दहशतवादी जग

फिरतीवर असणारे जाणतात दहशतवादाचे परिणाम. विलायतेत कोणीतरी पकडला गेला की विमानात रासायनिक द्रव्ये वापरुन स्फोट करणारेत म्हणून. अमेरिका लगेच जाग्रुत झाली. विमानात आणि विमानतळावर द्रव्य स्वरुपातले काहीही घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. "जीवनावश्यक" पाणीसुद्धा घेऊन जायला मनाई झाली. आज सकाळी CNN वर बघत होतो, व्यावसायीकतेची परकोटी झालेल्या अमेरीकेत फक्त तीन दिवसात नवीन पद्धतीचे द्रव्य रसायने सापडवणारे scanners आले आहेत. प्रत्येक विमानतळावर ते लवकरच दिसु लागतील. ९११ नंतर अमेरीका दर वर्षी अब्जोवधी डॉलर फक्त हवाई सुरक्षेवर खर्च करते आहे मी बाकीच्या देशांबद्दल बोलतच नाहीये. का होते आहे हे सारे?

चोर कायम पोलीसापेक्षा ४ पाऊले पुढे असतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही कडक सुरक्षा ठेवा, जगातले चोर कमी होणार नाहीत. प्रत्येक सामाजीक व्यवस्थेने मागची हजारो वर्षे समाजातून वाईट गोष्टींच्या निर्मुलनासाठी वाया घालवली का? पण हे निर्मुलन कधी झालेच नाही ना? चोर कायम नव्या प्रकारांच्या शोधात असतो. चोर काय आणि दहशतवादी काय, दोघांचा धर्म एकच, जात वेगळी. दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाला वैतागलेले असतात, आणि समाजावर सूड उगवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. कोणी देशाप्रेमाच्या नावावर, कोणी फक्त पैशासाठी.

मग हे थांबणार कसे? "हम ईट का जवाब पत्थर से देंगे।" या नियमाने प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते. पण माझ्यामते, कोणी काही म्हणो, अमेरीकेने जगभर लोकांना दुखावले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात लोक दुखावले जातात, जर ते स्वभावाने सनातनी असतील तर ९११ होते. प्रत्येक जण झाले गेले विसरून जा अशा मताचा नसतो. बदल्याने उठतो. देशप्रेमाच्या नावावर लोकांना दहशत निर्माण करतो. "जिहाद" आणि "दहशतवाद" याच्यात अगदी बारीक फरक असतो. तो जर बघायचा नसेल तर त्याला अजुन एखादा गांधी जन्माला यावा लागेल. ज्याला दबलेला/दुखावलेला देश/धर्मप्रेमी "जिहाद" म्हणतात त्याच भावनेला साम्राज्यवादी .. दाबणारा ... किंवा स्वतःला भारी समजणारा दहशतवादी म्हणतो. आठवा, आपल्या मदनलाल धिंग्राला, सावरकरांना इंग्रज दहशतवादीच म्हणाले होते ना? आज स्वराज्यानंतर ते स्वातंत्र्यवीर झाले ना? इटलीतला गॅरिबाल्डीची पण कथा अशीच. मला असे अजिबात म्हणायचे नाही की ओसामा हा स्वातंत्र्यवीर आहे, तो नक्की दहशतवादीच आहे.... फरक फक्त नजरेचा असतो.... गांधीवादी असल्याने म्हणा पण माझ्या नजरेत तो खुनी आहे, दहशतवादीच आहे.... फक्त नजरेचा फरक.

आज इराक मध्ये दररोज लोक मरत आहेत, आधीपण मरत होते, कमीतकमीत अगोदर आपण सद्दामला दोषी ठरवू शकत होतो, आता कोणाला ठरवणार? इराक, अफगाण... असे अनेक देश या नवीन प्रकारच्या साम्राज्यवादाच्या आहारी जात आहेत. भारत, पाकीस्तान, इस्त्राइल पण अणुशक्ती राबवत होते ना? पण आता नवीन त्रास इराणला होणार आहे असे दिसते आहे. देशामागून देश अमेरीकन मांडलीकत्व स्विकारत आहेत. असे जर होत राहीले तर नवीन दहशतवादी निर्माण होतच राहतील. अमेरीकेची ही इतर देशांमधील ढवळाढवळ थांबली नाही तर असे स्फोटवादी परत परत येत राहतील. अमेरीकेला धमकवणारे दहशतवादी पण घुसखोर पाकचे असुन "पाक" कसे?

मी गांधी तत्वज्ञानाचा चाहता आहे त्यामुळे कधी वाटते की जर अमेरीकी राष्ट्रपतींनी जर जाहीर माफी मागितली की "भुतकाळात आमच्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफी असावी, लोकांचे हीत हेच ध्यानात ठेवून आम्ही जे काही केले त्यामुळे जर कॊणी दुखावले गेले असेल तर क्षमा असावी". यामुळे जर अमेरीकन जनतेचे जीव आणि करदात्यांचे अब्जो डॉलर वाचणार असतील तर काय हरकत आहे? हेच "Aireline Securty/ Airport Security" चे अब्जो डॉलर जर चांगल्या कामाला वापरता येतील. कदाचीत ते अशा दहशतवादी देशांमध्ये आशा उत्पन्न करायला वापरता येतील ना? मला लहानपणापासून एक शिकवले आहे की माफी मागितल्याने कॊणीही लहान होत नसतो. पण याच्याने प्रश्न सुटले तरे बरे नाही तर "तेल ही गेले आणि तूप ही" असे व्हायचे.

मला हे पण माहीत आहे की काही प्रश्न माफी मागुन सुटणारे नाहीत. मला सांगा पाकीस्तानची माफी मागुन काश्मीरातला प्रश्न सुटला तर किती बरे होईल नाही? मग कमीत कमी स्वतःच्या ताकतीवर असे विषय सोडवायची हिम्मत पहिजे. जसा इस्त्राइलने जसा हिजबॊला स्वतःच सोडवायचा निर्णय घेतला. आपल्या घरचा प्रश्न बराच अवघड जागी दुखणे आहे. जितके दिवस जातात तितके ते चिघळते, अशाच चिघळलेल्या जखमेसाठी दोन अणुशक्ती देश ज्यावेळी जीवावर उठतात तेव्हा जगाला विचार करावा लागतॊय. खरे सांगायचे तर, मला या ओसामा आणि अमेरीकेतल्या भांडणाशी काही कर्तव्य नाही. मुंबईतल्या स्फोटांनी मरणारी लोक्संख्या माझी आपली होती/आहे. ती काही करुन थांबायला हवी. मानवतावादी विचार करुन निष्पाप लोक जगात कोठेही मरु नयेत असे म्हणणे शोपे आहे. पण जगात सगळीकडे बघा, अमेरीकन मेला तर अमेरीकेने जग वर खाली करायचा प्रयत्न केला ना? पण मुंबईत मरणारी जनता त्यांना कोणीच नाही. अरे जगाने आपले प्रश्न सोड्वायचे अशी अपेक्षा जे भारतीय सरकार ठेवते आहे, ती चूक आहे. दहशतवाद कधीच संपणार नाही, कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच. पण तो संपवण्यासाठी जगाची मदत मागणे आणि त्यांनी काही करावे अशी अपेक्षा करणारे सरकार फक्त भारतातच बघायला मिळेल....

Vishal Khapre

No comments: