मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

काही दिवसांपुर्वी वडिलांशी बोलताना पु. ना. ओक यांचा विषय झाला, त्यांनी लिहिलेले नेताजींच्या सहवासात हे पुस्तक मी वाचुन आता वर्षे झाली आहेत. सध्या नव्वदीतील या कु-प्रसिद्ध इतिहासाकाराने लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे. नेताजींच्या स्वभावातील अनेक बारकावे यात अगदी सहजतेने मांडले आहेत. जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा फार मोठा अचंबाच वाटला. नेताजीपेक्षा जास्त मोठा देशप्रेमी मला आठवत नाही, ज्यांनी स्वतंत्रतेचे कार्य स्वतःच्या हिमतीवर पुढे चालवले. मला अजुनही कधी समजले नाही की पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान कसे? जर नेताजींनी त्याच्या कित्येक वर्षे अगोदर स्वतंत्र भारताची स्थापना केली. त्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. ते स्वतंत्र भारताचे पहीले सरसेनापतीपण होते ना?

मृत्यूशय्येवर ते म्हणाले, "मी नेताजी'
गुणा, ता. २९ - बाबा लालजी महाराज सव्वाशे वर्षांचे होऊन गेले... पण मृत्यूशय्येवर असताना त्यांनी स्वतःबद्दलचे गुपित उघड केल्याने एकच खळबळ उडाली. .....
..... ते म्हणाले, ""मीच नेताजी सुभाषचंद्र बोस.'' अर्थात हे गुपित स्वतःच्या मृत्यूनंतरच उघड करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी ही बाब उघड करण्यात आली आणि सरकारी तपासाची चक्रे फिरूही लागली.  
बाबा लालजी महाराज हे मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील सईजी गावात राहात होते. त्यांच्याबद्दल गावातील कोणालाच फारशी माहिती नव्हती. उलट ते स्वतःच म्हणत, "मी स्वतःबद्दलची माहिती उघड केली, तर येथे मला पाहायला जनसागर उसळेल.' प्रत्यक्षात बाबा २७ ऑक्‍टोबरला गेल्यानंतर सईजीमध्ये जनसागर उसळला नाही, तरी सरकारी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

आजची ही बातमी सरकारला जशी हलवणारी आहे, तशी अनेकांना प्रेरणापण देणारी आहे. आता बाबा लालजी खरेच नेताजी होते की नाही हे सरकार ठरवणार असल्याने, शेवटी सरकारी शोधकार्य ज्यावेगात होईल त्या वेगात होईल. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा" हे वाक्य कितीही दबवले तरी दबणारे नाही आणि त्याबरोबर लोकांची मने अजुनही प्रज्वलित होत रहातील.

आता अबु सालेम पण राजकारणात जर शिरणार असेल तर अहो मुंबईत दहशत कोण गाजवणार? काही वर्षांपुर्वी "DON" राजकारण्यांची मदत घ्यायचे आता राजकारणी "DON"ची मदत घेतात. पण जर डॉनच राजकारणी झाले तर कसे चालणार? उद्या दाऊद पण म्हणेल की "त्याला राजकारणात शिरायचे आहे, आणि तो म्हणे दुबईतुन निवडणुक लढवणार आहे." असे जर झाले तर भारतात खरेच दहशतराज येणार.  

सालेमला जायचंय यूपी विधानसभेत
[ Monday, October 23, 2006 12:52:32 am]
 
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गँगस्टर अबू सालेम याला आता आमदारकीचे वेध लागले आहेत. तो उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीत मुबारकपूर मतदारसंघात अपक्ष म्हणून उभा राहील, अशी माहिती सालेमचे वकील अशोक सरोगी यांनी दिली. 
सालेम सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. दिवाळी व रमझानच्या शुभेच्छा देणारी सालेमची २० हजार पोस्टर्स, बॅनर्स मुबारकपूरमध्ये सर्वत्र झळकले आहेत. त्यावर सालेमचे गांधी टोपी व कुडत्यातले फोटो आहेत. उत्तरप्रदेश स्थानिक शिवसेना शाखेने सालेमला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा सालेमच्या वकिलाने केला. इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत, असेही हा वकील म्हणाला. काही अभिनेत्री सालेमच्या प्रचाराला येणार असल्याचा दावा या वकिलाने केला खरा, पण त्यांची नावे मात्र घेतली नाहीत.

आता हा सालेम आर्थर रोडच्या कारागृहातुन निवडणुकीला उभे राहण्याच्या गोष्टी करत आहे, प्रचाराला अभिनेत्री  येणार आहेत, म्हणजे तो नक्की निवडुन येणार. अबु सालेम महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशचा असल्याने प्रचारात काही अडथळा येईल असे मला वाटते. माझी आता एकच इच्छा आहे की तेथे निवडणुक घेऊच नये, त्यामुळे करदात्यांची थोडीफार संपत्ती वाचेल. निवडुन आल्यावर अबु सालेम ती संपत्ती आपल्या खिशात घालेल यात अजिबात शंका नाही. जगभरातल्या सर्व वृत्तपत्रांनी त्याची ख्याती भारताचा एक दहशतवादी गुंड म्हणुन प्रसिध्द केली आहेच. जर हा निवडुन आला तर आपण एक नवीन प्रथा चालु केली" असा दावा तो करु शकेल. काही वर्षे गेली की भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात त्याचे नाव नक्की येईल....
दहावीच्या विद्यार्थ्यांना १६ गुणांचा "कारणे द्या" प्रश्न असेल की "अबु सालेमने राजकारणात केला."

नवी दिल्ली, ता. १९ - संसदेवरील हल्लाप्रकरणी दोषी ठरलेल्या महंमद अफझल गुरू याला उद्या (शुक्रवार) फाशी दिली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले. .......अफझलला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी, यासाठी त्याच्या कुटुंबीयांना केलेला माफीचा अर्ज राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडे  प्रलंबित आहे. कायद्यातील तरतुदीनुसार, जोपर्यंत या माफी अर्जावर कोणताही निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत त्या आरोपीला फाशी दिली जात नाही. त्यानुसार फाशी देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार, अफझलला उद्या (शुक्रवार) पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती.

१३ डिसेंबर २००१ रोजी जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीच्या संसदेवर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली. ही शॄंखला बघा, आज पर्यंतच्या या विषयावरील सगळ्या बातम्या एकत्र बघता येतील, आज पर्यंत या विषयावर एवढा ऊहापोह झाला आहे, आणि परिणाम काय तर आमचे नेते या अतिरेक्यांना सोडा म्हणुन मागणी घालतात? भारताच्या प्रजासत्ताकाची अस्मिता ज्या संसद भवनात नांदते  त्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणाऱ्या देशद्रोहयाची शिक्षा माफ व्हावी म्हणुन राष्ट्रपतींकडे अर्ज करण्यात येत आहेत. पण माझ्या देशाचा अपमान करणाऱ्याला माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही का असावा? त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजते, जे जास्त शिकलेले आहेत हे मला अगदी मान्य आहे. पण हाच विचार करुन निवडुन दिलेल्या राज्यकर्त्यांनी आपली मुक्ताफळे वाटलीच ना की म्हणे या अफझलला माफी द्या. शेवटी एका देशद्रोह्याला शिक्षा मिळते यात कोणत्याही धर्माचा काय संबंध येतो? मुस्लीम समाज या फाशीला धार्मिक वळण का देत आहे? 

फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांचे खून पडतील.
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.
-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा
-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा
-----------------------------------------------
भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.
-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर
-----------------------------------------------
अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.
-खुशवंतसिंग

समीर भिडे यांनी लिहिल्याप्रमाणे हा अपमान फ़क्त त्या हल्ल्यात मरण पावलेल्या ९ पोलिस जवान आणि एक संसदीय अधिकाऱ्यांच्या घरच्यांचाच नव्हे तर सर्व देशाचा हा अपमान आहे. आज भारताचे सारे मुत्सद्दी नेते त्या महंमद अफझलच्या सुटकेची वाट बघत आहेत, आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यांना लाजही वाटत नाही त्याची? आश्चर्य आहे. जर फाशी रद्द म्हणजे जानेवारी २००२ च्या आसपास भारत-पाकीस्तान लष्करी तणाव हा  वायफळ, मृतांच्या नातेवाइकांचे अश्रु कोरडे, इस्लामाबदेतील भारतीय दुतावासातुन आपल्या राजदुताची हकालपट्टी क्षुल्लकच नाही का? 

पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९९९, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"आई, उशीर होतोय,  डबा तयार आहे का?"
"डबा कधीचा तयार आहे, पण तुझं आवरलंय का? अरे छत्री घे पाऊस पडेलसं वाटतय आज." 
"डॅड, जाताजाता मला स्कुटरवरुन शिवाजीनगरला सोडा ना... pleeeeeessseee"
"चिरंजीव, आता स्वतःची गाडी घ्या..... किती दिवस अशा लिफ्ट मागत फिरणार आहात? आणि लवकर आवरले तर भोसरीपर्यंत सोडेतो"
वडिलपण भोसरीलाच काम करायचे, पण त्यांच्याबरोबर एवढ्या लांब जायचे म्हणजे आज करीअर याविषयावर खुप ऐकावे लागणार म्हणुन मी ती सुविधा नाकारली. कंपनीची बस परवडली असे वाटायचे.
माझी लुना आता कधीच मागे पडली होती. नव्या गाडीची स्वप्ने बघत होतो. नक्की काय घ्यायचे हे अजुन कळत नव्हते.

इसवी सन १९९९, ऑक्टोबर महिना, मु.पो. पुणे.
कोणते काम होते आठवत नाही पण शनिवारी संध्याकाळी वडिलांच्या बरोबर ताई कडे गेलो होतो. अजुनही आमची गाडी काही आली नव्हती त्यामुळे अजुनही "हमारा बजाज" मी चालवत होतो. वडिल मागे बसले होते. आताच्या सारखा शिवाजी रस्ता  एकमार्गी नव्हता, शनिवार वाड्यावरुन सरळ डावीकडे वळुन तुम्हाला शुक्रवाराकडे जात होतो, त्यामुळे लाल महालाकडुन येणाऱ्या गाड्या अगदी जीवाच्या आकांताने चढण चढत होत्या. अगदी उतार वयात आलेल्या आजोबांनी जीना चढावा अशी गाड्यांनी अवस्था झाली होती. मी मात्र लकडी पूलावरुन येत असल्याने आमची "बुलंद तस्वीर" (म्हणजे बजाज हो!) उतरत होती.

उतारावरुन आल्याने वाढलेला वेग कमी न करताच मी शनिवार वाड्याच्या पुर्व बुरुजाला वळसा घालुन लाल महालासमोरच्या चौकात आलो. लाल दिवाबघुन कर्कचुन ब्रेक मारला. ब्रेकच्या ऒढ्याने पुढे खेचले गेलेले वडिल लगेच माझ्या खांद्याचा आधार घेत म्हणाले, "सावकाश".
"अहो असे मध्येच विचित्र दिवे लावल्यावर काय"
"दिवाबरोबर आहे, तु फक्त बघितला नाहीस इतकेच", निरुत्तर मी हिरव्या दिव्याची वाट बघत होतो.

पहिल्या गियरवर  आणण्यासाठी बोटांनी क्लच दाबुन धरला आणि मनगटातल्या सगळ्या जोराने डावे हॅंड्ल वर उचलले, खट्ट असा आवाज करुन गाडीने पहिला गीयर पडला याची पावती दिली.  मधुनच  "हमारा बजाज" बंद होऊ नये म्हणुन हलकेच रेज करत होतो, तोच मागुन जोरात भोंगा वाजला, मागे बघतोय तोवर "PMT च्या बसमध्ये भोंगाच फक्त हवातसा आवाज करतो" हयाची मला आठवण व्हावी म्हणुन त्या बसच्या चालकाने अजुन एकदा कर्णकर्कश्य ध्वनीयंत्र वाजवले. मी अजुनही काय झाले याचाच विचार करत होतो, बहुतेक मला नाही म्हणुन परत हिरव्या दिव्याची वाट बघु लागलो तोच मागे PMT चा चालकाने त्याच्या खिडकीतुन हात बाहेर काढला होता, आणि मला "आता चला" असा इशारा करत होता.
दिवे लाल असताना कसे जायचे, त्याला मी पण दिवा दिसत नाही का असे दर्शवले.
आता मात्र त्या बस चालकाने डोके बाहेर काढले होते, "ए, अरं चल की, कोण नाय रस्त्यावर मग कशाला दिव्यासाठी थांबतोस?".
"अहो, मला कसली घाई आहे, मी थांबणार तुम्हाला काय त्रास आहे"
"अरं मला आहे ना पण", थोडासा सातारी गावाकडच्या मराठीची लकब आवाजात होती.
"मग घेऊन जा की बस वरनं, अगदी प्रवाशांना पण बसच्या तिकीटात  विमान प्रवास करायला मिळेल"
"जरा स्कूटर घे बाजुला, मी जातो" तो आता वैतागला होता.

इतर दुचाकीवाले ही मजा बघत होते. बघ्यांची कधीच कमी  नसते. दिव्याला उभे असताना विना-तिकीट मनोरंजन.

"अहो श्रीमंत, थांबा की जरा", वडिल म्हणाले.
आता मात्र चालक उचकला होता.   त्याने बळेच बसच्या इंजिनचा घुऱ्र्ऱ्ऱ्ऱ्ऱ्र घुर्मऱ्ऱ्ऱ असा आवाज करवला. मी पण पेटलो होतो, वडिलांना उतरायला सांगितले आणि स्कुटर स्टॅंडवर चढवली, त्याच्या बस कडे तोंड करुन उभा राहीलो, "काय हो या खाली, रहदारीचे नियम आज माझ्याकडुन शिकायचे आहेत का?", आता मात्र माझा आवाज वाढला होता. 
मला नक्की माहीत होते की तो काही उतरणार नाही, कारण त्याला Accelerator वर पाय ठेवुन रहावे लागणार होते. जर तो PMT चा खटारा बंद झाला तर काय करा.
तेवढ्यात हिरवा दिवा पडला, आजुबाजुचे दुचाकीवाले जशा मुंग्या लगबगीने कामाला जातात तसे निघु लागले.
"अरे बाबा आता तरी चल की" चालक कळवळला. माझ्या पोकळ धमकीला नाही तर त्याच्या सवयीत न बसणाऱ्या "हिरव्या दिव्याची वाट पहाणे" या प्रकाराला तो कंटाळला होता.
मी गाडी बाजुला घेतली आणि त्याला जागा दिली, बस पुढे जात असताना पुढच्या सीट्वरचे प्रवासी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. 
बस गेल्यावर वडिल म्हणाले, "जे केलेस ते बरोबर होते, पण करायची पद्ध्त चुकली".
"अहो पण माझ्या ओरडण्यामुळे त्या पाच-पन्नास बघे जमा झाले, त्यांच्यापैकी एकालाही आज त्या चालकामध्ये काही चूक दिसली नाही, कदाचीत उद्या त्याच्यातल्या एकाने जरी नियम तोडायला नकार दिला तर आजची माझी आरडाओरड कामी येईल ना?"
वडिल बघत होते, मी शांतपणे गाडी काढली. स्कुटरची कीक मारुन आम्ही बसलोच होतो तोच लक्षात आले की दिवा परत हिरव्याचा लाल झाला होता.
आणि मी पुन्हा हिरव्या दिव्याची वाट बघत होतो......

पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९९८, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
संध्याकाळी साडेपाच वाजले होते, वडील नुकतेच कामावरुन येत होते, अजुन त्यांनी बजाज सुपर स्टॅंडवर पण लावली नव्हती, तोच मी पळत वाड्यात आलो.  
मला त्यातल्यात्यात पांढरट शर्ट, थोडीशी गडद पॅंट आणि बुट घातलेले बघुन, डॅड (आजकाल मी वडिलांना डॅड म्हणत होतो) म्हणाले,
"आजकाय विशेष?"

"मी स्कुटर घेऊन जाऊ?"

"पण आज स्वारी कुठे? PL शिवाय अभ्यास कधीच करु नये असे काय विद्यापीठाने सांगितले आहे का?"

"मी अभ्यास करतो हो, तुम्हाला दाखवुन करत नाही इतकेच आणि मार्क्स मिळतात ना बस्स? आणि मला कॉलेजात जायला उशीर होतोय, मी जाऊ"
खरे तर मी आता BCS च्या एका क्लासमध्ये अर्धवेळ गणित शिकवत होतो. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात दुपारी परीक्षा देऊन संध्याकाळी शिकवायचो. तरीसुध्दा मी विद्यापीठात सातवा-आठवा आलो असल्याने घरचे सगळे माझ्यावर जरा खुष होते. 
"तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना की जास्त मार्क्स मिळवुन कोणाचे भले झाले आहे? मला उशीर होतोय मी स्कुटर नेऊ का ते सांगा"

"हे आता तुकाराम महाराज कधी म्हणाले? आजकाल तुला साक्षात्कार पण होतात वाटतं.... आणि तुझ्या लुनाला काय झाले?"

"अहो ते मीच म्हटलंय, पण तुकाराम महाराजांच्या नावाने जरा वजन वाढतं, आणि ते गांधीजींनी नाही का आपल्या नाटकात लिहिलंय की 'नावात काय आहे?' म्हणुन...  आणि माझ्या लुनात पेट्रोल थोडे कमी आहे."

"वाह रे वाह, ते शेक्स्पीयरने लिहिलंय"

"तेच ते हो!! शेवटी 'नावात काय आहे?'" असं म्हणत मी स्कुटरला किक पण मारली, "आणि तुम्हाला सागितलेच नाही ना, मी टाटा इंफोटेकच्या Campus interview च्या पहिल्या फेरीत पास झालो आता शेवटची मुलाखत आहे, तिथेच निघालोय"

"गाडी फार वेगात चालवतोस तु, सावकाश जा रे", वडिलांचे वाक्य संपेपर्यंत मी नक्की फडगेट पार केली असेन.

रात्रीचे दहा वाजायला आले होते, गाडी लावली आणि आत आलो.
आई : "काय रे काय, झाले तुझ्या मुलाखतीचे?"

हातातले पत्र झळकावत मी भसाड्या स्वरात गायला लागलो "अपनी तो निकल पडी, अपनी तो निकल पडी, अपनी तो निक्कssल पssडी".
"अहो पेशवे, इतर लोक झोपलेत, जरा हळु आणि इतक्यात काही पगार मिळत नाही, कामाला पुढच्या वर्षी लागणार ना, मग?"

(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)

पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९९७, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"ह्रिषी, अरे जरा दादाकडे बघ, तुला पण त्याच्याप्रमाणे मोठ्या कॉलेजात शिकायचे आहे ना?", काकु म्हणाल्या.
"मी काय भारी" असा भाव तोंडावर ठेऊन मी ऐकत होतो.

नुसतं "चल मेरी लुना" असे म्हणुन काही लुना चालत नाही. ह्रषिकेश, जगताप काकांचा मुलगा, ज्ञानप्रबोधिनीच्या प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करत होता, त्याला अजुनही माहीत नव्हते की तो काय करतोय पण आईवडिलांवर पुर्ण विश्वास ठेऊन त्याचे काम चालु होते. त्याला गणित शिकवले की त्याबदल्यात काका माझ्या लुनाची झालेली पडझड दुरुस्त करुन देणार म्हटल्यावर मी दररोज कॉलेजनंतर त्याला शिकवायला जाऊ लागलो.  थोड्याच दिवसात वडिलांचे मित्र, कर्नल गुप्ते यांच्या घर-वजा-ऑफिसात त्यांचा मदतनीस-वजा-लेखनीक म्हणुन अर्धवेळ काम मिळाल्यावर मात्र माझा पेट्रोलचा प्रश्न पुरता सुटला होता, पण आता अभ्यासाला वेळ मिळेनासा झाला. बऱ्याचशा गोष्टी लुनाने सोप्या केल्या. ताईचे लग्न झाल्यामुळे आयुष्यात कशाचाच अभ्यासाशिवाय त्रास नव्हता.

COEP मध्ये मुलींवर इंम्प्रेशन असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे, ज्यावेळी ती गाडी हवी त्यावेळी मिळाली नाही आता काय उपयोग? इथे बहुतेक सगळे पुलापलिकडल्या वसतीगृहात राहायचे, आणि चालत यायचे. वर्गात मुली म्हणजे एक फार मोठी गोष्ट होती येथे. यंत्र अभियांत्रिकीला (मेकॅनिकलला) दोन मुली होत्या. त्यांना मुलांनी बॉइलरच्या नावावरुन, एकीला बॅबकॉक आणि दुसरीला विल्कॉक्स अशी नावे ठेवली होती. अशा या सौदर्याच्या वाळवंटात फक्त संगणक आणि दुरभाष्य अभियांत्रिकी मध्ये मृगजळे होती. पण माझ्या धातुशास्त्रविभागापासुन ते अगदी दुसऱ्या टोकाला होते.  कर्नल गुप्तेंकडे काम करताना समजले की त्यांना दोन सुगुणी नाती आहेत, पण त्या खुपच वरच्या प्रकारात मोडत असल्याने आमचे मुलीला गाडीवरुन फिरवायचे स्वप्न हे अपुर्णच राहणार होते. आता काही सौदर्यस्थळे  

म्हणजे एकंदरीत आम्ही आता फक्त बायकोला गाडीवर फिरवणार अशी शक्यता उरली होती. रोहिणी (माझी बायको) ताईच्या लग्नात पुण्याला आलेली असताना तीला एकदा मी स्कुटरवरुन घेऊन गेलो होतो, बस्स यापेक्षा दुसरी मुलगी आमच्या मागे गाडीवर अजुन बसली नाही. अहो माझ्या त्या मोडक्या जुनाट लुनावर मी अजुन किती अपेक्षा ठेवणार होतो?
सध्या मी अमेरिकेत कॉलेजला (इथल्या भाषेत school)जाते. इथे नविन technologyचा वापर शिकवण्यात पुर्णपणे केला जातो म्हणजे power point ,projector वगैरे.फ़ळा नावाला लावलेला असतो. कधीतरी त्याचाही वापर होतो.परवा एक नवीन गम्मत बघितली, हो गम्मतच वाटली मला!
माझ्या एका मास्तरांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि मी बघतच बसले. त्यांनी(हो त्यांनी ,कारण माझ्या भारतीय मनाला अजून मास्तरांना एकेरी नावाने हाक मारायला जमत नाही) खडू chalk holder मध्ये पकडला होता.मला ते विचित्र वाटलं. असं का? अंगाला, हाताला खडू लागू नये म्हणून? हे म्हणजे कोळिणीला मच्छीचा वास सहन न होण्य़ासारख आहे. मला नाना पाटेकरचा अग्निसाक्षि चित्रपटाचा संवाद आठवला. नाकावर रुमाल घेऊन चामड्याच्या फॅक्टरीत काम करणारया माणसाला नाना पाटेकर अत्तराच्या फॅक्टरीत काम करण्याचा सल्ला देतो. अहो,हे अगदी स्वच्छ आहे कि,तुम्ही जिथे काम करता तिथे लागणारया किंवा तिथे वापरल्या जाणारया वस्तु आणि तुमचं वेगळ्चं नातं जोडलेले असतं. त्या वस्तुंची allergy असून चालत नाही.

मला लगेच आठवलं ती माझी शाळा... जिथे सर खडूमध्ये माखतं फळाभरुन गणिते सोडवायचे, कधीतरी वर्गात वात्रटपणा करणारया एखाद्या मुलाला अगदी नेम धरुन खडूचा छोटासा तुकडा मध्येच मारायचे. बाई रंगेबिरंगी खडू वापरुन जीवशास्राच्या आकृत्या अगदी तन्मयतेने काढायच्या ( अगदी साडी खराब होईल का याचा विचार न करता). तिथे खडू म्हणजे शिकवण्याचा अविभाज्य भाग असायचा, आहे. पण तॊ पुढे राहिल की नाही याची शाश्वती नाही. ज्या पद्धतीने आणि आंधळेपणाने आपण अमेरिकेच्या पाउलावर पाउल टाकतोय, त्यामुळे भारतातपण खडूची allergy व्हायला वेळ लागणार नाही.

जसं छडीने येणारई विद्या भुतकाळ झाली त्याप्रमाणॆ खडू आणि फ़ळा कालवश होण दुर नाही. दुख: याच नाही की शिकवण्यासाठी नविन नविन गोष्टींचा वापर होतोय, पण त्या power point दाखवत chalk holder मध्ये खडू पकडून शिकवणारया मास्तरांसाठी (त्यांना मास्तर पण म्हणता येत नाही) हा श्लोक ओठांवरती येईल ??

गुरुऱ ब्रम्हः गुरुऱ विष्णु गुरुऱ देवो महेश्वरः ॥
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९९७, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.

"हे बघ ही लुना माझ्या कमाईत घेतलेली पहिली वस्तु आहे, आता मी ती वापरत नाही म्हणुन काय झाले? जरा जपुन वापर तीला." भाऊजी धमकी-वजा विनंती करत म्हणाले.

माझ्या त्या पादचारी किंवा सायकलारूढ जगात प्रत्येक वाहनधारक हा "भाईगिरी" करत होता. या जगात माझा जन्म हा इतरांना कोणीतरी झापायला मिळावा म्हणुन झाला आहे असे मला कायम वाटते. अरे जो येतो तो मोठेपणा गाजवतो. पण काय करणार दुसऱ्याची लुना जर मला फुकट वापरायची असेल तर असे सगळे ऐकुन घ्यावे लागते. तसे ते प्रेमळ आहेत, मला पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात (COEP हो!) प्रवेश मिळाल्यावर दोन वर्षे झाली पण माझ्या कठोर पालनकर्त्यांना गाडीचा पाझर फुटत नाही म्हटल्यावर माझ्या मेव्हण्याने त्यांच्या छातीवर दगड ठेऊन मला त्यांची ताईपेक्षा लाडकी लुना मला दिली होती. आता माझ्या किर्तीप्रमाणे मी तिची थोडीफार वाट पण लावली होती. आता सांगा, COEP च्या विद्यार्थी भांडारात वस्तु जशा सरकारी subsidy-ने मिळतात, तसे त्यांनी पेट्रोल पण का विकु नये? दरमहा आईकडुन खर्चाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात मी पण काय काय करणार? सारी हातखर्चाची रक्कम पेट्रोलमध्येच संपायची आणि तरी बरेचदा पेट्रोल मध्येच संपल्याने लुनाची सायकल व्हायची, मग तीच्या दुरुस्तीला पैसे आणायचे कोठुन? आणि म्हणे नीट वापर.

"हो, परत करताना नवीन बनवुन देईन तुमच्या खटाऱ्याला" मी उत्तरलो, "पण कमवायला लागल्यावर बरं का".
"अरे, परत नको देऊस वाटले तर पण आत्तातरी नीट वापर", जवळपास निरुत्तर झालेल्या भाऊजींनी परत झापले.

 
***************************************************************

आकाशच्या मोठ्या भावाचे लग्न होते. स्वागत सभारंभाच्या चमचमीत जेवणानंतर बरीच कलाकार मंडळी खुप दिवसांनी रंगात आली होती. रात्री उशीरा आम्ही इतरांच्या डोक्याचा "चहा" करत होतो... आणि मुक्त कट्टा. चेष्टा बहरात आलेली... रात्रीच्या अंधारात लोचा-पोचा झालेला पुना क्लबच्या पोर्च आमच्या हसण्याने घुमत होता. आम्ही वऱ्हाडी असल्याने रखवालदार पण गप्प होता. खरे तर आमच्यातल्यांनी त्याच्या  बिडीकाडीची सोय केल्याने तो खुष होता.

"अरे पकलोय यार", आशिष उभा होत म्हणाला.
"बरं मगं? थांब थोडा वेळ पडशील खाली आपोआप", राहुलने त्याच्याकडे न बघताच त्याला उधळला.
"अरे मी काय पेरू आहे, पिकलो की पडायला", कावलेला आशिष.
"नाही चिक्कू आहेस, चल पैसे काढ बिलाचे", त्याचे सांत्वन करणारा केरी
"अरे चला सिंहगडावर चहा-भजी खायला जाऊ", जयदीप डोक्यात दीप लागल्यासारखा ओरडला.
"याला कोणी पाजली रे, येडा झालायस का रे? एक वाजलाय आता.." आशिषचा नेहमीचा अतिशहाणपणा ...

रात्रीच्या एक वाजता गडावर जाऊन भजी खायची कल्पना कितीही मुर्खपणाची असली तरी आशिष नाही म्हटला म्हणजे झाले आम्ही सहा-सात जणं मनात बंगाळांच्या जयदीप नामक नक्षत्राला कोसत..  तयार झालो, त्या भज्यापेक्षा पडलेला आशिषचा चेहरा लोकांना जास्त महत्वाचा वाटत होता.

"ए, मी आज वडीलांची बाईक आणलीये... ती घेऊन मी काही येणार नाही, माझी आणतो जरा माईलेज कमी आहे पण तुम्ही उदार लोक स्वतःच्या गाडी पेट्रोल भरताना माझ्याही भरालच" आमचा केरी म्हणजे... त्याच्याविषयी आज सांगायला नको, या पात्रावर मी PhD करण्याचा विचार करत आहे.
"हो आमचे आईबाप कुवेतचे आहेत ना ... " मी बोंबललो
"हो का? अरे माझ्या कायनेटिक मध्ये पण एखाद दुसरा लिटर भर मग", राहुल
"अरे चालतीये का आधी ते बघ",  मी मुद्द्याचे बोला असा आव आणला.
"ब्रेक थोडा जास्त दाबावा लागतोय आणि हॉर्न हवा असेल तर मागच्याला कोपर मारावे लागते,  दिव्याचे असे आहे की तु खापरेंचा दिवा आहेसच.." राहुलने आपल्या छडमाड  कायनेटिकचे कौतुक सांगितले.

"विशाल ती तर तुच चालवणार आहेस, नाही तरी तुझी लुना काही चढणार नाही", केरी उगाच उवाच.
"त्या जयदीपची घ्या की, बोलताना काही वाटले नाही बरे", चंद्या त्याच्या गाडीचा विषय निघु नये म्हणुन.
"मी केरीच्या मागे बसणार, चला स्वारगेटचा पंप उघडा असतो रात्रभर, स्टॅंडावर तुमच्या धुरनळ्यांची पण सोय होईल " निहारने त्याच्या बुडाची निश्चिंती केली.
"अरे तो स्वारगेटचा, पेट्रोल कमी आणि रॉकेल जास्त घालतो" जयदीपला शिव्याखायची सवय असल्याने कारण देण्यासाठी बरळला.
"फुकण्या, त्या आशिष समोर बोलताना नाही आठवले का रे? आता भज्याचे पैसे भरणार आहेस हे लक्षात ठेव"   केरी खेकसला.

सगळा जामानीमा करुन आमच्या टोळक्याने सिंहगडावर चढाई केली अर्थात गाडीवरून. चांगल्या दिव्याची पुढे आणि त्याच्या उजेडात इतर असे आम्ही पोहोचलो. पहाटे ४ वाजता गडावर आलेल्या या वटवाघळांना तेथे गरम चहा-भजी मिळाली. तिथल्या टपरीवाल्याला उठवावे लागले नाही. जोरात गोंधळ, विचित्र आवाज करणाऱ्या गाड्या त्याची गरम घोंगडीतली झोप उडवायला पुरेशा झाले. त्या पहाटेच्या भज्यांची चव अजुनही जीभेवर आहे. त्यानंतर गडावर मी अनेकदा गेलोय, पण काही म्हणा आता ती भजी काही मिळत नाहीत.

(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९९३, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.
मी अजुन सायकल लावत होतो तर आईनं विचारलं, "काय रे, लवकर आलास? तु तर म्हणालास की सात वाजतील म्हणून आणि तुझं कॉलेज कसं आहे?"

"अगं, कॉलेज एकदम झकास आहे, खुप मोठं आहे, अगं पण सायकल एकदम कोपऱ्यात लावावी लागते, सायकल तळ एकदम लहानसा आहे"

"तु नक्की फर्गुसनलाच गेला होतास ना रे? ", दारात पाय अजुन आत टाकत ताई म्हणाली. आमच्या भगिनी अशा नेमक्या वेळी कशा टपकतात कोण जाणे, आणि तीला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला काय जातेय.

"तुझे काय माहीतीये, सायकल चालवुन बघ तिथं, मग कळेल, सगळे जण गाड्यांवरच येतात, सायकल तळ पुढच्या वर्षी काढुन टाकणार आहेत म्हणे", आईकडे बघत म्हणालो, "आई, मला पण कायनेटिक होंडा हवीये."

"माझे ऑफिस पण फर्गसन रस्त्यावरच आहे समजलं? फर्गसनमध्ये बरेच जण सायकलीवर येतात. तुला अकरावीत गाडी कशाला हवी? पोरींवर इंम्प्रेशन मारायला?"
"आता बास, तुमचं कधी संपेल तर नशीब", आई दरडावत म्हणाली, "रावसाहेब, तुम्ही जरा अभ्यासात लक्ष जास्त द्या, अकरावी ही बारावीचा पाया असते. नीट पास झालास तर तुम्हाला पण गाडी घेऊ आपण आणि तु गं कधी कधी विशालला तुझी लुना चालवायला देत जा. आणि आता चला, जरा स्वच्छ व्हा, भुका लागल्यात ना?".

आईने टाकलेली अट माझ्याकडुन पुर्ण होण्याची अपेक्षा मला अजिबात नव्हती. वैशाली-सवेरामध्ये जर वर्ग भरला तरच सगळे जण वर्गात असणार अशी तर आमच्या वर्गाची परिस्थिती. मला अकरावी-बारावीची दोन्ही वर्षे माझ्या सायकल-महोत्सव म्हणुन साजरी न करावी लागली तरच आश्चर्य. अकरावीला जेमतेम ५१% मिळवुन नव्हे तर पाडुन आम्ही बारावीत शिरलो आणि गाडीला किक मारुन जाण्याचे माझे स्वप्न मी सायकलवर टांग मारुन बघत राहीलो.

कधी कधी ताईची लुना "लायसेंस नसताना" पण कॉलेजात घेऊन जायचो, पण वर्गातल्या मुलामुलींमध्ये ९०% जण गाडीवर येत असल्याने, माझी आणि त्या जुनाट लुनाची किम्मत गॅस उडुन गेलेल्या सोडापेयापेक्षा जास्त नसावी. अहो एकदा येताना पेट्रोल संपले, पण भरायला पैसे हवेत ना? मग काय, लुनाच्या मागच्या चाकाजवळचा खटका आत दाबुन लुनाची सायकल केली आणि घरी येऊन ताईची मंत्रपुष्पांजली ऐकली.  नशीबापुढे काय चालतंय का कुणाचे, लुना वापरली ती पण बरेचदा सायकल करुनच.

पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे.  त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.

इसवी सन १९८८, फेब्रुवारीचा महिना, मु.पो. पुणे.
ताई पटकन खेकसली, "तुला मी सांगितले होते ना, माझ्या सायकलीला हात लावु नकोस म्हणुन, खरचण्यावर भागले, हात पाय मोडला असता म्हणजे.., जा जरा पाय धुऊन घे."

"मला काही झालेले नाहीये", पायावरच्या लाल रेघा लपवत मी म्हणालो.

"आईSS, ह्याने माझी सायकल पुन्हा पाडली बघ, पुढचं चाकपण वाकडे करुन आणले आहे यावेळी"

"आईने मला सायकल घेऊन दिली की मी पण तुला हात लावु देणार नाही", मी उसने अवसान आणुन ओरडलो. 

"नको मला तुझी सायकल, त्यावेळी माझ्याकडे लुना असेल, मग नको मला लिफ्ट मागुस.."

"हॅहॅहॅ, तोंड बघितलंय का आरशात, लुना चालवायला त्याला लायसेंस लागते आणि त्यासाठी गाडी चालवायची परीक्षा द्यावी लागते.."

"पाहीलंय बरं, छानच आहे मी आणि माझं तोंड, आणि परीक्षा पण देईल की"

"बाई, पण पास झालात तर... हो हो हो", रामानंद सागर निर्मित रामायणात विजय अरोराने (इंद्रजीतने) लंका जाळणाऱ्या दारासिंगला पकडुन आणल्यावर अरविंद त्रिवेदी म्हणजे रावण जसा हसला, तसे काहीतरी हसत मी पळालो.

खरे तर, शुक्रवारात राहणाऱ्याला नूमवित शिकण्यासाठी सायकल म्हणजे चंगळच होती, पण ताईची जुनी सायकल आता हळुहळु माझी झाली होती, "लेडिज" का असेना, पण सायकल होती. मला स्वतःची  सायकल मिळायला दहावीचे वर्ष उजाडले.  दातार क्लास आणि शाळा यात वेळ वाचेल, माझी नेहमीची जुन्या सायकलची कुरकुर पण थांबेल म्हणुन तीर्थरुपांनी सायकलला मंजुरी दिली आणि आमच्या वाड्यात हिरो रेंजर ए. टि. बी. येऊन लागली.
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ▼  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ▼  October (10)
      • नेताजींच्या सहवासात...
      • सगळेच जर राजकारणी झाले तर कसे होणार...
      • महंमद अफझलला नाही, पण आज अस्मितेला नक्की फाशी आहे ...
      • दुचाकीच्या शोधात.. भाग ६
      • दुचाकीच्या शोधात.. भाग ५
      • दुचाकीच्या शोधात.. भाग ४
      • गुरुर ब्रम्ह गुरुर विष्णु ...........!!!
      • दुचाकीच्या शोधात.. भाग ३
      • दुचाकीच्या शोधात.. भाग २
      • दुचाकीच्या शोधात.. भाग १
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose