मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

प्राच्यां दिशि शिरश्शस्तं याम्यायामथ वा नृप ।
सदैव स्वपतः पुंसो विपरीतं तु रोगदम् ॥
( विष्णुपुराण ३।११।११३ )
सदैव वर्ज्यं शयनमुदक्शिरास्तथा प्रतीच्यां रजनीचरेश ।
( वामनपुराण १४।५१ )
नोत्तरापरावाक्शिराः ।
( विष्णुस्मृति ७० )
नोत्तराभिमुखः सुप्यात् पश्चिमाभिमुखो न च ॥
( लघुव्याससंहिता २।८८ )
उत्तरे पश्चिमे चैव न स्वपेद्धि कदाचन ॥
स्वप्नादायुः क्षयं याति ब्रह्महा पुरुषो भवेत् ।
न कुर्वीत ततः स्वप्नं शस्तं च पूर्वदक्षिणम् ॥
( पद्मपुराणा, सृष्टि० ५१।१२५-१२६ )
उदक्‌शिरा न स्वपेत तथा प्रत्यक्‌शिरा न च ।
प्राक् शिरास्त स्वपेद् विद्वानथवा दक्षिणाशिराः ॥
( महाभारत, अनु० १०४।४८ )

अर्थ- नेहमी पूर्व आणि दक्षिणेकडे डोके करून झोपावे. उत्तर किंवा पश्चिमेकडॆ डोके करून झोपू नये त्यामुळे आयुष्य क्षीण होते तसेच शरीरीत अनेक व्याधी(रोग) उत्पन्न होतात.

 

न भग्ने नावशीर्णे च शयने प्रस्वपीत च ।
( महाभारत, अनु० १०४।४९ )
'न भिन्ने'
( विष्णुस्मृति ७० )
न शीर्णायां तु खट्‌वायां शून्यगारे न चैव हि ।
( कूर्मपुराण, उ० १९।२९ )

अर्थ- तुटलेल्या शय्येवर(खाटेवर) झोपू नये.

 

 

07262007

भूमिष्ठमुद्‌धृतात् पुण्यं ततः प्रस्त्रवणोदकम् ।
ततोऽपि सारसं पुण्य तस्मान्नादेयमुच्यते ॥
तीर्थतोयं ततः पुण्यं गाङ्गं पुण्यन्तु सर्वतः ।
( अग्निपुराण १५५।५-६ )
भुमिष्ठादुद्‌धृतं पुण्यं ततः प्रस्त्रवणादिकम् ।
ततोऽपि.....................
( गरुङपुराण, आचार० २०५।११३-११४ )

अर्थ- विहीरीच्या पाण्यापेक्षा झर्‍याचे पाणी पवित्र असते. त्यापेक्षा जास्त पवित्र सरोवराचे(तळ्याचे) पाणी, त्यापेक्षा जास्त नदीचे पाणी पवित्र समजतात. देवाचे तीर्थ त्यापेक्षा जास्त पवित्र तर गंगा नदीचे पाणी सर्वात जास्त पवित्र मानले गेले आहे.

 

 

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि ।
तावद्भवति चाण्डालो यावत्स्नानं न चाचरेत् ॥
( चाणक्यनीति ८।६ )

अर्थ- अंगाला तेल लावल्यावर, स्मशानातून परतल्यावर, स्त्रीसंग केल्यावर आणि हजामत(केस कापणे)केल्यावर, जोपर्यंत मनुष्य स्नान करत नाही तोपर्यंत तो चांडाळ योनीत असतो.  

 

07252007

रेखाप्रभुत्यथादित्ये त्रिमुहूर्तगते रवौ ।
प्रातः स्मृतस्ततः कालो  भागश्चाह्नः स पञ्चमः ॥
तस्मात्प्रातस्तनात्कालात्त्रिमुहूर्तस्तु सङ्गवः ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तस्तु तस्मात्कालात्तु सङ्गवात् ॥
तस्मान्माध्याह्निकात्कालादपराह्ण इति स्मृतः ।
त्रय एव मुहूर्तास्तु कालभागः स्मृतो बुधैः ॥
अपराह्णे व्यतीते तु कालः सायाह्न एव च ।
दशपञ्चमुहूर्ता वै मुहूर्तास्त्रय एव च ॥
( विष्णुपुराण २।८।६१-६४ )
प्रातःकालो मुहूर्तांस्त्रीन सङ्गवस्तावदेव तु ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्ततः परम् ॥
सायाह्नस्त्रिमुहूर्त्तः स्याच्छ्राद्धं तत्र न कारयेत् ।
राक्षसी नाम सा वेला गर्हिता सर्वकर्मसु ॥
( मत्स्यपुराण २२।८२-८३; पद्मपुराण, सृष्टि० ११।८३-८५ )
मुहूर्तानां त्रयं पूर्वमह्नः प्रातरिति स्मृतम् ।
जपध्यानादिभिस्तस्मिन् विप्रैः कार्यं शुभव्रतम् ॥
सङ्गवाख्यं त्रिभांग तु मध्याह्नस्त्रिमुहूर्तकः ।
लौकिकं सङ्गवेऽर्थ्यं च स्नानादि ह्यथ मध्यमे ॥
चतुर्थमपराह्णं तु त्रिमुहूर्तं तु पित्र्यकम् ।
सायाह्नस्त्रिमुहूर्तं च मध्यमं कविभिः स्मृतम् ॥
( महाभारत, अनु० २३।३५ )
त्रिमुहूर्तस्तु प्रातः स्यात्तावानेव तु सङ्गवः ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्तथैव च ॥
सायं तु त्रिमुहूर्तः स्यात्पञ्चधा काल उच्यते ।
( प्रजापतिस्मृति १५६-१५७ )

 

अर्थ- दोन घटका अर्थात ४८ मिनीटांचा एक मुहूर्त होतो. १५ मुहूर्तांचा एक दिवस होतो तर १५ मुहूर्तांची एक रात्र होते. सूर्योदयापासून पुढे ३ मुहूर्तांचा ’प्रातःकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’संगवकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’मध्यान्हकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’अपरान्हकाल’, आणि त्यानंतर ३ मुहूर्तांचा ’सायंकाल’ असतो.

 

 

रात्रौ च वृक्षमूलानि दूरतः परिवर्जयेत् ॥
( मनुस्मृति ४।७३; विष्णुधर्मोत्तर० ३।२३३।१६५ )
'नक्तं सेवेत न द्रुमम्
( शुक्रनीति ३।२९; अष्टांगहृदय, सूत्र० २।३७ )

 

अर्थ- रात्री झाडाखाली झोपू नये अथवा राहू नये.

 

 

07242007

स्त्रानमूलाः क्रियाः सर्वाः सन्धोपासनमेव च ।
स्त्रानाचारविहिनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ॥
( वाधूलस्मृति ६९ )
न हि स्नानं विना पुंसां प्राशस्त्यं कर्मसु स्मृतम् ॥
( लघुव्याससंहिता १।७ )
आस्नातो नाचरेत्कर्म जपहोमादि किञ्चन ॥
( बृहत्पराशरस्मृति २।९३ )
विना स्नानं तु यत्कर्म पुण्यकार्यमयं शुभम् ।
क्रियते निष्कलं ब्रह्मस्तत्प्रगृह्णन्ति राक्षसाः ॥
( स्कन्दपुराण, ब्रह्म० चातुर्मास्य० १।२४ )

अर्थ- स्नान(आंघोळ) न करता जे पुण्यकर्म केले जाते, ते निष्फळ होते. ते पुण्य राक्षस घेऊन जातात.

 

 

स्त्रवन्ती चेत् प्रतिस्त्रोत प्रत्यर्क चान्यवारिषु ।
मज्जेदोमित्युदाहृत्य न च विक्षोभयेज्जलम् ॥
( महाभारत, आश्व० ९२ )

अर्थ- जर नदीत स्नान करावयाचे असेल तर, नदी ज्या बाजूने वहात येते, त्या बाजूला तोंड करून स्नान करावे आणि दुसर्‍या जलाशयात, किंवा अन्य ठिकाणी, स्नान करताना सूर्याकडे तोंड करून स्नान करावे. 

 

07232007

खालील बातमी आहे दैनिक 'सकाळ' मधील, नीट वाचावी आणि विचार करावा.

Sakal Papers International Marathi News Daily - Pune


शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद - डी. एस. कुलकर्णी

पुणे, ता. १७ - ""शहरात नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूल हा सर्वांत मोठा विनोद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, त्यात थोड्या सुधारणा केल्या असत्या तर वाहतूक आणखी सुरळीत झाली असती, असे मत "डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले.

शहरात हा पूल बांधण्याचा विनोद वर्षभर चालला होता, सर्व पुणेकर हैराण झाले होते तेव्हा हे महाशय कोठे होते? या साहेबांचा पुण्यात फार मोठा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना या पुलाचे बांधकाम चालले होते हे माहित होते तर त्यांनी त्याच वेळेस सुधारणा का सांगितल्या नाहित, नंतर जाहीरपणे बोलण्यात काही अर्थ आहे काय? माहित आहे कि आता काहीच होऊ शकत नाही मग बोलायला काय जाते? जेव्हा वरील विधाने केली त्याच वेळेस त्यातील सुधारणा का सांगितल्या नाहीत. पुढे मागे भविष्यात त्याचा दुसर्‍या पुलांच्या बांधकामाच्या वेळेस उपयोग होईल ना? कोणत्याही कामाला नंतर कशी नावे ठेवायची, त्याची कशी वरात काढायची हे भारतीयांना बरोबर माहित आहे. हि खोडी सामान्य पुणेकरांना नाही बरं का? हे काम अशी थोर मंडळीच करतात. पुण्याची वाहतूक सुरळीत व्हावी असे त्यांना वाटले असते तर त्यानी त्याच वेळेस वेळोवेळी जाहीर करायला पाहिजे होते, पुणेकरांनी नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला असता. जर त्याबद्दल त्यांना माहीत होते, आणि त्यांनी सांगितले नाही तर त्यांनी पुणेकरांचे फार मोठे नुकसान केले आहे. खरे तर हे नंतर जाहीर करून तेच फार मोठा विनोद करीत आहेत.कृपया त्यांनी, कुलकर्णी साहेबांनी, आठवा 30 सप्टेंबर 1993, किल्लारीचा महाभयंकर भूकंप. किती हानी झाली, किती लोकांना प्राण गमवावे लागले.खूप दुःखाचे प्रसंग आले लोकांवर. मग काही दिवसांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार मा. नलिनी केळकर(नक्की नाव माहित नाही, माहित असणार्‍यांनी दुरूस्ती करावी) यांनी जाहीर केले कि, भारताच्या कुंडलीनुसार हा भूकंप होणारच होता, मग काय लोक चिडले, त्यांनी त्यांना जाब विचारला, जर हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही एवढी हानी का टाळली नाही, याला तुम्हीच जबाबदार आहात. बस, मला वाटते नंतर त्यांचे नावच ऐकायला मिळाले नाही. घडलेल्या घटनांचे भविष्य सांगायला यांची काय जरूरी आहे. एखादी गोष्ट माहित असूनही लपवून ठेवली जाते, आणि त्यात जनतेचा संबंध असेल तर, अशा माहिती लपवून ठेवणार्‍याला योग्य शासन झालेच पाहिजे. खूप जाणकार भविष्य भास्कर, ज्योतिष भास्कर, शिरोमणी आहेत त्यांनी खालील घटनाचे भविष्य का सांगितले नाही? कारगील युद्ध, भयंकर पूर, क्रिकेटचा वर्ल्ड कप, निवडणुकीतील अंदाज वगैरे. भविष्य सांगणारे आणि वेधशाळा यात काहीच फरक नाही. पाउस पडेपर्यंत वेधशाळा काहीच अंदाज करीत नाही, पण लगेच अंदाज केला जातो, पुढील दोन दिवसात आकाश ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. आणि पुढील दोनच काय तर आठवडाभर पाउस पडत नाही. आता आपणच तुलना करावी. त्यापेक्षा रस्यावरचा भविष्य सांगणारा पोपट बरा. सर्व जाणकार, भविष्य सांगणारे,ज्ञानी, अभियंते, थोर उद्योगपती, मंत्र, तंत्र शास्त्र पारंगत, सर्वांना विनंती, जे काही असेल ते आधीच सुचवा, नंतर नको.

'नैकः सुप्याच्छून्यगेहे'
( मनुस्मृति ४।५७ )
'नैकः सुप्याच्छून्यगृहे'
( कूर्मपुराण, उ० १६।६७ )
'नैव स्वप्याच्छून्यगेहे'
( पद्मपुराण, स्वर्ग० ५५।६७ )
'नैकः सुप्यात्व्कचित्छून्ये'
( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६।६२ )
न श्मशानशून्यालयदेवतायतनेषु ।
( विष्णुस्मृति ७० )
'न देवायतने स्वपेत्'
( कूर्मपुराण, उ० १६।८७; पद्मपुराण, स्वर्ग० ५५।८९ )

अर्थ - घरात कुणीही नसतांना एकट्याने झोपू नये. मंदिर आणि स्मशानात झोपू नये.

 

नान्धकारे च शयनं भोजनं नैव कारयेत् ॥
( पद्मपुराण, सृष्टि० ५१।१२४ )

अर्थ - अंधारात झोपू नये.

 

07212007

'नार्द्रपादस्तु संविशेत्'
( मनुस्मृति ४।७६; अत्रिस्मृति ५।२५; महाभारत, अनु० १०४।६१ )
'नार्द्रपादः स्वप्यात्'
( विष्णुस्मृति ७० )
शयनंचार्द्रपादेन........नैव कारयेत् ॥
( पद्मपुराण, सृष्टि० ५१।१२४ )
'नार्द्रपादः स्वपेन्निशि'
( महाभारत, शान्ति० १९३।७ )
'संविशेन्नार्द्रचरणः'
( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६।७३ )
अनार्द्रपादः शयने दीर्घां श्रियमवाप्नुयात् ॥
( अत्रिस्मृति ५।२६ )

 

अर्थ- ओल्या पायांनी झोपू नये. कोरड्या पायांनी झोपल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते.

 

 

प्राक्‌शिरःशयने विद्याद्धनमायुश्च दक्षिणे ।
पश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युथोत्तरे ॥
( भगवंतभास्कर, आचारमयूख )

 

अर्थ- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास धन आणि आयुष्याचा नाश होतो. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास प्रबळ चिंता उत्पन्न होते. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास नुकसान आणि आयुष्य क्षीण होते. 

 

07202007

आपण जेव्हा ’आस्था’ किंवा ’संस्कार’ वाहिनी पाहतो, तर त्यावर कितीतरी बाबा, महाराज, गुरू, माता, मा, आई, सद्‌गुरू, पंडित,परमपूज्य, साध्वी अजून कितीतरी विशेषणे असतील, तर सर्वजण आपापल्या परीने प्रवचन, कीर्तन, उपदेश करीत असतात. याशिवाय दूरदर्शनवर न दिसणारे अजून कितीतरीजण असतील. एवढे झाले भारतीयांना उपदेश देणारे. त्यात परत वेगवेगळ्या भाषेत प्रवचन सांगणारे.

भारतातील या सर्व महान अशा संत या मंडळींचा मला आदरच आहे, त्यांचा अपमान किंवा त्यांना बोल लावण्याचा माझा हेतू नाही. पण आता या सर्वांचे पूर्वायुष्य, चरित्र प्रसिद्ध करण्याची इच्छा आहे, त्यावरून सर्व लोकांना अधिक ज्ञान, प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महान कार्यापासून सामान्य जनता स्फूर्ती घेईल.

या सर्व भारतातील महात्म्यांची एक Directory करण्याचा माझा प्रयत्न आहे, तेव्हा मला मदत करावी, म्हणजे सर्व सामान्य जनतेपर्यंत त्यांची ओळख होईल. हि माहिती संकलीत केल्यावर जागतिक स्तरावर पोहोचवता येईल. सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. 

महात्म्याचे नाव, त्यांचे शिक्षण, त्यांच्या गुरूंचे नाव, त्यांचे मूळ गाव, विशेष असा विषय ज्यावर ते सहज प्रवचन करतात,

विशेष ज्ञान, त्यांचा पूर्वीचा व्यवसाय (शक्य असल्यास, त्यांच्या परवानगीने), काही विशेष कार्य, असामान्यत्व, चमत्कार,  भविष्यातील समाजकार्य, जर काही आश्रम मठ स्थापन केले असतील तर तेही द्यावेत. पण हि माहिती देताना आपला

email id, आपले नाव, त्रोटक माहिती देणे जरूरीचे आहे. 

मी सर्वांना आवाहन करतो कि, मला सूची तयार करावयाची असल्याने ज्या कोणाला, कोणा महाराज, मातांबद्धल माहिती असल्यास जरूर कळवावी. वरील मुद्यांव्यतीरिक्त अन्य विशेष माहिती असल्यास कळवावी.

सर्वोऽयं ब्राह्मणो लोके वृत्तेन तु विधीयते ।
वृत्ते स्थितस्तु शूद्रोऽपि ब्राह्मणत्वं नियच्छति ॥
( महाभारत, अनु० १४३।५१ )

अर्थ- सदाचारी असल्यामुळेच ब्राह्मण समुदाय आपल्या ब्राम्हण पदावर स्थित आहे. सदाचारी शूद्रसुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त करू (या जन्मी) शकतो. 

आचाराल्लभते चायुराचाराल्लभते प्रजाः ।
आचारादन्नमक्षय्यमाचारो हन्ति पातकम् ॥
आचारः परमो धर्मो नृणां कल्याणकारकः ।
इह लोके सुखी भूत्वा परत्र लभते सुखम् ॥

( देवीभागवत ११।१।१०-११ )

अर्थ- सदाचाराने दीर्घायुष्य, संतान प्राप्ती होते, अन्नाची उपलब्धता वाढते. सदाचार सर्व पापांचा नाश करतो. मानवजातीसाठी सदाचार कल्याणकारी धर्म मानला गेला आहे. सदाचारी मनुष्य इहलोकी सुख भोगून परलोकीही सुखी होतो. 

 

 

07192007

वृत्तं यत्‍नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च ।
अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥
( महाभारत उद्योग० ३६।३० )

 

अर्थ- प्रयत्नपूर्वक सदाचाराचे रक्षण केले पाहिजे. धन तर येत जात असते. धनाचा नाश झाल्यास मनुष्याचाही नाश होतो असे समजत नाहीत, परंतु जो सदाचाराने भ्रष्ट होतो त्याला नष्ट झाला असेच समजले पाहिजे.

आचारप्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः ।
आश्रमाचारयुक्तेन पूजितः सर्वदा हरिः ॥
( नारदपुराण, पूव० ४।२२ )

अर्थ- सदाचारापासून धर्म प्रकट होतो, धर्मापासून भगवान विष्णू प्रकट होतात. अंततः जो आपल्या जीवन आश्रमात सदाचाराशी संलग्न आहे, त्याच्याकडून सदा सर्वदा श्रीहरी पूजीत आहेत.  

 

07182007

सदाचारवता पुंसा जितौ लोकावुभावर्पिं ॥
साधवः क्षीणदोषास्तु सच्छब्दः साधुवाचकः ।
तेषामाचरणं यत्तु सदाचारस्स उच्यते ॥

( विष्णुपुराण ३।११।२-३ )

अर्थ- सदाचारी मनुष्य इहलोक परलोक दोन्ही जिंकून घेतो. संत या शब्दाचा अर्थ आहे साधू आणि साधू म्हणजे तो जो दोषरहित आहे.अशा साधूपुरूषाचे जे आचरण आहे, तेच सदाचरण होय.

 

आचारहीनः पुरुषो लोके भवति निन्दितः ।
परत्र च सुखी न स्यात्तस्मादाचारवान् भवेत् ॥

( शिवपुराण, वा० उ० १४।५६ )

अर्थ- आचारहिइन मनुष्याची या जगात निंदा होते तर तो स्वर्गात सुद्धा सुख प्राप्त करू शकत नाही. तरी सर्वांनी सदचरीत व्हावे.

उद्या- अनमोल विचार - ४ 

07162007

आचारः फलते धर्ममाचारः फलते धनम् ।*
आचाराच्छ्रियमाप्नोति आचारो हन्त्यलक्षणम् ॥

( महाभारत, उद्योग० ११३।१५ )

अर्थ- सहाचारच धर्म सफल बनवतो, सदाचारापासून धनरूपी फळ मिळते, सदाचारापासून संपत्ती प्राप्त होते, तसेच सहाचार अशुभ लक्षणांचा नाश करते.

कलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽर्थतः ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः ॥
वृत्ततरस्त्वविहीनानि कुलान्यल्पधनान्यपि ।
कुलसंख्या च गच्छति कर्षन्ति च महद् यशः ॥

( महाभारत, उद्योग० ३६।२८-२९ )

अर्थ- ज्या कुळात धन, मनुष्य आणि गाई विपुल प्रमाणात असूनही, जे कुळ सदाचाराने हीन आहे, त्याची गणना उच्च कुळात होत नाही. परंतु जी कुळे धनवान नसूनही सदाचाराने संपन्न आहेत, त्यांची गणना मात्र उच्च कुळात होते आणि त्यांना महान यश प्राप्त होते.

 उद्या- अनमोल विचार - ३

हिंदू धर्म सनातन धर्म आहे. हिंदू धर्मात वेद, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये वगैरे प्रचंड साहित्य आहे, यातून आपल्या पूर्वजांनी अनमोल शिकवण दिलेली आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने उपदेश केलेला आहे. आपण रोज त्याची माहिती करून घेऊ यात. आयुष्यात काय करावे, आणि काय टाळावे याची जाणीव होते. माणसाचे आचार विचार कसे असावेत याबद्दल ऋषी मुनींनी काय सांगितले आहे ते रोज याठिकाणी मनन करू यात.

आचारहीनं न पुनन्ति वेदा
यद्यप्यधीताः सह षड्‌भिरङ्गैः ।
छन्दांस्येनं मृत्युकाले त्यजन्ति
नीडं शकुन्ता इव जातपक्षाः ॥

( वसिष्ठस्मृति ६।३; देवीभागवत ११।२।१ )

अर्थ - आचारहीन मनुष्याने, 'शिक्षा, कल्प, निरुक्त, छन्द, व्याकरण आणि ज्योतिष’ या सहाही अंगांनी वेदांचे अध्ययन केले असता सुद्धा वेद त्याला पवित्र करण्यास असमर्थ आहेत. ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी घरटे सोडून देतात, त्याचप्रमाणे मृत्युसमयी वेद त्या मनुष्याचा त्याग करतात. 

 

आचाराल्लभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः ।
आचाराद्धनक्षय्यमाचारो हन्त्यलक्षणम् ॥

( मनुस्मृति ४।१५६ )

अर्थ - मनुष्य सदाचाराने दीर्घायुष्य प्राप्त करतो, गुणवान संतान प्राप्त करतो, अक्षय धन संपत्ती प्राप्त करतो  त्याचप्रमाणे सदाचाराने वाईट लक्षणांचा नाश होतो.

उद्या - अनमोल विच्रार - २
 
पुण्याच्या दैनिक सकाळ मधील या दोन बातम्या. विचार करायला लावणार्‍या. एक कायदा राबवणारे आणि दुसरे उद्या कायदा शिकून कायदा पाळणारे, भारताचे आधारस्तंभ. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवताना ज्यांनी प्राण दिले की ज्या गुरूजनांनी यांना शिक्षण दिले त्यांचे पुण्य कमी पडले, म्हणून आजहे  वाचावे लागले. अरे, लिहा रे कुणीतरी यावर.
 
 
http/www.esakal.com/esakal/07132007/PuneEC40304BA1.htm


 
दारूच्या नशेत पोलिस हवालदाराचा गोंधळ

पुणे, ता. १२ - दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका पोलिस हवालदाराला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जंगली महाराज रस्त्यावरील मॉर्डन कॅफे हॉटेलजवळ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. .......
 
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना अटक

पुणे, ता. १२ - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना काल रात्री बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. रुक्‍मे यांनी या मद्यपींची, एक हजार रुपयांच्या रोख जातमुचलक्‍यावर आज सुटका केली. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश असून ढोले पाटील रस्त्यावरील पबमधून ते बाहेर पडले होते. ........
या रस्त्यावर लश, टेन डाउनिंग स्ट्रीट (टीडीएस) हे पब; तसेच बार रेस्टॉरंट आहेत. रात्री उशिरा येथून बाहेर पडलेले मद्यपी तरुण-तरुणी घरी जायला निघाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरुद्ध मद्य पिऊन वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दुचाकी; तसेच चारचाकी चालकांचा समावेश आहे.

 

उद्या शुक्रवार १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता माउलींची पालखी जेजुरी कडे मार्गस्थ होईल. सासवडमध्ये आपले बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेउन माउली विठ्ठल भेटीसाठी, वारकर्‍यांसोबत पंढरपूरला निघतात.   
'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पावले पंढरीकडे आपोआप चालतात. 

पांडुरंगाच्या सेवेनं, प्रेमानं देव प्रसन्न होतो. पण देवाजवळ मागणे काहीही नाही. वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. येथे देव-भक्ताचं नातं नाही, ते माता-मुलाचं नातं आहे. येथे बाळ आईची किती वाट पाहतं नाही. आईचे डोळे मात्र बाळासाठी आसुसलेले असतात.
"वाट पाहे उभा भेटीची आवडी
कृपाळू तातडी उतावीळ'
जर देव पांडुरंगच आमची वाट पाहत असेल, तर आम्ही त्याच्यापाशी धावत का जायचे नाही? ही तर सख्याचं दर्शन घेण्याची वारी असते. ’भेटीलागी जीव लागतसे आस’ अशी आस लागलेली असते, तेव्हाच जगाचा विसर पडून पावले आपोआप टाळ मृदुंगाच्या गजरात नाचू लागतात.

पालखी जेजुरीला येणार, आणि वारकरी खंडोबारायाचे दर्शन घेणार, त्यात पांडुरंगाचे रूप पाहणार.

जेजुरीबद्धल थोडेसे-जेजुरीला खंडोबाचे मंदीर आहे. मंदीर गडावर असून साधारण २०० पायर्‍या आहेत. मुख्यतः धनगर लोकांचे भक्तिस्थान आहे. शिवाजीमहाराज नेमाने दर्शनाला येत. खंडोबाला मल्हारी मार्तंड सुद्धा म्हणतात. गजर करताना ’येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणतात. येळकोट म्हणजे कानडीत, येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी, खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. खंडोबाला भंडारा खोबरे उधळले जाते. 

माउलींची पालखी १४ जुलै,शनिवारचा मुक्काम-वाल्हे

तुकाराम महाराजांची पालखी १४ जुलै, शनिवारचा मुक्कम-उंडवडी गवळ्याची

 १२ जुलै २००७ 

आज दि. १० जुलै पुणे मुक्कामी वारकरी समाजाला जेवण असते. जेवण अत्यंत साधे, भाकरी, भाजी, फोडणीचा भात, एखादा गोड पदार्थ. पण त्यात आनंद भरलेला असतो. वारकरी  जेव्हा जेऊन तृप्त होतो तेव्हा वाढणा‌र्‍याला जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येणार नाही. राती सर्व वारकरी कीर्तन करतात, हरिपाठ होतो, आणि दुस‍र्‍या दिवशी सकाळी लवकर उठून माऊलींना सोबत करायची आहे, संत संगत करायची आहे, या ओढीनेच केव्हा झोप लागते कळत नाही. 
दि. ११ जुलै रोजी बरोबर सकाळी ६ वाजता पालख्या आरती करून निघतील. तेव्हा सर्व दिंड्या आपापल्या जागेवरच येणार, नंबराला लागणार. दुपारी ११ वाजता दोन्ही पालख्या हडपसरला थांबणार. जेवण करणार आणि माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघणार. सासवडला जाताना रस्त्यात दिवे घाट येतो, पालखीच्या रथाला १२ बैल जुंपतात. घाट चढतानाचे दृश्य फारच अप्रतीम असते. प्र्त्येकाच्या खांद्यावर भगबी पताका. सबंध घाट असा भगवामय होऊन जातो. सासवडला माऊलींचे बंधू सोपानदेव महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन करून, एक दिवस मुक्काम करून मगच पालखी पंढरपूरला निघते.

पंढरीच्या वारीचे हे वेळापत्रक आहे. यात कधीही बदल होत नाही. हे वेळापत्रक राबवण्यासाठी कोणत्याही यंत्रणेची गरज

भासत नाही.

WariTimeTable2007

वरील वेळापत्रक दैनिक सकाळ मध्ये छापून आलेले आहे.

दरवर्षी प्रमाणे, ज्येष्ठ महिना आला आणि वारीचे वेध लागले, वेध कसले? पांडुरंग दर्शनाचे, संतांच्या सहवासाचे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतून वारकरी आळंदी, देहूला जमू लागले. आठशे वर्षांपूर्वी सुरु झालेला हा सोहोळा अखंड सुरू आहे.   ज्ञानेश्वरांचे आई वडीलही नेमाने पंढपूरला जात. तुकोबारायांच्या घराण्यातही वारी होती.तुकोबारायांनी वारीला सामुदायिक रूप दिले.

तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा, त्यानंतर नारायणबाबा यांनी ही प्रथा पुढे सुरू ठेवली. नारायणबाबांनी तुकोबारायांच्या व ज्ञानोबांच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. "ज्ञानोबा-तुकाराम' हा भजनघोषही त्यांनीच दिला. नारायणबाबा तुकाराम महाराजांच्या पादुका सप्तमीला पालखीत ठेवीत आणि अष्टमीला आळंदीला जात. तेथे ज्ञानोबारायांच्या पादुका घेत आणि तेथूनच नवमीला वारीला निघत. १६८० ते १८३२ पर्यंत ही प्रथा कायम राहिली.

हंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. शिंदे यांचे आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी १८३२ मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका म्हणे गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंतची वारी पायी करीत. माऊलींच्या पालखीचा श्रीमंती थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. लष्करी शिस्तीचा सोहळा हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र सुरू करतानाच, या सोहळ्याला शिस्तही लावली. हि शिस्त वारकर्‍यांनी कोणाच्याही नेतृताशिवाय पाळली.

श्री संत ज्ञानेश्‍वर व श्री संत तुकाराम यांच्या पालख्या पुण्यात म्हसोबा नाक्‍यावर (नवमीला सायंकाळी) भेटतात. त्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेत विठोबाच्या देवळात, तर तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेत निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम करते. दशमीला विश्रांती घेऊन एकादशीला दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात.

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, लोणी, यवत, वरवंड, पाटस, बारामती, अकलूज या मार्गे पंढरपूरला जाते.तर माऊलींची पालखी सासवड, जेजुरी, वेल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस या मार्गे पंढरपूरला जाते.  

तारीख ९ जुलैला पालख्या पुण्यात मुक्कामी य्रेऊन ११ तारखेला पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. वारकरी आपली सर्व खरेदी पुण्यातच करतो. त्यात प्रामुख्याने पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टीकचे कापड खरेदी केले जाते. पुणेकरांचे अहोभाग्य, दोन्ही पालख्यांचे दर्शन होते. पुण्यात जागोजागी वारकरी भोजन दिले जाते. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाते.

पालखी सोहळ्यात ज्ञानदेव महाराजांच्या पालखीपुढे 27 व मागे 105 दिंड्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे 18 व मागे 69 दिंड्या आहेत. काही वर्षे सातत्याने पालखीबरोबर चालल्याशिवाय पालखी सोहळा दिंडीला मान्यता देत नाही.

पुण्याबद्दल थोडेसे - इ.स. ८ व्या शतकात पुणे 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात पुणे 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर "पुण्यनगरी"नावाने ओळखले जाउ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. आता हे शहर "पुणे" या अधिकृत नावाने ओळखले जाते.

तारीख ९ जुलैचा कार्यक्रम

पुण्यात आगमन आणि मुक्काम.

मुक्कमाचे ठिकाण

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी-पालखी विठोबा मंदीर भवानी पेठ, पुणे.

तुकाराम महाराजांची पालखी- श्री निवडुंगा विठोबा मंदीर नाना पेठ, पुणे.

"स्टार माझा" ही नवीन मराठी बातम्यांची नवीन वाहिनी सुरु झाली आहे. आज चुकुन त्यांच्या संकेतस्थळावरुन नजर घालता आणि लक्षात आले की तेथे ती वाहिनी बघता येते. आणि तेही चक्क फुकट!!

बघा http://www.starmajha.com/

आणखी एक उदाहरण, ज्यामुळे आज अशा अनेक गोष्टी इतिहासात दडुन गेल्या आहेत. आपण जो पर्यंत या सर्वांचा विचार करत नाही तो पर्यंत हे सारे ठिक आहे. पण निसर्ग या सार्‍याचा हिशेब नक्की देणार हे आपल्याला माहीत आहे ना?

रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'

सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ - गेल्या काही वर्षांत पाषाण, बावधन, औंध परिसरातील अनिर्बंध बांधकामांनी रामनदीचा ४४ टक्के भाग "गिळंकृत' केल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. .........
पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात "जिओ-अप्रेझल ऑफ रूरल- अर्बन इंटरफेस अलॉंग नॉर्थ-वेस्ट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ः स्टडी बेस्ड्‌ ऑन जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावर संशोधन सुरू आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुरस्कृत केलेल्या या संशोधनात, शहरात नव्याने समाविष्ट गावांमधील भू-पर्यावरणीय बदलांची नोंद घेण्यात येत आहे. त्यात रामनदीच्या ५१ चौरस किलोमीटर खोऱ्यातील विशेषतः शहराच्या हद्दीतील ४४ टक्के भाग अतिक्रमणांनी व्यापला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूल घाबरते तेव्हा आईजवळ जाते, आई त्याला पदराखाली घेते, तेव्हा त्या बाळाला जगातील सर्वात सुरक्षित जागा वाटते.

साडी कितीही भारी असो, तिचा पदर पाहिला जातो, त्यावरून तिची किंमत ठरते. ऊन असो अगर पाऊस, पदर डोक्यावर घेतला कि, संरक्षण. तो पदर जो सात फेर्‍यांच्या वेळेस गाठ बांधला जातो, तो जन्मजन्मांतरीची गाठ बांधतो. जेव्हा प्रियकर समोर असतो, अबोला असतो, गालावर गुलाबी लाली असते तेव्हा तो पदर बोटावर गुंडाळला जातो आणि  सर्व मनातले गुपीत उघड करतो. बंगालमध्ये हाच पदर तिजोरीच्या चाव्या सांभाळतो. जेव्हा स्व-संरक्षणाची वेळ येते तेव्हा हाच पदर खोचला जातो. पैसे म्हातारपणासाठी वाचवायचे असतील तर, पदराला दोन पैसे गाठ मारायला सांगीतले जातात. पैसे ठेवायला जागा नसेल तर पदराचा कोपरा कामाला येतो. अरेरे, लहान बाळाचे नाक कशाने पुसायचे, पदर काय कामाचा मग? खांद्यावरचा पदर डोक्यावर गेला कि, देवाचा, थोरामोठ्यांचा आशिर्वाद मिळतो. द्रौपदीच्या पदराला दुःशासनाने हात घातला आणि श्रीकृष्णाने लाखो साड्या पुरवल्या, पदराची लाज सांभाळली.  

हाच पदर पडला तर, विश्वामित्र व्हायला वेळ लागत नाही.  

पदर पारदर्शक असला तरी सुरक्षीत वाटतो ना? पण तोच पदर थोडासा जरी घसरला तर........? 

कल्पनाच न केलेली बरी.

भारतात दहावीचा निकाल 71 टक्के लागला, का नाही लागणार? प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले? त्यांचे काय? त्या सर्वांवर अन्याय नाही काय?

ज्या विद्यार्थ्यांना गणितात 5 मार्क मिळाले ते सुद्धा पास झाले ना. म्हणजे यावर्षी 30 मार्कांच्या खाली कोणीच नाही.

किती छान गोंधळ घातला आहे ना? पुस्तकात चुका होतात, त्या नंतर कळतात, छापल्या जातात, ते पुस्तक तयार करणारे, छापण्या आधी बघत नाहीत, छापल्यावर कळते, आहेत कि नाही हुशार लोक?

सगळ्यात महत्वाचे, मी तर म्हणतो दहावीला कोणाला नापासच करू नये, म्हणजे कोणालाही वाईट वाटणार नाही. सगळे पास. 5-10 टक्के वाला आणि 98 टक्केवालाही पुढे कॉलेजला जाईल, जो जास्त टक्केवाला तो प्रवेश घेईल. सर्वांना पास करण्याचे फायदे-

  1. सर्वांना आनंद
  2. शाळांचा निकाल 100 टक्के
  3. पुन्हा ऑक्टोबर बॅच नको
  4. अकरावीला भरपूर विद्यार्थी असल्यामुळे शिक्षणसम्राटांना नवीन कॉलेजेस काढता येतील, त्यांचा धंदा वाढेल. कॉंपीटिशन वाढल्यामुळे भरपूर डोनेशन मिळतील.

आता अभ्यासक्रम बदलण्याची काय आवश्यकता होती? तोच अभ्यासक्रम चालला असता ना? नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना? मग काय फरक पडतो? पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना? उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार? पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय? थोडा विचार करा त्या चुकीच्या पुस्तकामुळे काय फरक पडला असता. उलट सरकारने जाहीर अरायला पाहिजे होते कि, या पुस्तकाच्या विषयात सर्वांना परिक्षेत कोणीही नापास होणार नाहीत. पुस्तके नवीन छापण्याचा खर्च वाचला असता. देशाचे नुकसान टळले असते. परीक्षेनंतर सगळे विसरायचेच असते.

खरे तर कोणालाही कधीच नापास करू नये. अगदी पदवीधरापर्यंत. पुढे जाऊन सगळेजण आपापल्या कुवतीप्रमाणे जीननात पुढे जातील.

यानंतर खेळ खंडोबा - 2 मध्ये.   

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ▼  July (22)
      • अनमोल विचार - ११
      • अनमोल विचार - १०
      • अनमोल विचार - ९
      • अनमोल विचार - ८
      • शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद
      • अनमोल विचार - ७
      • अनमोल विचार - ६
      • भारतातील बाबा
      • अनमोल विचार - ५
      • आनमोल विचार - ४
      • अनमोल विचार - ३
      • अनमोल विचार -२
      • अनमोल विच्रार - १
      • यांच्या शिक्षणात काय कमी पडले?
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • बघा स्टार माझा !!
      • रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'
      • पदर
      • भारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose