NRIच्या बायकोची गोष्ट भाग-१

आजकाल NRI मुलांची लग्न म्हण्जे चट मंगनी पट शादी असतात. आईवडिल मुलगी पसंद करतात, मुलाला फोटो दाखवतात आणि मग chatting ने मुलीशी बोलण होतं.मुलगी आवडली तर लवकरात लवकर सुट्टी टाकुन मुलगा लग्नाला उभा राहतो.मधल्या वेळात मुलीला passport सारखे सोपस्कार करायला लागतात. मुलीचे आईवडिल NRI जावई मिळाला म्हणून खुश असतात. मैत्रिणीसुद्धा मुलीला चिडवायला सुरुवात करतात आणि मुलगी मात्र नवीन देश आणि नवरा कसा असेल या विचारात असते. आतापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली राहिलेल्या तिला या सर्व नवीन गोष्टिंनी धडकी भरते. पण हि सुरुवात असते. मुलगी नवऱ्याबरोबर नवीन देशात येते आणि स्वतःचा संसार आई, सासु च्या शिकवणीने, उपदेशाने,मदतीने सुरु करते. गाडी आता कुठे रुळावर येत असते आणि तेवढ्यात कुठेतरी गडबड होते. दोनजणांच्या छोट्या घ्ररट्यात तिसरा पाहुणा यायची चाहूल लागते. माहेरचे,सासरचे सर्व खुश असतात आणि परत एकदा मुलीला धडकी भरते. आई, सासु,ताई, मैत्रिणी सगळ्यांचे परत एकदा सल्ले सुरु होतात. पण महत्वाची गोष्ट अशी असते कि, घरापासुन लांब असणाऱ्या त्या मुलीला काहीच कळत नाही. नवऱ्यालाही काही माहीत नसतं. तो बिचारा ओळखीच्या चार मित्रांकडुन याबाबतीत माहिती मिळवण्यात लागलेला असतो. सुरुवात insurance प्रमाणे जवळ असलेला Doctor शोधण्याने होते. बहुतेकवेळी हा doctor म्हणजे मित्रांनी त्यांच्यावेळी शोधलेलाच असतो. सर्वसाधारण भावना हिच कि, जर चार देसी त्या doctorकडे जातात तर आपल्यालाही चालेल. बऱ्याचवेळी हा doctorहि देसीच असतो. कारण, बहूतेक इथल्या doctorकडे जाणं म्हणजे फार मोठ दिव्य वाटत असतं.

पण एखादा असा असतो जो वेगळ्या doctorकडे जायच ठरवतॊ.कुठल्याही doctor कडे गेल तरी मोठे forms भरायला लागतात. त्यामध्ये लिहायची माहिती फ़कत नवरा आणि बायको यांच्यापुरती म्रर्यादित नसुन ती family history नावाच्या प्रकाराखाली माहेर आणि सासरपर्यन्त पसरते. त्यात विचारलेले रोग कधी ऐकण्यात पण आलेले नसतात.  स्वतःबद्द्लही इतकी खोलवर माहिती लिहायची बहुतेकदा पहिलीच वेळ असते. बऱ्याच कष्टांनंतर एकदाचा form भरला जातो आणि doctorशी पहिली भेट होते.

Rohini Khapre - Ghawalkar

No comments: