फळांचे गुण

फळांचे गुण दडले आहेत त्यांच्या आकारात
हे जग परमेश्वराने निर्माण केले आहे, अशी एक आपली श्रद्धा आहे. ती खरी मानायची तर माणूस हे परमेश्वराचे लाडके अपत्य मानायला हवे. याचे कारण म्हणजे परमेश्वराने निसर्गात ज्या गोष्टी तयार केल्या आहेत त्याचा मानवाला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल, याचाच विचार करुन तयार केल्या आहेत. शास्त्रज्ञांनीही तसे सांगितले आहे. अगदी फळांचाच आकार घ्या. फळांचे आकार मानवी अवयवांशी साधर्म्य राखणारे आहेत. इतकेच नव्हे तर ही फळे ज्या मानवी अवयवांसारखी दिसतात त्या अवयवांना ती उपयोगी पडतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गाजर गोल कापले की ते मानवी डोळ्यांसारखे दिसते. म्हणजे त्याच्या मधल्या भागाकडे नीट पाहिल्यावर तो बुबुळासारखा दिसतो. गाजर खाण्याने रक्ताची कमतरता भरुन निघते; पण त्याचबरोबर गाजर दृष्टी चांगली होण्यासाठीही तितकेच उपयोगी पडते.     टोमॅटो चिरला की आत त्याचे चार भाग दिसून येतात. माणसाच्या हदयाचेही चार भाग असतात आणि टोमॅटोत असणारे लाइकोपीन नावाचे द्रव्य हदयासाठी गुणकारी आहे. द्राक्षांचे घोस असतात. हे घोस रक्तपेशींप्रमाणे दिसतात. द्राक्षे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. आक्रोडाचा आतल्या भाग मानवी मेंदूसारखा दिसतो. बटाटयाचा आकार स्वादुपिंडासारखा आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोजच्या प्रमाणात कार्बोहायड्रेट तयार करण्याचे काम बटाटा करतो. कांदा चिरला की त्याचा आकार पेशींसारखा दिसतो. अलीकडेच एका संशोधनात आढळून आले आहे की, पेशींमध्ये नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात कांदा मदत करतो. लसूणदेखील शरीरातील नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतो. आहे की नाही निसर्गाची करणी माणसाच्या भल्याची ?

दैनिक ’पुढारी’ मधील एका लेखावरून, वाचकांच्या माहितीसाठी.

Unknown

No comments: