मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

आमंत्रक - श्री. संदीप देवकुळे, अध्यक्ष - महाराष्ट्र मंडळ बे एरिया, सॅनफ्रॅन्सिस्को, अमेरिका.

विषय - ८२वे साहित्य संमेलन अमेरिकेत भरवावे.

हे आमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य महामंडळाचे श्री.कौतिकराव ठाले-पाटलांनी स्विकारले, आणि २३ जून रोजी अति उत्साहात अमेरिकेचे आमंत्रण स्विकारून जाहीर करून टाकले, यापुढील ८२ वे साहित्य संमेलान अमेरिकेत होणार. साहित्य विश्वात काय प्रचंड धुराळा उडाला, बाप रे!

प्रकाशक खडबडून जागे झाले, तिथे अमेरिकेत कोण जाणार स्टॉल लावायला, इथे भारतात काय, मस्त पुस्तक विक्रीतून प्राप्ती होते. त्याचा वाटा मात्र महामंडळाला द्यायला नको. मराठी पुस्तकांची किंमत पाहिली तर डोळे पांढरे होतात. दिल्ली, बनारस मधील प्रकाशकांना स्वस्तात जमते तर यांना का जमू नये?

हे बरोबर आहे की, मूठभर अमेरिकेतील मराठी माणसांच्या सोईसाठी तिकडे संमेलन घ्यावे काय? आता बघा ८१ संमेलने भारतात झाली, त्यापासून साहित्य क्षेत्रात काय क्रांती झाली? अध्यक्षपदाच्या निवडणूकीचे राजकारण ही साहित्यीक, सरस्वतीचे पुत्र खेळतात. अध्यक्ष महाशय काय भाषण करतात? त्यांना फक्त याच संमेलनात interest असतो, पुढील वेळी हजेरी लावत नाहीत.  ह्या निमीत्ताने का होईना मागा ना सरकारला अमेरिका वारीला अनुदान. आपले मायबाप सरकार तर काय पैसेच वाटायला बसलेय? नाहीतरी मंत्री लोक करत नाहीत परदेश दौरे? शेतकरी दादाने नाही का कर्जे माफ करून घेतली. हे जे आता विरोध करतात ना त्यांना फुकट वारीला नेतो म्हणा. मग बघा कसे समर्थन करतील ते.

मी अमेरिका, ऑस्ट्रेलिया फिरून आलो, तिथे सहा सहा महिने राहून आलो, तिथे सर्व सण वार, उत्सव हिंदू, महाराष्ट्रीयन उस्ताहाने साजरे करतात. जर तेथून संक्रांतीला हळदीकुंकूवाचे आमंत्रण आले, तर येथील महिलामंडळांनी जायची तयारी ठेवावी. तिथे परदेशात गणपती बसवतात, त्या उत्सवाला आरती म्हणायला आमंत्रण आल्यास गणपती मंडळांनी परदेश दौर्‍यासाठी जास्तीची वर्गणी वसूल करावी, म्हणजे कार्यकर्ते परदेश वारी करतील, आणि तिथे मिरवणुकीचे धडे देतील.परदेशात गरबा खेळातात, तेव्हा आमंरेअण आल्यास अष्टमीचा होम करण्यास येथील गरबा मंडळांनी तयारी करावी.

बघा एका ठाले पाटलांसारख्या गुणी अध्यक्षाने हे संमेलनाचे आमंत्रण स्विकारल्यामुळे आपण आपली संस्कृती किती सातासमुद्रापार नेत आहोत.

करा करा ठाम निर्धार करा, ठाले पाटील, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अहो आम्हालाही परदेशात मराठी पुस्तके, खरेदी करण्याचा योग केव्हा येणार.

सॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ यांना आमचा सलाम. "भारतरत्न" देण्यावरून मागील वर्षी एवढे वाद झाले, सर्वांचे स्वार्थ कळले, लाचारी कळली, कोणीही योग्य व्यक्ती भेटली नाही, म्हणून पुरस्कार दिला गेला नाही, पण ’सॅम" साहेब आपले नाव कोणालाच सुचले नही हे आमचे दुर्दैव.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3173757.cms

सॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ असे लांबलचक नाव धारण करणा-या माणेकशॉ यांचे कर्तृत्वही तितकेच उत्तुंग होते. तब्बल ४० वर्षे भारतीय लष्कराच्या सेवेत असलेल्या शॉ यांनी ब्रिटीशकाळापासून पाच युद्धात भाग घेतला. या काळात त्यांनी भारतीय लष्करासाठी अनेक छोटे-मोठे विजय नोंदवले. पण १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाने त्यांना देशात 'हिरो' करून टाकले. उत्तमोत्तम लष्करी डावपेच, राजकीय मुत्सद्देगिरी आणि सैन्याचे मनोधैर्य उंचावत पाकिस्तानी सैन्याला अवघ्या १४ दिवसांत गुडघ्यावर आणण्याची अचाट कामगिरी त्यांनी केली. दुसऱ्या महायुद्धात शत्रू सैनिकांच्या हल्ल्यांतून ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्यातील धाडस तसूभरही कमी झाले नाही.
अत्यंत मनस्वी, कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी असलेल्या माणेकशॉ यांनी राज्यर्कत्यांची भीड कधीच बाळगली नाही. इंदिरा गांधी यांनाही त्यांच्याबद्दल नितांत आदर होता.
भारतीय लष्करातील गोरखा रायफल्सच्या जवानांशी असलेल्या सख्यामुळे लष्करात ते 'सॅम बहादूर' या नावानेच ओळखले जात. मात्र हा आदर प्राप्त करण्यासाठी शॉ यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. चीनबरोबरच्या युद्धात झालेल्या भारताच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांची बदली अरुणाचल प्रदेशात करण्यात आली. युद्धातून सावरू पाहणाऱ्या सैनिकांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सूड भावनेने झालेल्या या कारवाईचे सोने करत त्यांनी आपली जबाबादारी निष्ठेने सांभाळली. ईशान्येच्या सीमेवरील सैनिकांत त्यांनी जणु प्राणच फुंकले आणि चीनमधून होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घातला. याशिवाय १९७१च्या ९० हजार पाकिस्तानी युद्धकैद्यांची व्यवस्था लावणे असो किंवा दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणांगतीनंतर उद्भवलेला पुनर्वसनाचा प्रश्न असो, माणेकशॉ यांनी प्रत्येक कामात स्वत:ला झोकून दिले. भारतीय सैन्यातील सवोर्च्च पद, अनुभव आणि करारी वृत्ती यामुळे सैन्यात त्यांचा प्रचंड दरारा होता. भारत सरकारने पद्मभूषण व पद्मविभूषण देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. 'फिल्ड मार्शल' हा लष्करातील सवोर्च्च किताब मिळाल्यानंतर १५ दिवसांत ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते तामिळनाडूच्या निलगिरी येथील कन्नूर येथे राहत होते. (वृत्तसंस्था)

पुन्हा एकदा सॅल्युट.

आमच्या माहितीत एक गृहस्थ आहेत, ते वातुशास्त्रात अतिशय पारंगत आहेत, अगदी क्षणात अंदाज करतात. मग ते फेंगशुई शिकले, छान खूप पईसा मिळवतात, अगदी आनंदी आहेत. मला वाटते त्यांनी या सर्वांसाठी दोन चार लाख खर्च केले असतील, शिकण्यासाठी. लोकांचा त्यांच्यावर अतिशय विश्वास.मग त्यांच्या मनात काय आले कुणास ठाउक ते पत्रिकेद्वारे भविष्य पहायला शिकले. त्यात सुद्धा त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. आमच्या या ओळखीत अजून एकजण आहेत ते पत्रिका ते पत्रिका पाहण्यात तरबेज, त्याच प्रमाणे कोणालाही काही सांसारिक अडचण आल्यास देवाधर्माचे करायला सांगत, ते कोणत्यातरी देवाला संकटातील माणसांना नेत, तेथे त्यांनी एक दारूची बाटली, सिगारेट त्या देवाला द्यायला लावत, लोक श्रद्धेने देत, भली त्यांची कामे हो अथवा न होवो, समाधान तर मिळे,  पण हे त्या पहिल्या गृहस्थांना पटत नसे ते म्हणत, वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर असेल तर काहीही संकट येणार नाही. पत्रिका चांगली असेल तर काहीही प्रश्न निर्माण होत नाहीत. दुसरे गृहस्थही पत्रिका पाहून लोकांना सल्ले देत. सर्व काही बरोबर चालले होते.

मग परवा काय झाले, या दुसर्‍या गृहस्थांच्या घरी खूप कडाक्याचे भांडण झाले, बस्‍, यांनी लगेच पत्रिका परत पाहिली, पत्रिकेत तर ग्रहांची दशा उत्तम. हे महाशय तर वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये पारंगत, मग हे असे कसे झाले, अगदी बायको घर सोडून जायची पाळी आली. मग त्यांनी धीर करून या मित्रांना कल्पना दिली, तेव्हा असे ठरले की, त्याने त्या देवस्थानाला जायचे आणि दारूची बाटली आणि सिगारेटचे पाकीट द्यायचे, काय करणार शेवटी कोणालाही न सांगता त्याने तेथे जाऊन सर्व दिले बाबा. मग काय झाले माहित नाही पण त्याचे सर्व problem दूर झाले.

आता दुसर्‍या गृहस्थांची गंमत ते त्यांच्या लग्नाआधीच पत्रिका पहायला शिकले होते, त्यामुळे त्यांचा आग्रह जबरदस्त कि, पत्रिका जुळलीच पाहिजे मग बाकी सर्व गौण. ते पत्रिकेचे गुणमेलन तर पहातच पण त्या मुलीची व्यक्तिशः पत्रिकाही पहात, त्यात संतान योग ही पहात. झाले असी एक मुकगी चालून आली, पत्रिका उत्तम जुळली, संतान योग उत्तम, एक मुलगा आणि एका मुलीचा योग. लग्न पार पडले. आज त्याला दहा वर्षे झालीत, पण बाबाला संसार सुख अजिबात नाही. बायकोची रोज भांडणे, शांतता नाही, एकच मुलगी, ती अजिबात ऐकत नाही. मुलासाठी दुसरा chance घ्यावा म्हटले तर बायको तयार नाही, असा वैतागलाय ना घरी रात्री उशीरा जातो, आणि स्वैपाक स्वतःच करतो, तेव्हा जेवायला मिळते. आणि लोकांचे भविष्य पत्रिकेवरून तंतोतंत सांगतो, देवाला नेतो दारूची बाटली देतो, सर्वांचे प्रश्न सोडवतो, पण तो देव याचे काही ऐकत नसेल काय? याला याची पत्रिका कळली नसेल काय? त्या पहिल्या गृहस्थांना आपल्या घराचे वास्तुशास्त्र कळले नसेल काय? त्यावर उपाय सुचले नसतील काय?

जगात असे खूप प्रश्न अनुत्तरित आहेत. पण वरील घटना मान्यच कराव्या लागतात. नाहीतर हे वास्तुशास्त्रज्ञ त्यांच्या घरात योग्य ते बदल करून करोडोपती झाले नसते काय? पत्रिका पहाणार्‍यांनी स्वतःच्या पत्रिकेतील ग्रहांची शांई वगैरे करून भाग्या उजळून घेतले नसते काय? कमीतकमी पुढील शांकटे ओळाखून त्यावर मात नसती केली काय? सर्व अजब आहे.

आजच दहावीवा निकाल लागला आणि भविष्यातील रोजगरांच्या संधींचाही निकाल लागला. नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे पास विद्यार्थ्यांची संख्या ८७ टक्के आहे, म्हणजेच १३ टक्के नापास झालेत. औरंगाबादमध्ये तर ९०% पास झालेत. परिक्षेला १३,८९,४४६मुले बसली आणि ११,९९,४६८ मुले पास झली.

http://www.esakal.com/esakal/06272008/Specialnews144356BBAB.htm

दहावीत उत्तीर्णांचा उच्चांक
पुणे, ता. २६ - दहावीच्या परीक्षेत ७८.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांच्या टक्केवारीचा उच्चांक नोंदविला गेला आहे.
यंदा प्रथमच दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांत उत्तीर्ण होणारांचे प्रमाण ८६.३३ टक्के आहे. या विक्रमी निकालामुळे अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्‍न तीव्र होण्याची शक्‍यता असली, तरी पात्र असणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळेल, अशी ग्वाही शिक्षण विभागाने दिली आहे.
नव्या अभ्यासक्रमानुसार प्रथमच घेण्यात आलेल्या या परीक्षेत सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचा गौरव गिरीश कुलकर्णी ९७.८४ टक्के (सहाशे पन्नासपैकी ६३६) गुण मिळवून राज्यात पहिला आला. नेहमीप्रमाणे यंदाही निकालावर मुलींचे वर्चस्व आहे. कोल्हापूर वगळता अन्य सातही विभागीय मंडळांत मुलीच प्रथम आल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही (८२.३६ टक्के) मुलांपेक्षा (७६.३२ टक्के) अधिक आहे. पुणे विभागात अहिल्यादेवी हायस्कूलची बिल्वा उपाध्ये ९६ टक्के (६२४) गुण मिळवून पहिली आली असून, विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण ८०.६९ टक्के आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे आज हा निकाल जाहीर करण्यात आला.
अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षेच्या स्वरूपातही मंडळाने काही बदल केले होते. गणित आणि विज्ञान; तसेच इंग्रजीसह अन्य दोन भाषा विषयांमध्ये संयुक्तपणे उत्तीर्ण होण्याची सवलत देण्यात आली होती. त्याचबरोबर सर्व विषयांच्या अंतर्गत मूल्यांकनासाठी वीस टक्के गुण देण्यात आले होते. या साऱ्यांमुळे उत्तीर्णांची टक्केवारी वाढली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल आठ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
मंडळाच्या अध्यक्ष विजयशीला सरदेसाई म्हणाल्या, ""इंग्रजी व गणित वगळता इतर सर्व विषयांचा निकाल ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागला. ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी निकाल असलेल्या ५९३ शाळा राज्यात आहेत. १८.३७ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविले. साठ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३९ टक्के आहे. नऊ टक्के विद्यार्थी ३५ ते ४५ टक्के यादरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.''
नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून राज्यातून १५ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७६.३२ टक्के मुले, तर ८२.३६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. नियमित विद्यार्थ्यांमध्ये ८५.४३ टक्के मुले, तर ८७.४१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
-----------------------------------------------------
गुणांच्या टक्केवारीतही वाढ
राज्यातील मानकरी
मुलींमध्ये पहिल्या - सायली रूपसिंह सागर (उमरगा) आणि पूजा वानखेडे (यवतमाळ) ९७.२३ टक्के
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ टक्के
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव (बालमोहन विद्यामंदिर, मुंबई) ९६.४६ टक्के
रात्र प्रशालेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (शिवाजी नाईट हायस्कूल, नागपूर) ८८.१५ टक्के
-----------------------------------------------------
विभागनिहाय निकाल (नियमित व पुनर्परीक्षार्थी)
पुणे - ८०.६९
नागपूर - ६७.९९
औरंगाबाद - ८३.४३
मुंबई - ८०.९८
कोल्हापूर - ७९.८६
अमरावती - ७६.७५
नाशिक - ८०.६०
लातूर - ८३.१३
-----------------------------------------------------
नवा अभ्यासक्रम
सर्वाधिक निकाल - औरंगाबाद विभाग ८९.४५ टक्के
सर्वांत कमी - कोल्हापूर विभाग ८५.८७ टक्के
-----------------------------------------------------

सर्वांना आनंद झाला, पण कोणी हा विचारच करत नाही की, अभ्यासक्रम सोपा केला म्हणून संख्या वाढली, बुद्धिमत्ता नव्हे. आत यातील साधारण ८०% ले ( साधारण १० लाख )पदवीधर होतील, सहा वर्षांनंतर, त्यांच्या नोकरीचे काय? पूर्वी निकाल जेमेतेम ६०% लागायचा तेव्हा सगळ्या बाबी balance व्हायच्या, सर्व प्रकारचे काम करणारे हात तयार व्हायचे, ITI मधून मुले बाहेर पडत, ते कारागीर असत, काही पदवीधर होत, पण आता काय सर्वच उच्चशिक्षीत, मग हलकी कामे कोण करणार? जेवढी जास्त मुले पास होणार तेवढा जीवनाचा तोल ढासळणार, industries, business, crafts, हे एक प्रकारचे पर्यावरणच आहे, त्याचा सुद्धा तोल राखायचा असतो. परदेशात सर्वा उच्चशिक्षीत, त्यामुळे घरकामाला कोणी मिळत नाही, तेव्हा ते हाल त्या लोकांनाच माहित.

किती मुले पास होतात, याहीपेक्षा किती हुषार intelligent मुले बाहेर पडतात याचा विचार होणे जरूरीचे आहे. आजच बेकारी भयंकर आहे, त्यात ही अशी भर. भारतात सुशिक्षीतांची बेकारी फार आहे, पण कामवाली बाई मिळत नाही, तिचा रूबाब काय सांगावा? ती engineer पेक्षा जास्त कमावते.

P.Hd. करणार्‍यांनी या विषयावर कि, यी ९०% कार्क मिळविलेल्या मुलांचे पुढे काय होते? माझ्या माहितीत एक मुलगी होती, अतिशय हुषार. दहावीला तिला ९२% मार्क मिळाले, मराठी माध्यामातून, फार मोठे स्वप्न घेऊन ती सायन्सला, डॉक्टर होण्या साठी गेली, पण काहीही इंग्रजी न कळल्याने तिला बारावीला फक्त ५६% मार्क मिळाले, त्या नैराश्येपोटी तिने शिक्षण सोडले, अशी किती मुले असतील देव जाणे.

अभ्याअसक्रम सोपा केल्याने संख्या वाढते, पण सकसपणा नाही वाढत. आजचा हा आनंदीआनंद, उद्याच्या बेकारीचे रडगाणे होणार आहे, याचा विचारच नाही.  एका भाकरीसाठी जेव्हा अनेक वारसदार असतात, आणि त्यांच्या हक्का साठी सोपी स्पर्धा घेतली जाते, तेवा सगळेच जिंकणार आणे शेवटी युद्ध होणार, आणि त्यात कोणाचेच पोट भरणार नाही.

सकाळमधील बातमी पहा, असाप्रकार विद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या "पुणे" नगरीत घडत आहे, खरे तर यांना लाज कशी वाटत नाही.

http://www.esakal.com/esakal/06252008/Maharashtra9F53E49BFF.htm

कुमारभारती'च्या दहावीच्या पुस्तकात चुकाच चुका
औरंगाबाद, ता. २४ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या दहावीच्या मराठी विषयाच्या नव्या "कुमारभारती' पुस्तकात अनेक चुका आहेत. शुद्धलेखनाच्याच चुकांनी परिसीमा गाठली आहे.
अशुद्ध शब्द वाचण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. यंदा मंडळाने "कुमारभारती' पुस्तक नव्याने प्रकाशित केले. या नव्या पुस्तकात काही जुनेच धडे आहेत. वारंवार मराठी विषयाचीच पुस्तके का बदलली जातात, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. "कुमारभारती'च्या पुस्तकात चुकीच्या शब्दांची संख्या सुमारे १३० आहे. चुकीच्या शब्दांमध्ये "आंगठे, श्वास, हुषार, आपणावर, बधीर, आश्‍चर्याचा, द्या, चैन, चैनीला, बांधिलकी, वृत्तीचा, पांडूरंगा...' आदी शब्दांचा समावेश आहे.
पाठ्यपुस्तक निर्मितीचा भाषा विषयाच्या पुस्तकांसाठी एक आकृतिबंध मंडळाने तयार केला होता. त्याप्रमाणे नववी, दहावी, अकरावी, बारावी या वर्गांची पुस्तके तयार करण्यात आली. पण, दहावीचे पुस्तक नव्याने काढताना आकृतिबंध बदलण्याची परवानगी न घेताच नवीन पुस्तक तयार करण्यात आले आहे, असा आक्षेप आहे. कठीण शब्दांचा अर्थ पाठ्यपुस्तकाच्या शेवटी द्यावा, असे ठरले होते. या पुस्तकात मात्र कठीण शब्द पाठाच्या खालीच देण्यात आले आहेत. टीपा आणि कठीण शब्द यांचा गोंधळ झाला आहे. कठीण शब्दांत टीपा, तर टीपांमध्ये कठीण शब्द, अशी सरमिसळ झाली आहे. "कुमारभारती'च्या नवीन पुस्तकात तीन कविता व दोन पाठ पूर्वीच्याच पुस्तकातील आहेत. नवीन अभंग व कविताही घेण्यात आलेल्या नाहीत.
पाठाच्या खाली देण्यात आलेल्या स्वाध्यायामध्ये काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे. एका वाक्‍यात उत्तरे देणे शक्‍यच नाही, असे प्रश्‍न एका वाक्‍यात उत्तरे द्या म्हणून विचारण्यात आले आहेत. काही लेखकांचे परिचय पूर्णपणे, तर काहींचे त्रोटक देण्यात आले आहेत. संतांची पूर्ण नावे नाहीत.

साधे visiting card किंवा लग्नाची पत्रिका छापताना सुद्धा आपण proof तपासून पाहतो, इथे तर थोरथोर मंडळी कारभार करतात, त्यांना सुद्धा समजले नाही, म्हणजे कमाल आहे. त्यांच्या ज्ञानाची कीव येते. असा राग येतो पण काय करणार? मला वाटते या सर्वांना कोर्टात खेचून यांच्या पदव्या काढून घ्याव्यात. काय आदर्श टेवणार आहोत आपण भावी पिढी समोर. दरवर्षी एक रडगाणे असते, पेपरातील चुका, अरे पणा या होतातच कशा? शिवाजीमहाराजांच्या काळात फटक्यांची सजा होती, तीच बरोबर होती, याची आज या पदवीधर मंडळींना पाहून वाटते. खरे तर आश्चर्य म्हणजे, पुण्यातील वर्तमानपत्रे आपल्या अग्रलेखातून आवाज उठवत नाहीत, त्यांना बाकी विषय समजतात, पण याचे गांभिर्य कळत नाही. वर्तमानपत्रे म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आधार, पण काही बाबतीत अगदी ठरवल्याप्रमाणे ती सुद्धा मूग गिळून गप्प बसतात.

पुण्यात  BRT एवढा धुमाकूळ चाललेला आही, बातम्यांची प्रचंड धूळ उडत आहे, पण वर्तमानपत्रातील, अग्रलेखांना मरगळ आलेली आहे, अजिबात आवाज नाही, जणू ते BRT चे प्रतिनिधीत्वच करताहेत. कधी कधी तर अशा विषयांवर अग्रलेख असतात, ते सामान्या लोकांच्या आकलना पलिकडचे असतात.

University  मध्ये कोणतातरी विषय घेऊन लोक प्रबंध सादर करतात, आणि त्याला मान्यता मिळून स्विकारला जातो, आणि त्याला डॉक्टरेट पदवी मिळते.

आता या साठी एवढे कष्ट करतात, दोन पाच वर्षे संशोधन करतात, पण त्या संशोधनाचा काही उपयोग होतो या कडे कुणी लक्ष देते काय? भविष्यात असे कुठेही पाहण्यात येत नाही की, त्याचा कोठेतरी उपयोग झालेला आहे. University घेत असणार आणि बस बासणात गुंडाळून थेवत असणार. बरे त्यांचे विष्य इतके मजेशीर असतात कि नाही, प्रश्न पडावा असे विषय यांना कसे मिळतात.

आजच पाच PhD दिल्या त्यांचे विषय पहा, 

१) अनिल अवचट यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास  २) मराठी संज्ञा प्रवाही कादंबरी:एक चिकित्सक अभ्यास ३) Human rights in Manipur:A social work perspective. आता या विषयांमध्ये PhD करण्यासारखे काय असेल देव जाणे आणि त्याचा देशाला किंवा भावी पिढीला काय उपयोग माहित नाही. मागे तर असे विषय होते, आदिवासींच्या जीवनाचा तुलनात्मक अभ्यास, कवी बोरकरांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे, महाराष्ट्रात रुजलेली लोककला. अरे, काय विषय घ्यावेत याला काही मर्यादाच नाहित. खरे तर Universityने आता विषय ठरवावेत आणि त्यातून विषय निवडून PhD करायला सांगावे. आतापर्यंत जेवढ्या विषयांवर PhD दिल्या गेल्यात त्यांची यादी Internet वर प्रसिद्ध करावी आणि सर्वांना ते थिसीस उपलब्ध करून द्यावेत.

खरे तर आज भारताला मोलाच्या विषयांवर संशोधन करणारे पाहिजेत, ते विषय घ्याना, उदाहरणार्थ -

१) पुण्यातील वाहतूकीच्या खेळखंडोबाचा समग्र अभ्यास

२) महानगरपालिका, न्यायालय, महसूल खाते, R.T.O. यांच्यातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या आलेखाचा चुलनात्म अभ्यास.

३) लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेला फायद्यात आणण्यासाठी वापरललेच्या कलेचा तपशीलात्मक अभ्यास.

४) काही अधिकार्‌यांची वर्षानुवर्षे बदली होत नाही, त्यासाठी त्यांनी केलेल्या युक्त्यांचा सखोल मागोवा.

५) पुण्यातील BRT प्रकल्पातून कोणाकोणाचे आर्थिक संबंध पक्के झाले, आणि त्यांचा कसा विकास झाला.

‍६) भारतरत्न देण्यावरून झालेल्या गोंधळाचा समग्र इतिहास.

७) मागील ५० वर्षातील टप्प्याटप्प्याने वाढलेल्या महागाईचा समग्र आणि तुलनात्म अभ्यास आणि त्याची सरकारवर नसलेली जबाबदारी यांचा तुलनात्मक अभ्यास.

८) मागील दहा वर्षात लाखोंनी दहावी पास झालेल्या विद्यार्थी आज कोणत्या परिस्थितीत आहेत, आणि पुढील मुलांचे भविष्य यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यामुळे झालेल्या वाटोळ्याला जबाबदार असणार्‌यांच्या कामगिरीवर संशोधनात्मक प्रबंध.

९) निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर  होईपर्यंत उमेदवारांनी केलेल्या कष्टांचा समग्र इतिहास आणि मागोवा.

असे अजून कितीतरी जिव्हाळ्याचे विषय आहेत की, त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे, ज्याचा फायदा भावी पिढीला होऊन त्यांचे जीवन उजळून निघेल.

पुढील वेळेस अजून मोठी यादी सादर केली जाईल, शिवाय कोणाला काही विषय सुचवावयाचे असतील तर स्वागत आहे. 

कोणत्याही धर्मात असो, संस्कार हे होतच असतात, मग ते धार्मिक असो, मानसिक असो  अथवा मुलांवर असो, मला तर वाटते की, मुले सुद्धा आई वडिलांवर संस्कार करत असावेत.  जशी वस्तूला गॅरंटी असते, expiry date असते, तशी संस्कारांना सुद्धा असावी.

मुलांवर आई वडिल संस्कार करतात, मग ती मोठी झाली की, त्या संस्काराची guarantee संपते, आणि मग मुले मनासारखी वागू लागतात. काही वेळेस मुलांची लग्ने झाली की बदलली असे आपण म्हणतो, म्हणजेच काय तर त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची expiry date संपलेली असते. जसे मालाची expiry date संपल्यावर आपण माल फेकून देतो, मग त्यात त्या मालाची काय चूक असते काय? मग आपण मुलांना तरी काय दोष द्यावा, आई वडिलांची guarantee संपल्यावर त्यांना दूर केल्यास त्या मुलांची काय चूक?

स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्यावर, मग देश प्रेम कमी होते, म्हणजेच काय तर देशप्रेमाची लोकांची guarantee संपलेली असते

परदेशात मुले मोठी झाल्यावर, त्यांना आईवडिल दूर करतात, ते काय तर त्यांनी मुलांची तेवढीच guarantee घेतलेली असते, त्यांच्या दृष्टीने त्यांची expiry संपलेली असते.

सर्व वस्तू expiry date नंतर अजिबात परत वापरत नाहित, त्यांचा उपयोग कायमच्या साठी संपलेला असतो, तीच  परिस्थिती नात्यात सुद्धा असते, पुन्हा कधीही ती जपली जात नाहित.

आम्ही लहाणपणी जिथे रहात होतो, तिथे एक कुटुंब होते, त्यात पाच मुले आणि दोन बहिणी. घरी खूप संपत्ती. त्यामुळे मुलांना चांगले वळण नाही.पहिल्या दोन मुलांनी लग्नच केले नाही. मुले दारू पिऊन वडिलांना मारत, आईला शिव्या देत. एका बहिणीचे लग्न करून दिले, २५ तोळे सोने देऊन, पण तिला पहिला मुलगा झाला आणि त्याच दिवशी तो वारला, तो धक्का सहन न होऊन ती वेडी झाली, आणि  तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी आणून सोडले, आजपर्यंत मागील जवळ जवळ ३० वर्षे ती वेडीच आहे. चवथ्या भावाचे लग्न झाले, ती सून अतिशय चांगली, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, तिला दोन मुली झाल्या चवथ्या भावाचे लग्न झाले, ती सून अतिशय कजाग, घरातच नाहीतर बाहेरही, अतिशय भांडकुदळ, सगळॆ वैतागले, पण तिला त्याची पर्वा नाही. यथावकाश तिला मुलगा झाला, अतिशय गुणी, हाच विचार की हिच्या पोटी हा कसा.नम्तर मुलगी झाली, ती ही छान. मग तिने आपला संसार कुणाचीही पर्वा न करता, वेगळा केला. दरम्यान मोठे दोन भाऊ दारू पिउन रस्त्यावर बेवारचपणॆ वारले, बापाने अंत्यसंस्कार केले, त्यामाणसावर दोन मोठी मुले अशा प्रकारे गेल्याचे, आणि २५ तोळे सोने देऊन लग्न करून दिलेली  मुलगी, घरात पाहण्याचे दुःख नशिबी आले. संपती किती काय सांगावी, करोडोत. मग कळले की मुले चाकूचा धाक दाखवून बापाकडून पैसे घेत, तरीही अशा प्रकारे मुले, गेल्याचे बापाला दुःख झाले आणि त्यातच बाप गेला. आईला नंतर मोठी सून सांभाळू लागली. आता मोठ्या सूनेच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या, लहान मुलीने पळून जाऊन लग्न केले, पण तो मुलगा व्यसनी होता म्हणून, मुलगी परत घरी आली, मोठ्या मुलीचे लग्नच ठरत नव्हते, उशीरा ठरले, पण तिला एक मतिमंद मुलगी झाली आणि ती मुलगी बाळंतपणातच गेली. तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला घरी आणून सोडले, तेव्हा त्या मतिमंद मुलीचीही जबाबदारी या सूनेच्या अंगावर आली, पण हिचा देवधर्म मात्र नित्य चालू होता.  दरवर्षी न चुकता वारी करायची, कुलदैवताचे करायची, पण हिच्या नशिबी मात्र हे सगळे भोग, आम्ही म्हणायचो, हाच काय देवाचा न्याय?

धाकट्या सूनेचा मुलगा चांगला शिकला,मुलगी दिसायला सुंदर म्हणून तिला सासर चांगले मिळाले, सगळा आनंदी आनंद, पण बाई कधी देवधर्म करणार नाही, सासूला बघणार नाही, नेहमी आजूबाजूला भांडणा. सगळे वैतागलेले ,  इथे सुद्धा तोच प्रश्न, हाच काय देवाचा न्याय?

दरम्यान, मोठ्या सूनेचा नव्ररा खूप दारू प्यायला लागला, आणि दुर्दैवाने त्याने  एका रात्री त्या माणसाने गळ्फास घेऊन आत्महत्या केली, तेव्हा पोलीसांचा ससेमिरा चुकवतांना त्या सूनेला नको नको  झाले. काय कराणार. नवरा वारल्यावर धाकट्या सूनेने त्रास ध्यायला सुरूवात, तेव्हा ती सून घर सॊडून, ते भाड्याने देऊन, माहेरच्या जवळ एक खोली घेऊन राहू लागली. ते पाहून हे सून त्या भाडेकरूला त्रास गेऊ लागली म्हणून भाडेकरू राहिनात, आणि या सूनेने या संधीचा फायदा घेतला, आणि ती जागा एकदम कमी किंमतीला विकत घेतली.

नीट पाहिले तर विसंगती लक्षात येते, देवाचा न्याय काय असेल.

मला वाटते, पाप पुण्य कोणी ठरवायचे, ते त्यानेच ठरवायचे. त्यानेच न्याय करायचा. त्यावर आपण काहिही भाष्य करू शकत नाही.

या सर्वात महत्वाचा मुद्धा असा कि, त्यासर्वांचा बाप ज्याने स्वकष्टाने संपत्ती जमवली, व्यसन केले नाही, अतिशय देवभोळा, मदतील सर्वात पुढे, त्याच्या नशिबी हे सर्व यावे, यालाच देवाचा न्याय म्हणावा काय?

भारतातील एका खेडेगावात वीज नव्हती, तेव्हा तेथील पुढारी लोकांनी सरकारकडे अर्ज केला, गावाचा विकास होण्यासाठी वीज पाहिजे, तेव्हा सरकारने तेथील सर्व्हे केला आणि वीजेसाठी परवानगी दिली. वीजेचे खांब टाकण्याचे कंत्राट एकाला, रस्ते खोदाई एकाला, तारा टाकण्याचे एकाला कंत्राट दिले गेले. झाले दोन महिन्यात वीज गावात आली. पण लवकरच खांब जमीन सोडू लागले, तारा तुटू लागल्या, आणि चौकशी समिती नेमली गेली. त्या समितीने अहवालात कोनाचीच चूक नसल्याचे दाखवून दिले. नंतर लोकांना कळले की, सर्व ठिकाणी कनेक्शन जुळालेले होते, आणि त्यातून वीज वहात नव्हती तर आर्थिक वीज वहात होती. अशी खूप प्रकारची आर्थिक कनेक्शन्स आपल्या भारतात आहेत. अगदी पाच व्होल्ट पासून चारशे चाळीस व्होल्ट पर्यंत.

मोठा राजकारणी असतो त्याचे भाई लोकांशी, कमिशनर साहेबाचे मोठ्या गुंडांशी, न्यायालयात अगदी वरच्या स्तरावर, जिथे सामान्य जनता पोहोचू शकत नाही, अशी कनेक्शन्स मोठा झटका देणारी.

साधारण थोडा झटका देणारी कनेक्शन म्हणजे नवीन वीज कनेक्शन पाहिजे, महानगरपालिकेत कॉंट्रॅक्ट पाहिजे, फंडाचा चेक पास करावयाचा असल्यास, ट्रकचे लायसेन्स पाहिजे असल्यास,  घराचा प्लॅन पास करावयाचा असल्यास, वगैरे वगैरे.

छोटा झटका देणारी कनेक्शन म्हणजे बिगर लायसेन्स पकडल्यास, दोन चाकी गाड्यांचे लायसेन्स पाहिजे असल्यास, कोर्टात नकला पाहिजे असल्यास, रेशनिंग कार्डाचे काम असल्यास, सात बारा उतारा पाहिजे असल्यास, शाळेत प्रवेश पाहिजे असल्यास, रोग्याचे खोटे सर्टिफिकेट असल्यास, या प्रकारच्या सर्व कनेक्शनस्‍चा झटका मात्र प्रत्येकाला पदोपदी बसत असतोच, त्यामुळे भारतातील जनता अगदी shockproof झालेली आहे.

दैनिक "सकाळ"मधील एक बातमी.

स्त्रियांसह पुरुषही करणार वटसावित्री!
मुंबई - मानवी जीवनाला प्राणवायू पुरवून उपकारक ठरणाऱ्या वटवृक्षाचे स्त्री-पुरुष दोघेही पूजन करून अभिनव व आधुनिक पद्धतीने वटसावित्रीचा सण साजरा करणार आहेत. महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत आय क्‍लीन मुंबईतर्फे हा उपक्रम आयोजित केला आहे.
पतीला दीर्घायुष्य चिंतण्यासाठी महिला पूर्वापार वटसावित्री व्रत करीत आहेत; पण स्त्रीप्रमाणेच पुरुषालाही तिची गरज असते. त्यामुळे दोघांनीही दीर्घायुष्यासाठी निसर्गाकडे प्रार्थना केली पाहिजे. वटवृक्षाप्रमाणे मानवी जीवनाला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या व प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या वृक्षांची निसर्गाला गरज आहे. त्यामुळे वटवृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटसावित्री साजरी करण्यासाठी माजी फ्लाईट लेफ्टनंट व आयक्‍लीनचे अध्यक्ष मधू सावंत गेली अनेक वर्षे स्त्री-पुरुषांना एकत्र आणीत आहेत. महापौर डॉ. शुभा राऊळ यांना ही कल्पना आवडल्याने १७ जून रोजी वटपौर्णिमा उपक्रमात त्या सहभागी होणार आहेत.
बिसलेरी व हिंदुस्थान लिव्हर कंपनीलगतच्या अंधेरी (पूर्व) येथील बी. डी. सावंत मार्गावरील वटवृक्षापाशी हा उपक्रम सकाळी ११ वाजता साजरा केला जाणार असल्याचे वास्तुविशारद सुरेश बर्वे यांनी सांगितले.

या पेक्षाही अजून एक कारण फार महत्वाचे आहे, जरा मुला मुलींचे संख्यांचे गुणेत्तर पहा, मुली आता कमी होऊ लागल्या आहेत, कारण एक वर्ग असा आहे की, त्यांना मुली नकोत, तेव्हा लग्नासाठी मुलगी मिळाली हेच नशीब समजून मुलांनी वटसावित्रीचे व्रत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय मुली मुलांपेक्षा जास्त शिकतात, चांगली नोकरी पटकवतात, मोठमोठ्या क्षेत्रात चमकतात, त्यामुळे मुलांना संधी कमी झाल्या आहेत, काही दिवसांनंतर तर स्त्रियांची सर्व कामे पुरूषांनाच करावी लागणार आहेत, म्हणून पुरूषांना व्रत करावे लागेल कि, हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो.चला या उपक्रमाचे श्रेय श्री. मधू सावंत या गृहस्थांकडेच जाते, हेही नसे थोडके.

आता मी इथे ओ‘स्ट्रेलियात रेल्वे प्रवास करताना माझ्या नातेवाईकाने सांगितले की, या ऑस्ट्रेलियातील रेल्वे अधिकारी भारतातील, मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रसाशनाला भेट देण्यास गेले होते, कारण काय तर मुंबईतील लोकल वेळेवर आणि लवकर कशा धावतात. कारण इथल्या गाड्या वेळेवर न धावता शक्यतो उशिराच धावतात. या अधिकारी वर्गाने अहवाल दिला की, अशी सुधारणा ऑस्ट्रेलियात शक्य नाही.

त्याची कारणे त्यांना नाही समजली, अहो कशी समजणार, मुंबईच्या लोकलचे दार बंद होतच नाही, अगदी भरभरून लोक चढतात, लटकतात, इथे असे नाही दरवाजे गाडी सुटण्या अगोदर बंद होतात, पुन्हा स्टेशन आल्यावर उघडतात, त्यात वेळ जातो.असे मुंबईत शक्य आहे काय? इथे प्लॅटफोर्मवर गार्ड उभा असतो आणि तो सर्व प्रवासी चढल्यावर शिट्टी देतो. असे मुंबईत घडेल काय?  आपली लोकसंख्याच एवढी आहे की, कोणाकोणाला रोकणार. असे म्हणतात की हे अधिकारी तेथील गर्दी बघूनच वेळेआधी परत आले आणि त्यांनी अहवाल दिला की, गाड्या वेळेवर धावण्यासाठी लोकसंख्या वाढली पाहिजे, म्हणजेच आपण भारतीयांनी लोकसंख्या वाढीचे महत्व कसे पटवून दिले पहा.

लोकसंख्या जास्त असल्यामुळे पेट्रोलचा खप जास्त आहे, त्यामुळे जागतीक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले, तेल विहीरीवाल्यांना किती फायदा आहे नाही का?

लोकसंख्या जास्त असल्यामुळे नोकर्‍या मिळत नाहीत, म्हणून लोक बाहेरील देशात जातात, प्रगत होतात, आई वडिलांना बोलावून घेतात,त्यांना जग बघायला मिळते, हा काय कमी फायदा आहे काय, लोकसंख्या वाढीचा?

लोकसंख्या वाढीमुळे खाणारी तोंडे वाढली, घरांच्यासाठी शेत जमिनी शेतकर्‍यांनी विकल्या, अन्न उत्पादन कमी झाले, म्हणून धान्य आयात करण्याने बाहेरील देशातील शेतकर्‍यांना किती काम मिळाले नाही का? शिवाय त्याची वाहतूक करणार्‍यांना रोजगार मिळाला, हे काय पुण्याचे काम नाही?

शेत जमिनी विकल्याने शेतकर्‍यांना बिल्डरांनी अमाप पैसा दिला, तेव्हा त्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांनी प्लाझ्मा टि.व्ही. घेतले, कार दारात उभ्या केल्या, मोबाईल वापरू लागले, त्या छोट्याशा घरातून मोठ्या फ्लॅट मध्ये आले, त्यांना सुंदर जग कोणी दाखवले, बिल्डरांनी नाही, लोकसंख्येने, यात त्या बिल्डरांची काय चूक आहे, त्यांनी तर लोकांना घरे बांधून दिली.

लोकसंख्यावाढीमुळे मुला मुलींची संख्या वाढली, म्हणजे त्यांना लग्न करणे आले, आता बघा कोणाकोणाची सोय झाली, भटजी, मांडववाले, केटरर्स, कपडेवाले, अहो रुखवत आला म्हणजे भांड्यावाले, घोड्यावाला, छपाईवाले, अजून कितीतरी लोकांची पोटे भरली जातात. लग्नानंतर प्रसूतीगृहांचा धंदा काय वाढला नाही का?

लोकसंख्यावाढी मुळे मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी शिक्षणसम्राट असे मागे राहतील?

मग आपण लोकसंख्या वाढ का रोखावी, उलट कुटुंबनियोजनाचे तीन तेरा वाजवावेत.

ज्योतिषी पत्रिकेवरून भविष्य पाहतात, खरे आहे, पण मला वाटते ते लोक आताच्या परिस्थितीवरून भविष्य सांगत असावेत. आता माझेच उदाहरन घ्या ना, साधारण १० वर्षांपूर्वी माझी परिस्थिती बेताचीच होती, मुले शिकणारी, पगार पोटापुरताच, राहण्याचे घर अगदी १०० वर्ग फूट सुद्धा नाही. त्या वेळेस मी पत्रिका दाखवली, अत्यंत निष्णात अशा ज्योतिषीला, काही नाही त्याने सांगितले पत्रिका छान आहे.बस्‍. आता ह्या सगळ्या परिस्थितीवरून भविशःयाची काय अपेक्षा करावी.

झाले, नंतर मुलांचे शिक्षण झाले, मुलगा अमेरिकेला आला, मुलीचे चान लग्न झाले, तिला करोडोची मालमत्ता असलेले सासर मिळाले, ती आता ऑस्ट्रेलियात आहे. आमचे लहान घर असूनही आम्ही मोठे घर घेतले, चांगलेच मोठे. मी स्वतः तिसर्‍यांदा परदेशात आलो, मग असा प्रश्न पडतो की त्या वेळेस असे भविष्य कोणी का सांगितले नाही, अहो आमची परिस्थितीच अशी होती की, कोणी हे भविष्य सांगण्याचे धाडसच केले नसते. म्हणजेच काय की, प्राप्त परिस्थितीच कारणीभूत असते. हा आता जर मी पत्रिका दाखवली तर मात्र सगळे सांगतील की तुमचे भविष्य फार उज्ज्वल आहे.

आता पहा, भारताचे पंतप्रधान देवेगौडा, चरणदास याचे तरी भविष्य कोणी सांगण्याचे धादस केले असते काय? काही नाही भूकंप झाला की, हे लोक उठतात आणि सांगायला सुरूवात हा भूकंप होणारच होता, अरे पण शहाण्या आधी सांगितले असते तर लोकांचे प्राण वाचले नसते काय? मी तर म्हणतो, अशा लोकांना महत्वाची माहिती लपवली म्हणून शिक्षा करायाअ पाहिजे.

पत्रिकेवरून भविष्य म्हणजे काय तर फक्त ठोकताळे.

म्हणून फक्त प्रमाणिकपणे कष्ट करावे, आणि भविष्य घडवावे.

जे भविष्य पाहतात, त्यांचे तरी त्यांना कोठे माहित असते.  

आम्हां भारतीयांना वेळेचे महत्त्वच फार. आमच्या दृष्टीने वेळ बहुमूल्य आहे म्हणून आम्ही वेळ वाचविण्याची एकही संधी दवडत नाही.
गरीब, श्रीमंत, सुखवस्तू, सुशिक्षित, उच्च-विद्याविभूषित, अशिक्षीत, पुरुष, स्त्रिया, मुले, राजकारणी, साधु, पूजापाठ सांगणारे, करणारे अगदी सर्व जो भारतीय आहे, त्याच्या रक्तातच वेळ वाचविण्याचे कसब आहे.
कसा वेळ वाचवतात पहा -
१) चौकात लाल दिवा असेल तर, आजूबाजूला पोलीस नाही हे पाहून वाहन सुसाट वेगाने नेतात - वेळ वाचवतात.
२) रहदारीत हिरवा दिवा लाल झाल्यास, न थांबता तसेच वाहन पुढे नेऊन दुसर्‍या बाजूच्या वाहनांची पर्वा न करता वेळ वाचवतात.
३) सायकल स्वार रहदारीची पर्वा न करता, जणू सिग्नल, नियम आपल्यासाठी नाहीतच असा विचार करून न थांबता, सायकल कशीही चालवून थांबतच नाहीत. - वेळ वाचवतात.
४) पादचारी सरळ चालतात, आजूबाजूला बघून थांबत नाहीत, थांबले तर वाहनांनीच यात शाळकरी विद्यार्थीही आले - वेळ वाचवतात
५) वृद्ध काठी टेकत, एक हात वर करून सरळ रस्ता ओलांडतात, त्यानंतर आयुष्याच्या शेवटी शेवटी थांबायला अजिबात वेळ नसतो.
६) सरकारी, कर्मचारी, बँकेतील कर्मचारी वगैरे वेळे आधीच लवकर काम बंद करतात. घरी जातात - वेळ वाचवतात.
७) बसचे कंडक्टर (सार्वजनिक सर्व सेवा) स्टॉपवरील प्रवासी न घेताच डबल बेल देतात आणि वेळ वाचवतात.
८) ड्रायव्हर स्टॉपवर गाडीच थांबवत नाही. पूर्ण वेळ वाचवतो.
९) रस्त्यावरील दुभाजकाला वळसा घालण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा वाहन चालक रॉंग साईड मधून गाडी चालवतो. वेळ वाचवतो.
१०) दुकानदार, रस्त्यावरील, गाडीवरील भाजीविक्रेते, वगैरे विक्रेते. वजनाच्या तागडीत भराभर पटकन माल टाकतात म्हणजे ती तागडी लगेचच खाली जाते - अशा प्रकारे वेळ वाचवतात.
११) पेट्रोल पंपावर स्कूटरमध्ये ऑईल टाकताना, ऑईल मापात बरोबर भरण्यासाठी वेळ लागतो, माप बघावे लागते म्हणून तो पटकन् ऑईल टाकल्यासारखे करतो - आणि लगेचच पेट्रोल भरतो - वेळ वाचतो ना ?
१२) दुकानदार कोणतीही वस्तू एकदाच दाखवतो, दुसरी दाखवायला कंटाळा करतो, मग गिर्‍हाईकाला निवडीला वाव दिला तर वेळ कसा वाचेल ? - मग दुकानदार पुढच्या वस्तू दाखवतच नाही आणि वेळ वाचवतो.
१३) गणपतीचे वर्गणीवाले, वर्गणी मागायला आले की लगेचच वर्गणी द्यावी लागते. नाहीतर त्यांना पुन्हा येण्यासाठी वेळ नसतो ना ?
१४) सोसायटीत खाली पायर्‍या उतरताना लिफ्ट वापरू नये, पण चालत कोण जाणार ? वेळ कोठे आहे ?
१५) रस्त्यात अपघात झाल्यावर दोन्ही वाहनचालक लगेचच एकमेकांशी हमरीतुमरीवर येतात ? समजून घ्यायला वेळ कोणाकडे आहे ?
१६) पोलीस चौकीत तक्रार घेऊन गेल्यास सामान्य माणसाचे ऐकूनसुद्धा घेत नाहीत - एवढा वेळ पोलिसांकडे अजिबात नसतो.
१७) कोर्टात अशीलाला एका ठिकाणी बसवुन दिवसभर वकील सर्व कोर्टात फिरत असतो संध्याकाळी अशिलाला तारीख घ्यायला लावून निघून जातो. एवढ्या केसेस त्याच्याकडे असतील तर तो अशा केस चालवायला वेळ कुठून काढणार ? म्हणून केसेस न चालवताच पैसे घेऊन वेळ वाचवतो.
किती! किती! आपण भारतीय वेळ वाचवतो आणि आपल्याला वेळच नसतो!

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ▼  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ▼  June (13)
      • परदेशातील साहित्य संमेलन
      • सॅल्युट माणेकशॉ
      • एकाद्याचे नशीब
      • बेकारीचे पीक
      • आदर्श कुमारभारती
      • पी.एच्‌.डी
      • संस्कारांची वॉरंटी
      • देवाचा न्याय
      • कनेक्शन
      • वटसावित्री व्रत
      • मुंबईची रेल्वे
      • भविष्य
      • भारतीयांचे वेळेचे महत्त्व
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose