मतदान करा

महाराष्ट्रात निवडणुका आल्या आणि उमेदवारांची एकच गर्दी.त्यांची जाहीरनामा, वचननामा वाचला तर ही मंडळी महाराष्ट्र, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी भाषा, यासाठी काही करतील, असंभव. आमदार जेव्हा दाराशी  येतो तेव्हा  साधाभोळा असतो, पणा तोच जेव्हा पाच वर्षांनी  पुन्हा मत मागायला येतो तेव्हा कपाळाला भला मोठा भगवा टिळा असतो. हातात, गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या, चेहर्‍यावर  एक प्रकारची गुर्मी असते. हेच लोक वाड्या वस्त्या काबीज करून, दंडेलशाहीने भाड्याची घरे, जुने वाडे मोकळे करून घेतात, तेथील लोकांना देशोधडीला लावतात, कोणाकडे तक्रार करायची, सगळेजण मिळून वाटून खातात. महाराष्ट्रात आज घराणेशाही उदयाला आलेली आहे, त्याबद्दल आम्ही मागे ब्लॉगमध्ये लिहीले आहे.

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे अनुभवी नेते, पण त्यांनी सुद्धा वाली वारसांची सोय करून ठेवली. त्यांना काय आपल्या कार्यकर्त्यांमधून उमेदवार मिळू शकत नाहीत? सर्व जण का राजकारणात पडतात, कारण पुढील सात पिढ्यांची सोय करून ठेवता येते. हजारो लाखो तरूण आयुष्यभर घसा सुकेपर्यंत जयजयकार करीत होते, सतरंज्या उचलत होते, तेच आता म्हातारपणाला आलेत, नेते मंडळी फक्त त्यांना भत्ता आणिया राजकारण्यांनी भारतातील लोकशाहीचं जागतीक विडंबन केले आहे.

आम्ही स्वतःला मर्द मराठे म्हणवतो, कय तर म्हणे आम्ही पेटत नाही, पण जर का एकदा आम्ही पेटून उठलो तर देनियेला आग लावू, अरे पण बाबांने तुम्ही कधी पेटणार, कधीच नाही. मागील पन्नास वर्षे बेळगाव प्रश्न वाकुल्या दाखवतो आहे. लोकांनो, कार्यकर्त्यांने का तुमचं रक्त तापत नाही? या पुढार्‍यांच्या पालखीला खांदा लावताना जराही स्वाभिमान दुखावत नाही?

अण्णा हजारेंनी माहिती अधिकाराचा कायदा लोकांप्र्यंत आणून खूप काही केले, पण त्यांना सुद्धा प्रसिद्धीची नशा चढली, आता त्यांच्या कडून काय अपेक्षा कराव्यात? त्यांना आता काय काम राहिलेय? बस‍ खटले भरायचे, उपोषण करायचे  आणि आश्वसन मिळाले की लिंबू पाणी. झाले अण्णा मोकळे पुन्हा पुढील उपोषणाची जागा आणि निमीत्त शोधायला. अण्णा तुम्ही लिंबू सरबत बदनाम करून टाकलत.

चीड येते काय करणार? पंधरा कोटी जनतेतून त्यांना आपल्या मुलांशिवाय अन्य  उमेदवार मिळत नाही? राजकारणाचं गन्हेगारीकरण झालं, अशांना तिकीटं मिळतात ते काय राज्य करणार? आम्ही उमेदवारांना नावे ठेवतो आणि नोकरीसाठी शिफारसपत्र पाहिजे म्हणून लाळघोटेपणा करतो. गणपती उत्सव त्यांच्याच काळ्या पैशातून होतो ते आम्हाला चालते, दहीहंडी, नवरात्रात जेव्हा ते मिरवतात तेव्हा आपण कौतुकाने त्यआंच्याकडे पाहतो, मुलांना हात करून  दाखवतो.

हे राज्य आता भटके जमात, स्त्रिया, तरूण, कामगार, कष्टकरी, जाणते याचं आलं पाहिजे. नकोत ते आम्हाला म्हातारे, वय झालेले, पुन्हापुन्हा तेचतेच चेहरे बघायचा कंटाळा आलाय, ते चेहरे आता भेसूर वाटू लागलेत.

संभवामी युगे युगे, असे श्रीकृष्ण सांगून गेले, पण त्यांनी जरी जन्म घेतला तरी काहीही उपयोग होणार नाही, त्यापेक्षा सर्व पुतळ्यांनी जिवंत व्हावे आणि यांच्या पेकाटात लाथा घालाव्यात.

तेव्हा मतदारांनो मतपेटीच्या माध्यमातून या भुतांना गाडून टाका, दाखवा आपल्या एका मताचा चमत्कार.

Unknown

No comments: