पंढरीची वारी-वारकरी

आज दि. १० जुलै पुणे मुक्कामी वारकरी समाजाला जेवण असते. जेवण अत्यंत साधे, भाकरी, भाजी, फोडणीचा भात, एखादा गोड पदार्थ. पण त्यात आनंद भरलेला असतो. वारकरी  जेव्हा जेऊन तृप्त होतो तेव्हा वाढणा‌र्‍याला जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येणार नाही. राती सर्व वारकरी कीर्तन करतात, हरिपाठ होतो, आणि दुस‍र्‍या दिवशी सकाळी लवकर उठून माऊलींना सोबत करायची आहे, संत संगत करायची आहे, या ओढीनेच केव्हा झोप लागते कळत नाही. 
दि. ११ जुलै रोजी बरोबर सकाळी ६ वाजता पालख्या आरती करून निघतील. तेव्हा सर्व दिंड्या आपापल्या जागेवरच येणार, नंबराला लागणार. दुपारी ११ वाजता दोन्ही पालख्या हडपसरला थांबणार. जेवण करणार आणि माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघणार. सासवडला जाताना रस्त्यात दिवे घाट येतो, पालखीच्या रथाला १२ बैल जुंपतात. घाट चढतानाचे दृश्य फारच अप्रतीम असते. प्र्त्येकाच्या खांद्यावर भगबी पताका. सबंध घाट असा भगवामय होऊन जातो. सासवडला माऊलींचे बंधू सोपानदेव महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन करून, एक दिवस मुक्काम करून मगच पालखी पंढरपूरला निघते.

Aditya. Bhosale

No comments: