मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT
सरकारकडे बहुतेक असे एक खाते असावे कि, तेथे फक्त नविन कोणता कर लावावा यावर संशोधन होत असावे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कर घ्यावा, आणि कामावर ठेवणार्‍याकडून सुद्धा घ्यावा. मेहनत करणारे विद्यार्थी, कामावर ठेवणारे पगार देणार आणि कर कोण घेणार तर सरकार. आईवडिल कष्ट करून शिकवणार, लहानपणी खस्ता खाणार, स्वतः त्रास काढणार त्यांचे काय? जर कामावर ठेवणार्‍यांना कर द्यायचा असेल तर ते त्यांना कामावर ठेवणार नाहीत, मग त्या विद्यार्थांच्या भविष्याचे काय? आईवडिल मुलांना शिकवतात आणि जर एखाद्या मुलाचे लग्न झाले तर सासरकडच्या मंडळींनी मुलाच्या आईवडिलांना, सरकारप्रमाणेच कर द्यायला नको का? हा कर लावला तर करांची एक मालिकाच तयार होईल. सरकारने तर आता एक स्पर्धा जाहीर केली पाहिजे कि, जो कोणी भारतीयांवर  जास्तीत जास्त कर कसे लावता येतील, कसे वसूल करता येतील, याबद्दल सविस्तर संशोधन करेल त्याला 'करमहर्षी" पुरस्कार जाहीर करून जमा झालेल्या करातून काही हिस्सा द्यावा. भारतीय माणूस फारच सोशिक आहे, तो कधीही, कुठेही तक्रार करणार नाही.  खरोखरच औरंगजेबाच्या जिझीया कराची आठवण होते.
 

Sakal Papers International Marathi News Daily - Pune




परदेशात नोकरी? "एक्‍झिट टॅक्‍स' भरा!  
नवी दिल्ली, ता. १९ - देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांतून पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून "एक्‍झिट टॅक्‍स' आणि अशा विद्यार्थ्यांना कामावर ठेवणाऱ्या संस्थांकडून "ग्रॅज्युएशन टॅक्‍स' आकारण्यात यावा, अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संसदीय समितीने केली आहे
 
 
 
 
भारताची न्यायव्यवस्था काय म्हणते,शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. बरोबर असेच ९९ अपराधी तर सुटत नाहीत ना? तीन तीन कोर्टातून साक्षी पुरावे तपासून,
हायकोर्टात शिक्कामोर्तब होऊन, सुप्रीम कोर्टात अपील होऊन फाशी कायम होते, शिवाय अपराध्याला पूर्ण संधी दिली जाते, तरीही राष्ट्रपतीकडे ही प्रकरणे वर्षानुवर्षे पडून रहावीत, म्हणजे ज्यांची या अपराध्यांमुळे हानी झाली आहे त्यांचे काय? बरोबर आहे हि प्रकरणे राष्ट्रपतींकडे पाठवूच नयेत. आणि शिक्षेची अंमलबजावणीसाठी सुद्धा मुदत असावी.
संजय दत्तबद्दल मिडीयावाल्यांनी दिवसरात्र न्युज दिल्या, अगदी कंटाळा येईपर्यंत, परंतु या कोणालाही एवढे समजले नाही कि, त्या बॉम्बस्फोटात ज्यांचे नातेवाईक, मुले, कर्ते पुरुष, आईवडिल, मुलेबाळे गेली, संपत्तीची हानी झाली, त्यांची साधी मुलाखात घ्यावी. अरे त्यांना विचारा, त्यांना न्याय करू द्या या अपराध्यांचा. एका तरी वृत्तपत्रवाल्यांनी त्या पिडीत लोकांवर अग्रलेख लिहीला काय? त्यांच्या मुलाखती छापल्या काय? त्यावेळच्या स्फोटाची छायाचित्रे छापली काय? नाही त्यांची आठवण कोणालाच नाही. देवा परमेश्वरा, आता तूच या सर्वांना बुद्धी दे बाबा. 
 
 
http://www.esakal.com/esakal/08182007/Pune0EFE30C321.htm


 
पुणे, ता. १७ - ""मुंबई बॉंबस्फोटांतील आरोपींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी किती दिवसांमध्ये होईल, हा प्रश्‍न आहे. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली, तरच गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखविता येईल आणि त्यांच्या मनात कायद्याविषयी भीती बसेल,'' असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज व्यक्त केले. ........
राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज किती प्रलंबित ठेवावा हे ठरविले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

निकम म्हणाले, ""न्याय प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळेच आज गुन्हेगारांना कायद्याविषयी भीती नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी फक्त कायदे कठोर करून चालणार नाही, तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरपणे झाली पाहिजे. पुण्यातील राठी हत्याकांडातील आरोपीला देण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली आहे. मात्र, त्यानंतर त्याचा दयेचा अर्ज पडून असल्याने अजूनही अंमलबजावणी झालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे.''

खालील बातमी आहे दैनिक सकाळ मधील. एवढी मुले शाळा कॉलेजमधून पास होत असताना एक सचिव मिळू नये? आहे के नाही कमाल. ते तर सोडा एवढ्या मोठ्या देशाला राष्ट्रपती मिळत नाही. शोधावा लागतो, मग पहिली स्त्री म्हणून अगतीक व्हावे लागते. किती जणांना त्या माहित असतील. अरे आम्हाला किरण बेदी पन चालल्या असत्या. हिंदू राष्ट्राच्या सर्वोच्च पदी हिंदूच राष्ट्रपती असावा हे तर आम्ही केव्हाच विसरून गेलोय, तीच कथा शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राचीही.
 
राष्ट्रपतीपदासाठी कोण कोण चालले असते हे कुणी सांगू शकेल काय?

 
 
 

Sakal Papers International Marathi News Daily - Pune


कुणी सचिव देता का, सचिव?
पुणे, ता. १७ - अनेक महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित असताना दुसरीकडे सहकार खात्याचे गाडे सचिवांविना अडले आहे. गेले काही दिवस खात्याला पूर्णवेळ सचिव नसल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले अनेक निर्णय रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.
 
 
 
 
 

 

 

*********************
दुरुस्ती केलेली

*********************

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर

http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm

जन्माला आल्याआल्या आपल्याला माणसांची ओळख सुरू होते. कळत नसते पण तोंडओळख होते. आजूबाजूचे लोक येऊन हसत बोलत असतात. सर्व जण गोडच बोलतात कारण त्यांना पक्के माहित असते कि, या बालकापासून काहिही फायदा तोटा नाही. पण त्याच लहान बाळाने अंगावर ’सू’ केली, कि लगेच त्याला त्याच्या आईकडे दिले जाते. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला जग कळते आणि आपल्यालाही जग ओळखते. शिक्षण पूर्ण होते, कामधंदा सुरू होतो, आणि संपर्कातील माणसांची संख्या वाढते.

जन्माला येताना काही नातेवाईक अपरिहार्य असतात, टाळता येत नाहीत, नातेवाईकांनाही आपले नाते टाळता येत नाही. मग होतात मित्र, ते जोडणे, मात्र आपल्या हातात असते, पण पन्नास टक्केच बरे का, कारण त्यालाही चॉइस असतोच ना? जो प्रकार मुलांच्या बाबतीत तोच मुलींच्या बाबतीतही. बालपणातले मित्र तरूणपणात, तरूणपणातले नंतर कमीकमी होत जातात, तर काही संगतीत राहतात. कधी नातेवाईक जवळचे तर कधी मित्र जवळचे असतात. किती प्रकार ना? नातेवाईक, जवळचे लांबचे, मित्र, शेजारीपाजारी, कधितरी कुठेतरी ओळख झालेले, शाळेतील मित्र, घराजवळचे मित्र, ऑफिसातले मित्र, व्यवहारातील ओळख झालेले, रस्त्यात भेटल्यावर पत्ता शोधत घरी येणारे, नुसतेच हाय करणारे, प्रवासात भेटणारे, किती प्रकार. 

घर असते, येणारे घरीच येणार, कधीतर बळेच घरी येणार. आता आपण हे ठरवायचे कि, कोणाला घरी आणायचे कोणाला नाही, नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच विचार केलेला बरा नाही का?

रस्ता, गल्ली, घराचे अंगण, दरवाजा बाहेर, दरवाजाच्या आत, हॉलमध्ये, आपल्या समोर, आपल्या शेजारी, फक्त बोलण्यापुरते, चहापुरते, चहासोबत काही खायला देण्या पुरते, काही सोबत जेऊ शकतात, तर काही पार स्वैपाकघरात सुद्धा येऊ शकतात. आता एवढ्या प्रकारात कोणाला कशी वागणूक द्यायची ते आपण ठरवायचे असते,  काय? काही माणसे रस्त्यात भेटल्यावर तिथेच सोडून द्यायचे असतात, तर काही पार स्वैपाक घरात न्यायच्या लायकीचे असतात, मग तिथे नातेवाईक का मित्र हा विचार नसतो. रस्याच्या लायकीचा जर स्वैपाकघरापर्यंत पोहोचलातर काय अनर्थ होईल कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा प्रत्येकाची जागा आपणच ठरवायची असते, एवढेच नाहीतर त्यांच्या जागासुद्धा प्रसंगाप्रमाणे, त्याच्या वागणूकीप्रमाणे बदलायच्या असतात, तिथे कोणाचीही भिडभाड ठेऊ नये, नंतर जड जाते, आयुष्य बदलून जाते, संसार उधळून जातो. दारावरच्या कोणालाही त्याच्या वागणूकीप्रमाणेच हळूहळू आत येऊ द्यावे, आणि तसेच बाहेरही ढकलण्याची मानसिक तयारी ठेवावी. आपणही दुसर्‍याच्या घरी जाताना विचार करावा कि आपली तिथे कोणती जागा आहे.

मात्र घरातील देवाचे स्थान अशा ठिकाणी असावे कि त्या ठिकाणी कोणीही पोहोचता कामा नये, कोणालाही तेथपर्यंत नेऊ नये.

शेवटी काय तर माणसाची प्रसिद्धी, प्रतिष्ठा कशावरून ओळखायची तर, त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक जमतात, त्यावरच ना?       

आपल्या भारतात जगातील एक आश्चर्य आहे, म्हणजे ताज महाल. आपण भारतीयांनी जीवाचा आकांत करुन त्याचं स्थान कायम केले. जर ताज महाल हे एक आश्चर्य आहे, तर ते जगातील इतरांनी मान्य केले किंवा नाही यात काय फरक पडतो? जर जागतिक मत बघुन हे ठरत असेल तर आपली लोकसंख्या बघता, साती आश्चर्ये भारतीय किंवा चिनी बनवता आली असती. जगातील काही सत्ये ठरवण्यासाठी आपण लोकशाहीचे नियम वापरु नयेत असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जगातील लोकप्रसिध्द गाणे  यावर असाच लोकशाही प्रयोग झाला होता. वंदे मातरम हे त्यात पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी, लोकांच्या मान्यतेची गरज होती. जगातील आश्चर्ये मात्र या लोकशाही प्रकाराल अपवाद नाही का. थायलॅंडमधील हिंदु मंदिराला तो दर्जा मिळावा म्हणुन हिदुवादींनी आवाहन केले होते, मग आपण ताजच का वर आणला? माझ्यामते, हा सर्व प्रकार पर्यटन सस्थां आणि उद्योगांनी फक्त गाजावाजा करत, प्रोत्साहनासाठी केला होता. जर ताज आश्चर्यात आला नसता तरी ज्यांना तेथे जायचे ते जाणारच, आणि ताजचे सौंदर्य त्यांना भुरळ पाडणारच. पण ताज महाल मध्ये  आश्चर्य ते काय?


"खुप मोठे हो ते बांधकाम" म्हणुन?

शाह जहान खूप मोठा बादशहा होता, त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे बांधले, त्यात फार काय ते कौतुक हे? अहो जागा फुकट, कामगार फुकट. खर्च तो फक्त सामानाचा, आणि नंतर त्या कामगारांचे हात कापणार्‍या सैनीकांचा. बस्स. झाला तयार तुमचा ताज महाल. एवढ्या मोठ्या बादशहाने जो बांधला त्यात कौतुक ते काय? कारण त्याच्या ऐपतीपेक्षा लहानच आहे तो.
अजुनही ताजवरील संशय काही कमी होत नाहीत. पु. ना. ओकांच्या म्हणण्याप्रमाणे, तो तेजोमहालय आहे. आता हे मात्र मला माहित नाही. पण इतिहास हा कायम, राज्यकर्त्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे बदलल्याची उदा. आपल्याला इतिहासात दिसतातच. त्यामुळे, सध्याच्या सरकारने तो बदलला किंवा शाह जहानने तो बदलला हे कोडे सुटणे अबघडच आहे.

बायकोसाठी बांधला म्हणुन?

आता मुमताजमहल मेल्यावर बांधला ना? नव‌र्‍याने बायकोसाठी ती मेल्यावर बांधले म्हणुन? खरे बघाल तर बायको मेल्यावर त्याच्या आनंदात आज अनेकजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे ताज महाल बांधतील. ;)  शाह जहानने फक्त मुमताजमहल साठीच का बांधला? त्याच्या इतर बायकांनी काय गुन्हा केला? (तु.मा.प्री. शाह जहानचा जनानखाना बराच मोठा होता.) मुमताजमहल खुप सुंदर होती म्हणे. पण तरी, दिल्लीच्या राजाने हे आश्चर्य आग्र्याला का बांधले? जर त्याला आपल्या समोर आवडतीच्या आठवणीसाठी तीच्या इतके सुंदर हवे होते तर त्याने इतक्या दूर का बनवले? हे मात्र कोडेच आहे. जागा सुंदर होती म्हणून असेल.


प्रेम वेडे असते म्हणुन?

आजवर प्रेमवीरांच्या नावात लैला-मजनू, हीर-रांझा अशी नाबे होती. (त्यांची लग्ने झाली नव्हती म्हणा. ) मग त्यात शाह-मुमताज हे नाव का येत नाही कोण जाणे? या बादशहाला चार मुले, सगळेच मुमताज महलची नव्हती. मग शाह जहान हा एक पत्नीव्रता नव्हता तर.

 

मरताना ताज बघत मेला म्हणुन?

आता असे खरे की शाह जहानने त्या ताज महालला बघत प्राण सोडले. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्या आज्ञाधारक मुलाने अशी सोय केली त्याची की बस्स, दुसरे काही दिसतच नव्हते त्याच्या खोलीतुन (हो, महालातुन नव्हे.).  कैदेत मिळणारी प्रत्येक सोय आवडीची नसते, पण चालवुन घ्यावी लागते. याशिवाय, शाह जहानचा इतिहास वाचला तर तुम्हाला माहीत असेलच की शाह जहानने सेवेतल्या दासींवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न अनेकदा केला होता. औरंगजेबाने शाह जहानला याबाबत एक पत्र लिहिले होते. हे सारे त्या ताजमहालकडे बघत बरं का!

सुंदर वास्तु

अतिशय रमणीय वास्तु, पटते हे. अगदी खरे. ताज बघता एकही जण निराश होत नाही. अप्रतिम, बस्स!!. या बाबत काही वादच नाही. हे एक कारण असु शकेल.

 

तरीपण, हातच्या काकणाला आरसा कशाला, ताज हे आश्चर्य आहे. मानणे किंवा नाही हे आपण आपले ठरवायचे. त्यासाठी कोणत्याही ब्रिटिश प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ▼  August (6)
      • करमहर्षी
      • अजब तुझे सरकार
      • कमतरता
      • हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
      • जागा
      • जगातील आश्चर्ये आणि भारतीय माणूस
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose