मानसिक ताण

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला खाण्यापिण्यापेक्षा मानसिक ताणच जास्त आहे. माणसाने कुठे कुठे मनावर ताण घ्यायचा. घ्यायला कशाला पाहिजे, आजूबाजूचे वातावरणच एवढे गंभीर आहे की आपोआप न मागताही मानसिक ताण आपल्याला सहन करावा लागतो. आता पहा आपण दर महिन्याला वीज बिल वेळेवर भरत असतो. कसं समाधानकारक चाललेले असते. पण एखाद्या महिन्यात काय होते, बिलच येत नाही. आपण वाट पाहतो, मग दुसर्‍या महिन्तात बिल येते भरमसाठ, कारण काय तर मिटर बंद असल्याने, सरासरी बिल पाठविलेले असते, आला का ताण? मग आपण म्हणतो जाऊ वीज बिल कार्यालयात आणि आपली बाजू मांडून बिल कमी करून आणू आणि भरू बिल. पण कय होते, वीज पुरवठा बंद करणारा येतो आणि सुनावतो, साहेब आपण दोन महिन्यांपासून बिल भरलेले नाही, तेव्हा आम्ही वीज कापणार. आपल्याला प्रचंड ताण येतो, आणि चिडचिड होतो, सांगा आता काय करणार? झक मारत आपण सगळं बिल भरतो, आणि त्या महिन्याचे बजेट कोलमडते.

दुसरा प्रसंग घाईघाईत आपल्याला तातडीच्या कामासाठी जायचे असते आणि पुढच्याच चौकात ट्रॅफिक जाम असते, धड पुढे जाता येत नाही धड मागे येता येत नाही. वरून ऊन लागत असते, असा राग येतो, नंतर कळते की, सिग्नलचे दिवे बंद असल्याने ट्रॅफिक जाम झालेय काय करणार? असो, तर असे खूप प्रसंग असतात, मग काय करणार? उपाय शोधणे.

आम्ही एक उपाय सांगतो पहा, आता आपली गाडी गर्दीत अडकलीयना ह्म एक काम करा, आपले आवडते गाणे थोड्या मोठ्याने म्हणा, आणि मध्येच त्याच गाण्यावर शिटी वाजवा,बघा कसा ताण नाहिसा होतो ते. अजून एक सांगतो, शेजारी उभा असलेलाही वैतागलेलाच असणार ना? एक तर त्याला नकळत तुमच्या गाण्यात इंटरेस्ट वाटू लागतो आणि त्याचाही ताण कमी होतो. किंवा काय करायचे, त्या माणसाशी बोलायचे, अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेय आपण साने ना? तो म्हणतो नाही, मी दाते. ओके ओके काय करता आपण? बस झाले संभाषण सुरू. तो सुद्धा सगळा ताण विसरतो. शिवाय आजुबाजूचे लोकं सुद्धा कळत नकळत आपल्या कडे बघू लागतात. आणि आपण मानसिक ताणाची साथ कमी करण्यास मदत करीत असतो.  

काही उपाय बघू यात.

आपल्या काही आजार झालाय का? डॉक्टरकडे गेलात ना? औषधे आणलीत ना? बरं आपण काही करू शकतो का? नाही ना? मग चिंता कशाला करता?डॉक्टरवर विश्वास ठेऊन गप्प बसा. ताण नका वाढवू.

सतत काहीतरी वाचा, विचार करा, नाहीतर कोरे कागद घेऊन काहीतरी लिहीत बसा. रिकामं मन सैतानाचं घर.

जवळपास एखादा मॉल असेल तर छान ए.सी.त फिरून या. असं थोडंच आहे काहीतरी खरेदी केलीच  पाहिजे?

जे काही आहे ते आपण स्वतःच आहोत प्रथम आपल्यावर प्रेम करा. आपल्याला मनाच्या आरशात बघा. समजून घ्या. भगवान रजनीश नेहमी म्हणायचे एकदाच सर्व कपडे काढून, नग्न अवस्थेत आरशासमोर उभे रहा आणि आपल्याला ओळखा.

Unknown

No comments: