मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT
काही वर्षांपुर्वी एका मित्राचे आई वडील अमेरीका फिरायला आले होते, जन्माने मारवाडी हा मित्र. आई वडीलांनी आयुष्यात पहिल्यांदा जोधपुर सोडले आणि सरळ अमेरीकेत आले. त्यांच्या बरोबर न्युयॉर्कला जाण्याचा प्रसंग आला आणि मी घाबरलॊ, एवढा तर मी मलेशियात सापाचे सार (snake soup) पिताना पण घाबरलॊ नव्हतो. त्या चार दिवसांच्या प्रवासात काका-काकूंनी तीन उपवास केले किंवा करावे लागले. जन्मात कधी अभक्ष भक्षण न केलेल्याना हा अनुभव म्हणजे सामाजीक, मानसिक आणि सांस्कृतीक धक्का होता. त्यांना देसी मध्ये जेवायला घेऊन गेलॊ, अहॊ त्यांना त्या बफ़ेवर दुसऱ्या बाजूला असणारे मांसाहारी पदार्थ बघुनच भोवळ यायला लागली. काका उठूनच गेले.... यात त्यांचा दोष नाही. पण अमेरीकेत असे हॊणे सहाजीक आहे. आता प्रश्न राहीला खाण्याचा, इच्छा असेल तर अमेरीकेत पण शाकाहारी पोटाचे लवकरच ढेरपोट नक्कीच हॊऊ शकते.


नातवाला/नातीला पहिला दात आल्यावर आजोबा मटण घेऊन येतात, अगदी सालंकृतपणे त्याला मांसाहारी बनवणा~या घरातला मी. ते एवढेसे पिल्लु नळी चोकुन आतले ऒढायचा प्रयत्न करते, आजोबा किंवा आजी नळी फोडुन आतले मऊ मांस खाऊ घालतात. असे आजोबा पण एथले मांसाहारी पदार्थ नको म्हणतील.Big Mac (TM) from McDonaldsमी मलेशियात प्रथम जेव्हा मॅकडोनाल्ड मध्ये बिग मॅक खाल्ला, बस्स तेव्हापासुन काही ठेवले नाही, खाण्यासाठी पाळलेले सारे खाऊन झाले. भारतातली मॅकडोनाल्ड आवड बघुन आश्चर्य वाटते, अरे ज्यांनी बिग मॅक खाल्ला नाही त्यांनी अजुन मॅकडोनाल्ड मध्ये काहीच खाल्ले नाही. ते असो. अमेरीकेत सगळ्यात आवडते मांस म्हणजे "beef", गायीचे, ब~याचदा डुकराचे. आवडते म्हणजे हॅमबर्गर, किंवा हॉट डॉग. किती प्रकारचे मांस हो. चिकन, बीफ, सॉसेज, बेकोन, पोर्क, हॅम. भारतीय माणसाच्या जीभेला हाड नसेल, पण धर्म नक्की असतो. बहुतेक भारतीय जगभर फिरतात, त्यांना पैशाचा विचार नसतो, फक्त विचार असतो, जेवणाचा. भारतात, पनीरने बनवलेला अमेरीकन वडापाव (बर्गर हो!) विकणारा रोनाल्ड मॅकडोनाल्ड, अमेरीकेत मात्र सगळे मांसाहारीच विकतो. जर तुम्ही शाकाहारी असाल तर घरूनच जेवण घेऊन गेलेले बरे. हिंदु धर्माचा गाय खाऊ शकत नाही, मुसलमान पोर्क खात नाही, आणि हलालशिवाय काहीच नाही. एकंदरीत सगळीकडे भारतीय वंशाच्या लोकांना अमेरीकेत जेवणाचा त्रास होतो. पन काहीजण ठराविक दिवशी खात नाहीत, तर काहीजण ठराविक महिन्यात. काहीजण तर कधीच खात नाहीत. अमेरीकन माणसाला हे शास्त्र समजवण्याचा प्रयत्न करा, जमले तर मला पण सांगा कसे समजवलेत ते.

आजकाल तरी बरेच सुधारले आहे, बहुतेक देसी लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे. अगोदर शाकाहारी म्हणजे काय हे ब~याच अमेरीकन लोकांना कळतच नसे. बीफ म्हणजे त्यांच्या मते "veg" असायचे. अजुनही माझे बरेच अमेरीकन मित्रमंडळी शाकाहारी जेवणाची कल्पनाच करू शकत नाहीत. Foie Gras from Flickr आई लहानपणी म्हणायची, "जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारू नयेत, अन्नाचा अपमान होतो. पानात वाढलेले सारे खावे." आता नाही, ही शिकवण थोडी घरापुरतीच वापरावी. अशा या दुष्ट अमेरीकेत, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल तर जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारणे ही तुमची गरज आहे. Foie Gras म्हणुन बघा जमते क बरे, खरा उच्चार "फ्वा ग्रा". झकास, चवीष्ट पाकपदार्थ अर्थातच तोंडाला पाणी. पाणी येण्या अगोदर काय आहे ते समजुन तर घ्यायला नको का? खुप चरबी असलेल्या बदकाच्या यकृतापासुन बनवलेली ही पाकक्रीया अगदी चविष्ट असते. अशा अनेक पाकक्रिया आहेत ज्या माहीत केल्या तर नको वाटतात. त्यामुळे प्रश्न विचारा, अंडे, मांस किंवा अजुन काही तुम्हाला चालत नसेल तर वेटरला स्पष्ट सांगणे फार आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात सलाड खाल्ले की झाले, पण त्यावर जे dressing ओततात त्याचे काय? बरेच जणांना इटालीयन किंवा मेक्सिकन जेवण आवडायला लागले आहे. हवे तर शाकाहारी आणि जमले तर थोडेसे तीखट पण जेवयाला मिळते. पण अमेरीकेत काही उडुपी सारखी उपहारगृहे पुर्ण शाकाहारी जेवण बनवतात. तुम्हाला "veggie burger" मिळॆल पण तो आणि हॅमबर्गर एकाच तव्यावर बनवला नसेल कशावरून? मॅकडोनाल्डच्या फ़्राईज मध्ये बीफ असते हे आता सगळ्यांना माहीत असेल. तर मग तुम्ही थाई उपहारगृहे पण ढुंढाळु शकता. तेथे पण तुम्हाला काही मिळण्याची शक्यता असते.


आजकाल वीगन (Vegan) हा नवा प्रकार आला आहे, हे लोक प्राणीजन्य काहीही खात नाहीत, वापरत नाहीत. मध, दुध किंवा त्यापासुन बनवलेले पदार्थ पण खात नाही. नशीब असे काही भारतात नाही. आपण आपली साधी माणसे. भारतातले अमेरीकन प्रेम लक्षात घेता तेथे पण वीगन सापडत असतीलच. तुम्हाला जर असे काही पाळायचे असेल तर तुम्ही खुशाल पाळा. मी मात्र पुर्ण मांसाहारी रहायला तयार आहे. माझे काही मित्र ज्यांना beef खुप आवडते, अशांच्या घरी समजले की beef खातो, आईला समजवताना हे म्हणे "अगं आई, भारतातली गाय निषिद्ध आहे, अमेरीकेतली नाही". हे आमचे नवे संगणकी मित्र ज्यांना सगळीकडे फक्त "if... else.." अशा आज्ञावल्याच दिसतात, म्हणे की " if(!India) hiduism="allow everything" else hinduism="strict" ". हे जरा संगणकीवाल्यांना समजेल. आई म्हणते तुला काय हवे ते कर, पण आमच्या समोर नकॊ आणि आम्हाला सांगु पण नकॊ. काही झाले तरी शेवटी निर्णय आपला आहे. शाकहारी आणि मांसाहारी ही फक्त जीभेची आवड आहे, धर्मात काय आहे त्याचा विचार करा, जर मानत नसाल तर जीभेचा करा. पण असे खा की ज्यामुळे निरोगी रहाल, आणि खुप वर्षे जगाल. धाराची जाहिरात आठवली, "हम कमाते किस लिये है? खाने के लिये". त्यामुळे आयुश्यभर खाता यावे, शारीरिक बंधनाने अर्धे आयुष्य अळणी खावे लागणार असेल तर आजच जीभेवर ताबा नको का?
ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका....
हे गाणं आम्ही लहानपणी गणपती विसर्जनला गात असु. वडिल सुरुवात करायचे आणि आम्ही सर्व मागुन सुर लावायचो.काल मराठी चित्रपट जत्रा ( दिग्दर्शक केदार शिंदे) बघितला. त्याची सुरुवात ह्या गाण्याने झाली.मराठी चित्रपटात item song सारख्या गाण्याने सुरुवात म्हणजे आम्ही थोडं चाटच पडलो. पण गाण बघितल्यावर मात्र खरच नाचावसं वाटू लागलं... अगदी गणपती विसर्जनला नाचतो ना तसं..
हे गाणं तुम्हासर्वांसाठी जे अशा गाण्यांवर नाचायला केव्हाही तयार असतात.


इथे बघा - ye go ye ye maina
फिरतीवर असणारे जाणतात दहशतवादाचे परिणाम. विलायतेत कोणीतरी पकडला गेला की विमानात रासायनिक द्रव्ये वापरुन स्फोट करणारेत म्हणून. अमेरिका लगेच जाग्रुत झाली. विमानात आणि विमानतळावर द्रव्य स्वरुपातले काहीही घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. "जीवनावश्यक" पाणीसुद्धा घेऊन जायला मनाई झाली. आज सकाळी CNN वर बघत होतो, व्यावसायीकतेची परकोटी झालेल्या अमेरीकेत फक्त तीन दिवसात नवीन पद्धतीचे द्रव्य रसायने सापडवणारे scanners आले आहेत. प्रत्येक विमानतळावर ते लवकरच दिसु लागतील. ९११ नंतर अमेरीका दर वर्षी अब्जोवधी डॉलर फक्त हवाई सुरक्षेवर खर्च करते आहे मी बाकीच्या देशांबद्दल बोलतच नाहीये. का होते आहे हे सारे?

चोर कायम पोलीसापेक्षा ४ पाऊले पुढे असतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही कडक सुरक्षा ठेवा, जगातले चोर कमी होणार नाहीत. प्रत्येक सामाजीक व्यवस्थेने मागची हजारो वर्षे समाजातून वाईट गोष्टींच्या निर्मुलनासाठी वाया घालवली का? पण हे निर्मुलन कधी झालेच नाही ना? चोर कायम नव्या प्रकारांच्या शोधात असतो. चोर काय आणि दहशतवादी काय, दोघांचा धर्म एकच, जात वेगळी. दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाला वैतागलेले असतात, आणि समाजावर सूड उगवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. कोणी देशाप्रेमाच्या नावावर, कोणी फक्त पैशासाठी.

मग हे थांबणार कसे? "हम ईट का जवाब पत्थर से देंगे।" या नियमाने प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते. पण माझ्यामते, कोणी काही म्हणो, अमेरीकेने जगभर लोकांना दुखावले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात लोक दुखावले जातात, जर ते स्वभावाने सनातनी असतील तर ९११ होते. प्रत्येक जण झाले गेले विसरून जा अशा मताचा नसतो. बदल्याने उठतो. देशप्रेमाच्या नावावर लोकांना दहशत निर्माण करतो. "जिहाद" आणि "दहशतवाद" याच्यात अगदी बारीक फरक असतो. तो जर बघायचा नसेल तर त्याला अजुन एखादा गांधी जन्माला यावा लागेल. ज्याला दबलेला/दुखावलेला देश/धर्मप्रेमी "जिहाद" म्हणतात त्याच भावनेला साम्राज्यवादी .. दाबणारा ... किंवा स्वतःला भारी समजणारा दहशतवादी म्हणतो. आठवा, आपल्या मदनलाल धिंग्राला, सावरकरांना इंग्रज दहशतवादीच म्हणाले होते ना? आज स्वराज्यानंतर ते स्वातंत्र्यवीर झाले ना? इटलीतला गॅरिबाल्डीची पण कथा अशीच. मला असे अजिबात म्हणायचे नाही की ओसामा हा स्वातंत्र्यवीर आहे, तो नक्की दहशतवादीच आहे.... फरक फक्त नजरेचा असतो.... गांधीवादी असल्याने म्हणा पण माझ्या नजरेत तो खुनी आहे, दहशतवादीच आहे.... फक्त नजरेचा फरक.

आज इराक मध्ये दररोज लोक मरत आहेत, आधीपण मरत होते, कमीतकमीत अगोदर आपण सद्दामला दोषी ठरवू शकत होतो, आता कोणाला ठरवणार? इराक, अफगाण... असे अनेक देश या नवीन प्रकारच्या साम्राज्यवादाच्या आहारी जात आहेत. भारत, पाकीस्तान, इस्त्राइल पण अणुशक्ती राबवत होते ना? पण आता नवीन त्रास इराणला होणार आहे असे दिसते आहे. देशामागून देश अमेरीकन मांडलीकत्व स्विकारत आहेत. असे जर होत राहीले तर नवीन दहशतवादी निर्माण होतच राहतील. अमेरीकेची ही इतर देशांमधील ढवळाढवळ थांबली नाही तर असे स्फोटवादी परत परत येत राहतील. अमेरीकेला धमकवणारे दहशतवादी पण घुसखोर पाकचे असुन "पाक" कसे?

मी गांधी तत्वज्ञानाचा चाहता आहे त्यामुळे कधी वाटते की जर अमेरीकी राष्ट्रपतींनी जर जाहीर माफी मागितली की "भुतकाळात आमच्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफी असावी, लोकांचे हीत हेच ध्यानात ठेवून आम्ही जे काही केले त्यामुळे जर कॊणी दुखावले गेले असेल तर क्षमा असावी". यामुळे जर अमेरीकन जनतेचे जीव आणि करदात्यांचे अब्जो डॉलर वाचणार असतील तर काय हरकत आहे? हेच "Aireline Securty/ Airport Security" चे अब्जो डॉलर जर चांगल्या कामाला वापरता येतील. कदाचीत ते अशा दहशतवादी देशांमध्ये आशा उत्पन्न करायला वापरता येतील ना? मला लहानपणापासून एक शिकवले आहे की माफी मागितल्याने कॊणीही लहान होत नसतो. पण याच्याने प्रश्न सुटले तरे बरे नाही तर "तेल ही गेले आणि तूप ही" असे व्हायचे.

मला हे पण माहीत आहे की काही प्रश्न माफी मागुन सुटणारे नाहीत. मला सांगा पाकीस्तानची माफी मागुन काश्मीरातला प्रश्न सुटला तर किती बरे होईल नाही? मग कमीत कमी स्वतःच्या ताकतीवर असे विषय सोडवायची हिम्मत पहिजे. जसा इस्त्राइलने जसा हिजबॊला स्वतःच सोडवायचा निर्णय घेतला. आपल्या घरचा प्रश्न बराच अवघड जागी दुखणे आहे. जितके दिवस जातात तितके ते चिघळते, अशाच चिघळलेल्या जखमेसाठी दोन अणुशक्ती देश ज्यावेळी जीवावर उठतात तेव्हा जगाला विचार करावा लागतॊय. खरे सांगायचे तर, मला या ओसामा आणि अमेरीकेतल्या भांडणाशी काही कर्तव्य नाही. मुंबईतल्या स्फोटांनी मरणारी लोक्संख्या माझी आपली होती/आहे. ती काही करुन थांबायला हवी. मानवतावादी विचार करुन निष्पाप लोक जगात कोठेही मरु नयेत असे म्हणणे शोपे आहे. पण जगात सगळीकडे बघा, अमेरीकन मेला तर अमेरीकेने जग वर खाली करायचा प्रयत्न केला ना? पण मुंबईत मरणारी जनता त्यांना कोणीच नाही. अरे जगाने आपले प्रश्न सोड्वायचे अशी अपेक्षा जे भारतीय सरकार ठेवते आहे, ती चूक आहे. दहशतवाद कधीच संपणार नाही, कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच. पण तो संपवण्यासाठी जगाची मदत मागणे आणि त्यांनी काही करावे अशी अपेक्षा करणारे सरकार फक्त भारतातच बघायला मिळेल....

देशाबाहेर देशप्रेमाचा "उबाळ" आणणारा हा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट.... कितीही देशाबाहेर राहून झाले तरी, आजचा दिवस फार महत्वाचा. आज छान वाटते, भारतीय असल्याचा अभिमान आज उफाळून बाहेर येतो. ज्याला बघुन मन भरुन येते त्या झेंडयाबद्द्ल थोडी माहीती एथे बघा.

वन्दे मातरम्


सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
बहुबलधारिणीं नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीं मातरम्॥
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्य श्यामलां मातरंम् .
शुभ्र ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम
फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् .
सुखदां वरदां मातरम् ॥

सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद कराले
द्विसप्त कोटि भुजैर्ध्रत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥

तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम् ॥

श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम् ॥

बंगालीत तर अजुन गोड...


বন্দে মাতরম্
সুজলাং সুফলাং মলয়জশীতলাম্
শস্যশ্যামলাং মাতরম্॥

শুভ্রজ্যোত্স্না পুলকিতযামিনীম্
পুল্লকুসুমিত দ্রুমদলশোভিনীম্
সুহাসিনীং সুমধুর ভাষিণীম্
সুখদাং বরদাং মাতরম্॥

কোটি কোটি কণ্ঠ কলকলনিনাদ করালে
কোটি কোটি ভুজৈর্ধৃতখরকরবালে
কে বলে মা তুমি অবলে
বহুবলধারিণীং নমামি তারিণীম্
রিপুদলবারিণীং মাতরম্॥

সুজলাং সুফলাং মলয়জশীতলাম্
শস্যশ্যামলাং মাতরম্॥
শুভ্রজ্যোত্স্না পুলকিতযামিনীম্
পুল্লকুসুমিত দ্রুমদলশোভিনীম্
সুহাসিনীং সুমধুর ভাষিণীম্
সুখদাং বরদাং মাতরম্॥

কোটি কোটি কণ্ঠ কলকলনিনাদ করালে
কোটি কোটি ভুজৈর্ধৃতখরকরবালে
কে বলে মা তুমি অবলে
বহুবলধারিণীং নমামি তারিণীম্
রিপুদলবারিণীং মাতরম্॥

তুমি বিদ্যা তুমি ধর্ম, তুমি হৃদি তুমি মর্ম
ত্বং হি প্রাণ শরীরে
বাহুতে তুমি মা শক্তি
হৃদয়ে তুমি মা ভক্তি
তোমারৈ প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে॥

ত্বং হি দুর্গা দশপ্রহরণধারিণী
কমলা কমলদল বিহারিণী
বাণী বিদ্যাদায়িনী ত্বাম্
নমামি কমলাং অমলাং অতুলাম্
সুজলাং সুফলাং মাতরম্॥

শ্যামলাং সরলাং সুস্মিতাং ভূষিতাম্
ধরণীং ভরণীং মাতরম্॥

तुम्हाला हा जर अमिताभचा हम मधला डायलॉग आठवत असेल तर सांगतो, भारताबाहेर अमेरीकेत दोन प्रकारचे भारतीय असतात, एक जे जन्माने भारतीय असतात, दुसरे फक्त भारतात जन्मलेले असतात. मी तर भारतात बाहेर जन्मलेल्यांना भारतीय समजतच नाही. अहो त्यांना भारत फक्त "Third World Country" वाटतो. ते हिंदी चित्रपटात दाखवतात तसे भारताबाहेर जन्मलेले आणि भारतावर प्रेम करणारे मला अजुन भेटायचे आहेत. आई-वडील किंवा आजी-आजोबा अमेरीकेत पोटापाण्यासठी आलेले, आणि आता ते म्हणतात म्हणुन ४-५ वर्षात देशात येतात. रंग बदलता येत नाही आणि आडनाव तर लगेच दाखवते ... तु तर देसी. पण अशांनी तोंड उघडले अरे हा तर ABCD (America Born Confused Desi). त्यांचा काय दोष जन्मले इथॆ ... शिकले इथे. आई-बापाने खूप प्रयत्न केले पण ते काही बदलले नाहीत.

ते असो, पण आपले कीडे दोनच प्रकारचे, माझा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक मित्र होता. पंजाबी ... त्याला अमेरीकेचा भलताच शौक, म्हणायचा, अमेरीकेत जायचे, खुप कमावयचे, मग खुप पुण्य कमवता येईल, जास्त पुण्य म्हणजे एक तर स्वर्ग किंवा पुढचा जन्म चांगल्या ठिकाणी, म्हणजे अमेरीकेत. दोन - तीन जन्मात नक्की स्वर्ग मिळणार. माझ्या अगोदर आला, पुण्य किती कमावले ते माहीत नाही पण त्याच्या मते स्वर्गाच्या जवळ आला. असे बरेच आहेत हो. ज्यांना भारत म्हणजे घाणच दिसते.या लोकांची चिडचिड होते. सर्वात वाईट भारतीय जमात म्हणजे ही. अमेरीकेत अजून ग्रीन कार्ड नाही, भारतात जायची इछा नाही. गोरी कातडी म्हणजे यांना फार प्रिय. अरे देसी दिसला रे दिसला की यांचे चेहरे बदलतात. का ते यांनाच माहीत. यांचे संकट असे की हे ग्रीन कार्डच्या रांगेत उशीरा आले. आता ती रांग ५-६ वर्षे लांब असल्याने मनातच आपला देश दुर दिसू लागतो. धुळ -धूर-पाणी सगळेच नको वाटते. मनापासुन नको वाटते त्यांना. "ऎसा लगता है तो लगने मैं कोई बुराई नही। ..." काही दोष नाही. परीस्थिती वाईट बनवते. देशात एवढी गरीबी आहे, भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीला स्पर्धा आहे. भारतातले मित्र छान म्हणतात, कारण अमेरीका अजुनही प्रतिष्ठाप्रतीक आहे. जरी पुण्यात प्रत्येक घरातला कोण ना कोण अमेरीकेत आहे. आज काल सगळ्या मुली लग्ना अगोदर GC आहे का विचारतात. यांना लग्नासाठी GCवाला/वालीच मिळावी लागते, नाहीतर त्या नवविवाहीत जोडप्याचे खूप हाल व्हायची संभावना दाट असते. यांची लग्ने "Arranged" झाली तर त्यांच्या आईने अमेरीकेत असणारी(रा) शोधलेला(ली) असते. आजकाल सगळ्या मराठी नट्यापण अमेरीकेतच आहेत. इथे चितळेच्या बाकरवडी पासुन हाजमोलाच्या गोळीपर्यंत सगळे मिळते. सारे भेसळ शून्य. "एक्सपोर्ट क्वालिटी", लोकसंख्या कमी त्यामुळे लोकांना लोकांची किम्मत आहे. जर नीट बघितले तर आयुष्य एकंदरीत चांगले आहे. GC असेल तर पगार पण चांगलाच मिळतो. इथल्या वर्षाच्या बचतीमध्ये भारतात घरे बनवता येतात. माझे बरेचसे नातेवाईक भारतात आहेत, त्यामुळे मी भारतात जायची इच्छा करतो. पण मला माहीत नाही कसे, यांचे खुप नातेवाईक पण अमेरीकेतच असतात. भारतात गेले तरी, अर्थात सुटीलाच, तन साथ देत नाही, सर्दी-पड्से परत येईपर्यंत सुटत नाही. याप्रकारच्या लोकांनी फक्त अमेरीका बघितलेली असते, त्यामुळे सिडनी, सिंगापोर, किंवा जपान खुपशा गोष्टीत अमेरीकेपेक्षा पुढे असु शकतो हे ते कधीच मानु शकत नाहीत. पासपोर्ट अजुन भारतीय असला तर तन-मन-डॉलररुपी धनाने हे अमेरीकन असतात.

दुसरा कीडा हा भरकटलेला, पोटापाण्यासाठी अमेरीकेत आलेला. भारतात बरेच मित्र-मैत्रिणी GRE-TOEFL चा अभ्यास करतात म्हणून आपणही करणारा. अमेरीकेत आल्याच्या पहील्या दिवसापासुन परत जाण्याच्या गोष्टी करणारा. थोडा पैसा कमवून जाईन असे मनी बाळगणारा. कदाचीत, एखाद्या प्रतिष्ठीत भारतीय संगणकीय कंपनीतुन अमेरीकेत आलेला. GC चे महत्व यांना उशीरा कळते, जर कळले तर त्या मॄगजळाच्या लागतात, बरेचदा डोळे उघडेपर्यंत व्हीसाची ६ वर्षे संपत आलेली असतात, मग एखादे मूल अमेरीकेत जन्माला घालतात. ते मूल अमेरीकन नागरीक असते, त्याला नंतर फायदा होईल असा प्रांजळ भाव मनी ठेवतात. मूलं लवकर मोठी झाली तर ती भारतात राहू शकत नाही. मग कुठे कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये नागरीकत्व पण मिळते का बघतात. काही नाही झाले तर भारतीय आहोत असे म्हणत भारतात जातात. जाण्या अगोदर यांची चिडचिड बघवत नाही. जे येणकेण प्रकारेण राहतात, ते GC ची वाट बघत म्हातारे होत राहतात. पण तोंडी कायम परत जाण्याच्या कथा असतात, यांचे परत जाण्याच्या अटीला हवे इतके पैसे कधीच साठत नाहीत. मग दर वर्षी सहल म्हणुन देशाला जातात, येताना मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके नक्की आणतात. पुण्यातल्या तुळशीबागेत खरेदी केलेली तोरणे भाड्याच्या घराच्या दारावर लावून मराठीपण आणतात. यांना परदेशात देशाचा खुप पुळका येतो, त्यामुळे बरेच देशी सणवार पण करतात, सत्यनारायण काय, आणि दिवाळीत घरावर कंदील काय. मुले जर शाळेत जाणारी असतील तर त्यांना गणेशोत्सवाऎवजी, नाताळाचे जास्त कौतुक असते. जर लग्न झाले नसेल (अर्थात लग्न झाले असेल तरीसुद्धा) तर अमेरीकन उघड्या अंगाच्या मुली बघण्याची गम्मत न्यारीच असते. जमले तर अमेरीकन पटवायची इच्छा कायम मनी असते. आई-वडिलांना आवडणार नाही अमेरीकन सुन असे म्हणुन काही जण मन मारतात, काही जण आपल्या जमणार नाही असे मनी समजून घेऊन फक्त देसीच जमतात का ते बघतात. काहींचे नक्की असते की "Arranged" च करणार. काही ABCD मिळतात का ते पण बघतात, एक तीर मॆं दो पंछी. जमले नाही तर भारतात आईने जीवनसाथी - रोहिणी अशा ठिकाणी प्रयत्न चालु ठेवलेले असतात. scanned photo गठ्ठ्याने येतात. सारासार विचार हॊतो, भारतात लग्न करून तीच्या/त्याच्या बरोबर परत अमेरीकाप्रयाण करतात. मनाने नसले तरी देहाने अमेरीकन झालेले असतात.

माझ्यामते, अमेरीका हा एक रॊग आहे, मलाही याची लागण झाली आहे, काही जणांवर परीणाम उठून दिसतात, काही जणांवर फक्त मानसिक जखमा दिसतात. याला मात्रा नाही, भारत यांचा रहात नाही, आणि अमेरीका यांची होत नाही. काहीही म्हणा, वय वाढू लागलं की आठवणी घिरट्या घालु लागतात. मुले अमेरीकेची झालेली असतात, तुम्ही मात्र मनाच्या कुठेतरी कोनाड्यात भारतीय असता. मला माहीत नाही याला उपाय काय, पण यातुन सुटका फारच कमी जणांची होते. पोटापाई त्रिशंकू होणारी ही जमात अमेरीकेत बरीच मोठी आहे, आणि दरदिवसागणी ही शिरगणती वाढत आहे....
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ▼  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ▼  August (5)
      • भारतीय वंशाचे शाकाहारी खवय्ये!!
      • ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका
      • दहशतवादी जग
      • वन्दे मातरम्
      • दुनिया मै दो तरह के किडे होते है।
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose