मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

भारतरत्न या पुरस्काराबद्धल भारतीयांच्या मनात अनंत आदर आहे, अणि तो ज्या व्यक्तींना मिळतो, त्यांच्याबद्दलसुद्धा. आतापर्यंत हा पुरस्कार दैदिप्यमान कामगिरी करणार्‍यांनाच दिला गेला, पण श्री लालकृष्ण अडवाणींनी एक अनिष्ट वळण दिले, आणि श्री. अटलबिहारी वाजपेयींच्या नावाची शिफारस केली, हा सुद्धा विचार केला नाही कि, पक्षाच्या कामगिरीच्या कसोटीवर पुरस्कार मागावा का? झाली छोटीशी ठिणगी पडली, आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा साक्षात्कार झाला आणि त्यांचे नेते थोर वाटू लागले म्हणजे आता जो पक्ष मोठा त्याच्याकडेच हा पुरस्कार जाणार. मधमाशांचे मोहोळ उठवण्यापलिकडे त्यांना काय काम आहे काय? खरी गंमत तर पुढेच आहे, ज्यांचे कुणाचे नाव सुचवले, ते मात्र मूग गिळून गप्पच आहेत, मिळाला तर ’भारतरत्न’ पुरस्कार मिळेल, मग नंतर मानभावीपणाने मिरवणार, मी कुठे मागितला होता. आता अशीच परिस्थिती अन्य पुरस्कारांच्या बाबतीतही निर्माण होणार. मग काय आहेतच, जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल. कोर्टाचा निम्मा वेळ तर या याचिका चालविण्यातच जाणार. आणि बिचारे कितीतरी कच्चे कैदी केवळ खटले चालत नाहीत म्हणून कैदेत खितपत पडलेले आहेत.
आतापर्यंत भारतरत्न मिळालेल्यांची यादी पहा, आणि करा तुलना या साळसूदपणे भारतरत्न मागणार्‍यांची.

BHARAT RATNA AWARDEES LIST : भारतरत्न मिळालेल्यांची यादी.

1) Kumari Lata Dinanath Mangeshkar - Arts : 2001  कुमारी लता मंगेशकर - २००१
2) Late. Ustad Bismillah Khan - Arts : 2001 उस्ताद बिस्मिल्ल्ला खान - २००१
3) Prof. Amartya Sen - Literature & Education : 1999 प्रा. अमर्त्य सेन - १९९९
4) Lokpriya Gopinath (posth.) Bordoloi - Public Affairs : 1999 लोकप्रिय गोपिनाथ बोरडोली - १९९९
5) Loknayak Jayprakash (Posth.) Narayan - Public Affairs : 1999  लोकनायक जयप्रकाश नारायण - १९९९
6) Pandit Ravi Shankar - Arts : 1999  पं. रवीशंकर - १९९९
7) Shri Chidambaram Subramaniam - Public Affairs : 1998  श्री. चिदंबरम्‌ सुब्रमणियम्‌ - १९९८
8) Smt. M.S. Subbulakshmi - Arts : 1998 श्री. एम्‌. एस्‌. सुब्बलक्ष्मी - १९९८
9) Shri (Dr.) A.P.J. Abdul Kalam - Science & Engineering. : 1997 श्री.(डॉ.) ए. पी. जे. अब्दुल कलाम- १९९७
10) Smt. Aruna Asaf (Posth.) Ali - Public Affairs : 1997 श्री. अरूणा असफ अली - १९९७
11) Shri Gulzari Lal (Shri) Nanda - Public Affairs : 1997  श्री. गुलझारीलाल नंदा - १९९७
12) Shri Jehangir Ratanji Dadabhai Tata - Trade & Industry : 1992  श्री. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा - १९९२
13) Shri Maulana Abul Kalam Azad - Public Affairs : 1992  श्री. मौलाना अबुल कलाम आझाद - १९९२
14) Shri Satyajit Ray - Arts : 1992  श्री. सत्यजीत राय - १९९२
15) Shri Morarji Ranchhodji Desai - Public Affairs : 1991  श्री. मोरारजी रणछोडजी देसाई - १९९२
16) Shri Rajiv Gandhi - Public Affairs : 1991  श्री. राजीव गांधी - १९९१
17) Sardar Vallabhbhai Patel - Public Affairs : 1991  सरदार वल्लभभाई पटेल - १९९१
18) Dr. Bhimrao Ramji Ambedakr - Public Affairs : 1990  डॉ. भिमराव रामजी आंबेडकर - १९९०
19) Dr. Nelson Rolihlahla Mandela - Public Affairs : 1990  डॉ. नेल्सन मंडेला - १९९०
20) Shri Marudur Gopalan Ramachandran - Public Affairs : 1988  श्री. मरुधर गोपालन रामचंद्रन‌ - १९९८
21) Khan Abdul Ghaffar Khan - Social Work : 1987 : Pakistan :  खान अब्दुल गफारखान - १९८७
22) Shri Acharya Vinoba Bhave - Social Work : 1983 : India : Maharashtra  श्री. आचार्य विनोबा भावे - १९८३
23) Mother Mary Teresa Bojaxhiu Teresa - Social Work : 1980  मदर मेरी तेरेसा - १९८०
24) Shri Kumaraswamy Kamraj - Public Affairs : 1976  श्री. कुमारस्वामी कामराज - १९७६
25) Shri V.V. Giri - Public Affairs : 1975  श्री. व्ही.व्ही.गिरी - १९७५
26) Smt. Indira Gandhi - Public Affairs : 1971  श्रीमती इंदिरा गांधी - १९७१
27) Shri Lal Bahadur Shastri - Public Affairs : 1966  श्री. लाल बहादूर शास्त्री - १९६६
28) Dr. Pandurang Vaman Kane - Social Work : 1963  डॉ. पांडुरंग वामन काणे - १९६३
29) Dr. Zakir Hussain - Public Affairs : 1963  डॉ. झाकीर हुसेन - १९६३
30) Dr. Rajendra Prasad - Public Affairs : 1962  डॉ. राजेंद्र प्रसाद - १९६२
31) Dr. Bidhan Chandra Roy - Public Affairs : 1961  डॉ. बिधान चंद्र रॉय - १९६१
32) Shri Purushottam Das Tandon - Public Affairs : 1961 श्री. पुरुषोत्तम दास टंडन - १९६१
33) Dr. Dhonde Keshav Karve - Social Work : 1958  डॉ. धोंडो केशव कर्वे - १९५८
34) Pt. Govind Ballabh Pant - Public Affairs : 1957  पं. गोविंद वल्लभ पंत - १९५७
35) Dr. Bhagwan Das - Literature & Education : 1955  डॉ. भगवान दास - १९५५
36) Shri Jawaharlal Nehru - Public Affairs : 1955  श्री. जवाहरलाल नेहरू - १९५५
37) Dr. M. Vivesvaraya - Civil Service : 1955  डॉ. एम्‌. विश्वेश्वरय्या - १९५५
38) Shri Chakravarti Rajagopalachari - Public Affairs : 1954  श्री. चक्रवर्ती राजगोपालाचारी - १९५४
39) Dr. Chandrasekhara Venkata Raman - Science & Engineering. : 1954  डॉ. चंद्र्शेखर वेंकट रामन - १९५४
40) Dr. Sarvapalli Radhakrishnan - Public Affairs : 1954  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‍ - १९५४

नाळेतल रक्त घ्यायची पद्धत

हि एक सोपी,सुरक्षित आणि वेदनारहित पद्धत आहे. प्रसुतीनंतर लगेचच हे करावे लागते. ह्या पद्धतीसाठी लागणार सामान नाळेतल रक्त जमा करणाऱ्या बॅंकाकडून उपलब्ध होते.अशा अनेक बॅंक सध्या आहेत,त्याबद्दल माहिती नंतर पाहू.  नैसर्गिक प्रसुतीनंतर  कापलेल्या नाळेला दोन्ही बाजुला चिमटे लावले जातात. हे काम तुमचा doctor, midwife  किंवा nurse करते. नंतर  एका बाजुचा चिमटा काढून syringe  किंवा tube च्या साहाय्याने नाळेतील रक्त जमा केले जाते. जमा केलेले रक्त लगेचच बॅंकेकडे पाठवले जाते. C-section झालेल्या प्रसुतीत थोडी वेगळी पद्धत अवलंबतात. पण ह्या पद्धतीत कमी रक्त मिळते. बॅंकेकडे पाठवलेल्या नाळेतल्या रक्तातून मुळ पेशी वेगळया केल्या जातात आणि त्यांना लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवले जाते.

जरी हा सर्व प्रकार फार उपयुक्त असला आणि याचे फायदे  असले तरी काही कमतरता व अनुत्तरीत प्रश्न आहेत ज्यामुळे या पद्धतीबद्दल मनात शंका उत्पन्न होतात.

१. सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्या रक्ताचा उपयोग बाळ किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला अशा रोगांमध्ये होवू शकतो ज्यात अस्थिमज्जा(bone marrow) बदलायची गरज असते.

२. पण हि नेहमीची पद्धत नसल्याने फार आधीपासुन सर्व तयारी करावी लागते.

३. सर्वसाधारणपणे काहिही धोका नसलेल्या बाळाला याचा कित्पत उपयोग होइल हे अजून माहित नाही.

४.रक्त जमा करण्याचा आणि बॅंकेत ठेवायचा खर्च थोडा जास्त आहे.

५. बऱ्याचवेळेला ह्या मुळ पेशी लहान मुलांसाठी वापरल्या जातात. पण मोठ्यांसाठी नाळेच्या रक्तातून मिळणाऱ्या पेशी पुरेश्या नसतात. ह्या बाबतीत बरेच वाद आणि संशोधन सुरु आहे.

६. नातेवाईकाच्या मुळ पेशी अनोळखी माणसाच्या मुळ पेशींपेक्षा जास्त उपयुक्त असतात,हे अजुन सिद्ध व्हायचं आहे.

७. स्वतःच्या मुळ पेशी स्वतःला वापरण्याचे फारसे प्रयोग अजुन झालेले नाहीत. काहिजणांच्या मते ज्या आजारी बाळाला स्वतःच्या मुळ पेशी दिल्या जातात, त्यांना तेच रोग परत व्हायचा धोका असतो.

८. नाळेतील रक्त घ्यायच्या पद्धतीत बाळ आणि आईला धोक्याची संभावना अगदी कमी असली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. जर नाळेला बाळ जन्मल्यावर लगेच चिमटा लावला तर जमा होणार रक्त वाढू शकत,ज्याचा परिणाम बाळ अनिमीक व्हायची भीति असते.

ज्यावेळी नविन बाळाच्या आगमनाची चाहूल लागते,तेव्हापासूनच  होणाऱ्या आईवडिलांना बाळाच्या भविष्याची काळजी वाटण्यास सुरुवात होते.त्याप्रमाणॆ ते सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे बाळासाठी पैसे वेगळे साठवायला सुरुवात करतात.याचप्रमाणे बाळाला उपयोगी पडेल अशी एक महत्वाची ठेवण आजच्या काळात पुढे आली आहे. ती म्हणजे जन्म झाल्या झाल्या बाळाच्या नाळेतल रक्त (Cord blood) साठ्वायची. जरी सगळे आईवडिल अजुन ह्या ठेवणीवरती फारसे लक्ष देत नसले तरी हि पदधत काळाची गरज बनत चालली आहे असे म्हट्ले तर वावगं ठरणार नाही.

बाळाच्या नाळेतल रक्त (Cord blood)  म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय?

बाळाच्या जन्मानंतर कापलेल्या नाळेचा जो भाग वारेला(placenta)  जोडून असतो,त्या भागातून जे रक्त घेतल जातं, त्याला नाळेतल रक्त (Cord blood) म्हणतात. साधारणपणे प्रसुतिनंतर हे रक्त वाया जातं. पण संशॊधनाने हे दिसुन आले आहे कि ह्या रक्तात मूळ पेशी (stem cell) असतात. मूळ पेशी ह्या अशा पेशी असतात ज्यांचे  शरीरातल्या सर्व पेशी, अवयव व अवयव संस्थांत वर्गीकरण होवू शकते.आपले शरीर मूळपणे ह्या पेशींनी बनलेले असते त्यामुळे कुठ्ल्याहि शरीरातल्या बिघाडात ह्या पेशींचा उपयोग होतो. ह्या पेशी भ्रूण(embryo),१-३ महिन्यांच्या गर्भातून(fetal), अस्थिमज्जातून(bone marrow) ,बाळाच्या नाळेमधुन मिळ्तात. ह्यापैकी पहिले दोन प्रकार अनैतिक समजले जातात. अस्थिमज्जातून मिळणाऱ्या मूळ पेशींवर शरीरातल्या वातावरणाचा परिणाम झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येते.त्यामुळे बाळाच्या नाळेतुन  मिळणाऱ्या मुळ पेशींना फार महत्व आहे.

भविष्यात बाळालाच नव्हे तर आई,वडिल,भावंड आणि नातेवाईकांना ह्या पेशींचा उपयोग होवू शकतो.जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त रोगांचा ह्या पेशी वापरुन इलाज करता येतो. बऱ्याच प्रकारचे कर्करोग,अस्थिमज्जाचे रोग,रक्ताचे रोगांवर ह्या पेशी रामबाण उपाय ठरु शकतात.

पहिली doctor भेट हा सुखद अनुभव असतो. इथे सगले doctor group मध्ये काम करतात. बऱ्याच ठिकाणी  एक मोठा doctor आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या Midwife असतात. Midwife म्हणजे आपल्याकडची सुईण असते. त्यांना हे काम करायचं license असतं. त्यांचा अनुभव भरपुर असतो, त्यामुळे बराच फायदा होतो आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या deliveryच्या वेळी ती पुर्णवेळ तुमच्या बरोबर असते. बरेचजण म्हणुन Midwife ला पसंदी देतात.

तुम्ही जेव्हा doctor कडे जाता तेव्हा तो doctor जर नसेल तर दुसरा doctor तुम्हाला बघु शकतो(अर्थात तुम्हाला चालत असेल तर). सर्वप्रथम तुम्हाला एका खोलीत बसवलं जातं. खोली म्हणजे तपासायच्या सर्व साधनांनी भरलेली छोटसं cabin असतं. एखादी नर्स येवुन तुमचं वजन, रक्तदाब बघून लिहून जाते. त्यानंतर तुमची urine test करुन pregnancy नक्की करते. आता तुमची midwife येते. येतानाच चेहऱ्यावरती छान हसु असतं.ती अगदी प्रेमात तुमच नाव विचारते. बऱ्याचवेळा पहिल्याच प्रयत्नामध्ये नाव काहितरी विचित्र उच्चारल जातं. पण लवकरचं ते पण जमून जातं. Midwife तुम्हाला पुर्ण तपासते. बरेचसे प्रश्न तुमच्या भरलेल्या form प्रमाणे विचारते. तुम्ही Pap test केली नसेल तर त्यावेळी करायला लावते. तुम्हाला काय काय त्रास होतो, ते लिहून घेते. यानंतर तुम्हाला pregnancy बद्द्ल खोलवर माहिती देते.अगदी तुमचं खाण-पिण, व्यायाम,घ्यावयाची काळजी,तुमच वजन वाढायचं प्रमाण  सगळं सांगते. त्यानंतर गरज असणाऱ्या तपासण्यांसाठी रक्त घेतले जाते. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या vitamin tablets दिल्या जातात. तुम्हाला कुठल्या गोळ्या आवडतात किंवा कुठल्या गोळ्या तुम्हाला घेताना त्रास होत नाही, हे ठरवणं हा एकच उद्देश असतो. तुम्हाला बरीचशी pregnancy ची पुस्तके, महत्वाच्या फोन नंबरची यादी वगैरे गोष्टी दिल्या जातात. एक महिन्यानंतरची पुढ्ची भेट ठरवली जाते आणि पहिली doctor भेट संपते.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ▼  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ▼  January (4)
      • भारतरत्न
      • बाळाची नाळ भाग-२
      • बाळाची नाळ भाग-१
      • NRIच्या बायकोची गोष्ट भाग-२
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose