मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

पुण्यात दि.२४ जानेवारी २००९ रोजी बहुभाषिक ब्राम्हण महाअधिवेशन झाले. खू्पसे मान्यवर महाराज, स्वामी, विचारवंत, ज्ञानी, राजकारणी, नेते मंडळी उपस्थित होती. मुळात असे जातीविषयक अधिवेशन भरवणेच गैर. त्याने जातीवादाला चालना मिळते. ब्राम्हण वर्ग म्हणजे ज्ञानी समजला जातो. कारण त्यांच्याकडे ज्ञानदानाचे कार्य होते. धर्माची व्याख्या करण्याचे काम होते. कोणत्याही विषयावर मतभेद झाल्यास, त्यावर साधकबाधक चर्चा, वादविवाद करून त्यावर मत ठाम करण्याचे काम ब्राम्हणांना शोभा देते, अरेरावीच्या जोरावर एखाद्याचे म्हणणे खोडण्याचे पाप कसे करू शकतात देव जाणे.

या अधिवेशनात डॉ. अश्निनी घोंगडॆ म्हणाल्य," आजच्या काळात संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल. त्याने ब्राम्हणत्व कमी होत नाही." यावर तेथे बराच गोंधळ झाला.अनेक श्रोते व्यासपीठाकडे धावून गेले, त्यांचे भाषण बंद पाडले. खरेतर या विषयावर चर्चा अपेक्षित होती. अजूनही ब्राम्हणांना संध्या, जानवे ओळखीसाठी लागते.

त्याच अधिवेशनात रामदेवबाबा काय म्हणाले," काही ब्राम्हण, पंडित तंबाखू आणि गुटखा चघळताना दिसतात. मग पुढे मांस दारूही ओघाने येते. या पुढे असेच वागाल तर निश्चितच संस्कृतीचे पतन होईल, म्हणून या अधिवेशनातून जाताना व्यसने सोडा." यावर कोणी काहीही बोलले नाही. संध्या करायची, जानवे घालायचे आणि व्यसने करायची, हे कोणत्या बुद्धीवंताच्या आचरणात बसते. रामदेवबाबांच्या वक्तव्यावर सर्व शांत होते, कोणी कसे म्हणाले नाही की ब्राम्हण व्यसने करीत नाहीत. असा शपथविधीचा कार्यक्रम कसा झाला नाही, असा ठराव का केला गेला नाही. मांसाहारी हॉटेलमध्ये गेल्यास कोणाची जास्त हजेरी असते हे न बोललेलेच बरे. संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल, पण आचारधर्म पाळा ना?

जेव्हा पृथ्वीवर मानव निर्माण झाला  तेव्हा रानटी अवस्थेत मानवात जात होती काय? नव्हती. पण नंतर काही लोक इतरांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू लागले, तेव्हा त्यांचा एक वर्ग निर्माण झाला, तोच ब्राम्हाण वर्ग. काही निधड्या छातीचे, बलदंड लोक शौर्य गाजवू लागले, त्यांना क्षत्रिय म्हणू लागले. अशा प्रकारे कर्माप्रमाणे जाती नि्र्माण झाल्या.

ब्राम्हणेतरांनी संध्या केली, जान्हवे घातले. मांस भक्षण नाही केलेतर, तो ब्राम्हाण होऊ शकतो काय? ब्राम्हणात रोटी बेटी व्यवहार होईल काय?

’पर्यायी माता’ ( surrogate mother), भारतात हा पर्याय मान्य होऊ शकेल काय? ज्या ठिकाणी अनाथ मुलांनी अनाथालये भरून जातात, पण त्या निष्पाप जीवांना कोणीही दत्तक घेत नाही. काही काही कुटुंबात चार चार पाच पाच मुले असतात, त्यांची आबाळ होते पण त्यांना कोणी मदतीचा हात देत नाही. स्त्रीयांच्या चारित्र्याबद्दलच्या संकल्पना दृढ आहेत, त्या समाजात ही पर्यायी म्हणा  किंवा भाडोत्री माता चालेल?

Surrogate Mother म्हणजे काय तर, पहिल्या प्रकारात ज्या जोडप्याला मूल होय नाही, त्यातील पतीचे शुक्रजंतू आणि पत्नीच्या बीजांडाचे फलन, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात केले जाते. मग त्या स्त्रीला मूल झाल्यावर, ते त्या जोडप्याच्या स्वाधीन केले जाते. दुसर्‍या प्रकारात पतीपत्नी व्यतिरीक्त दुसर्‍या अन्य पुरूषाचे शुक्रजंतू आणि या जोडप्यातील पत्नीच्या बीजांडाच्या सहाय्याने, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ तयार केला जातो, आणि त्यातून जन्मलेले मूल त्या दांपत्यास दिले जाते. या अवस्थेत त्या बाळाला पाच पालक असू शकतात.

आता यात स्त्रीने किती जणांना आपले गर्भाशय वापरू द्यायचे हा प्रश्न आहेच ना? पुरूषाने किती वेळा शुक्रजंतू दान करावयाचे. यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचा विचार भारतात चालू आहे म्हणे. म्हणजेच याला कायदेशीर मान्यता मिळणार. मग याला धंदेवाईक स्वरूप येणार. पैशांचे व्यवहार होणार.

यातून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात.

१) नवीन आईने बाळ देण्यास नकार दिला तर? कारण तिचे मातृत्व आड आले तर? मग कोर्ट कचेरी आली.

२) मालमत्ता वादात सापडली, तर  ज्याने शुक्रजंतू दान केले, त्याच्या मालमत्तेवर हा मुलगा किंवा मुलगी हक्क सांगू शकतो काय? कारण ह्या प्रकारात डॉक्टर पैशासाठी फुटला तर? आणि D.N.A. test  केली तर?

३) मरणानंतर अग्नि देताना हा मुलगा, दुसर्‍याच्या शुक्रजंतूंपासून निर्माण झाल्यामुळे, अस्तित्वातल्या बापाला अग्नि देऊ शकतो काय?

४) दत्तक मुलापेक्षा हे बरे, कारण कमीतकमी आईच्या बीजांडाचा तरी वापर झालेला असतो, त्यामुळे जिव्हाळा राहतो.

५) मुलाची खरी आई कोणती हा प्रश्न उरतोच ना?

६) ज्या दांपत्याने अशाप्रकारे मूल प्राप्त केले, आणि नंतर या दांपत्याला मूल झालेत तर? या मूलाचा इस्टेटीवर काय हक्क असेल? लग्न कार्यात काय अडचणी येतील?

७) दांपत्यातील पुरूषाला वंध्यत्व असेल तर पर्यायी बापाचा विचार होऊ शकतो काय?

यातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी असावी. तसा कोणताही हेतू नाही.

महाभारतावर आतापर्यंत कितीतरी जणांनी अभ्यास केलेला आहे. माझ्या सुद्धा मनात काहे प्रश्न उपस्थित झालेत, उत्तेरे शोधावीच लागनार.

जर द्रोणाचार्यांच्या अभ्यासशाळेत त्यांनी कौरव आणि पांडवात भेदभाव न करता दोघांनाही, सांभाळून घेउन, प्रत्येकवेळेस अर्जुनालाच पाठीशी घातले नसते तर, दुर्योधनाच्या मनात कायम लहाणपणीच पडवांबद्दल अढी निर्माण झाली असती काय? गुरूचे कर्तव्य द्रोणाचार्य विसरले. 

माता कुंतीने मंत्राचे सामर्थ्य, खरेपणा पाहण्यासाठी, कुमारीवयातच प्रत्यय घेतला आणि कर्णाचा जन्म झाला. कुंतीने हा विचारच केला नाही काय, की हा वर खर झाला, आणि अपत्यप्राप्ती झाली तर काय करायचे? बिचार्‍या त्या कर्णाचा काय दोष होता. त्याला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून जगावे लागले ना? त्या काळी वरदानाने प्राप्त झालेल्या संततीला मान्यता  होती. महाभारतात युद्धाच्या वेळेस शेवटी श्रीकृष्ण कर्णाची कुंतीशी ओळख मुलगा म्हणून करून देतो, तेव्हा कुंती कर्णाजवळ अर्जुनाचा वध न करण्याचे वचन घेते. मग त्याच वेळेस ती पांडवांना कर्नाबद्दल माहिती का देत नाही? तिचा आदेश सर्वांनी मानला असता ना? आयुष्यभर झालेल्या मानहानीला कुंती जबाबदार नाही काय?

जेव्हा इंद्रप्रस्थ मध्ये पांडव मयसभा उभारतात, त्यात अनेक चमत्कृती बनवतात, आणि कौरवांना आमंत्रण देतात. दुर्योधन मयसभा सहज कुतुहलाने न्याहाळत असताना, त्याला जाणीव होते, आणि तो आश्चर्यचकीत होऊन भारावून जातो, आणि एका क्षणी त्याला जमीन वाटून जेव्हा तेथे तो पाय टाकतो, तर तेथे पाणी असते, आणि त्यात तो पडतो. त्याच वेळेस द्रौपदी त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते," आंधळ्या बापाची मुले आंधळीच असतात." कोणा क्षत्रियाला  हा अपमान सहन होईल? दुर्योधनाचा आंधळा बाप म्हणजे द्रौपदीचा सासराच ना? मग तिला हे शोभले का? हाच राग मनात ठेऊन दुर्योधनाने महाभारत घडवले ना? कौरव मयसभा पहायला आल्यावर पांडवांनी, धर्माने तरी कौरवांना मयसभेची वैशिष्ट्ये समजावून सांगायला पाहिजे होती. हल्ली आपण सुद्धा आपले घर दाखवताना पाहुण्यांसोबत राहतो.मग हे सगळं पाहिल्यावर पांडवांनी हे मुद्दमच केले नसेल कशावरून?

त्याकाळात जातीय वाद भलताच फोफावलेला होता, शिक्षक सुद्धा जातीय वादाला महत्व देत. पहा, एकलव्याला द्रोणाचार्यांनी विद्यादान का नाकारले? अर्जुनच श्रेष्ठ पाहिजे म्हणून द्रोणाचार्यांनी किती विद्यार्थ्यांवर अन्याय केला. कर्णाने उत्तम विध्यार्थ्याचा परिचय देऊन सुद्धा परशुरामांनी कर्णाला केवळ तो ब्राम्हण नाही म्हणून शाप दिला, आणि कर्णावर अन्याय केला, त्याला माफ सुद्धा करता आले असते.

भीष्म लढाईत जिंकत आहेत हे पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाला शिखंडीच्या मागून बाण मारायला सांगितले, हे कपट श्रीकृष्णासारख्या देव माणसाने का करावे?

इंद्र देवाने कपटाने कर्णाकडून त्याची कवचकुंडले याचकाच्या रूपाने मागून अर्जुनच्या प्राणाची भीकच मागीतलीना?

असे अनेक प्रसंग आहेत. धृतराष्ट्र आंधळा असतानाही, भीष्माने बाहुबलाच्या जोरावर त्याच्या विवाहासाठी, गांधारीचा हात मागीतला, गांधारनरेश शकुनी काहीही करू शकत नव्हता. पण कोणा भावाला आपली बहीण, आयूष्यभर डोळे असून आंधळ्यासारखे वावरलेले आवडेल? त्याचा सूड घेण्यासाठी  शकुनीनी दुर्योधनाचे कान भरून त्याला अनेक पापे करायला भाग पाडले, आणि त्यांना विनाशाजवळ नेऊन ठेवले.

असे महाभारत पाहून काय बोध घ्यावा. आणि अशी कथा का लिहावी. आणि त्यालाच आपण महाकाव्य म्हणतो.

काल दि.२७ जानेवारी २००९ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती श्री. वेंकटरमण यांचे निधन झाले. त्यानिमीत्त सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द. काय कारण? कोणाही नेत्याला त्या मरणाचे दुःख झाले नसेल. फक्त राष्ट्रपती म्हणून दुःख, पण तो माणूस म्हणून किती श्रेष्ठ होता याचा विचार कोणी करते काय? पूर्वी तर दुखवटा म्हणजे T.V. वरील कार्यक्रम सुद्धा रद्द असायचे, पण कोणाला सुख दुःख. उलट लोक केबल लावून बसायचे. असा सर्व्हे केलाच गेला नाही की, या दुखवट्याचा जनतेवर काय परिणाम होतो.

राजकारणी लोकांबद्दल लोकांना काय वाटते, याचा अभ्यास सर्व्हे करणे जरूरीचे आहे. १५ ऑगष्ट किंवा २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती T.V. वरून जे भाषण देतात, ते किती लोक ऐकतात? १० टक्के सुद्धा नसतील. लोकांचा राग मतपेट्यांद्वारे व्यक्त होत असेल तरी, भारतातील घटनेप्रमाणे एक मत जरी जास्त मिळाले तरी उमेदवार निवडून येतो. समजा कोणीच मतदानाला गेले नाही तर अगदी दोन तीन मते मिळाली तरी मतदान झाले असे समजण्यात येते. खरेतर कमीतकमी किती मते पडावीत याची टक्केवारी त्यात्या भागातील, मतदारांच्या संख्येवर निश्चित करावी.

भारतात किती धर्म आहेत, किती नेते होऊन गेले ( त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या) , किती सण येतात, किती स्मरणदिन या सर्वांचा विचार केला तर किती कामाचे दिवस उरतात. याचा कोणीही विचार करत नाही. पुण्यात पाहिले, मोहरम, ईद सुट्टी अशा शाळांना दिली जाते, त्या शाळेत एकही मुस्लीम विद्यार्थी नसतो. आता या सणांना हिंदू शाळांतील विद्यार्थी काय मस्जिदमध्ये नमाजासाठी जाणार काय?

असा कोणी नेता दिवंगत झाल्यास  जास्त्तीतजास्त एक दिवसाचा दुखवटा पाळायला हरकत नाही. नवीन वर्षाच्या सुरवातीला लोक जोडून सुट्ट्या पाहतात आणि पिकनिकचे बेत आखतात. कोणीही राष्ट्रीय सणांना घरी थांबत नाही, की सरकारी कार्यक्रमाचा आनंद घेत नाहीत. जे सरकारतर्फे पुरस्कार दिले जातात, कोणीही T.V. वर पहात नाहीत. सुट्टीच्या दिवसाचे महत्व फक्त मजा करण्यासाठी, कोणीही त्या दिवसाचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. 

हे सगळं आठवले या दुखवट्या वरून.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतची राज्यघटना मान्य झाली, आणि तत्वतः याप्रमाणे देशाचा कारभार करावा आणि  त्या राज्यघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, हे एकदा मान्य झाले. किती हुतात्म्यांच्या रक्ताने ही राज्यघटना, खरेतर लिहीली गेली. जगाच्या मंचावर महासत्ता बनण्याची स्वप्ने घेऊन आज भारत मार्गक्रमण करीत आहे, या पार्श्वभूमीवर राज्यघटना साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु खरेच तसे झाले काय, ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. नाहीतर १०० वर्षांनी राज्यघटना म्हणजे काय हे त्या पिढीला सांगावे लागेल. राज्य घटना जन्माला तीच मुळी नानाविध जाती, धर्म पंथ, भाषा, संस्कृती यांच्या कमकुवत पायावर. कारण राज्यघटना लिहीताना भविष्यात काय परिणाम होतील याचा विचारच केला गेला नव्हता. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदूंनाच प्राधान्य मिळावयास हवे याचा, स्वतःला महान  बनविण्याच्या नशेत, घटनाकर्त्यांना विसर पडला होता. 

जगात खूपसे देश या मागच्या पन्नास एक वर्षात निर्माण झाले, त्यांनी घटना बनविली नाही, पण देश सुरळीत कारभार करताहेत. भारतात घटनेचे आपल्या मर्जीप्रमाणे, सोईनुसार अर्थ काढून देशाचे पार वाटोळे करून टाकले आहे, त्यापेक्षा ही घटना नसती तर बरे झाले असते, असे वाटते. आज असे लोकही जिवंत आहेत की, ज्यांनी इंग्रजांचा काळ अनुभवला आहे, आणि ज्यांनी स्वातंत्रयुद्धात भाग घेतला  होता, ते  सुद्धा उद्वेगाने म्हण्तात, इंग्रजांचा काळ बरा होता. बकासूर परवडला तो रोज एकच माणूस खात होता, पण आज घाऊक पद्धतीने माणसे मुंग्यांसारखी चिरडली जाताहेत.

राज्य कारभार करणारे लोकप्रतिनिधी, मंत्री राज्याघटनेप्रती, सचोटीने वागण्याची शपथ घेतात, सत्ता स्विकारतात, त्याप्रमाणे वागतात काय? कायद्याचा अर्थ सांगणारी, एवढीच राज्यघटना नसून आचारविचार, तारतम्य, राज्यप्रणाली म्हणून तिचे महत्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या ध्रर्माला धर्मग्रंथाचे जेवढे महत्व आहे तेवढेच देशाला घटनेचे महत्व आहे. गीता किंवा वेदांमधून धार्मिक संहीता सांगितलेली आहे, पण त्याच बरोबर राज्यघटना अचारली गेली तर सोन्याचा धूर निघतो, नाहीतर उगीचच धग राहून धूर होतो.आज या राज्यघटनेचे द्रौपदी वस्त्रहरण झाले आहे, लाज राखण्यासाठी श्रीकृष्णाच्या वस्त्रांची गरज आहे.

याच राज्य घटनेचा सोईस्कर अर्थ लाउन नागरीकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी, आणीबाणी लादली गेली होती, हे विसरून चालणार नाही. राज्यघटना किती प्रभावी आहे, हे सर्वस्वी ती राबणार्‍यावर अवलंबून असते.  राज्यघटनेचे यश अपयश तोलण्याची आज वेळ आलेली आहे, साठाव्या वर्षी हे तरी करूय यात.

धर्मनिरपेक्षतेचा संदेश देता देता, धर्माच्या मूलतत्वांना कसा सुरूंग लावला गेला, अन्य धर्माचे लाड करताना आपलाच धर्माला कशी सापत्न भूमिका दिली गेली, याचा विसर पडत आहे. धर्माबद्दलची कलमे, जास्त ती्व्र करण्याची, बदलण्याची आज गरज आहे, नाहीतर धार्मिक संघर्ष होण्यास वेळ लागणार नाही.

भ्रष्टाचार, अत्त्याचार, आर्थिक घोटाळे, धार्मिक विषमता, स्वैराचार हे सर्व केवळ घटना राबवली गेली नाही म्हणून भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. सामान्य माणूस राज्यघटना राबवू शकत नाही, पण राज्यघटने प्रमाणे वागण्यासाठी ते मतदान करून नेता निवडतो, पण त्यानेच पाठीत खंजीर खुपसल्यास त्याचा न्याय कोण करणार. राज्यघटना राबवण्याची जबाबदारी न्यायालये, पोलीस, राज्यकर्ते, पुढार यांच्यावर आहे, पण तिथेच भ्रष्टाचार एवढा आहे की, भयानक गढूळपणा आलेला आहे.

राज्यघटना कागदावरच ठेवायची, की ती योग्य प्रकारे राबवायची हे ठरविण्याची वेळ आलेली आहे. राज्यघटनेतील प्रत्येक कलम हे ईश्वरवचन आहे, असे मानले तर पुन्हा भारतात सुवर्णकाळ येईल.

साधे चित्र जेवढे चांगले दिसते, त्याही पेक्षा ते काचेच्या फ्रेम मध्ये अजून मोहक दिसते, कारण त्याला बंधन असते. १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण तेच जेव्हा २६ जानेवारीला १९५० रोजी राज्यघटनेच्या फ्रेम मध्ये बंदिस्त झाले, तेव्हात त्याला एक प्रकारची झळाळी आली.

६० व्या प्रजासत्ताक दिनी सर्वांचे अभिनंदन.

दैनिक "सकाळ", २४ जानेवारीची एक बातमी-

वयाच्या ३० वर्षानंतर ’एलएलबी’, तर वयाच्या विशीनंतर ’बीएसएलएलबी’ आता करता येणार नाही.हे बंधन घातले आहे बार कौन्सिल ऑफ इंडियाने.

यात बार कैस्सिलचा शुद्ध हेतू वाटत नाही. कदाचित वकील मंडळी जास्त झाली असतील, म्हणून आताच्या वकीलांची बार कौन्सिल काळ्जी घेत असेल. असे म्हणतात की शिक्षणासाठी, वय आड येत नाही. माणूस आयुष्यभर शिकतच असतो. या निर्णयामुळे ज्यांची शिक्षणाची इच्छा आहे, पण गरीबीमुळे शिकू शकत नाहीत पण, कालांतराने पैसे आल्यावर वकील होऊ शकतात, त्यांचा हक्क मारला गेला ना. खरे तर कोणत्याही शिक्षणाला वयाची अट नकोच.

जर हा प्रकार सर्व क्षेत्रात होऊ लागला तर अवघड होईल. वकीलमंडळी हा जो पायंडा पाडता आहेत, तो समाजाच्या दृष्टीने घातक आहे. सामाजिक क्षेत्रात काय गोंधळ होईल, कल्पना करवत नाही. लोकसंख्या वाढती आहे, म्हणून सरकारने कायदा केला, की कोणालीही वयाच्या २१ व्या वर्षानंतर लग्न करता येणार नाही, तर? २१ वय उलटून गेलेल्यांनी काय करायचे. असाच कायदा अन्य शिक्षणक्षेत्राला लागू झाला तर?

वकील मंडळी विचार करतात काय, की या निर्णयाने मानवी हक्काची पायमल्ली होत आहे, आणि हे कायदा शिकवणारेच करत आहेत. वयाच्या अटीला सबळ अशी कारणे ही नाहीत आणि ते देऊही शकत नाहीत.

त्यापेक्षा असा नियम का करत नाहीत की, वयाच्या ५०व्या वर्शानंतर वकीलाने वकीली सोडून द्यायची, आणि नवीन पिढीला वाव द्यायचा. अक्षरशः काही वकील मंडळींना नीट चालता, बोलता येत नाही पण तसेच न्यायालयात येतात, आणि त्यांनी केव्हातरी तरूण वयात घेतलेले आणि तारखांवर तारखा मिळवत लांबलेले खटले चालवायला येतात. जसे ’एलएलबी’ प्रवेशाचे वय ठरवतात, तसेच निवृत्तीचेही वय ठरवावे. आणि हा नियम सर्व क्षेत्राला लागू करावा. सरकारी कर्मचारी ठराविक वयात रिटायर होतो ना? मग वकीलांनी स्वेच्छानिवृती घ्यायला काय हरकत आहे?

आता यावर चर्चा होणार, कोणीतरी पुन्हा कोर्टात जाणार, कुणाचातरी इगो दुखवणार. बरोबर आहे आपल्याला काही कामच नाही ना? काहीतरी नवीन पिल्लू सोडून द्यायचे, आणि झुंजत बसायचे.

डाव किती छान आहे ना? माल कमी आणि मागणी जास्त असेल तर काय होते? बाजारातला मालाचा भाव वाढतो. आता काय वकील झाले असतील जास्त, तेव्हा पीकच कमी काढायचे, म्हणजे आताच्या मालाला भाव जास्त. केसेस खूप वाढताहेत, मग वकील कमी असतील तर, यांची चंगळच.

फक्त वकीलांनाच नाही,जर असे नियम सर्व क्षेत्राता लागू होऊ लागले तर अवघड होईल. अशा नियमावलीची राजकारणी लोकांसाठी गरज आहे. कोणीतरी अशी नियमावली बनवणे गरजेचे आहे.

जीभ, शरीरातील अजिबात हाड नसलेला अवयव, पण हाच अवयव घसरला की, शरीरातील सर्व हाडे मोडतो. सरीराचे आरोग्य आणि सुरक्षितता जीभेवरच अवलंबून असते. जीभ जेव्हा बोलू लागते, तेव्हा काही चांगले तर काहीवेळेला वाईट परिणाम होतात. परंतु जीभ जेव्हा चोचले पुरवू लागते तेव्हा आरोग्य बिघडते आणि नियंत्रणात राहते तेव्हा आरोग्य निरोगी राहते. तलवार काय काम करेल तेवढी जीभ काम करते.

जीभने शब्द उच्चारले जातात, महात्मा गांधी बोलत तर इंग्रज हलत, लोकमान्य टिळक बोलले आणि जन्मसिद्ध हक्क मिळाला. तर बॅरिस्टर जीना बोलले आणि पाकिस्तानची निर्मीती झाली, आणि भारताला आयुष्यभरची डोकेदुखी झाली. एखाद्याशी बोलताना जिभेचा तोल गेला तर आयुष्यभरची नाती तुटतात.

माझ्या माहितीत एक सज्जन होते, म्हणजे ते आता नाहीत. त्याला कोळंबीची भाजी खायची होती, तसे त्याने बायकोला सांगितले तर ती म्हणाली, बरं. भाजी झाली, नवरा म्हणाला भाजीत मीठ जास्त पडले आहे, पण बायको काय कबूल होईना. याच्या जिभेला खारट ता बायकोच्या जीभेला बरोबर चव. खूप भांडण झालं. त्यांच्या अबोला निर्माण झाला. आता प्रश्न आला प्रथम कोणी बोलायचे. यात महिने निघून गेली. नवरा तावातावाने घर सोडून निघून गेला. त्याचा खूप शोध घेऊनही तो सापडला नाही, शेवटी त्याच्या मृत्युचीच खवर दहा एक वर्षाने मिळाली. संसार मातीत मिळाला, त्याचा बेवारस अंत झाला. हे सर्व कशामुळे घडले, जिभेची चव आणि जीभेचाच अबोला. आहे ना जीभेची कमाल. अमिन सायनीने जीभेवर,रेडिओ सिलोन वर बिनाका गीतमाला गाजवली. दोघांच्या भांडणात तीसर्‍याने जीभ चालवली, तर काय होईल, कल्पना करा.

आरोग्य जीभेवरच अवलंबून असते, कितीही व्यायाम करा, पण जो जीभेला सांभाळतो ना त्याला आरोग्यासाठी बाकी कशाचीही जरूरी नाही. माझ्या माहितीतली एक व्यक्ती, त्याच्या जीभेची शिस्त सांगू? सकाळी उठल्यावर कपभर चहा त्या बरोबर एक गरम चपाती. दुपारी दोन चपात्या आणि वाटीभर भात, तोच आहार रात्री सुद्धा. वेळा सुद्धा ठरलेल्या सकाळी सात, दुपारी बारा आणि रात्री साडे आठ. मधीआधी अजीबात खाणे नाही. जेवताना आग्रह अजिबात नको. साधीबभाजी असो, श्रीखंड असो, नाहीतर मांसाहार असो, दोन म्हणजे दोनच चपात्या. भाजी चांगली झाली, मटण मच्छी आहे म्हणून जरा जास्त नाही.  त्या माणसाचे आरोग्य अजूनही अबाधित आहे, डॉक्टरची ओळखच नाही.

जीभेच्या कार्याचा विचार केला तरी, महत्व लक्षात येते. जेवताना दाताखाली अन्न कोण ढकलते. जीभेमुळेच तर केस किंवा इतर अनावश्यक पदार्थांची जाणीव होते.

’अय्या’ करून जेव्हा मुली जीभ बाहेर काढतात, तेव्हा अहाहा! काय सांगू नका.

भारतात आज खूप प्रश्न आहेत, ज्याचे उत्तरे फक्त ईश्वरच देऊ शकतो. आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, सामाजीक प्रश्न, धार्मिक प्रश्न, वैयक्तिक प्रश्न, अजून कितीतरी. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेच मुळात अनेक प्रश्न माथ्यावर घेऊन. भारतात एवढ्या जातीधर्माचे, बहुभाषिक लोक आहेत, त्यांच्याप्रमाणे राजकारण होऊच शकत नाही. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस, त्यावेळच्या नेत्यांनी भविष्य काळात काय परिणाम होतील, याचा विचारच केलेला नव्हता, आणि भाषेला प्राधान्य देऊन राज्ये निर्माण केली, त्यात पण घोळ घालून ठेवले, त्यातला सर्वात मोठा घोळ म्हणजे, बेळगाव. ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कायम भळभळणारी जखम करून ठेवली, आणि नंतरच्या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या जखमेवरच्या माश्यासुद्धा हाकलल्या नाहीत. आज काय परिस्थिती आहे, लोक बसगाड्या जाळताहेत, आगी लावतहेत, तोडफॊड चालू आहे. आता यात राजकारणी काहिही करू शकत नाहीत. बेळगाव महाराष्ट्राला दिला तर कर्नाटकात उद्रेक होईल, आणि महाराष्ट्रातील नेते गप्प बसले तर त्यांच्या मतपेट्यांवर परिणाम होणार, म्हणून ते गप्प आहेत.

खरे तर बेळगाव, कर्नाटकात काय किंवा महाराष्ट्रात काय.  काय फरक पडतो. तिथल्या जनतेला आता असे काय स्वर्गसुख मिळते काय? किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांना काय सोन्याचा घास मिळणार आहे? पण नाही आपण जिद्द दाखवतच संपत आहोत.  महाराष्ट्राला बेळगाव कशाला पाहिजे समजतच नाही. काय बेळगावात तेलाच्या विहीरी आहेत काय? सोन्याच्या खाणी आहेत काय? जर बेळगाव केंद्रशासित प्रदेश केला तर?

नक्षलवाद्यांचे म्हणणे तर काही औरच आहे. त्या राज्यांना सुद्धा एक डोकेदुखीच आहे.

लवकरच घोटाळ्यांची चर्चा करू यात.

"चार दिवस सासूचे" नावे serial ई-मराठीवर चालू आहे, त्यातील एका भागाने मात्र विचार करायला भाग पाडले आहे, मलाच नाही तर सर्वांनी विचार करावा.

त्यात ’पार्थ’ ला आपली बायको ’रिया’ पासून घटस्फोट हवा असतो, आणि तो सारखा घटस्फोटांच्या कागदांवर रियाची सही मागत असतो. तो काही केल्या ऐकत नाही, कारण त्याला दुसर्‍या ’अंजू’ नावाच्या मुलीशी लग्न करायचे असते. तो प्रसंग असा आहे, त्याची आई म्हणते, जर तू देवा ब्राम्हाणांच्या साक्षीने सप्तपदी, होम, मंगळसूत्र बांधण्याचा विधी देवांना साक्ष ठेउन केला होतास तर, तेच विधी तू आता उलट कर, म्हणजे लग्नाची सर्व तयारी करायची अगदी मुंडावळ्या बांधायच्या आणि होमाला उलटे फेरे मारायचे, मंगळसूत्र तोडायचे, कुंकू पुसायचे, म्हणजेच सर्व विधी उलट करून पुन्हा जसे लग्नाआधी हो्ती तशीच परिस्थिती आणायची, म्हणजे ते पती-पत्नी असणार नाहीत, मग मी ’रिया’ला घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करायला सांगते.

आता ती तयारी होते, पार्थ तयार होतो,ब्राम्हण येतो, आणि त्याला जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा तो याला तयार होत नाही. त्याचे म्हणणे’,"हे शक्य नाही, कारण हिंदू धर्मात असे कोणतेही लग्न तोडायचे मंत्र नाहीत. या लग्नगाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात, तेव्हा त्या तोडायचा अधिकार कोणालाच नाही, म्हणून असे कोणतेही विधी नाहीत, की ज्या द्वारे लग्न मोडता येईल." आणि तो ब्राम्हण उठून जातो.

खरे आहे हा विचार मनात आलाच नव्हता की, जर असे कोणतेच धार्मिक विधी नाहीत तर, मग काय अयोग्य संसार आयुष्यभर करायचा? ऋषीमुनींनी हा विचारच केला नाही काय? की असे मंत्र आहेत पण कोणी ते जगासमोर आणले नाहीत. शिवाजीमहाराजांच्या काळात नेताजी पालकरला त्याने धर्म बदलला असताना, त्याला पुन्हा धर्मात घेतले, म्हणजे ती उलट प्रक्रीया झालीचना ?

आपल्या  हिंदू धर्मात असे विधी का बरे नसतील? धर्मशास्त्राप्रमाणे लावलेले लग्न धर्मशास्त्राप्रमाणेच का तोडता येत नाही, त्याला कायद्याचा आधार कशासाठी? का पूर्वी पती-पत्नी विभक्त होतच नव्हते. कोणीतरी यावर संशोधन करून मला कळवेल काय?

समजा मंत्र न म्हणता ते सर्व विधी उलट केले तर काडीमॊड होईल काय? शास्त्र काहीतरी अपूर्ण वाटतेय.

यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे.

भारतात संसदेवर हल्ला झाला, मुंबईत बॉंब स्फोट झाले, पुन्हा मुंबईत समोरासमोर लढाई ताजमहाल हॉटेलात झाली, अशा छोट्यामोठ्या खूप अतिरेकी कारवाया झाल्या, सर्वांचे पुरावे मिळाले, पण कशात काही नाही. सर्व प्रकरणे कोर्टात. स्वच्छ निर्णय नाहीतच. केव्हा आपण धाडस करणार? अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो मजेत बिर्याणीवर ताव मारत मजा करत असेल. ताजमहालवर हल्ला झाला, अगदी समोरासमोर लढाई झाली, कसाब जिवंत सापडला, त्याला हल्ला करताना अनेकांनी पाहिले, वार्ताहरांनी बातम्यांमध्ये T.V. वर दाखवले, अगदी समोरासमोर पुरावा असून सुद्धा त्याच्यावर कोर्टात दावा चालणार, काय म्हणावे या लोकशाहीला. आता हा खटला रेंगाळणार, आणि याला फाशीची शिक्षा झाली तर हा सुद्धा गुरू बरोबर भारताची टर उडवत बिर्याणीवर ताव मारणार. जर त्या कसाबला समक्ष पाहणारे एवढे साक्षीदार असतील, तर त्याच्यावर खटला चालविण्याऐवजी एकदम निकालच का होत नाही? आण्खी काय पुरावे न्यायालय मागणार?

अगदी लहान मुले गल्लीत भांडतात ना त्याप्रमाणे भारत पाकिस्तानात सद्या शाब्दिक खेळी चालली आहे. पाकिस्तान रडीची खेळी करतोय, आणि आपण फक्त तोंडाची वाफ वाया घालवतोय. पुरावे दिले तरी पाकिस्तान नाकारतोय, आणि भारत पुन्हा गळा काढतोय. सैन्य आहे,सैन्यात धैर्य आहे, लढण्याची ताकद आहे, पण नाही, राजकारण आडवे येतय ना! हे असेच चालणार, आणि कुठे तरी बंद होणार. पुन्हा काहीतरी होणार, आणि आपण मागचे विसरणार.

इतका संताप येतो पण काय करणार? शहीद झालेल्यांच्या घरची परिस्थिती काय असणार? कोण त्यांना न्याय देणार.

पाकिस्तानात महत्वाच्या जाऊ द्यात, पण अगदी साध्या पदावर तरी एखादा हिंदू आहे काय? एखादा राजकारणी तरी आहे काय? तेथे हिंदू असतील तर त्यांची काय अवस्था असेल. आणि इथे भारतात अगदी राष्ट्रपती सुद्धा मुस्लीम असू शकतो, आणि एकदा नाहीतर तीन वेळा. शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणार्‍या महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती आहे काय? मतांसाठी हे राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात. एकंदर सर्व सरकारी आणि राजकीय पदांचा आढावा घ्यावा, आणि बिगर हिंदूंची टक्केवारी काढावी. का? भारतीय हिंदू ती पदे  भूषवू शकत नाहीत. कालच्या सकाळ मध्ये किती भारतीयांना अमेरिकेच्या राजकारणात, ओबामांच्या स्ररकारात स्थान आहे याची यादी प्रसिद्ध झाली आहे, अगदी इतर देशांच्या शास्त्रज्ञांच्या तुकडीतही भारतीयांना दर्जा आहे, आहे अशी यादी पाकिस्तान जवळ? भारतातील सर्व धर्मांच्या लोकांच्या मनात भारत प्रेम आहे हे खरे आहे, यात शंकाच नाही, पण शेवटी विचार होतोच ना?

भारतात माहिती अधिकारामुळे कितीतरी भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना चपराक बसली आहे, आणि सरकारी कामात पारदर्शपणा आलेला आहे.

http://www.esakal.com/esakal/01182009/NationalB660FDAEA1.htm

संपत्ती जाहीर करण्यास न्यायमूर्ती बांधील नाहीत - के. जी. बालकृष्णन

 

पण आता भारताचे सरन्यायाधीश असे विधान कसे करू शकतात. त्यांनी आपली मालमत्त जाहीर करू नये काय? असे विधान केल्याने शंकेला जागा राहते. नाहीतरी भारतात न्यायालय आणि न्यायनूर्ती यांच्याबद्दल मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांची पूर्ण गळचेपी करून टाकलेली आहे.

काही बोलावे तर न्यायालयाचा अवमान होतो.  सगळ्या भारताला न्यायाची भाषासांगणारे मात्र जनतेसाठी काही करायचे असेल तर माघार घेतात. कामचा व्याप वाढलातर लोक पाळ्यांमधून काम करतात. आम्ही मागेच या ब्लॉग मधून सुचविले होते की, आता न्यायालये दोन पाळ्यात चालविल्यास खटल्यांची संख्य कमी होईल. जे कैदी फक्त सुनावणी होत नाही म्हणून कित्येक महिने साधे कैदी म्हणून तुरूंगात सडत पडले आहेत त्यांना न्याय मिळेल. पण  आता जे ११ वाजता येतात, लगेच दोनला तासाभराचे जेवनाची सुट्टी घेऊन पाच नाही वाजले की जायाची तयारी करतात, त्यांना पाळ्यांमध्ये काम करायला जीवावर येणार. सकाळी सात ते दुपारी एक, आणि दुपारी एक ते रात्री आठ पर्यंत न्यायालये चालवायला काय हरकत आहे.

सर्वात मोठा विनोद काय असेल तर उन्हाळ्याच्या सुट्टीत न्यायालये महिनाभर बंद असतात, काय कारण. ठीक आहे ब्रिटीशांना उन्हाळा सहन होत नव्हता म्हणून ते सुट्टी घेत,पण आपले काय? शिवाय जयंत्या, सण, विशेष दिवस, दुसरा चवथा शनिवार आहेच परत.

कोर्टाची वेळ ११ ते ५. न्यायाधीश येतात साडेअकरापर्यंत. वकीलांकडे खूप केसेस असतात, म्हणून ते एकाच वेळेस सर्व ठिकाणी जाऊ शकत नाहीत म्हणून न्यायाधीश त्यांची वाट पाहात बसतात. जर एखादी केस बोर्डावर असेल तर तीच तास दोन तास चालते. झाली जेवणाची सुट्टी. दुपारी परत हाच प्रकार. सर्व जामिनाच्या केसेस. म्हणजे चालू एखादी दुसरीच केस मग बाकीच्यांना फक्त तारखा. त्यात परत फक्त तारखा घेणारे वकील वेगळेच. केसप्रमाणे निकालाची मुदत न्यायाधीशांना ठरवून दिली पाहिजे. माहित नाही, ओव्हरटाईम करा नाहीतर रविवारी या, केसेस निकालात निघाल्याच पाहिजेत. वकीलांपेक्षा न्यायाधीशांनाच इच्छा पाहिजे.

कनिष्ठ न्यायालयातून न्यायाधीश, बढतीप्रमाणे वरवर च्या न्यायालयात जातात. म्हणजेच सत्र न्यायालयातून, उच्च न्यायालयात नंतर सुप्रीम न्यायालयात. (कदाचित माझा क्रम चुकला असेल, पण आशय समजावून घ्यावा). खालच्या कोर्टात निकाल लागल्यावर वरील कोर्टात अपील केले जाते, काही वेळेस निकाल विरूद्ध जातो, पुन्हा अपील केल्यावर पुन्हा निकाल फिरतो, आणि मूळ निकाल कायम होतो. आहे की नाही गंमत. म्हणजे न्यायाधीशच न्यायाधीशांची चूक कबूल करतात. समजा जिल्हा न्यायालयात निकाल मिळाल्यावर, जर हायकोर्टात जाण्याची ऐपत नसेल तर तोच निकाल योग्य मानावा लागेल ना? आणि तशी खात्री देता येत नाही, तो निकाल बरोबर असण्याची. कदाचित‍ वरच्या कोर्टात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच नैसर्गिक न्यायप्रक्रीया झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

शेवटी काय तर न्यायाधीश कोणत्याच गोष्टीला बांधील नाहीत. काही बोलावे तर न्यायालयाचा अवमान.

मंगळावारी ’बराक ओबामा’ अमेरिकेच्या ४४व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. एक इतिहास घडणार आहे. सव्वादोनशे वर्षांनंतर प्रथमच एक कृष्णवर्णिय व्यक्ति राष्ट्राध्यक्ष होत आहे. सव्वादोनशे वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा अशी आव्हाने वगैरे काही नव्हती. दहशतवाद नव्हता. आता ओबामांसमोर खूप आव्हाने उभी आहेत. पण त्यांची तडफ पाहता ते हे सर्व नीट सुरळीत करतील अशी खात्री आहे. ओबामा अब्राहम लिंकनने जे कार्य केले, त्याच्याशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतील, कारण त्या वेळॆस अमेरिकेत यादवी चालू होती, आणि आज ओबामांना यादवीपेक्षा भयानक अशा मंदीला, आणि दहशतवादाला तोंड द्यायचे आहे, कारण सगळॆ जग त्यांच्या कडे दहशतवाद मोडून काढण्याच्या अपेक्षेने बघत आहे. ९-११च्या घटनेनंतर इराक अफगाणिस्तानात अमेरिकेचे युद्ध चालू आहे, रशिया आणि चीनबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानने मदत देऊन, दगाबाजी केली आणि दहशतवाद जोपासला.

आता ओबामांनी परराष्ट्र धोरण बदलण्याची गरज आहे. ते लगेच होणार नाही, पण दृष्टिकोन बदलला जाईल. बुश प्रशासनाने जी अशांतता माजवून ठेवली आहे, त्या पश्चिम आशियात शांतता निर्माण करण्याची गरज आहे. आता गाझा पट्टीतही अमेरिका लक्ष घालत आहे. खरेतर इस्त्राईल-पॅलेस्ताईन संघर्षात अमेरिकेने न पडलेलेच बरे. आज भारतही २६-११च्या हल्ल्यात पाकिस्तान विरुद्ध पुरावे गोळा करून अमेरिकेचे दार ठोठावत आहे.

खूपशी आव्हाने खांद्यावर घेऊन ओबामा अध्यक्ष होत आहेत, त्यांना मारूतीराया शक्ती देवो.

श्री. बराक ओबामांना हार्दिक शुभेच्छा, भारतासाठी त्यांचे सरकार फलदायी ठरो.

 

http://www.esakal.com/esakal/01182009/Specialnews0943D3B42E.htm

मस्तानीची समाधी चोरट्यांकडून उद्‌ध्वस्त

 

मी स्वर्गातून बाजीराव पेशवे पोलीसांना mail पाठवतोय, अरे काय लावलंय, इथे मस्तानी माझ्याशी तावातावाने भांडत आहे, काय ही महाराष्ट्रीय मराठी मंडळी, माझी कबर फोडतात. धन शोधतात. तिचंही बरोबर आहे, आम्ही एवढा पराक्रम गाजवला, आणि मस्तानीला राजस्थानातून आणले. इथे स्वर्गात तिचे आईवडिलही रागारागाने मला म्हणतात, जा खाली पृथ्वीवर आणि त्या नराधमांना शासन करून या. त्याची मस्तके आम्हाला सादर करा. मस्तानीसुद्धा अडून बसलीय, त्या चोरट्यांची खांडोळी, करून या म्हणून. आता सांगा मी काय करू? शनिवारवाड्याची अवस्था झाली आम्ही काही बोललो काय? तेव्हा पोलीसांनी लवकरात लवकर त्या नराधमांना वर पाठवा, आम्ही त्यांना मस्तानीच्या हवाली करू, म्हणजे आम्हाला इथे स्वर्गात सुखाने राहता येईल. आम्ही किती आनंदात आहोत, की राजा केळकर संग्रहालयाने पहा आमच्या मस्तानीचा महाल किती छान ठेवला आहे तो.

आज E Tv मराठीवर एक सिरीयल पाहिली, ’मंथन’

त्यात एका बँक मॅनेजरला मोबाईलवर फोन येतो, आणि त्याला विचारले जाते की, तुम्हाला लग्न करायचे आहे, तेव्हा माझे वय ४६ आहे आणि मी विचार करायला तयार आहे. त्या मॅनेजरला कळतच नाही की हि काय भानगड आहे, माझे लग्न होऊन ३० वर्षे झालेले आहेत, आणि यांना कोणी सांगितले की मी लग्न करणार आहे म्हणून. पुन्हा तसाच फोन येतो, तिच चौकशी होते, या माणसाला फार मनस्ताप होतो. काही वेळानंतर त्या बॅंकेतील एक कर्मचारी येतो आणि त्याला विचारतो काय साहेब आपण लग्न करणार आहात काय? तो म्हणतो तुम्ही असे काय विचारताय, तेव्हा तो कर्मचारी वर्तमानपत्रातील जाहिरात दाखवतो. ती जाहिरात कोणीतरी मुद्दाम त्या मॅनेजरला त्रास देण्यासाठी त्याच्या नावावर दिलेली असते.

जेव्हा पेपर मध्ये जाहिरात घेतली जाते , तेव्हा काहिही शहानिशा करत नाहीत, त्यामुळे असे प्रकार होऊ शकतात. हे तर आमच्याही डोक्यात कधी आले नाही. पण किती भयानक प्रकार आहे ना? आता असा प्रश्न पडतो की, T.V. वर दाखवले पण काही विक्षिप्त मंडळींना idea मिळाली ना.

तेव्हा असे प्रसंग दाखवताना काळजी घेणे जरूरीचे आहे. म्हणून T.V. वरील कार्यक्रमांना देखील sensor पाहिजे.

महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे.

धृतराष्ट्र जन्मजातच अंध होता, पण तो हस्तिनापूरचा राजा झाला, त्याची बायको गांधारी तिने पतिव्रतेचे पालन करून आयुष्यभर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. आयुष्यभर डोळे असून आंधळेपणाने आयुष्य घालवले.

जेव्हा महाभारतातील युद्ध संपत आले, आणि सर्व नष्ट झाले, फक्त कौरव आणि पांडवच उरले, आणि भीमाने द्वंद्वयुद्धाला दुर्योधनाला आव्हान दिले. दुर्योधनाने ते स्विकारले. दुर्योधन मग आईचा आशिर्वाद घेण्यासाठी जाणार होता, कारण हा शेवटचेच युद्ध होते, कारण यात एकाचे मरण निश्चित होते. हे श्रीकृष्णाला समजले, आणि तो त्या दुर्योधनाकडे गेला, तेव्हा त्याला समजले की गांधारीने दुर्योधनाला एकही कपडा अंगावर न ठेवता आंघोळ करून आशिर्वाद घ्यायला बोलावले आहे.एवढ्या मोठ्या मुलाला एकट्यालाच विवस्त्र का बोलवावे, या विचारात कृष्ण  पडला. तेव्हा त्याला अंतर्ज्ञानाने गुपीत समजले.

कृष्ण दुर्योधनाकडे सहज (सहज कुठला)  म्हणून गेला, तेव्हा नुकताच दुर्योधन आंघोळ करून आईचा आशिर्वाद घेण्यासाठी चालला होता. तेव्हा कृष्ण म्हणाला, बाबारे असा कसा तू आईसमोर जाणार, कमीतकमी कंबरेला तरी गुंडाळ. दुर्योधन लाजला आणि त्याने जवळच असलेल्या केळीच्या झाडाचे पान कंबरेला गुंडाळले, ते पार मांड्यांपर्यंत खाली आले. शेवटी कितीही आईसमोर जायचे असेल तरी लाज वाटतेच ना?

दुर्योधन आईसमोर आला, प्रणाम केला आणि आशिर्वाद मागितला, आणि काय आश्चर्य गांधारीने आशिर्वाद देण्यासाठी चक्क डोळ्यावरची पट्ट काढली, आणि दुर्योधनाकडे पाहिले, आणि रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली," मी तुला विवस्त्र होऊन यायला सांगितले होते ना? बघ तुझे सर्व अंग लोखंडासारखे अभेद्द्य झाले आहे, कोणतेही शस्त्र त्यावर चालणार नाही. तू अजिंक्य झाला असतास, पण तुझे दुर्दैव. तुझी मांडीवर प्रहार होऊ शकतो"

पतिव्रतेप्रमाणे गांधारीने डोळे जे आयुष्यभर बंद ठेवले होते त्यात ताकद आली होती, आणि ही कृष्णाने ओळखली होती, त्याचाच फायदा घेत, भीम दुर्योधनाच्या द्वंद्वयुद्धात कृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार करण्याची खूण केली होती.

तपश्चर्येचे फळ काय असू शकते, ते यावरून समजते.

भारतीय माणसाला झोपेची किती गरज आहे, हे ठरविण्याची वेळ सुप्रीम कोर्टाला यावी, यातच सर्व काही आले.

http://www.esakal.com/esakal/01122009/Specialnews070373953A.htm

झोपेसाठी शांतता हा मानवी हक्कच - सर्वोच्च न्यायालय

 

आम्हाला झोप कामापेक्षाही जरूरी आहे. आता बघा दिवसातल्या २४ तासात कोणीना कोणी, कोठेना कोठे तरी झोपतच असतो, मग पूर्ण २४ तास ध्वनि बंद ठेवावा लागेल. प्रत्येक दुकानदाराला दुपारी जेवल्यावर झोप लागते. सार्वजनिक उद्यानात तर कायम झोपलेले असतात. तेव्हा तेथे कोणीही गोंधळ करू नये, म्हणून कोर्टात जाणे आलेच. आम्ही मतदार एकदा मत दिले की, पाच वर्षे झोपतो, राजकारणी मात्र २४ तास जागा असतो, म्हणूनच तो पाच वर्षाचा पूर्ण फायदा घेतो. आम्ही कुठल्यातरी चिट फंडात पैसे गुंतवतो आणि मजेत झोपतो.

जागेपणी सुद्धा झोपेसारखेच व्यवहार होतात. शेअर्स मध्ये पैसे टाकतात, दारात आलेल्या सेल्समनशी आपण झोपेतच व्यवहार करतो ना? कोणी सोन्याचे दागिने प्लेटिंग करून देतो म्हणल्यावर झोपेतच त्यावर विश्वास ठेवतात ना? अंगावर घाण पडली म्हणून पैसे पळवतात तेव्हा आपण झोपेतच असतो ना? शाळेतला विद्यार्थी वर्षभर झोपच काढतो आणि शेवटी अभ्यास करतो. आई वडिल मुलांच्या दहावीपर्यंत झोपेत असतात, आणि जागे होऊन क्लासेस शोधतात.

फक्त आपण एकाच वेळेस झोपत नाही, परिणामांची पर्वा करीत नाही, म्हणून भिकेला लागलोत, तरीही भारतीयांना जाग येत नाही, ते गाढ झोपेत आहेत,

आणि लोकसंख्या वाढत आहे.( यावर सुप्रीम कोर्टाचे काय म्हणणे आहे)

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • राग यमन
    राग यमन मधील काही रचना - यमन रागातील प्रार्थना, मराठी, हिंदी चित्रपटगीते, भावगीते या विषयीची सूची- मराठी चित्रपटगीते - १) ब्रह्मा विष्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • दहावीचा अभ्यास कसा करावा - १
    दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...
  • पावसासाठी प्रार्थना
    मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
  • पोवाडा
    शाहिर, भांड, भालदार, भवय्ये, चितारी, गपी, विनोदी, कथाकारी, नकलाकारी वगैरे गुणीजनांना पदरी बाळगण्याची चाल रीत फार पूर्वीपासून राजे महाराजे, प...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ▼  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ▼  January (16)
      • संध्या आणि जानवे
      • पर्यायी माता
      • महाभारत
      • दुखवटा
      • २६ जानेवारी
      • वयाची अट
      • जीभ
      • भारतातील प्रश्न
      • घटस्फोट
      • खरंच संताप येतो
      • माहिती अधिकार आणि न्यायाधीश
      • बराक ओबामा
      • मस्तानी
      • मनस्ताप
      • गांधारीची शक्ती
      • झोप
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose