आदर्श कुमारभारती

सकाळमधील बातमी पहा, असाप्रकार विद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या "पुणे" नगरीत घडत आहे, खरे तर यांना लाज कशी वाटत नाही.

http://www.esakal.com/esakal/06252008/Maharashtra9F53E49BFF.htm

कुमारभारती'च्या दहावीच्या पुस्तकात चुकाच चुका
औरंगाबाद, ता. २४ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या दहावीच्या मराठी विषयाच्या नव्या "कुमारभारती' पुस्तकात अनेक चुका आहेत. शुद्धलेखनाच्याच चुकांनी परिसीमा गाठली आहे.
अशुद्ध शब्द वाचण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. यंदा मंडळाने "कुमारभारती' पुस्तक नव्याने प्रकाशित केले. या नव्या पुस्तकात काही जुनेच धडे आहेत. वारंवार मराठी विषयाचीच पुस्तके का बदलली जातात, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. "कुमारभारती'च्या पुस्तकात चुकीच्या शब्दांची संख्या सुमारे १३० आहे. चुकीच्या शब्दांमध्ये "आंगठे, श्वास, हुषार, आपणावर, बधीर, आश्‍चर्याचा, द्या, चैन, चैनीला, बांधिलकी, वृत्तीचा, पांडूरंगा...' आदी शब्दांचा समावेश आहे.
पाठ्यपुस्तक निर्मितीचा भाषा विषयाच्या पुस्तकांसाठी एक आकृतिबंध मंडळाने तयार केला होता. त्याप्रमाणे नववी, दहावी, अकरावी, बारावी या वर्गांची पुस्तके तयार करण्यात आली. पण, दहावीचे पुस्तक नव्याने काढताना आकृतिबंध बदलण्याची परवानगी न घेताच नवीन पुस्तक तयार करण्यात आले आहे, असा आक्षेप आहे. कठीण शब्दांचा अर्थ पाठ्यपुस्तकाच्या शेवटी द्यावा, असे ठरले होते. या पुस्तकात मात्र कठीण शब्द पाठाच्या खालीच देण्यात आले आहेत. टीपा आणि कठीण शब्द यांचा गोंधळ झाला आहे. कठीण शब्दांत टीपा, तर टीपांमध्ये कठीण शब्द, अशी सरमिसळ झाली आहे. "कुमारभारती'च्या नवीन पुस्तकात तीन कविता व दोन पाठ पूर्वीच्याच पुस्तकातील आहेत. नवीन अभंग व कविताही घेण्यात आलेल्या नाहीत.
पाठाच्या खाली देण्यात आलेल्या स्वाध्यायामध्ये काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे. एका वाक्‍यात उत्तरे देणे शक्‍यच नाही, असे प्रश्‍न एका वाक्‍यात उत्तरे द्या म्हणून विचारण्यात आले आहेत. काही लेखकांचे परिचय पूर्णपणे, तर काहींचे त्रोटक देण्यात आले आहेत. संतांची पूर्ण नावे नाहीत.

साधे visiting card किंवा लग्नाची पत्रिका छापताना सुद्धा आपण proof तपासून पाहतो, इथे तर थोरथोर मंडळी कारभार करतात, त्यांना सुद्धा समजले नाही, म्हणजे कमाल आहे. त्यांच्या ज्ञानाची कीव येते. असा राग येतो पण काय करणार? मला वाटते या सर्वांना कोर्टात खेचून यांच्या पदव्या काढून घ्याव्यात. काय आदर्श टेवणार आहोत आपण भावी पिढी समोर. दरवर्षी एक रडगाणे असते, पेपरातील चुका, अरे पणा या होतातच कशा? शिवाजीमहाराजांच्या काळात फटक्यांची सजा होती, तीच बरोबर होती, याची आज या पदवीधर मंडळींना पाहून वाटते. खरे तर आश्चर्य म्हणजे, पुण्यातील वर्तमानपत्रे आपल्या अग्रलेखातून आवाज उठवत नाहीत, त्यांना बाकी विषय समजतात, पण याचे गांभिर्य कळत नाही. वर्तमानपत्रे म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आधार, पण काही बाबतीत अगदी ठरवल्याप्रमाणे ती सुद्धा मूग गिळून गप्प बसतात.

पुण्यात  BRT एवढा धुमाकूळ चाललेला आही, बातम्यांची प्रचंड धूळ उडत आहे, पण वर्तमानपत्रातील, अग्रलेखांना मरगळ आलेली आहे, अजिबात आवाज नाही, जणू ते BRT चे प्रतिनिधीत्वच करताहेत. कधी कधी तर अशा विषयांवर अग्रलेख असतात, ते सामान्या लोकांच्या आकलना पलिकडचे असतात.

Unknown

No comments: