मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT
जगभर स्वईन फ्लु पसरत असताना भारताने खुप काळ्जी घ्यायला हवी आहे. सरकारने अतिदक्षता जाहीर केलेली असली तरी लोकांनी काळजी घेणे फार महत्वाचे आहे. WHO ने "पातळी ५" जाहीर केली आहे. "पातळी ५" म्हणजे आता ही साथ जगभरात पसरुन त्यामुळे मृत्यु होणारच. अमेरिका आणि युरोपातुन येणा‍र्‍या प्रवाशांना अतिशय कठीण होणार आहे. पण ह्या तापाचा आणि डुकराचा काही संबंध नाही हे फार जणांना माहीत नसेल.



View H1N1 Swine Flu in a larger map

निवडणुका पार पडल्या आणि बाबा मी एकदाचा निवडून आलो, काय काय भानगडी कराव्या लागल्या त्या माझ्या मनालाच माहीत. तेव्हा आभार प्रदर्शन करायला बोलावले आहे तेव्हा चार शब्द सांगावे म्हणतो -

मला मायबापांनो तुम्ही निवडून दिलेत त्याबद्दल आभार, नाहीतरी मी निवडून येणारच होतो, कारण आपण तशी फिल्डींगच लावली होती ना. सर्व निवडणूक केंद्रांवर आपली माणसेच पेरली होती, काय खर्च आला म्हणून सांगू. आपण आधी कायपण खर्च केला नाही, पण बुथवर मात्र मोकळा हात सोडला होता.

या भागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी सर्व कंत्राटे जवळच्या माणसांना (नातेवाईकांना) देईन म्हणजे काम बरोबर न झाल्यावर बोलता येते हो, आणि शिवाय त्यांनी एवढी मेहनत घेतली आपल्याला निवडून आणायला, ती उगाच काय?

मी प्रत्येकाला रोजगार मिळवून देईन, पण शिक्षण पाहिजे बरं का, नाहीतर एम्प्लॉयमेंट एक्चेंज मध्ये नाव नोंदवायला मदत करेन.

नळाला पाणी येण्यासाठी प्रयत्न करेन, पण जर पाणी नाहीच आले तर टॅंकरची सोय करेन, आणि प्रत्येकाला खास निधीतून फिल्टर देईन. शेवटी आम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी आहेच ना!

मुलांना मोफत शिक्षणाची सोय करेन. त्यांना दुपारी खिचडीचा कार्यक्रम असेल, त्यासाठी माझ्या शेतातील तांदूळ वापरेन, त्यासाठी निधी वापरला जाईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातील, गावाचे मुलं कशी फाडफाड इंग्रजी बोलली पाहिजेत.

शेतकर्‍यांना भरभरून कर्जे दिली जातील, कर्ज माफी नाही, कारण ती कर्जे मिळतील ती पुढच्या निवडणुकीपर्यंत फेडायचीच नाहीत, म्हणजे पुढील वेळेस ती तुम्हाला पूर्ण माफ केली जातील, याची मी हमी देतो.

आपल्या भागात साधा विमानतळ नाही म्हणजे, हा अपमानच आहे. यासाठी मी कसून प्रयत्न करेन.जगाशी सांपर्क नको काय?

प्रत्येक घरात एक एक T.V.तो पण रंगीत देणार आणि नाहीतर आपले भाषण कसे लोक पाहणार.

उन्हाळ्यात प्रत्येकाला A.C.ची सोय करणार, हप्ताने बॅंकेकडून घेऊन देणार, नव्वद टक्के सबसिडीवर.

गावात कोणत्या देवाचे देऊळ नाही ते बघा, आपण बांधू म्हणजे उरसाची सोय झाली, तमाशा आयताच आला की नाही!

आपण जाहीरनाअमा छापलाच नाही, उगाच कोणीतरी पुढील निवडणुकी पर्यंत जपून ठेवला म्हणजे आली का पंचाईत.

हे जे आपण करणार आहे ते सर्व खासदार निधीतून, तेव्हा कोणाच्याही बापाचे काही जाणार नाही, तेव्हा कोणीही माज करायचा नाही. जे जसं मिळेल तसं गोड मानून घ्यायाचं काय!

ही सगळी तयारी मी पुढची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन करीत आहे, एवढं ध्यानात ठिवा.   

( वरील सर्व कल्पनाविलास आहे, व्यक्तिगत कोणीही घेऊ नये )

अखेर अजमल कसाबचा खटला सुरू झाला आहे. ज्या माणसाने गोळीबार करताना मिडीयाने पुन्हा पुन्हा दाखविले, माणसांचे मुडदे पाडताना करोडो लोकांनी त्याला पाहिले अशा गुन्हेगारावर खटला चालू आहे. काय लोकशाहीची दुर्दशा ! न्यायालयात जेव्हा खुनाचा खटला चालू असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्‍या साक्षीदारावर विश्वास ठेउन कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देते, आणि इथे तर T.V. वर प्रत्यक्ष देशाने पाहिलेले असताना त्या कसाबवर खटला चालवावा म्हणजे काय?

आता त्याला न्यायालय सर्व संधी देणार. वर्तमानपत्रात त्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर अंदाज तरी करता येईल काय, किती खर्च येत असेल ते. आपण उलटा विचार करू यात असे पाकिस्तानात घडले असते तर काय पाकिस्तानने लाड पुरवले असते काय? अरे कसला खटला चालवता त्याला दाखवा तो कसा गोळीबार करतो ते आणि हाच पुरावा ग्राह्य धरून द्या ना त्याला जाहीर जाहीर फाशी, मग कोणीही माईचा लाल यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. द्या त्या अफझल गुरूला जनतेच्या हवाली करून, मग बघा जनता त्याचा काय न्याय करते ते.

कसाब काय तक्रार करतो, जग काय म्हणेल, पाकिस्तानचे संबंध कसे राहतील याच काय विचार करायचा? बंदूक चालवताना त्याने विचार केला होता? त्याने किती कुटुंबांना निराधार केले आहे, त्यांनी काय करावे. काय भारताची घटना आहे, ज्याने खुले आम, ज्यांचा कुठलाही गुन्हा किंवा दोष नसताना, दीडेकशे माणसांचे मुडदे पाडले, जे सर्व भारताने पाहिले, त्याला कायदा संरक्षण देतो, न्यायाची संधी देतो आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेतो, मोठी चेष्टा आहे.

आपण जगाला काय दाखवायचे की, आम्ही किती न्यायप्रिय आहोत, भले मग आमच्या निष्पाप जनतेवर कोणीही कसाही गोळीबार करावा.  काय न्याय मिळणार आहे त्या कर्तबगार अधिकार्‍यांना, काय न्याय मिळणार आहे त्या कुटुंबीयांना, आपण त्यांना न्याय नाकारतो आहोत, त्या कसाबाला न्याय देताना याचे भान सर्वजण विसरलेत.

लोकसभेला मते मागणारे, जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत, पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार  आहे.

मतदान करणे हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे हे अगदी ठासून सांगितले जाते, पण अशा अयोग्य उमेदवारांना मत देऊन आपण काय साधणार आहोत समजत नाही. सुशिक्षित मतदार मतदान टाळतो. तो सर्व समजतो म्हणूनच ना. अशिक्षित उमेदवाराला कळत नसताना तो भावनेच्या भरात मतदान करतो.

उमेदवार जाहिरनामे प्रसिद्ध करतात, ते वाचून कोणाचा विश्वास बसणार आहे काय? असे शक्य आहे काय? मग अशी खोटी आश्वासने देणार्‍या उमेदवाराला काय म्हणून मत द्यायचे. मागील निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुन्हा उभे आहेत, पण त्यांनी जर मागील आश्वासने पूर्णा केली नाहीत तर त्यांना काय म्हणून मत द्यायचे. या वर्षी तर सर्वांनी बोलण्याचे ताळतंत्रच सोडले आहे. जनतेच्या विकासाबद्दल कोणी बोलत नाही पण एकमेकांची उणीधुणी काढण्याची जण स्पर्धा चालू आहे अशंना काय म्हणून मत द्यायचे? निवडून आल्यावर तो पक्ष बदलणार नाही याची काय हमी. पक्ष बघून मत दिले तर उमेदवार निवडून आल्यावर पक्ष बदलतो तेव्हा चिडचिड होते पण मग मतदान केल्याबद्दल पश्चात्तप होतो, ही वेळ येऊ द्यायची नसेल तर मतदानच नको ना. 

हे निवडून दिलेले उमेदवार संसदेत हजेरी लावत नाहीत. तिथे फक्त हेवेदावे काढले जातात. अधिवेशन उधळून लावले जाते. जनतेच्या विकासाचा विचार होत नाही, मग अशा उमेदवारांना मतदान करायचे काय?

मत देऊन निवडून आलेल्या उमेदवाराने कामे न केल्यास, मतदान केल्याचा पश्चाताप होण्या पेक्षा मतदान न केलेलेच बरे.

’असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्’ या संस्ठेने काही निष्कर्ष काढले आहेत त्याप्रमाणे पाच कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या ४० उमेदवारांपकी ११ विजयी झाले, तर पाच लाखापेक्षा कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांपकी कोणीही मागील निवडणुकीत विजयी झाले नाही. याचा अर्थ असा की ज्याच्याकडे पैसा कोट्यावधी रूपयात खर्च करण्याची ताकत आहे तोच उमेदवार निवडून येऊ शकतो.

या १५व्या लोकसभा निवडनुकीकरीता जे उमेदवार उभे आहेत त्यांची एकूण मालमत्ता ७०० कोटीपेक्षाही जास्त आहे. सर्वांनी भरभरून आश्वासने देली आहेत पण कोणीही दानशूर स्वःतच्या पैशावर नाही, जे काही करणार आहेत ते जनतेच्या कररूपी पैशातून. एकाही उमेदवाराने देणगी जाहीर केली नाही. कोणीही अनाथ संस्थांना मदत दिली नाही. देशाला मदत केली माही.

आकडेवारी सांगत आहे - कॉग्रेस पक्षात ४५, भाजपत ३०, बसपात २३, तर अपक्ष २२ उमेदवर करोडपती आहेत. एवढी मालमता कोठून जमवली हे कोणीही जाहीर केले नाही. यात आयकर विभाग काय करत आहे? त्यांना चौकशी करता येत नाही? त्यांना हे पाहता येत नाही का की या उमेदवारांवर जबाददार्‍या किती आणि यांच्याकडे मालमत्ता किती. कोणीतरी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली पाहिजे.

मागील निवडणुकीत राहुल गांधींनी मागील निवडणुकीत ६२.३५ लाख रूपयाची मलमत्ता जाहीर केली होती तर यावर्षी त्यांनी २.३३ कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. शरद पवारांनी ८.७ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे, कोण विश्वास ठेवेल. खरंच पवार साहेब विनोद करतात.गंमत तर पुढेच आहे, त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी ५२.७६ कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

एक जळजळीत सत्य - देशातील ७७ टक्के लोकांचे रोजचे सरासरी उत्पन्न केवळा २० रूपयेअआहे तर लोकसभेतील ३५ टक्के लोकप्रतिनीधी कोट्याधीश आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये राहून निवडणुक लढविणारा उमेदवार निवडून आला की पाच वर्षाच्या आत आलिशान बंगला उभा करतो.  

मी माझ्या मनातील कप्पा रिता करीत होतो,

कारण तू येण्याचे वचन दिले होतेस,

वसंत्तात येण्याचे,

हळूवर मंद चाफ्याच्या सुगंधतून,

अल्लड बागडणार्‍या फुलपाखरातून,

गजगामिनीच्या चालीने,

नागीण वेणी डौलाने झुलवत,

मोगर्‍याचा गजरा माळून,

वसंतातील उन्हातून आल्यावर,

लालीलाल गालामधून,

सुंदर राजहंसी दंतपंक्तीतून,

आणि काय सांगू,

माझ्या हृदयाच्या मखमली पायघडीवरून,

तू येणार म्हणून माझे वाट पाहणे,

चातकाला लाजवीत होते,

माझी आर्त हाक जाणवून,

मदन मदनबाण मारायचा विसरला,

आतातरी तू ये,

तुझ्या येण्याच्या चाहुलीने,

हृदय थांबू दे,

म्हणजे ते वाट पाहणे नको,

कप्पे रिते नकोत,

मदनाला आपले काम करू दे,

आणि असे प्रेमवीर घायाळ होऊ देत.

सर्व वेलींवर फुले फुलू देत,

न फुलण्याचे पाप मला नको.

"देशाचा पंतप्रधान मुस्लिम झाल्या शिवाय मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाहीत" हे तारे तोडलेत जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी.निवडणुका जवळ आल्या की यांना मुस्लिमांबद्दल कळवळा येतो. जणू काही मुस्लिम मतदार आता यांच्या इशार्‍यावरच मतदान करतात. आता मुस्लिम मतदार सुद्धा विचार करू लागलेत. जे मुस्लिम राज्यकर्ते त्यांच्या देशात मुस्लिमांचे भले करू शकले नाहीत, ते इथे हिंदू राष्ट्रात काय भले होणार आहेत?  सध्या बेताल. मनाला येईल तशी खळबळजनक विधाने करण्यात सर्वजण निपुण झालेले आहेत. सर्वजण फुकटची प्रसिद्धी मिळवतात आणि त्यांना महत्व देतात चॅनेलवाले. कारण अशा बातम्यांवरच तर त्यांचे पोट अबलंबून आहे मग ते तरी बिचारे काय करणार?

आता याला शिवसेनाप्रमुख, नरेंद्र मोदी, राज ठाकरे सडेतोड उत्तरे देतील, पण तोंडसुख घ्यायला निमीत्त मिळाले ना. कोणत्याही धर्माचा नेता सत्तपदावर बसला म्हणून त्या धर्माचे भले होते हा विचार केव्हाच बाद झालाय. राजकारण्याला जात धर्म नाती नसतात, त्याला फक्त दिसत असते ती खुर्ची, मग तो कुणाचीही पर्वा करीते नाही. महाराष्ट्रावर मुस्लिम मुख्यमंत्री होते तेव्हा काय मुस्लिमांचे भले झाले. तीन राष्ट्रपती मुस्लिम होते, त्यांनी तोंड तरी उघडले काय? अस्स्ल राजकारणी मतांसाठी जातीचे राजकारण करतो, पण खुर्ची मिळाल्यावर खुर्चीचे राजकारण खेळतो, जात पात सर्व विसरतो.

देशात बहुसंख्य मंत्री संत्री हिंदू आहेत म्हणून काय भारतात हिंदूंचे भले झाले आहे काय? मायावतींनी दलीतांचे भले केले आहे काय? शाही इमामांना असे वाटत असेल की राजकारणी मुस्लिमांची मते मागायला त्यांच्या कडे येतील, तर तो त्यांचा भ्रम आहे.

मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम अधिकारी पदावर असतात म्हणून काय तेथील जनता सुखी आहे, उलट भारतातले मुस्लिम जास्त सुरक्षित आणि सुखी आहेत.पाकिस्तानातील मुस्लिमांचे काय हाल आहेत, तालिबानचे भूत कसे डोक्यावर बसले आहे, हे इमामांना माहित नाही काय?

मुशर्रफ, भुत्तो, आयुबखान, याह्याखान, झरदारी, नवाज शरीफ यांची कारकीर्द धर्माच्या पायावरच उभी होती ना? आता त्या देशातील राजकारण धर्माभोवतीच केंद्रीत झाले असताना सुद्धा तेथील मुस्लिमांची दुरवस्था का आहे? विचारा पाकिस्तानातल्या आणि भारतातल्या मुस्लिमांना कॊणाची परिस्थिती चांगली आहे ते.

लक्षात घ्या विचार सर्व समाजाचा, नागरिकांचा त्यांच्या प्रश्नांचा, प्रगतीचा असतो. जात, धर्म, संघटना, संप्रदाय, यांचा नसतो.

कधीही नसतो.

भारतात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारांना अर्ज भरतांना मालमत्ता जाहीर करण्याचे बंधन आले. त्याप्रमाणे उमेदवारांनी आपले उत्पन्न जाहीर केले. पण गंमत अशी की, सर्व कोटीच्या कोटी उड्डाने आहेत. कोणीही लाखाच्या घरात नाही. विनोदाचा भाग म्हणजे काही उमेदवारांकडे कोट्याने संपत्ती आहे, पण त्याच्याजवळ गाडी नाही, का? तो गाडी घेऊ शकत नाही. पण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

निवडणूक आयोगाने जसे संपत्ती जाहीर करण्याचे बंधन घातले, त्यापेक्षा जास्त महत्वाचे त्या संपत्तीचा स्रोत जाहीर करण्याचे बंधन असायला पाहिजे. कोठून एवढी मालमत्ता गोळा केली हे पाहिले पाहिजे. यातील काही उमेदवारांकडे तर पॅन कार्ड सुद्धा नाहीत. मग ते टॅक्स भरतात काय असा प्रश्न निर्माण होतो.

हे उमेदवार जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध करतात, अगदी जणू काही सर्व फुकटच मिळणार आहे. त्यांचे काय जाते? सर्व बोजा शेवटी जनतेवरच येणार आहे ना. हे उमेदवार काय खिशातून घालणार आहेत. एका तरी उमेदवाराने आपल्या संपत्तीतील काही वाटा देशासाठी जाहीर केला आहे काय? कोणीतरी देणगी जाहीर केली आहे काय? कोण असे म्हणाले आहे काय की, मी माझ्याकडील दहा कोटी बॅंकेत ठेऊन त्यावरील व्याजापोटी काही गरीब मुलांचे शिक्षण करतो.

ज्यांनी जी संपती जाहीर केली त्यातील काही भाग देशासाठी देणगी देणे बंधनकारक ठेवावे. काही काही उमेदवारांकडे तर एवढी मालमत्ता आहे की, सर्व उमेदवाराची मालमत्ता एकत्रीत केली तर भारताचे दारिद्र्य दूर होईल. जे पक्ष जाहीरनामे जाहीर करतात त्यांच्याकडून अनामत रक्कम ठेउन घ्यावी. आणि त्यातून वचने पूर्ण करून घ्यावीत.     

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पवयात १८व्या वर्षी समाधी घेतली. महाराजांनी लोकांना गीता समजत नव्हती म्हणून तिचे प्राकृत भाषेत भाषांतर केले, आणि लोकांना गीता समजली. याच ज्ञानेश्वरीवर आज भलेभले व्याख्यान, प्रवचन देतात पण संपत नाही. अहो, हे फक्त प्रवचन देतात पण त्यांना गीता समजलेलीच नाही. गीता समजून आत्मसात करून दिलेले प्रवचन लोकांच्या आत्म्यापर्यंत जाऊन भिडेल.

गीतेचे भाषांतर करताना महाराजांना संस्कृत येत होते का असा प्रश्न पडतो.  वयाच्या  सोळाव्या वर्षी महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली, त्या आधी ते तीन वर्षे ज्ञानेश्वरी लिहीत होते. शिवाय त्या भावंडांना ब्राम्हण समाजाने वाळीत टाकल्यावर त्यांना काशीला जावे लागले, इथे महाराष्ट्रात झगडावे लागले मग त्यांनी आपले संस्कृतचे शिक्षण कोठे पूर्ण केले असेल असा प्रश्न पडतोच ना? त्याच्या चरित्रात त्यांनी कोठेही गुरूकुलात शिक्षण घेतल्याचा उल्लेख नाही. जाणकारांनी स्पष्ट करावे.  

असो तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहील्यावर समाधी का घेतली कारण त्यांना गीता पूर्णपणे समजली होती. मग त्यांना दिव्य ज्ञान झाले की, हे सर्व जग मिथ्या आहे, हे जीवन निरर्थक आहे. गीतेतील तत्वज्ञान त्यांना अचूक समजले, आणि त्यांनी समाधी घेतली. आजकाल एवढे स्वतःला संत महात्मा म्हणवून घेणारे  स्वयंघोषीत आत्मे यांना गीता ज्ञानेश्वरी समजलेलीच नाही, असे म्हणावे लागेल, नाहीतर यांनी सुद्धा ज्ञानेश्वरांचा मार्ग आचरला असता. म्हणून प्रथम यांनी, आधुनिक महात्म्यांनी, गीता ज्ञानेश्वरी समजून घ्यावी, आणि मगच त्यावर भाष्य करावे.

भारतत निवडणुका जाहीर झाल्या आणि एकच गडबड. सगळे अगदी बांशिंग बाधून बोहल्यावर चढले. पाच वर्षे मतदारांना न ओळखणारे अच्च्नक ओळख दाखवू लागले. सर्व पक्षांनी आपापली जाहिरनामे, वचननामे जाहीर केले. पक्षात जाणकार जुने जाणते नेते मंडळी असतात, पण त्यांना एवढे साधे समजू नये की, मतदार आता कोणत्याही भूल थापांना फसणार नाहीत ते.

कॉंग्रेसने तीन रूपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले, तर लगेच भाजपाने दोन रूपये किलोचा भाव लावला. आता दुसर्‍या पक्षाने  एक किलोचा भाव लावावा. मग दुसरा पक्षतर पैसेच घेणार नाही, फुकट घरी अन्न धान्य. मतदारांना आता काम करायची गरजच काय? सगळं आयतं म्हणल्यावर कोण काम करेल. मग त्यांना काय काम उरणार, पाठवा मग सैन्यात, लढू द्यात तालीबानींशी, अतिरेक्यांशी. जर सगळम कसंफुकट तर शिक्षणा तरी कशासाठी?

कसे राजकारणी लोकांना आळशी बनवतात ना?

कोणीही मागील वचननामा दाखवून त्याप्रमाणे काम केले काय हे बोलत नाही. आणि मतदार तरी जुना मागील वचननामा लक्षात ठेवतात काय?

आर्थिक मंदीवर कोणी बोलत नाही, कायदा सुव्यवास्थेबद्दल कोणी बोलत नाही, स्त्रीयांच्या प्रश्नाबद्धल अवाक्षरही नाही, शेतकरी आत्महत्या करतात याचे कोणाला दुःख आहे काय?

हे जे वचवनामे आहेत ना हे कोर्टात जाऊन शपथपत्र, न्यायधीशासमोर करायला पाहिजेत आणि जर त्याप्रमाणे काम केले नाही तर त्या त्या निवडून आलेल्या उमेदवाराला सजा दंड ठोठावला पाहिजे, आणि त्याने दर वर्षी तसा अहवाल न्यायालयात सादर करायला पाहिजे. मगच असले निरर्थक वचननामे जाहीर करताना जरा तरी लाज बाळगतील.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ▼  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ▼  April (10)
      • स्वाईन फ्लु (H1N1)
      • मी खासदार बोलतोय!
      • खटला सुरू झाला
      • मतदान
      • कोट्याधीश
      • ये
      • जातीचा पंतप्रधान
      • कोटींची मालमत्ता
      • गीता
      • वचननामा
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose