गुरुर ब्रम्ह गुरुर विष्णु ...........!!!

सध्या मी अमेरिकेत कॉलेजला (इथल्या भाषेत school)जाते. इथे नविन technologyचा वापर शिकवण्यात पुर्णपणे केला जातो म्हणजे power point ,projector वगैरे.फ़ळा नावाला लावलेला असतो. कधीतरी त्याचाही वापर होतो.परवा एक नवीन गम्मत बघितली, हो गम्मतच वाटली मला!
माझ्या एका मास्तरांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि मी बघतच बसले. त्यांनी(हो त्यांनी ,कारण माझ्या भारतीय मनाला अजून मास्तरांना एकेरी नावाने हाक मारायला जमत नाही) खडू chalk holder मध्ये पकडला होता.मला ते विचित्र वाटलं. असं का? अंगाला, हाताला खडू लागू नये म्हणून? हे म्हणजे कोळिणीला मच्छीचा वास सहन न होण्य़ासारख आहे. मला नाना पाटेकरचा अग्निसाक्षि चित्रपटाचा संवाद आठवला. नाकावर रुमाल घेऊन चामड्याच्या फॅक्टरीत काम करणारया माणसाला नाना पाटेकर अत्तराच्या फॅक्टरीत काम करण्याचा सल्ला देतो. अहो,हे अगदी स्वच्छ आहे कि,तुम्ही जिथे काम करता तिथे लागणारया किंवा तिथे वापरल्या जाणारया वस्तु आणि तुमचं वेगळ्चं नातं जोडलेले असतं. त्या वस्तुंची allergy असून चालत नाही.

मला लगेच आठवलं ती माझी शाळा... जिथे सर खडूमध्ये माखतं फळाभरुन गणिते सोडवायचे, कधीतरी वर्गात वात्रटपणा करणारया एखाद्या मुलाला अगदी नेम धरुन खडूचा छोटासा तुकडा मध्येच मारायचे. बाई रंगेबिरंगी खडू वापरुन जीवशास्राच्या आकृत्या अगदी तन्मयतेने काढायच्या ( अगदी साडी खराब होईल का याचा विचार न करता). तिथे खडू म्हणजे शिकवण्याचा अविभाज्य भाग असायचा, आहे. पण तॊ पुढे राहिल की नाही याची शाश्वती नाही. ज्या पद्धतीने आणि आंधळेपणाने आपण अमेरिकेच्या पाउलावर पाउल टाकतोय, त्यामुळे भारतातपण खडूची allergy व्हायला वेळ लागणार नाही.

जसं छडीने येणारई विद्या भुतकाळ झाली त्याप्रमाणॆ खडू आणि फ़ळा कालवश होण दुर नाही. दुख: याच नाही की शिकवण्यासाठी नविन नविन गोष्टींचा वापर होतोय, पण त्या power point दाखवत chalk holder मध्ये खडू पकडून शिकवणारया मास्तरांसाठी (त्यांना मास्तर पण म्हणता येत नाही) हा श्लोक ओठांवरती येईल ??

गुरुऱ ब्रम्हः गुरुऱ विष्णु गुरुऱ देवो महेश्वरः ॥
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥

Anonymous

No comments: