकेची भीक मागुन पोटाचाच धंदा करतात. सरकार फक्त करदायकांचे ऎकते, भिकेवर कर लागला तर त्यांना शहराबाहेर काढणार नाही. पण मग भीकेचा व्यवसाय मात्र चालणार नाही.
खूप आले खूप गेले ... धर्म हो!! भारताला धर्म ही काही अपूर्वाई नव्हे. आम्ही "सर्वधर्मसमभाव" ही संज्ञा फार वेगळ्या अर्थाने वापरली. इंग्रजीत सांगायचे झालेच तर "loosely". DaVinci Code हा जगभर चालला, भारतात त्याच्यावर बंदी घाला म्हणे!! का? अरॆ युरोपात चालला. अमेरीकेत पळतोय अजून. मग भारतातल्या ख्रिस्ती समाजाला काय त्रास आहे? मी मानतो की, तो चित्रपट कॅथॉलिक चर्चच्या कल्पनेला धक्का पोहचवणारा आहे. पण तो ख्रिस्ती धर्माच्या विरोधात नाही. मग कसला हा विरोध?

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे "डॅन ब्राऊनची ही कथा निव्वळ कादंबरी आहे" हे सर्वांना मान्य असताना कसला न्याय मागता? तीन वर्षांनी जागे होऊन पुस्तकावर बंदी नकॊ तर, चित्रपटावर बंदी हवी असेल तर हे चूक आहे. बोला न्यायदेवता विजयी भवः।

अरे हे तर काहीच नाही, Jyllands-Posten ची महंमदावर व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली तेंव्हा भारत कुठॆही मागे नव्हता. आम्ही जगभर उठाव केला. मुसलमानी देशांनी करो अथवा न करो, आम्ही केला. मी त्या व्यंगचित्रांची प्रशंसा करत नाहीये.

हे तर जरा जास्त झाले की हिंदु मागे राहीले, बाबरी मशीद पाडताना त्यांनी स्वतःची मनमानी केलीच की. ते जर कमी असेल तर मुंबईत बाळ ठाकरेंचा फोटॊ लावा. आंधळॆ हिंदुत्व हे सगळ्यांना माहीतच आहे, जे राजकारणी लोकांनी देशाला शिकवले. हुसेनसाहेबांनी देवाची गलीच्छ चित्रॆ काढली त्यावेळी पण आम्ही संप केलाच होता ना?

मला फक्त इतकेच म्हणायचे की भारतात सर्व धर्मांना पुरेसा वाव आहे आणि त्याचा अनुयय करायला पुर्ण अधिकार आहे. कॊण कसा त्याचा वापर करतो, हा आपापला प्रष्ण आहे. एकंदरीत काय? सगळॆ धर्म अनुयायी मनमानी करण्यासाठी भारतात येतात. भारतीयत्व विसरून धर्माचं राजकारण करतात. त्यानंतर राजकारणात, करदायकांचा पॆसा स्वताःच्या खीशात भरतात. परदेशी दौरे करतात. प्रत्येक पश्चिमी देश भारताचा नकाशा काश्मिर सोडुन दाखवतो, सगळ्या परकीय विमान कंपन्या काश्मिर पाकीस्तानात दाखवतात. मला सांगा एका तरी भारतीय नागरीकाने सर्वोच्च न्यायालयात फर्याद दाखल केली का? त्या मध्ये कोणाचाच फायदा नाही. मग का ही उठाठेव करायची?

मुसलमानांना एकापेक्षा जास्त लग्ने करण्याची मुभा आहे, तसे हिंदुंना आरक्षण आहे. ख्रिस्ती लोक भारतात beef खाऊ शकतात. आपण सर्वधर्मनिरपेक्ष की सर्वधर्मिय? सगळ्यांना आपापल्या प्रमाणे वागु दिले आणि त्यासाठी कायदे बनवत राहीलो तर समानता येणार कशी?
अरे त्या राखीला मराठी चित्रपट दाखवा. "७ च्या आत घरात" हा चित्रपट फक्त तिच्यासाठीच बनवला आहे. आधीच तीला शरीर प्रदर्शनाची फार हौस, मग त्या मिकाला का दोश द्यावा. कोल्हापुरची केस मिटली नाही तोच हे नवे खूळ. कायम पडद्यावर असवे, गीतवाहिनिवर आणि नाही जमले तर वृत्तवाहिनिवर. लोकांनी तिला विसरू नये म्हणजे झाले. बहुतेक सगळी जहिरातबाजी आहे. मिकाला पण आजकाल publicity हवी आहे, टेपस खपत नाहीत, नवीन pop singers आल्यामुळे याला मागणी नाही. मोठा भाऊ पण आता मदत करण्यालायक नाही. ही publicity काही देऊ शकली तर बरे.

कमी कपडे घालून टीव्हीवर नाचणारी मुलगी.. सेटवर येण्यासाठी काय करत असेल? एक chance मिळावा म्हणून काहीही करायला तयार मुलींची कमी नाहिये आजकाल. बहुतेक ती चणचण आधी पण नसावी.. फक्त आता ते प्रेक्षकांनाही बघायला मिळत आहे. पण हे मात्र बरे झाले की तिकीट प्रेक्षक काढणार आणी मजा मात्र फक्त निर्माता घेणार असे आता होणार नाही. ग्राहक अधिकार कायद्याचा विजय असो!!!

सगळीकडे आता अमेरीकन जीवनशैली आहे..... अमेरीकन माणूस जर नागवा नाचला तर भारतात नक्कीच नागवे नाचतील. ही राखी सावंत काही भारतीय डोक्यातुन आली का? अमेरीकेत Hip Hop गाण्यात कृष्णवर्णीय मुली अंग हलवीत Booty Dance करतात, भारतात ते नक्कल करतात. जर भारतीय गाण्यात हे झाले नाही तर लोक hip hop बघणारच ना!! मग काय हे सगळे "Demand Supply Chain" आहे. जे खपते तेच पीकते असा जमाना आहे. अहो कोणी काय करावे हा आपापला प्रष्ण आहे. मी पण अमेरीकन मताचा आहे. दाखवणाऱ्याला काही वाटत नाही, बघणाऱ्याला काय बोलणार? मला अचंबा वाटतो तो त्या मुलींच्या आईबापांचा. काय वाटत असेल त्यांना? आई म्हणत्त असणार "ही बिकिनी की नाही राखीची आवड्ती हो!!, सगळे दिसते पण काहीच दिसत नाही. अहो त्या कोल्हापूरच्या शोला हीच घातली होती". वडीलांनी तर scrapebook बनवली असेल. हा मिका बरोबरचा, हा तिच्या दुबईतल्या खाजगी पार्टी मधला. "तीला प्रेमात Item Girl of Bolywood म्हणतात बरे". आश्चर्य आहे.
Rahul Mahajan, Son of BJP top gun Pramod Mahajan, he is really a mole in our society. There are always time when everybody gets their bad times in their life, that does not entitle you to make such acts that will ruin image of your family. I am not trying to glorify late Pramod Mahajan here. He was a politician in himself, so without any comments, Pramod Mahajan was never clean. What culture and values does Rahul carry forward when he drinks and get highly intoxicated with cocaine, just before his father's funeral?

Rahul is really not a criminal here, everybody will try to point to him to make him feel guilty. Apperently, there can be another side to reality. There is a very great opportunist who worked much more cleverly and got Rahul framed with his act with drugs. Considering Rahul was already involved in drugs, he was an addict and also a dealer, spoiling thousands of lives with cocaine. This fact never came out in public until he was eligible for a public figure. There is a very high chance that Rahul was next candidate in the list for Constituency in Mumbai. He would have won the race to Loksabha with much more promisingly than his father. Pramod Mahajan has been to parliament but mostly in Rajyasabha. But Rahul would have won the elections very easily with his father's name and sympathy wave created by brutal murder of his father. Major threat to Rahul was inside BJP than other parties. The politics make it all dirty.

Rahul is definitely not innocent, he is liable for a lifetime career ruin. Bigger concern is there is higher society "rich" youth who is addicted with drugs. They have money and power to commit and hide such crime. Rahul's arrest does not mean anything right now. He will not be able to run election in close future, mob has short memroy people will forget his act. They will forgive him as recoverer. They will elect him with same spirit. Who will solve this drug crime then? Do you think he will stop this drugs or their dealing after he is out of payback in jail? Mostly his well wishers will blame it on Sahil Zaroo. "Sahil supplied and got Rahul framed" will be the headline very soon.

There is a lot to think about, why Pramod's real brother shot him? How can Rahul got involved in drugs? Why there is Gopinath Munde forced doctors to give forged medical reports?
आज माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. weblog मराठीत लिहायला शिकत आहे. लिहायला वेळ लागतो पण ठीक आहे, सवय होइल....
Newer Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ▼  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ▼  June (6)
      • आंधळी अमेरिका
      • भूक
      • DaVinci Code आणि भारतीय धर्मनिरपेक्षता
      • राखी सावंत आणि ७ च्या आत घरात
      • Rahul Pramod Mahajan - One big social mole
      • खूप खूप दिवसांची इच्छा!!!

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose