जगातील आश्चर्ये आणि भारतीय माणूस

आपल्या भारतात जगातील एक आश्चर्य आहे, म्हणजे ताज महाल. आपण भारतीयांनी जीवाचा आकांत करुन त्याचं स्थान कायम केले. जर ताज महाल हे एक आश्चर्य आहे, तर ते जगातील इतरांनी मान्य केले किंवा नाही यात काय फरक पडतो? जर जागतिक मत बघुन हे ठरत असेल तर आपली लोकसंख्या बघता, साती आश्चर्ये भारतीय किंवा चिनी बनवता आली असती. जगातील काही सत्ये ठरवण्यासाठी आपण लोकशाहीचे नियम वापरु नयेत असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जगातील लोकप्रसिध्द गाणे  यावर असाच लोकशाही प्रयोग झाला होता. वंदे मातरम हे त्यात पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी, लोकांच्या मान्यतेची गरज होती. जगातील आश्चर्ये मात्र या लोकशाही प्रकाराल अपवाद नाही का. थायलॅंडमधील हिंदु मंदिराला तो दर्जा मिळावा म्हणुन हिदुवादींनी आवाहन केले होते, मग आपण ताजच का वर आणला? माझ्यामते, हा सर्व प्रकार पर्यटन सस्थां आणि उद्योगांनी फक्त गाजावाजा करत, प्रोत्साहनासाठी केला होता. जर ताज आश्चर्यात आला नसता तरी ज्यांना तेथे जायचे ते जाणारच, आणि ताजचे सौंदर्य त्यांना भुरळ पाडणारच. पण ताज महाल मध्ये  आश्चर्य ते काय?


"खुप मोठे हो ते बांधकाम" म्हणुन?

शाह जहान खूप मोठा बादशहा होता, त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे बांधले, त्यात फार काय ते कौतुक हे? अहो जागा फुकट, कामगार फुकट. खर्च तो फक्त सामानाचा, आणि नंतर त्या कामगारांचे हात कापणार्‍या सैनीकांचा. बस्स. झाला तयार तुमचा ताज महाल. एवढ्या मोठ्या बादशहाने जो बांधला त्यात कौतुक ते काय? कारण त्याच्या ऐपतीपेक्षा लहानच आहे तो.
अजुनही ताजवरील संशय काही कमी होत नाहीत. पु. ना. ओकांच्या म्हणण्याप्रमाणे, तो तेजोमहालय आहे. आता हे मात्र मला माहित नाही. पण इतिहास हा कायम, राज्यकर्त्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे बदलल्याची उदा. आपल्याला इतिहासात दिसतातच. त्यामुळे, सध्याच्या सरकारने तो बदलला किंवा शाह जहानने तो बदलला हे कोडे सुटणे अबघडच आहे.

बायकोसाठी बांधला म्हणुन?

आता मुमताजमहल मेल्यावर बांधला ना? नव‌र्‍याने बायकोसाठी ती मेल्यावर बांधले म्हणुन? खरे बघाल तर बायको मेल्यावर त्याच्या आनंदात आज अनेकजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे ताज महाल बांधतील. ;)  शाह जहानने फक्त मुमताजमहल साठीच का बांधला? त्याच्या इतर बायकांनी काय गुन्हा केला? (तु.मा.प्री. शाह जहानचा जनानखाना बराच मोठा होता.) मुमताजमहल खुप सुंदर होती म्हणे. पण तरी, दिल्लीच्या राजाने हे आश्चर्य आग्र्याला का बांधले? जर त्याला आपल्या समोर आवडतीच्या आठवणीसाठी तीच्या इतके सुंदर हवे होते तर त्याने इतक्या दूर का बनवले? हे मात्र कोडेच आहे. जागा सुंदर होती म्हणून असेल.


प्रेम वेडे असते म्हणुन?

आजवर प्रेमवीरांच्या नावात लैला-मजनू, हीर-रांझा अशी नाबे होती. (त्यांची लग्ने झाली नव्हती म्हणा. ) मग त्यात शाह-मुमताज हे नाव का येत नाही कोण जाणे? या बादशहाला चार मुले, सगळेच मुमताज महलची नव्हती. मग शाह जहान हा एक पत्नीव्रता नव्हता तर.

 

मरताना ताज बघत मेला म्हणुन?

आता असे खरे की शाह जहानने त्या ताज महालला बघत प्राण सोडले. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्या आज्ञाधारक मुलाने अशी सोय केली त्याची की बस्स, दुसरे काही दिसतच नव्हते त्याच्या खोलीतुन (हो, महालातुन नव्हे.).  कैदेत मिळणारी प्रत्येक सोय आवडीची नसते, पण चालवुन घ्यावी लागते. याशिवाय, शाह जहानचा इतिहास वाचला तर तुम्हाला माहीत असेलच की शाह जहानने सेवेतल्या दासींवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न अनेकदा केला होता. औरंगजेबाने शाह जहानला याबाबत एक पत्र लिहिले होते. हे सारे त्या ताजमहालकडे बघत बरं का!

सुंदर वास्तु

अतिशय रमणीय वास्तु, पटते हे. अगदी खरे. ताज बघता एकही जण निराश होत नाही. अप्रतिम, बस्स!!. या बाबत काही वादच नाही. हे एक कारण असु शकेल.

 

तरीपण, हातच्या काकणाला आरसा कशाला, ताज हे आश्चर्य आहे. मानणे किंवा नाही हे आपण आपले ठरवायचे. त्यासाठी कोणत्याही ब्रिटिश प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

Vishal Khapre

1 comment:

Unknown said...

taj mahal baddal manatil sarv prashnanchi uttare aaj milali