भारतातील प्रश्न

भारतात आज खूप प्रश्न आहेत, ज्याचे उत्तरे फक्त ईश्वरच देऊ शकतो. आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, सामाजीक प्रश्न, धार्मिक प्रश्न, वैयक्तिक प्रश्न, अजून कितीतरी. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेच मुळात अनेक प्रश्न माथ्यावर घेऊन. भारतात एवढ्या जातीधर्माचे, बहुभाषिक लोक आहेत, त्यांच्याप्रमाणे राजकारण होऊच शकत नाही. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस, त्यावेळच्या नेत्यांनी भविष्य काळात काय परिणाम होतील, याचा विचारच केलेला नव्हता, आणि भाषेला प्राधान्य देऊन राज्ये निर्माण केली, त्यात पण घोळ घालून ठेवले, त्यातला सर्वात मोठा घोळ म्हणजे, बेळगाव. ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कायम भळभळणारी जखम करून ठेवली, आणि नंतरच्या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या जखमेवरच्या माश्यासुद्धा हाकलल्या नाहीत. आज काय परिस्थिती आहे, लोक बसगाड्या जाळताहेत, आगी लावतहेत, तोडफॊड चालू आहे. आता यात राजकारणी काहिही करू शकत नाहीत. बेळगाव महाराष्ट्राला दिला तर कर्नाटकात उद्रेक होईल, आणि महाराष्ट्रातील नेते गप्प बसले तर त्यांच्या मतपेट्यांवर परिणाम होणार, म्हणून ते गप्प आहेत.

खरे तर बेळगाव, कर्नाटकात काय किंवा महाराष्ट्रात काय.  काय फरक पडतो. तिथल्या जनतेला आता असे काय स्वर्गसुख मिळते काय? किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांना काय सोन्याचा घास मिळणार आहे? पण नाही आपण जिद्द दाखवतच संपत आहोत.  महाराष्ट्राला बेळगाव कशाला पाहिजे समजतच नाही. काय बेळगावात तेलाच्या विहीरी आहेत काय? सोन्याच्या खाणी आहेत काय? जर बेळगाव केंद्रशासित प्रदेश केला तर?

नक्षलवाद्यांचे म्हणणे तर काही औरच आहे. त्या राज्यांना सुद्धा एक डोकेदुखीच आहे.

लवकरच घोटाळ्यांची चर्चा करू यात.

Unknown

No comments: