मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलांना ’परिक्षा’ या विषयावर चित्र काढायला सांगितले तेव्हा मुलांनी राक्षसाचे चित्र काढले. यावरून मुलांच्या मनात परिक्षेविषयी किती भिती आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहे हेच जाणवते. यावरून असा बोध होतो की, त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जशा आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्याच प्रमाणे मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतातच ना? मुले नेहमी पालकांकडे आशेने बघत असतात. लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवली, किंवा मुले घाबरली तर त्यांना आईच्या पदराशिवाय दुसरी सुरक्षित जागाच सापडत नाही.

पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात. चांगल्या शाळेत, मोठे डोनेशन देऊन घातले, आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका. मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का? याची चौकशी करा. कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो, आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो, मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो. त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा.

आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते, आणि काळजी असावी, पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे. मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना, याची खात्री करावी. आपल्याला पाल्याची काळजी वाटते, हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे. त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे. शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे, त्यांना काय हवे नको ते पहावे, म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात, त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात. मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या. त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या, नोकरांवर सोडू नका. रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा. त्यालाही बरे वाटेल.

शेवटी आपण सर्व कुणासाठे करतो, मुलांसाठीच ना? लक्षात घ्या मुलेच आपली भविष्यकाळ आहेत.     

आपलं भूतकाळात चांगलं होतं की, आपण भविष्यकाळात चांगल्याची अपेक्षा करत आहोत, तर हे सर्व विसरा आणि विचार करा, आतचा जो आयुष्यातील बिंदू आहे तोच आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आताचा हा बिंदू आहे तोच आपण होकारात्मक विचार करून एक चांगल्या सकारात्मक आयुष्याची सुरूवात करू यात. समजा जर आपला मेंदू काही नकारात्मक विचार करत असेल तर त्याला थांबवा आणि सकारात्मक विचाराकडे वळवा. एकदा का गाडीने रूळ बदलला ना तर काहीही करून आपण त्या गाडीची दिशा बदलू शकत नाही. तसेच विचारांचे आहे. यालाच म्हणतात विचारांतून बाहेर येणे.

कल्पना करा तुम्ही हॉटेलात बसलात, तेव्हा तुमच्या समोर मेनू येतो, हाच मेनू जर विचारांचा असेल तर? तुम्ही एक किंवा अनेक विचार निवडू शकता, आणि हेच विचार आपल्या भविष्यातील अनुभव ठरतील. बघा आपण एखादे अन्न खातो त्यापासून आजारपणा येते, आपण पुन्हा माहीत नसतांना तेच अन्न खातो पण मग लक्षात आल्यावर खातो का? नाही ना! तसेच विचारांचे आहे, द्या सोडून नकारात्मक विचार. जर समस्या निर्माण झाली तर ती कशी सोडवायची यापेक्षा ती का निर्माण झाली याचा विचार करा मग ती सोडविण्याचा. आपल्या मेंदूतील विचार आपले भविष्य घडवत असतात. 

शाळा कॉलेजातून शिकविले गेले पाहिजे की विचार कसे काम करतात, त्या विचारांना वळण कसे द्यावे. काय शिकून फायदा आहे? की कोण कधी जन्मला आणि मेला. सनावळ्या पाठ करायच्या कशासाठी, तर काय त्यांचे वाढदिवस साजरे करायचेत. कशासाठी पाहिजे, पानिपत युद्ध कधी झाले?. त्यापेक्षा मुलांना शिकवा जगात धन चांगल्या मार्गाने कसे मिळवायचे, भ्रष्टाचार म्हणजे काय, मिळवलेले पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे, चांगले आईवडिल म्हणजे काय. लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करावेत,सकारात्म विचार कसा करावा, बाबा आता अशा ज्ञानाची गरज आहे. कल्पना करा असा अभ्यासक्रम असेल तर भावी पिढी कशी निर्माण होईल.

आकाशात पाहून हात वर करून,एक मंत्र रोज म्हणा ( कितीही वेळा ) -

या विश्वातील सर्व शुभ आणि पवित्र शक्तींचा स्वीकार करण्यास माझा आत्मा तयार आहे आणि या शुभ आणि पवित्र शक्ती माझ्या समस्या दूर करून मला सुख प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे.

आणि बघा काय बदल घडून येतो ते.

जगात लोक यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात. एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात पैसे वाचवून मुलांना चांगले शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पणा मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शारिरीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाहे, मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते.

एखाद्याला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना? आपले आयुष्य जेमेतेम पन्नास ते साठ वर्षांचे त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवतो, नंतर कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात काय देवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका. आपल्याला शिकवलेले असते, "आराम हराम आहे","कष्टाला पर्याय नाही", "कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको ", "मेहनतका फल मिठा होता है" बाबा हे सर्व निबधात लिहायल सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय? दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो त्याला मिळतात चार हजार रूपये, पणा गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही  भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारणा त्यांनी बुद्धीचाबा पर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले.माण्साने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला, मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना. 

दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो, पण ही पुस्तके लिहीणार्‍याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात, म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात.  यशस्ची होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, वैयक्तिक स्वभाव या गोष्टी कारणीभूत असतात, मग पुस्तके वाचून काय हॊणार.

खूपशी मुले आजुबाजूला बघून आपले ध्येय ठरवितात, किंवा वडिल म्हणतात त्याप्रमाणे पुढे जातात, मग मुलांच्या मनाचे काय? म्हणून आयुष्याची दिशा ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. आम्ही दहाचीचे क्लास घेतो, तेव्हा मुलांना समजावून सांगतो, आणि त्याला आयुष्याचे कोष्टक दाखवतो, मग तो मुलगा अंतर्मुख होऊन विचार करूल लागतो आणि मग त्याला काही सांगावे लागत नाही.

दहावीची परिक्षा, फक्त एकच वर्ष कष्ट उत्तम मार्क -डोनेशनची गरज नाही -  चांगले मोठे कॉलेज - चांगले मित्र - चांगले शिक्षण - उत्तम नोकरी - वशिला नको - भरपूर पगार - मग उच्च जीवनमान - उत्तम सुस्वरूप मुलीचे स्थळ सांगून येणार - मुलगी सुद्धा शिकलेली असणार - घरात सुशिक्षीत वातावरण - समाधानी - अपत्ये गुणी होणार - कारण आईवडिल सुशिक्षीत म्हणून संस्कार चांगले - मुलांचं करियर उत्तम - काळजी नाही - म्हातारपण सुखात .

हे सर्व कशामुळे? दहावीचा अभ्यास कष्टाने करून चांगले मार्क मिळविले तर. 

आज ६१वा भारतीय प्रजासत्ताक दिन.

अनिवासी भारतीयांनो, आता तुम्ही पण प्रजासत्ताक सोहळा बघु शकता.

 http://republicday.nic.in/

http://72.78.249.125/esakal/20100125/5599782320145400743.htm

केंद्राच्या जाहिरातीत पाकच्या अधिकाऱ्याचे छायाचित्र!

नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख तन्वीर अहमद यांचे गणवेशातील छायाचित्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या छायाचित्रांसह महिला व बालकल्याण मंत्रालयाने वृत्तपत्रांमध्ये आज प्रसिद्धीस दिलेल्या पूर्ण पान जाहिरातीत प्रसिद्ध झाले आहे. या गफलतीबद्दल पंतप्रधान कार्यालयाने देशाची माफी मागितली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

वाचा समस्त भारतीयांनो वा्चा ही बातमी, आणि सरकारी कारभारात कायकाय होऊ शकते हे समजावून घ्या. राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्ताने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत पाकिस्तानी हवाई दलाचे माजी प्रमुख तन्वीर मेहमूद अहमद यांचाही फोटो झळकला आहे. कोणालाही कशी लाज वाटली नाही, कळत नाही. सर्वांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली. झाले प्रकरण संपले. खरेतर ह्याला जे जबाबदार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण हे पहिल्यांदाच घडले आहे, तर भविष्यात घडणार नाही.

महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री कृष्णा तिरथ म्हणतात, ’"ही घोडचूक आपली नाहीच. या जाहिरातीत प्रतिमांपेक्षा जो संदेश देण्यात आला आहे, तो महत्वाचा  आहे. छायाचित्र केवळ प्रतिकात्मक असते." अरे अशा लोकांना जे बेजबाबदार विधाने करतात त्यांना हाकलून द्यायला पाहिजे. 

आमचा नातू श्रीहरी कदम ऑस्ट्रेलियात इयत्ता पहिलीत शिकतो. भारतात आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे तेथे त्यांचा हा दिवस स्वातंत्र्यदिन असतो.

जेव्हा हा शाळेत जात होता तेव्हा काल त्याने पाहिले काही मुले त्यांचा झेंडा हातावर टॅटू करून घेत होते. याची आई म्हणाली तुला टॅटू करायचे काय? तर हा म्हणतो आई भारतात मुले झेंडा छातीवर लावतात, ते एखाद्या मेडल प्रमाणे, किती proud आहे ना! एथे तर त्या झेंड्याचा टॅटू करतात.

एवढ्या लहान वयात फक्त भारतीय मुलेच असा विचार करू शकतात. परदेशांना तर खूपच लांब आहे. आम्ही अमेरिकेत असताना पाहिलेय, त्यांच्या झेंड्याच्या  पॅंट  शिवतात, हातरूमाल शिवतात काय आदर्श आहे ना? आपल्याकडे भारतात रस्त्यावर झेंडे विकतात आणि दुसर्‍यादिवशी ते रस्त्यातच फेकून देतात. शाळेतील मुलांना दुसर्‍या दिवशी ते झेंडे गोळा करायला लावून त्यांना आदर्श लावून दिला पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?

आहेत भारतात कायदे भरपूर आहेत. पण ते पाळण्यासाठी नसतात. तर कोर्टात वकीलांच्या उपजीवीकेचे ते साधन बनून आहेत.

ही आहे दैनिक लोकसत्तातील एक बातमी -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=27&Itemid=4

नवी दिल्ली, २० जानेवारी/पीटीआय
दिवंगत माकप नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू हे वयाच्या पंचाण्णव्या वर्षीही अतिशय चपळ होते, त्यामुळे त्यांच्या मेंदूचा अभ्यास बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस) ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था करणार आहे.

 

आता यावरून काय लक्षात येते, की ज्योती बसूंचा मेंदू तपासायचा आहे, की ते पंचाण्णव्या वर्षी एवढे चपळ कसे. तपासा आमचे काय जाते? पण आता मुद्दा येतो की मग इतरांचे मेंदू का तपासायचे नाहीत? अतिरेकी एवढ्या लहान वयात, एवढे जीवावर उदार होऊन कामे करतात, त्यांना फाशीची शिक्षा दिल्यावर त्यांचासुद्धा मेंदू तपासा, कायकाय भरलंय त्यांच्या मेंदूत ते तरी एकदा कळू देत. म्हणजे तसेच धर्म आणि देशप्रेम आपल्या कोणाच्या मेंदूत भरता येईल काय? आता त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे. भारतात एवढा भ्रष्टाचार माजलेला आहे, त्यांचे ही मेंदू ते मेल्यानंतर तपासून, जतन करून ठेवावेत. शिवाय आताचे राजकारणी एवढे निगरगट्ट कसे हे सुद्धा त्यांचा मेंदू तपासून बघता येईल. जन्म झाल्यानंतर त्यांच्या मेंदूत अशी काय प्रक्रिया घडत होती, ते तरी संशोधनातून बाहेर येऊ देत. अशा सर्वांचे मेंदू जतन करून ठेवावेत, आणि जमल्यास हे मेंदू, जुने मेंदू काढून त्याजागी, रोपण करता येतात का ते पहावे. काही काही राजकारणी, भ्रष्टाचारी असे काही सुपीक मेंदू चालवतात, ज्याचे नाव ते. आम्ही तर म्हणतो अशा मेंदूचे एक कायमस्वरूपी संग्रहालय बनवावे. मग त्यात सर्वांचे मेंदू ठेवावेत.

राजकारणी जेव्हा शपथ घेतात, तेव्हाच त्यांच्याकडून देहदानाचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे. नव्हे तसा कायदा करावा. देहदानानंतर फक्त त्यांचा मेंदू काढून  घ्यावा आणि बाकी निरूपयोगी भाग नातेवाइकांच्या स्वाधीन करावा. अंडरवर्ल्ड मधील जे अतिरथी महारथी आहेत त्यांचे मेंदू तर काय विलक्षण असतील ना!  त्यांचा  अभ्यास करणार्‍या  डॉक्टरांनाच घेरी येईल.

खरे तर हा विचार आपल्या पूर्वजांना का सुचला नाही कोणास ठाऊक. नाहीतर आज आपल्याला चंगेजखान, हिटलर, नेपोलियन, सिकंदर, म.गांधी, नेहरू, लो.टिळक, इंदिरा गांधी वगैरेंचे मेंदू तपासून एक डाटा तयार करता आला असता. म्हणून आम्ही म्हणतो आपल्या पुढील पिढीसाठी, त्यांना स्फूर्ती येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे आणि कोणाकोणाचे मेंदू जमा करून त्यावर संशोधन करायचे आहे त्याची यादी बनवून त्याप्रमाणे संसदेत कायदा पास करून लगोलग त्याची अंमलबजावणी करावी.

आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरले की, यापुढे टॅक्सीचालकांना परवाने देताना मराठी लिहीता, वाचता येणे जरूरीचे असणार आहे आणि मगच परवाने देण्यात येणार आहेत. खूप दिवसांनंतर अक्कल आली म्हणायची, आता आली हे काय थोडके झाले. सर्व महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जाण्यापुर्वी हे पाऊल उचलले हेच आम्हां मराठी जनतेवर सरकारचे उपकार झाले म्हणायचे.
आता हाच नियम सर्व क्षेत्रात लागू झाला पाहिजे. R.T.O. अधिकार्‍यांचे एकदां मराठी तपासून पहायला पाहिजे, कारण त्यांना मराठी आलेच पाहिजे. आता यावर काही अतीशहाणे लोक टीका करतील, कारण काही लोकांना संवयच असते फक्त विरोध करायची. सरकारने मनावर घेऊ नये. आता महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यातच वेगळ्या विदर्भाच्या हालचाली चालू आहेत. दुसर्‍या प्रांतातले राजकारणी लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास साधतात, मग तेथील जनता देशोधडीला लागेल नाहीतर काय? जर त्यांनी त्यांच्या राज्यात उत्पन्नाची साधने निर्माण केली असती तर तेथील जनता परराज्यात, आपला संसार का सोडून आली असती? त्यांना नको वाटते काय आपल्या मुलाबाळांत रहायला. असो आपण त्याचा विचार करून काय उपयोग? पण राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. आपल्या घरात जर कोणी घुसखोरी करत असेल तर, कोण सहन करेल? त्याला हुसकावून दिले पाहिजे ना. नाहीतर तो़च आपल्याला घराबाहेर काढेल त्याचे काय? हे आम्हीच मागे एकदा आमच्या ब्लॉगमधून लिहीले होते. मग यांच्यासाठी काहीतरी नियम केलेच पाहिजेत. तसाच प्रकार राज्य सरकारर्ने केला आहे.
मागे एकदा एक ICICI चा ऑफिसर घरी आला होता, काही माहिती देण्यासाठी, तो बोलत होता हिंदीत, इंग्रजीत आणि आम्ही मराठीत. पण तो काही केल्या मराठीत बोलत नव्हता, तर आम्ही त्याला त्याच्या गावाविषयी विचारले तर तो होता दिल्लीकडचा. त्याला मराठी येत नव्हते. आम्ही त्याला सरळ घालवून दिले आणि मराठी शिक आणि मगच आमच्याकडे ये असे खडसावून सांगितले. आम्ही खूप वेळा मुंबईला जाताना पाहिलेय लोक मुंबईत हिंदीतच बोलतात, जरी मराठी येत असेल तरी. आपल्याला वाटते समोरच्याला मराठी येत नाही, पण त्यालासुद्धा तसेच वाटते. लक्षात ठेवा समोरचा कोणत्याही भाषेत बोलू देत आपण मात्र आपली मराठी भाषा सोडायची नाही. अगदी भांडायचे सुद्धां मराठीतच, कारण एकएक इरसाल शिव्या फक्त मराठीतच आहेत. ऐकल्यास अगदी नाकातले केस जळतील. सांगू? नको, ही ती जागा नाही. आपण काय समजून गेला असताल. मराठी कशी मर्दा सारखी वाटते, वाटते नाही आहेच. मराठी बोलतांना कसे मिशीला पीळ दिल्यासारखे वाटते. बाकी भाषा गुळगुळीत दाढीवरून हात फिरवल्यासारख्या वाटतात.
महाराष्ट्र राज्याचे या निमीत्ताने ’ जय हो ’. असाच आपल्या माय मराठीला तिचा पदर ओढणार्‍यांपासून, वस्त्रहरण करणार्‍यांपासून वाचवा.  

ऐका हो ऐका, भारतात इंडियन प्रिमियर लीगचा लिलाव सुरू झाला. लिलाव भाग घेणारे मालक सरसावून बसले आहेत. जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावले जातील. ज्यांचा लिलाव होणार आहे, ते एखाद्या गुलामाप्रमाणे मालकाची वाट बघत आहेत. १२ मार्चला या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे, आणि या तमाशात कोणाकोण कलाकार आपली कला कोणाकडून सादर करणार आहेत ते कळणार आहे.
यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना टाळण्यात आले आहे. त्याला कारण दहशतवादात पाकिस्तानवर संशय. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर  हल्ले होतायत त्याचेही परिणाम या लिलावावर जाणवू लागले आहेत, कारण त्या खेळाडूंना सुद्धा बाजारभाव नाही. ज्या प्रकारे हा लिलाव चालतो, ते पाहून घोडेबाजाराची आठवण होते. नंतर हे घोडे त्या त्या मालकासाठी जिवाचे रान करून पळणार, नाहीतर पुढ्च्या वेळेस लिलावात भाव मिळणार नाही ना! या वेळेस किरण पोलार्डला सर्वात जास्त म्हणजे ३.५० क्प्टी भाव मिळाला. भारतातील तीन खेळाडूंची लिलावत विक्री झाली. या पुढील का्ळात अजून कशाकशाचा लिलाव होईल, ते एक परमेश्वरच जाणो.
या वेळेस ’ सायलेंट टायब्रेकर ’ हा नवीन नियम करण्यात आला आहे. एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी जास्तीतजास्त ३.५ करोड करोडचीच बोली बोलता येते, पण जर एका पेक्षा अनेकांची बोली समान झाली तर टाय होतो अशा वेळेस या पेक्षा जास्त रक्कम बोलता येते, पण ही जास्तीची रक्क्म खेळाडूला न मिळता आयपीएलला मिळते. आहे की नाही मज्जा!
सर्वात जास्त जळफळाट झाला तो पाकिस्तानी खेळाडूंचा, कारण त्यांना कोणीच लिलावात विकत घेतले नाही.
आतापर्यंत जे खेळाडू मायभूमीसाठी खेळायचे ते आता कोणत्यातरी पैसेवाल्या मालकासाठी खेळणार. खेळाडूंनी आपले अवमूल्यन तरी किती करून घ्यायचे. पैसा मिळतो पण गुलामाप्रमाणे.
आपण सामान्य माणसे हे खेळ पाहणार पण त्यात देशप्रेमाचा जिवंतपणा असणार आहे काय? यात जाहिरातवाल्यांची चांदी, दुसरे काय?
यापुढे हे लिलाव बंद झाले पाहिजेत. प्रत्येकाने देशासाठी खेळावे. याच लिलाववाल्यांजवळ जर एवढा पैसा असेल तर त्यांनी भावी खेळाडू तयार करण्याकडे लक्ष द्यावे, ज्यायोगे आम्ही ऑलिंपीक मध्ये डोळे लावून पदकांची वाट पाहतो ते स्वप्न तरी साकार होईल.   

पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्ट्या खेड्यातील हाल पहायलाच नकोत. ति्थे तर  टॅंकरने पाणी आणलेलेही पुरत नाही.
ही टंचाई दूर करण्याचे काम सरकार जरी करत असेल तरी आपलेही काही कर्तव्य आहे की नाही. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
आपली उपनिषधे सांगतात, दुसर्‍याचे काहीही घेऊ नये, कारण ही सृष्टी परमेश्वराच्या मालकीची आहे, आणि आपण आपल्या गरजेइतकाच भाग घ्यावा. कारण ह्या जगातील सर्व सर्वांसाठी आहे आणि ते देवाने सर्वासाठी निर्माण केले आहे. निसर्गाची नासाडी थांबवणे आता आपल्या हातात आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे, त्या तापमान वाढीला आपण हातभार न लावणेच बरे.  नाही का? पाण्यावरच हे सृष्टीचे चक्र फिरत आहे, आपण पाण्याशिवाय पॄथ्वीची कल्पनाही करू शकत नाही. सगळे मोठमोठे देश पाण्यासारखा पैसा खर्च करून परग्रहावर फेर्‍या मारताहेत, पण फक्त पाणी नाही म्हणून हतबल आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातही थोडा विचार करून, योग्य नियोजन करून, पाण्याचा दुरूपयोग टाळू शकतो. पण त्यासाठी काय केले पाहिजे -
पाण्याखाली घागर किंवा कोणतेही भांडे ठेवले तरी ते वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खूपजण दात घासताना बेसिनचा नळा उघडाच ठेवतात, त्याचा काय फायदा माहित नाही?. काहीजणांना शॉवरखाली आंघोळ करण्याची भारी हौस असते, अगदी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती पाणी वाया घालवतो ते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात, त्यापेक्षा हॉटेल मध्ये छोट्या ग्लासात पाणी दिल्यास वाया जाणार नाही, पण का्ळजी कोण घेतो. खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी मारतात, त्याचा काय फायदा ते एक तो दुकानदारच जाणो. आम्ही रोज सकाळी जाताना पाहतो स्वारगेटला एका छोट्याशा मंदिरासमोर असा भला मोठा पाईप घेऊन रोज पाणी मारतात, एवढे की पाण्याचे पाट वाहू लागतात, त्याला एकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याने सुनावले, आम्ही तुमच्या घरचे पाणी वापरतो काय? हे तर सरकारचे पाणी आहे. मोठमोठया सोसायटीत टाक्या भरून वाहतात पण एक बॉल कॉक बसविल्यास पाणी वाहणार नाही, थोड्याशा विचाराने, एका बॉलकॉकने आपण किती पाण्याची बचत करू शकतो, हे सांगून पटणार नाही.
खरे तर पाणी वाचविण्यावी मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनः वापर करता आला पाहिजे.
यासाठी कायदा करून काही उपयोग होणार नाही.

एक बातमी, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की, स्वसंरक्षणासाठी केलेली हत्या हा खून नव्हे.

त्याचे असे झाले, लुधियानातील दर्शनसिंग यांनी आपल्या काकाची हत्या जमिनीच्या वादातून केली होती. दर्शनसिंगने न्यायालयात सांगितले, त्याचा काका गुरूचरणसिंग याने त्याच्या वडिलांवर शस्त्राने हल्ला केल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून स्वसंरक्षणासाठी त्याने काकावर गोळी झाडली. असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्या.दलबीर भंडारी आणि न्या. अशोककुमार गांगुली यांनी नमूद केले की, स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार कायद्याने प्रत्येकाला दिला आहे. त्यामुळे आक्रमकपणे हल्ला करणार्‍याला ठार मारले, तर तो खून होऊ शकत नाही. त्याने जिवावर बेतणार असेल तर, घाबरून पळ काढणे अपेक्षित नाही. 

आम्हांला वाटते, जेव्हा एखादा न्याय सुप्रीम कोर्टकडून दिला जातो तेव्हा त्याचे रूपांतर कायद्यात होते, तर त्याचे समाजावर काय दूरगामी परिणाम होतील हे पाहिले जात नाही, असे खेदा्ने नमूद करावे लागते. या निकालाचा भविष्यात गुन्हेगारांकडून गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक आहे. गुन्हेगार सरळ सरळ खून करतील आणि न्यायालयाला हे पटविण्यचा प्रयत्न करतील, की त्याने तो हल्ला स्वसंरक्षणासाठीच केला होता. कारण त्यावेळेस तेथे कोणीच साक्षीदार असणार नाहीत, मग कोणाचे खरे मानायचे.

जर उद्या एखाद्या नवर्‍याने पत्नीचा खून केला आणि त्याने कांगावा केला की, पत्नी माझ्यावर हल्ला करत होती म्हणून मी स्वसंरक्षाणासाठी खून केला, तर काय? आणि पत्नीने ‍पतीचा अशाप्रकारे खून केला तर? अशा गोष्टी सिद्ध करायला वकीलांना काय वेळ लागतो. नायमूर्तींनी पुढे म्हटले आहे की, स्वसंरक्षाणाच्या अधिकाराचा वापर बदला घेण्यासाठी केला जाणार नाही, या साठी परिस्थितीजन्य पुराव्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. पण हे समाजातील सर्व स्तरावर शक्य आहे काय? परिस्थितीजन्य पुरावा निर्माणसुद्धा केला जाऊ शकतो त्याचे काय?

एकंदरीत भारतात न्याय? पैसेवाल्यांचे काम, दंडेलशाहीचे काम.

 

ही बातमी आहे, दैनिक ’सकाळ’ मधील भारतीयांवरील, ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांसंदर्भात.

व्हिक्‍टोरिया शहरातील टॅक्‍सीचालक सतीश थत्तीपामुला (वय 24) याला पॉल जॉन ब्रॉगडेन (वय 48) याने दारूच्या नशेत वर्णद्वेषातून शिवीगाळ करत मारहाण करत, त्याच्या टॅक्‍सीचीही मोडतोड केली. पोलिसांनी आज सकाळी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयात ब्रॉगडेनचे वकील फिलिप लॅंच यांनी सांगितले, की ब्रॉगडेन याने भरपूर मद्यप्राशन केल्यामुळे काल रात्री काय झाले, हे त्याला आठवत नाही. न्यायालयात सांगितलेल्या घटनाक्रमानुसार ब्रॉगडेनने एका पार्टीत भरपूर मद्यप्राशन केल्यानंतर बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सुमारे दोन वाजता एक टॅक्‍सी भाड्याने घेतली. त्याने पार्टीत अमली गोळ्याही खाल्ल्या होत्या. टॅक्‍सीतील इतर प्रवासी जेव्हा त्याला शिवीगाळ करू लागले तेव्हा भारतीय चालकाने त्याची टॅक्‍सी तत्काळ एका सर्व्हिस स्टेशनमध्ये नेली. तेथे ब्रॉगडेनने चालकास मारहाण केली.
ब्रॉगडेनला मद्यसेवनप्रकरणी यापूर्वी शिक्षा झाल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी न्यायाधीश मिचेल हॉगसन यांनी निर्णय देत ब्रॉगडेनला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. समाजात मद्यप्राशन करून हिंसाचार करण्याची वृत्ती वाढीस लागणे, ही बाब चिंताजनक आहे. वर्णद्वेषातून हल्ले करणे, हा प्रकार कधीही खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

कल्पना करा असा प्रकार आपल्या भारतात घडला असता तर? तो हल्लेखोर उजळ माथ्याने फिरून शिवाय गुन्हा नाकारून,  मोठा वकील देऊन मोकळा झाला असता. मग तारखांवर तारखा. तो खटला उभारण्यासच दोन चार वर्षे गेली असती. त्यात कितीतरी साक्षीदार तपासले गेले असते. शेवटी न्याय मिळण्याची आशा धूसर होते, आणि लोक ही घटना विसरून जातात.

पहा ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने पोलीसांचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली. ऑस्ट्रेलियात जर चुकूनही चुकीचे पार्किंग झाले तर पोलीस गाडीवर दंडाची पावती लावून जातो, बस त्या माणसाने दंड भरायचाच. कोणत्याही सबबी चालत नाहीत. आणि तो पोलीसही ऐकत नाही. लाच हा प्रकार तर नाहीच. कोठेही दलाल नाहीत, बस आपले काम आपणच करायचे. आणि ते काम सरकारी कर्मचारी इमानदारीने करतो.

इथे तर म्हणे न्यायालयातही आर्थिक व्यवहार चालतात, आणि ते आर्थिक व्यवहार करणारेही दलाल असतात. कसा लोकांना न्याय मिळणार?

खटले वर्षानुवर्षे चालत राहतात, आजोबाची केस नंतर नातू चालवतो, त्याला सुद्धा न्याय मिळण्याची खात्री नसते.

२६-११ च्या हल्ल्यातील कसाबची केस कशी मस्त चाललीय. त्याने केलेल्या गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, T.V. वर आख्ख्या जगाने पाहिलेय, एवढा पुरावा न्यायालयाला पुरेसा नाही काय? त्या कसाबचे लाड पुरवत, जणू तो आपला पाहुणाच आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो आहे, अशा थाटात खटला चाललाय. त्याला काळजीच नाही, जरी फाशीची शिक्षा झाली तरी तरी आधीची फाशीची शिक्षा झालेले आरोपी नंबरात आहेत ना. तेव्हा याचा नंबर लागेल तोपर्यंत आख्खे आयुष्य निघून जाईल, हे त्याला चांगले माहीत आहे. शिवाय आत आरामच आराम, रोज मेजवानी.

आता आपल्याकडील कायदे आणि न्यायदानाच्या पद्धती बद्लायला पाहिजेत. टाईम लिमीट पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालले पाहिजे हे आम्ही मागेच या ब्लॉग मधून लिहीले होते. आताच्या कामकाजाच्या वेळा आणि कामकाजाची पद्धत पाहिल्यास अडाणी माणसालाही कळेल की न्याय उशीरा का मिळतो ते.

आता आपल्याला काहीतरी केले पाहिजे.

दूरदर्शनवर बातम्यांचे चॅनेल आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असते, त्यांनी बातम्या वेळेवर आणि योग्य दाखवाव्यात, पण तसे होत नाही, त्यांना काय आणि केव्हा दाखवायचे याचे भान नसते.

आम्ही कंकणाकृती ग्रहण पाहण्यास कन्याकुमारीला जाऊ शकलो नाही म्हणून बातम्यांच्या वाहिन्या पहात होतो, वाटले हे चॅनेल वाले Live दाखवतील आणि आपण कंकणाकृती ग्रहण पाहू शकू, घरात बसल्या बसल्या. पण कसले काय? ते लोक फार हुशार ना. त्यांनी काय दाखवले माहित आहे?

सर्वात जास्त विनोद केला Star News वाल्यांनी. त्यांनी बोलावले होते काही तर्कशास्त्री, वैज्ञानिक आणि ज्योतिषांना, ग्रहणावर चर्चा करण्यासाठी. चर्चा कसली नुसते भांडण. प्रत्येकजण आपली बाजू कशी बरोबर ते ओरडून सांगत होता, अगदी दुसर्‍याच्या हातातील माईक ओढून. सगळे अति शहाणे ना? त्यांना हे भानच नव्हते की ते ज्या विषयावर भांडत आहेत, ते ग्रहण मात्र प्रेक्षकांना दाखवले जात नाही. एवढ्या वर्षानंतर जर अशी संधी येत असेल तर चॅनेलवाल्यांनी फक्त ग्रहण नको दाखवायला? त्य मंडळींना एवढी सधी गोष्ट कळत नव्हती की, एका वेळेस एकानेव बोलायचे असते. ते जे काही बोलत ( भांडत ) होते त्यातील एक अक्षरही समजत नव्हते. झोपडपट्टीतील नळावर बायका भांडतात ना अगदी तसे. चॅनेलवाली मंडळी शांतपणे पहात होती, त्यांना एवढेही कळत नव्हते की, आपल्याच चॅनेलचे नाव खराब होत आहे.

आजतक चॅनेलवर ग्रहणाची दृष्ये दाखवत होते, पण जेव्हा कंकणाकृती ग्रहण अवस्था आली त्यावेळी नेमक्या जाहिराती  दाखवल्या, कंकणाकृती अवस्था संपली आणि त्यांच्या जाहिरातीही संपल्या. आहे की नाही मज्जा.

NDTV, Doordarshan News यांनी वेगळीच कमाल केली, कन्याकुमारीला होत असलेले कंकणाकृती ग्रहण दाखवायचे सोडून, बाकी ठिकाणांचीच ग्रहणे दाखवत होते.  

बातम्यांच्या चॅनेलवाल्यांना खरंच एवढे सुद्धां ज्ञान नसावे, की प्रेक्षकांना काय पाहिजे आहे? आणि आपण काय दाखवत आहोत. हे सर्व जण जे ज्ञानी लोक तारे तोडत होते, ही सर्व माहिती ग्रहणानंतर सुद्धा सांगता आली असती ना?

मागील दोन भागात आपण अभ्यास कसा करावा हे पाहिले, आता पाहू यात, शेवटच्या दीड महिन्यात, काय काळजी घ्यावी.

ज्यांची सकाळची शाळा असते, त्यांना साधारणपणे दुपारची झोपायची संवय असते, मग तीच संवय पेपराच्या वेळेस हानीकारक ठरते, मग तिथे पण झोप येते. तेव्हा आता शाळा कमी असते, तेव्हा दुपारची झोप घेण्याचे टाळा. जर अकरा ते तीन यावेळेत जेवण्याची संवय असेल तर, ती बदला नाहीतर परिक्षेच्या वेळेत भूक लागते.

आताचा शेवटच्या दीड महिन्यातील अभ्यास म्हणजे शेवटचा हात फिरवल्या सारखे आहे. पुन्हापुन्हा तोच तोच विषय घेता येणार नाही. गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या, जोड्या लावा अशा छोट्याछोट्या प्रश्नांची उत्तरे पाठ करा. म्हणजे ते मार्क हातचे होतात. गणितात अधिक, ऊणे च्या चिन्हात गोंधळ होतो, आणि चिन्हे चुकतात मग सगळे गणितच चुकते, मार्क तर नाहीतच, पण वेळही वाया जातो, कारण प्रत्येक मिनीट महत्वाचा आहे. परिक्षेत प्रश्न नीट वाचा, समजावून घ्या, काय लिहायचे ते नीट ठरवा, नाहीतर निम्मे उत्तर झाल्यावर लक्षात येते आणि वेळ गेलेला असतो. निबंधात मुले नेहमी गोंधळ करतात,  विषय ठरवत नाहीत, मग दहाएक ओळी लिहील्यावर लक्षात येतच नाही, काय लिहावे पुढे. मग एक प्रकारची भिती वाटायला लागते. असे करू नका. आतापासूनच ठरवा की आपल्याला निबंधाचा  काय विषय घ्यायचा त्याचाच अभ्यास करा.

आता फक्त वाचन आणि मनन करण्याची वेळ आहे. लिखाणे कमीतकमी करा. मात्र जर असे वाटत असेल की, एखाद्या विषयाला वेळ पुरणार नाही तर प्रत्येक विषयाचा एकेक पेपर वेळ लावून सोडवा, पण विकल्पाचा विचार न करता, सर्व प्रश्न सुटले पाहिजेत, म्हणजे परिक्षेत सर्व प्रश्न सोडवायला वेळ पुरतो. लक्षात घ्या भाषा, इतिहास, भूगोल या विषयांना वेळ पुरत नाही. कारण गणित एकतर येते किंवा नाही, तिसरा पर्याय नाही. कारण सविस्तर उत्तर नसते. तेव्हा शक्यतो याच विषयांचे पेपर सोडवायचा सराव करा.

बाकी नंतर परिक्षेच्या आठ दिवस आधी पाहू की, परिक्षेच्या दरवाजात काय करावे, याचा विचार करू यात.

पळण्याच्या शर्यतीत भाग घेणारा खेळाडू ज्याप्रमाणे, शेवटच्या टप्प्यात जास्तीचा ठेवणीतला जोर लावतो आणि शर्यत जिंकतो तसा आपल्याला अभ्यासाला जोर लावायचा आहे आणि दहावीची शर्यत जिंकायची आहे

बिलकुल काळजी करू नका, काळजी करण्याचा वेळ अभ्यासाला द्या, मग बघा कसे फ्रेश वाटते.

बाकी परिक्षेच्या आधी आठ दिवस सूचना आणि पंधरा दिवस आधी अपेक्षित गणिताचा आणि इंग्रजीचा पेपर, सरावासाठी आणि मूल्यमापनासाठी.

काल दहावीचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन कसे करावे ते आपण पाहिले. दहावी ही महत्वाची आहेच पण त्यासाठी टेन्शन घेऊ नका. शांतपणे अभ्यास केला तर सर्व सुरळीत होईल. एवढा अभ्यास कसा होईल? मला हे सर्व जमेल का? दिवस थोडेच राहिलेत, मग आता मी कसा अभ्यास करू? ह्या सर्व काळज्या आता सोडा. कारण काळजी करण्याची वेळ गेली आहे. उरलेल्या वेळेचा उपयोग करून घ्या. एकेक विषय पूर्ण करा. जसजसा अभ्यास पुढे जाईल तसतसी काळजी कमी होत जाईल. अवघड विषय कुठला आहे, त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा. सोपा विषय वेळेवर सुद्धा करता येतो, कारण तो सहज पार होतो. किती सोपं असतं पहा. गणित जमत नाही ना? काल आम्ही सांगितल्या प्रमाणे गणिताचा अभ्यास करा, म्हणजे पाचही प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवायचा, जर तो बरोबर झाला तर झाले ना १० मार्क. आठ प्रमेय पाठ करा, दोन परिक्षेला येतात, झाले ना आठ मार्क. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ,  घनफळाची  फक्त सूत्रे पाठ करा, बघा कशी गणिते फटाफट सुटतात, याचे सहा मार्क मिळतात, मग झाले ना २४ मार्क. कशाला पाहिजे बाकी काय? अशा प्रकारे प्रश्न आणि मार्क निश्चित करा, आणि त्याच प्रमाणे अभ्यास करा, सर्व सोपे होऊन जाईल.

जिथे पुस्तके, वह्या ठेवता त्याठिकाणी नीट मांडणी करा. एका विषयाचे पुस्तक, त्याचे गाईड (असेल तर), वह्या, पुस्तिका वगैरे एकच ठिकाणी ठेवा म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करताना सर्व साहित्य एकाच वेळेस मिळेल, शोधायला वेळ जाणार नाही. आणि अभ्यास झाल्यावर ते सर्व साहित्य जागेवर ठेवल्याशिवाय दुसर्‍या विषयाला हात घालायचा नाही. एकापेक्षा जास्त मित्रांना सोबत घेऊन अभ्यासाला बसायचे नाही, त्याने मतांतरे होतात आणि अभ्यास होत नाही. शिवाय मित्रांची संवय होते आणि एकादा मित्र जर आला नाही तर अभ्यासाला मूड येत नाही. शिवाय गोंधळ जास्त होतो. सर्वात उत्तम आपण एकट्यानेच अभ्यास करणे. कारण आपणच आपले गुरू असतो.

आता पासूनच आहार हलका ठेवा.पचायला जड आहार नको. कारण आजारपण आल्यास नुकसान होईल. पोट सांभाळा. जागरण करू नका, त्याने पोट बिघडते मग सगळे वेळापत्रकच बिघडते. चिडचिड करू नका. आणि महत्वाचे वेळेवर आहार घ्या. अजिबात उन्हात फिरू नका.

बाकी उद्या.

दैनिक ’सकाळ’, दि.७ डिसेंबर २००९ च्या ’मुक्तपीठ’ मध्ये छापून आलेला लेख खास या बॉगच्या वाचकांसाठी देत आहोत.

श्री.द.पु. पारखे, कर्वे रस्ता यांनी केलेला मधुमेहावरील प्रयोग आणि त्यांना त्यात आलेले यश. त्यांना १९९८ मध्ये मधुमेह झाला होता, तेव्हा साखर होती ३५५. नंतर डॉक्टरांनी औषध दिल्यावर चारपाच दिवसात हायपोमुळे ते आयसीयुत गेले व गंभीर परिणामापासून वाचले. या अशा स्थितीत त्यांनी स्वतःवर प्रयोग करून गेली दहा ते बारा वषे एकही औषध न घेता मधुमेह आटोक्यात ठेवला आहे. आहे ना आश्चर्य? मग त्यांनी काय प्रयोग केले असतील?

जर आपण रोज सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खाल्ले व रात्री एक विटॅमीन बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतली तर साखर पूर्णपणे नियंत्रणात राहते. कारण सफरचंदामुळे मधुमेहाची प्रक्रिया तात्पुरती का होईना थांबते व त्याचे दुष्परिणाम व औषधे न घेतल्यामुळे त्याचेही दुष्परिणाम होत नाहीत. संपूर्ण माहितीसाठी त्यांची वेबसाईट इच्छुकांनी जरूर वाचावी.

http://www.applecontrolsdiabetes.com/

दिनांक ११ जानेवारीच्या दैनिक ’सकाळ’च्या मुक्तपीठ मध्ये एका वाचकाने लिहीलेला अनुभव -

श्री. अनिल बर्वे, कर्वे रस्ता यांनाही मधुमेह होता. त्यांनी विचार केला, उपाय करून बघायला काय हरकत आहे? दुसर्‍या दिवसापासून उपाशीपोटी रोज एक सफरचंद खाण्यास सुरूवात केली.आणि मधुमेहावरील गोळ्या  बंद करून रोज रात्री ’बी कॉम्प्लेक्स’ची गोळी घ्यायला लागले. दहा दिवसांच्या प्रयोगानंतर भीतभीतच ब्लड शुगर चेक केली तर ती नॉर्मल दाखवत होती.

हा आहे अनुभव, तरी आमच्या सर्व वाचकांनी याचा जरूर विचार करावा. आणि आपल्या जबाबदारीवर प्रयत्न करावा.

दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर्वंचे ध्येय एकच असेल, परोक्षेत चांगले मार्क मिळावेत. अशी अपेक्षा तर पालकांची सुद्धा असेल.

बघा परिक्षेत चांगले मार्क तर चांगले कॉलेज म्हणजे प्रवेश मिळणार, चांगले मित्र, मग चांगले संस्कार, मग पदवी परिक्षा पास होणार. चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, स्वतःचे घर वगैरे होणार. मग जेव्हा आईवडिल लग्नासाठी मुलगी बघणार ती सुद्धा शिकलेली मिळणार, संसार सुखाचा होणार, आयुष्य मजेत, समाधानी होणार त्यातून आईवडिलांनासुद्धा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटणार. मग पालक म्हणणार आम्ही समाधानाने डोळे मिटायला मोकळे. हे सर्व घडणार एका दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले तर, मग फक्त आता दोनच महिने उरलेत अभ्यास करायला, मुलांने चला तर मग या शेवटच्या दोन महिन्यांचा पूर्ण उपयोग करून घेऊ यात. 

१) प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा. जमल्यास एक कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो. आठपर्यंत पाठांतर करा, कारण ही वेळ पाठांतरासाठी चांगली. आठ नंतर आंघोळ, नाष्टा करावा आणि पुन्हा साडेआठला बसावे, आता लिखाण करावे ते दहा वाजेपर्यंत. काय लिखाण करावे तर जे पाठांतर केले ते आठवते का पहावे. नंतर शाळेचे तयारी. सायंकाळी सहा वाजता शाळेतून आल्यावर प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्यावे आणि पुन्हा  सात ते नऊ अभ्यासाला बसावे. आता मात्र मोठयाने वाचूनच अभ्यास करावा, ही वेळ मनन करण्याची नाही. कारणा बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही  म्हणून मोठयाने वाचून अभ्यास करावा. परत जेवण करून नऊ नंतर बसावे आणि धडे अथवा गाईड चाचून लिहीण्याचा सराव करावा. हा अभ्यास अकरा वाजेपर्यंत करावा यात थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. पाच ते सहा तास झोप पुरेसी होते. उगीचच रात्रभर जागू नये, त्याने प्रकृतीवर परिणाम होते, परिक्षा देण्यासाठी आरोग्य ठीक पाहिजे ना?

२) आता ही वेळ आहे, सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याची. बाजारात नवनीतचे सराव प्रश्नपत्रिकेचे पुस्तक मिळते, ते आणून त्यातील प्रश्न पत्रिका सोडवाव्यात. पण कशा तर, पाचही सराव प्रश्नप्रत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवावा, म्हणजे बीजगणितातील पहिल्या प्रश्नात आठ प्रश्न असतात, तर ते आठच्याआठ मिळून चाळीस होतात, तर ते सर्व सोडवावेत, अशाप्रकारे दुसरा, तिसरा सर्व सोडवावेत. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा.

३) भाषेच्या निबंधात विषय ठरवावा, आणि सतत संध्याकाळच्या वेळेस निबंध वाचावेत, पुन्हापुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. आता गणिताचा अभ्यास करताना, गणिते सोडवायला वेळ नाही, तर गाणिते फक्त वाचावीत आणि रीती समाजावून घ्याव्यात. सायन्सच्या आकृत्यांचा सराव करावा. पण हे सर्व संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंतच करावे.

४) एक मास्टर वही बनवावी त्यात गणिताची सूत्रे, सायन्स मधील सूत्रे, आकृत्या, महत्वाचे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे ऐनवेळेस पुस्तकात शोधावे लागत नाही.

बाकी उद्या.

खेड्यापाड्यातीलच काय पण शहरातीलही बाया बापड्य़ांचे संसार या दारूपायी धुळीस मिळाले. कितीतरी लोकांनी आमहत्त्या केल्या. कित्येकांचे विषारी दारूमुळे प्राण गेले आणि त्यांचे संसार उघडे पडले. पण सरकारला त्याचे काय? दारूच्या दुकानांना परवानगी मिळतेच ना.

सध्या बा्जारात जी दारू उपलब्ध आहे ती प्रामुख्याने उसाच्या मळीपासून बनविली जाते. म्हणजे उसाची मळी कामाला येते, आणि खर्चही कमी येतो. पण सरकार गप्प बसेल तर ना. मोठ्या मोठ्या धनदांडग्यांचे, राजकारण्याचे भले कोण करणार, ते बिचारे किती हालात दिवस काढतात. म्हणून सरकारने आता धान्यापासून दारू बनविणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.

महाराष्ट्रात लोक अन्नटंचाईला तोंड देत असताना सरकार धान्यापासून दारू तयार दारू कारखान्यांना परवानगी देत आहे, आणि त्यांना अनुदान सुद्धा मिळणार आहे. लोकांची अन्नाविना उपासमार सुरू आहे, आदिवासींमध्ये भूकबळींची संख्या वाढते आहे, कुपोषण वाढते आहे. पण मायबाप सरकार दारूड्यांचे भले करायला निघाले आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांचा वारसा लाभलेल्या राज्यात असे राजकारणी पैदा व्हावेत यापेक्षा या जनतेचे भोग ते काय? आता वाटते आम्ही मतदान नाही केले ते चांगलेच केले, कोण धुतल्या तांदळासारखे आहेत म्हणून त्यांना निवडून द्यायचे. कशाला? धान्यापासून दारू बनवायला?

सरकारला गोरगरिबाचे प्रश्न सोडवता येत नाहीत, विद्यार्थ्यांच्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखता येत नाहीत, त्या सरकारवर दारूची नशा चढायला लागली आहे.

राज्यशासनाने कोट्यावधी रूपयांचे अनुदान या दारूसम्राटांना खिरापती सारखे वाटले आहे. आणि ही सर्व मंडळी राजकारणीच आहेत. यावर कळस म्हणजे सरकारने उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला आहे. उच्च न्यायालयाने अनुदान देण्यासाठी स्थगिती दिली होती पण सरकारला काय त्याचे?  धान्यापासून दारू गाळणार्‍या कारखान्यांना राज्य सरकारने हजारो कोटी रूपयांचे अनुदान वाटून टाकले, अगदी उच्च न्यायालयाला टांगून. या अनुदानातून दारू प्रकल्प सुरू झालेत, काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, मग जर उच्च न्यायालयाने अनुदान परत घेण्याचे आदेश दिले तर काय डोंबलं परत मिळणार आहे, ते तर त्यांनी खाउन मोकळे करून वर ढेकर दिली असणार.

धान्यापासून दारू गाळणार्‍या कारखान्यांना प्रत्येकी ५० कोटी रूपयांचे अनुदान दिलेले आहे. आणि असे २४ प्रकल्प दारू गाळणार आहेत. धान्यापासून बनविलेली दारू उच्च प्रतीची असल्याने दारू सम्राट बाजारात टिकाव धरू शकणार नाहीत, म्हणून सरकारने प्रत्येक बाटलीमागे १० रूपये अनुदान देण्याचे ठरवले आहे. आणि ते पैसे जनतेच्या करातून. ज्यांना निवडून दिले, त्यांच्याच कारखान्यातून दारूचे गाळप होणार आहे. सर्व अनुदाने जनतेच्या पैशातूनच आहेत.

४ जानेवारीला येथे ब्लॉग मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल लिहीले होते, पण पुन्हा ते सत्र चालूच आहे, म्हणजे ही बाब किती गंभीर आहे यावर आता सरकार, समाजकारणी, शिक्षणतज्ञ, विचारवंतांनी सखोल जाऊन विचारमंथन करण्याची निकड आहे. ज्या पालकांच्या मुलांनी आत्महत्या केल्या ते जबाबदार तर आहेतच पण ते सुद्धा जबाबदार आहेत, ज्यांनी हा असा अभ्यासक्रम बनवून मुलांच्या माथी मारला आहे. मागे आम्ही लिहीले होते की इतिहास, भूगोले किंवा आताच्या गणिताचा व्यवहारात, आयुष्य जगण्यात काही फायदा आहे काय? जर गरज नसेल तर का आपण विनाकारण स्पर्धा माजवत आहोत. याचा अर्थ शिक्षणाला महत्व नाही असा नाही, तर त्याला फाजील महत्व देऊ नये.

प्राचीन काळी राजे लोक राजपुत्रांना अथवा सामान्य जन मुलांना गुरूकुलत, ऋषींच्या आश्रमात अध्ययानाला पाठवत तेव्हा ते गुरूजन मुलांना धनुर्विद्या, स्वसंरक्षण शिकवत. आता सुद्धा याची गरज आहे, कारण गुन्हेगारी एवढी बोकाळली आहे की, शाळेपासूनच स्वसंरक्षणाच्या  शिक्षणाचे महत्व आहे. तरमग त्या इतर विषयांची गरजच काय?

रविंद्रनाथ टागोर, इंदिरा गांधी, महात्मा फुले यांचे शिक्षण शाळा कॉलेजातून पदव्यांपर्यंत झाले नव्हते, पण त्यांचे कार्य? एखाद्या पंडिताला हादरवून सोडणारे होते. पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर घडविण्याची संधी द्यायला हवी, अणि तसे प्रोत्साहन शाळेकडून मिळायला हवे. पण शाळा तर पैसे कमवायच्या मागे लागल्यात त्यांना परत खाजगी क्लासेसची मदत आहेच. मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त कला व क्रिडा क्षेत्राकडे ओढा असेल तर त्यांना त्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. निव्वळ नोकरीसाठी शिक्षण ही संकुचीत वृत्ती आता पालकांनी सोडून द्यायला हवी.

मुलं हळव्या मनाची, भावूक असतात, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उमलू दिले नाहीतर ती कोमेजून जातात आणि अशा आत्महत्या समोर येतात. त्यामुळे मुलांची मानसिकता ओळखून शिक्षकांनी आणि पालकांनी जबाबदारीचे भान ठेवावे. मुलांच्या बाबतीत कोणताही आततायीपणा  करू नये.  

पुण्यात सत्तावन्नाव्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवास काल गुरूवारी सुरूवात झाली. देशभरातील सर्व प्रतिभावंत गायन वादनकारांना इथे हजेरी लावणे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटते. आणि रसिकांनाही ही संगीतची मेजवानीच वाटते. या महोत्सवाची तिकीटे विक्री सुरू झाल्या बरोबर एका तासात संपली. एक रसिक तर पहिली रांग मिळावी म्हणून त्या दुकानासमोर आदल्या दिवसाच्या रात्री दहा पासूनच बसला होता.

या कार्यक्रमाचे सुरूवात सनईवादनकार प्रमोद गायकवाड यांच्या सनईवादनाने झाली. प्रमोद गायकवाड म्हणजे सनईसम्राट शंकरराव गायकवाड आणि प्रभाशंकर यांची तिसरी पिढी होय. तेव्हापासून यांचीच हजेरी असते सनईवादनाने.त्यांनी पहिल्या दिवशी ’राग गवती’ ने सुरूवात केली. या रागातील अनेक सौंदर्यस्थळे त्यांनी अगदी अलगदपणे उलगडून दाखवली, आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना प्रेरणा गायकवाड आणि प्रविण तुपे यांनी स्वरपेटीची साथ केली. त्यांच्या मैफलीची सांगता अत्यंत मधूर राग ’पिलू’ ने झाली. या वेळेस जुन्या रसिकांना ’उडन खटोला’ या चित्रपटातील ’मोरे सैयाजी’ या गाण्याची आठवण झाली.

प्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगळ याचे शिष्य नागनाथ वडियार याछे आगमन स्वरमंचावर झाले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी प्रथम ’राग मुलतानी’ गायला. यात त्यांनी ’गोकुल गाव का छोरा’ आणि ’आज बाजत बधाई बरसानी रे’ ही द्रुत त्रितालातील बदिश गायली. त्यांना हार्मोनियमवर अविनाश दिघे तर तानपुर्‍यावर मेधा वडियार आणि वासुदेव कारेकर यांने समर्थपणे साथ केली. शेवटी वडियार त्यांनी ’आज सखी सद्‌गुरू घर आये’ हे भजन सादर केले आणि रसिक भक्तिरसात बुडून गेले.

देवकी पंडीत, हे नाव समोर आले तरी अंग कसे स्वरांनी डोलायमान होते. त्या स्वरमंचावर आल्या आणि साक्षात स्वरदेवताच आल्याचा भास झाला. टाळ्यांचा नुसता कडकडाट. त्यांनी म्हिमपलास रागातील विलंबित त्रितालाची बंदिश ’नाद समुद्र तोहे महाकठीण’ सादर केली. नंतर त्यांनी ’धानी रागा’तील ’लंगरवा छांड मोरी बैया’ ही द्रुत त्रितालातील बंदिश गायली. पेटीवर त्यांना सुयोग कुंडलकर, तबल्यावर रामदास पळसुले तर तानपुर्‍यावर मनीषा जोशी यांनी साथ केली. नंतर त्यांनी पं.जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली कशी? तर त्यांनी निर्मिलेला ’अमृतवर्षिनी’ राग आळवून. या रागातील ’नाद अनाद अनामय अचल अमर’ ही विलंबित रूपक तालाची बंदिश सादर केली. शिवाय ’का संग किनी प्रीत’ ही द्रुत एकतालाची बंदिश सादर केली. नंतर रसिक स्वरात न्हालेच हो, जेव्हा देवकी पंडितांनी ’किरवानी’ रागातील ’ आली पिया बिन’ हा दादरा गायला. संत चोखामेळा यांचा ’आम्हा न  कळे’ हा अभंग गाऊन  देवकी पंडीत यांनी समारंभाची सांगता केली.

या समारंभात गेल्या वर्षात दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षा, सवाई गंधर्वांच्या शिष्या आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगोबाई हनगळ, विश्वस्त अरविंद मुळगुंद, सरोद वादक उस्ताद अली अकबर खा, सतारवादक आणि संगीतकार पं. भास्कर चंदावरकर, कवी गीतकार गंगाधर महांबरे, शांताराम नांदगावकर, अशोक जी परांजपे, ज्येष्ठ गायक पं रामरंग, ज्येष्ठ अभिनेते   मा. अविनाश उर्फ गणपतराव मोहिते, निळू फुले, ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे, कर्नाटकीग गायिका डी.खे. पट्टमाल, बासरीवादक अजित सोमण , तबलावादक केशवा बडगे, पेटीवादक आप्पा जळगावकर, रंजना गोडसे, लेखिका सुनीताबाई देशपांडे, गायिका मोहना खरे, विमल दंडवते आणि छायाचित्रकार नितीन दाबक यांना आदरांजली  वाहण्यात आली. 

मागील काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात भारतीयांवर हल्ले होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी मेलबर्न शहरात नितीन गर्ग नावाच्या इसमाचा खून झाला, म्हण्जे पार खूनाची वेळा आली आहे, याला कारण भारत सरकारचे निष्ककाळजीपणाचे धोरण आणि ऑस्ट्रेलियन सरकारची बेफिकिरी. तेथील पोलीसांच्या म्हणण्यानुसार हे वांशिक हल्ले आहेत. आणि हा खून वंशभेदातून झाला असावा. अरे पण खून झाला ना? त्याचे काय?

आता ऑस्ट्रेलियात चिनी, लेबानीज, मुस्लीम, अफ्रिकन वगैरे देशातील लोक पोटापाण्यासाठी आलेले आहेत. तर मग भारतीय सोडून इतर देशातील नागरीकांवर हल्ले का होत नाहीत? हे तपासून पहायला हवे. भारत सरकारला एक खोड आहे, फक्त कडक शब्दात निंदा करायची. बस एक खलीता पाठवून दिला, की झाले परराष्ट्रमंत्रालयाचे काम. पण ठोस पाऊल उचलले पाहिजे हे आम्हांला माहितच नाही.

पाश्चात्य देशात अशा घटनांना भारतीयांना सामोरे जावे लागत आहे, यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.

पिझ्झा डिलीव्हरी करणार्‍या शिख तरूणाला अमेरिकेत अत्यंत लाजीरवाणी वागणूक दिली गेली होती. अनेक देशात भारतीयांना वंशभेदाच्या हल्ल्यांना बळी पडावे लागत आहे, फक्त ते आपल्या पर्यंत येत नाही. गाजावाजा होत नाही. ऑस्ट्रेलियात माझ्या मुलीच्या घरातून सोने आणि रोख  डॉलर चोरीला गेले, पोलीस तक्रार झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. फ्रान्स मध्ये शिखांच्या पगडीवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ’बिग ब्रदर’ च्या रियालिटी शो मध्ये भाग घेण्यासाठी जेव्हा २००७ मध्ये ब्रिटनमध्ये गेली होती तेव्हा ’जेड गुडी’ या अभिनेत्रीने शिल्पाला, वंशिक भेदावरून काय गहजब केला होता. हे सार्‍या दुनियेला ठाऊक आहे. नंतर तिने माफी मागितली ही गोष्ट वेगळी. गोरे नेहेमीच काळ्यांना कमी लेखतात. कातडीचा रंग बदलला म्हणून काय माणसाची बुद्धी बदलते काय? तो माणूस नसतो काय? रक्ताची गरज लागल्यावर काळ्या माणसाचे रक्त चालते ना? 

मागे चीनच्या नागरीकांवर हल्ले झाले तेव्हा चीनने व्यापारी संबंध बंद करण्याची धमकी दिली तर ते हल्ले बंद झाले.

क्रिकेटच्या मैदानावरही ऑस्ट्रेलियन खेळाडू अशोभनीय वर्तन करतात.

सगळं जग एकत्र येण्याची संकल्पना रूजत असताना, हे वांशिक हल्ले यात अडथळा निर्माण करतील, हे आता सर्वांनी समजले पाहिजे.

स्पर्धेच्या तणावातून मुंबईत तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Monday, January 04, 2010 AT 11:24 PM (IST)

मुंबई - पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि शैक्षणिक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने शहर आणि उपनगरांतील तीन वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या तिघांच्या आत्महत्यांची कारणे वरवर वेगळी वाटत असली, तरी वैफल्यग्रस्तता हा यातील समान धागा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने सुशांत पाटीलने शाळेच्या स्वच्छतागृहात आत्महत्या केली, तर वैजंतीकौर बुलेर हिने दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. वडिलांनी नृत्याऐवजी अभ्यासाचा सल्ला दिल्याने नेहा सावंत हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वरील बातमी वाचून मन सुन्न होऊन जाते. आपण शिक्षणाच्या बाबतीत कुठे जाणार आहोत, आणि ही जीवघेणी स्पर्धा कधी संपणार आहे देव जाणे. या आत्महत्येसाठी सर्वस्वी पालक आणि शाळाच जबाबदार आहेत. अभ्यास तरी किती असावा, काहीही नियम नाहीत. मुळात सर्व भयंकर आहे.

याच ब्लॉगमधून आम्ही आधीही लिहीले होते की, अभ्यासाचे आणि अभ्यासक्रमाचे नियोजन फार महत्वाचे आहे. आम्ही सांगितले होते, आजकालच्या जीवानात जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे, आणि शिक्षण कशासाठी आणि अंतिम काय तर चांगली नोकरी, धंदा आणि यासाठी शिक्षण.

कशाला पाहिजे भूगोल आणि इतिहास. काय गरज आहे, हुमायुन कोण होता? वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवनमान काय? गरज नसताना मुलांनी अभ्यास करायचा, स्पर्धा गाजवायच्या. गणितातील समिकरणे, पायथॅगोरसचा सिद्धांत, ज्या जीवा काय करणार आहोत त्यांचे आपल्या सर्वसामान्य जीवनात? एकदा दहावीची परिक्षा पास झाल्यावर, नंतर जेव्हा मुलगा डॉक्टरकीला जातो तेव्हा या सर्वांचा काय उपयोग? मुले परिक्षेनंतर सगळे विसरून जातात, तर मग मुलांनी एवढे टेन्शन घेऊन का जगावे? या शिक्षण पद्धतीत बदल करणे जरूरीचे आहे.

हे सर्व कमी करा आणि मुलांना व्यावसायिक ज्ञान द्या, त्यांच्या कलाने प्रगती करू द्यात, तेच काय तर भारताचे भविष्यही उज्ज्वल होईल. मुलांना व्यवहारज्ञानाची गरज आहे. रहदारीच्या नियमांची गरज आहे. भ्रष्टाचाराचे तोटे सांगून तो कसा समूळ नष्ट करावा याचे ज्ञान द्या. सरकारी शाळांमधून शिक्षणाची उंची वाढवा. आत्महत्या कमी होतील. 

via येss रे मना येरेss मना !

मराठीब्लॉग्स नेट वर  नोंदलेल्या व मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.

पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.

पहिल्या भेटीचा उद्देश एकमेकांचा परिचय करून घेणे हा्च मुख्यत: असेल, तरीही ह्या भेटीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा व वारंवारिता ठरवणे, त्याचे ठिकाण, आपापल्या ब्लॉग्स ची माहीती व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करता येईल.

तरी ह्या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित रहावे, तसेच आपल्या माहीतीतल्या सर्व ब्लॉगर्स ना ह्याची कल्पना देऊन त्यानाही येण्यास उद्युक्त करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. आपण खात्रीने येणार असल्याची नोंद, आपले नाव व फोन नं. सहीत येथेच आपल्या उत्तरात करावी म्हणजे त्याचेशी संपर्क करणे सोयीचे होईल. ह्या पुढील कार्यवाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून असेल.

आपले,

सुरेश पेठे

अनिकेत समुद्र

भारत सरकारने जनतेला नवीन वर्षाची अनमोल भेट दिली आहे. यात सामान्य जनतेचे कल्याणच होणार आहे पण यातूनही काही पळवाटा निघू नयेत हीच ईश्वराजवळ प्रार्थना.

भारतात रुचिका प्रकरण झाले, आणि त्यात एक वरीष्ठ पोलीस अधिकारी अडकला असल्याने ती तक्रार दहा वर्षे नोंदविली गेली नाही, हे उघड झाले, आणि सरकारला जाग आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश जारी केला की, पोलीसांकडे आलेली प्रत्येक तक्रार एफाआयआर समजून नोंदवून घ्यावी आणि कारवाई करावी. यामुळे सामान्य जनतेच्या तक्रारे नोंदवल्या जातील, त्यांचा तपास होईल आणि सामान्य जनतेला न्याय मिळेल, कमीतकमी आतातरी तशी खात्री वाटते, जर काही पळवाटा नाही निघाल्या तर.

जर काही अनुचीत घटना घडली तर सामान्य माणूस प्रथम पोलीस चौकीला धाव घेतो, त्याला पोलीसांवर भरोसा असतो, म्हणजेच न्याय मिळण्याची खरी सुरूवात पोलीसांपासूनच होते आणि इथेच हरताळ फासला जातो. आर्थिक व्यवहार होतात आणि एक प्रकारची भिती निर्माण होते. पोलीस खाते सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत असते. न्यायालयाचा संबंध जनतेशी क्वचित येतो, मात्र पोलीसांचा रोजच असतो. सरकारचे अस्तित्व जनतेला पोलीसांमुळेच जाणवते, त्यात संवेदनशीलता असते. दीनदुबळ्यांसाठी, गरीबांसाठी, अशिक्षितांसाठी पोलीस हेच सरकार, न्याययंत्रणा असते. न्याय मिळण्याला पोलीसांपासूनच सुरूवात होते, पण तेथेच घोडे पेंड खाते. खरेतर पोलीस न्याय देत नाही, पण न्याय देण्यात मदतीची सुरूवात करतो. आणि त्यानेच जर टाळाटाळ केली तर सामान्य जनतेला त्याच्या उभ्या आयुष्यात न्याय मिळणार नाही. कारण त्याच्या तपासावरच तर न्यायालयात न्याय मिळतो. आणि याचाच पोलीस खात्याला विसर पडला आहे. आणि गृहखात्याने पोलीसखात्याला जागे केले आहे, पाहू यात पोलीस खाते जागे होते की, अजगरासारखे सुस्त पडून राहते.

खरे तर असा आदेश सप्टेंबर २००८ मध्येच सर्वोच्च न्यायलयाने एका जनहित याचिकेवर दिला होता पण तो सोईस्कररीत्या टाळला गेला.त्यावेळेस असा आदेश होता, सामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यास ती नोंदली नाही तर तो नागरिक थेट जिल्हा न्यायालयाकडून संबंधित अधिकार्‍यांविरूद्ध न्याय मागू शकतो. पण हे किती जणांना माहित असते? सुप्रीम कोर्टाने म्हटले होते, जर पोलीसांकडून गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ झाली तर हा कोर्टाचा अवमान समजण्यात यावा आणि संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी, शिवाय खाते चौकशीचेही आदेश देण्यात यावेत, पण हे झालेच नाही, आता नवीन २०१० साली होईल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक तक्रार ही दखलपात्र ठरवून तिचा तपास सक्तीचा व्हावा ही फौजदारी संहितेतील दुरूस्ती सामान्या नागरीकांच्या, बायाबापाड्यांच्या जीवनात न्यायाच्या दृष्टीने एक क्रांतीच ठरेल. नैसर्गिक न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल पडेल. म्हणूनच सामान्य जनतेला ही नववर्षाची सरकारकडून अनमोल भेट आहे असे आम्हांला वाटते. 

शेवटी पोलीसांचे एक वाक्य असते, xxx आम्हांला कायदा शिकवतोस काय? आत टाकल्यावर सगळे कायदे विसरशील xxxxx.

आमच्या भारत देशात काय होईल हे एक परमेश्वरच जाणत आहे. आंध्र प्रदेश राज्यात के. चंद्रशेखर आव यांनी उपोषण केले, आणि त्यांनी वेगळ्या तेलंगण राज्यासाठी केलेली मागणी, केंद्र सरकारने अनुकूल ठरवली. त्याला हिरवा कंदिल दाखवला गेला. परंतु केंद्र सरकारने याचा भविष्यातील गंभीर विचार केलाच नाही. प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेतली नाही. इतर राज्यात याचे काय पडसाद उमटतील, याचा भल्याभल्यांना अंदाज आला नाही. देशाच्या विविध राज्यांतून छोट्या राज्यांची विभागणी करून वेगळी राज्ये मागण्यांना जोर आला, जुनी भुतं पुन्हा जागी झाली.

या छोट्या राज्यांच्या मागणीमागे काही मंडळींची राजकीय महत्वाकांक्षा असते. वेगळे राज्य केल्याने विकासाला गती मिळते, गरीबांना न्याय मिळतो वगैरे बाता असतात. वेगळ्या तेलंगणाची मागणी म्हणजे आंध्रातील बिभत्स राजकारण होते हे केंद्र सरकारातील मुत्सद्यांना कळू नये म्हणजे नवलच आहे.  डॉ. वाय. एस. रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जगमोहन रेड्डी यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. पण दिल्लीत कांहीतरी घडले आणि रोसय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मग यांनी वेगळे राज्य मागणीला जोर धरला, आणि केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवून पेच निर्माण केला.

महाराष्ट्रात विदर्भाच्या मागणीला जोर आला, जर विदर्भसारखा दुष्काळी भाग वेगळा झाला तर काय विकास साधला जाणार आहे ते त्या भागातील आमदार, नेतेमंडळीच जाणोत. अशा सारख्या मागण्या प्रत्येक राज्यातून होतील आणि सर्व अवघड होऊन बसेल.

वेगळे राज्य न होता उलट राज्यांचे विलीनीकरण करून कमीतकमी राज्ये असावीत, याचा विचार होणे जरूरीचे आहे.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ▼  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ▼  January (25)
      • पालकांसाठी.....
      • सकारात्मक विचार
      • कष्ट करावेत का?
      • ६१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!
      • गोंधळ
      • भारतीय झेंडा
      • तपासा, मेंदू तपासा
      • माय मराठी
      • घोडेबाजार
      • पाणी वाचवा
      • स्वसंरक्षणासाठी हत्या
      • न्यायदान
      • चॅनेलवाल्यांची कमाल
      • दहावीचा अभ्यास कसा करावा - ३
      • दहावीचा अभ्यास कसा करावा - २
      • मधुमेहावर उपाय
      • दहावीचा अभ्यास कसा करावा - १
      • धान्यापासून दारू
      • विद्यार्थी वाचवा
      • सवाई गंधर्व महोत्सव - पहिला दिवस
      • ऑस्ट्रेलियातील भारतीयांवरील हल्ले
      • विद्यार्थ्यांची आत्महत्या
      • पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा
      • नववर्षाची भेट
      • तेलंगणा
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose