मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी एक नवीनच फतवा काढला की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घटक चाचणी परिक्षा लेखी स्वरूपात न घेता फक्त तोंडीच घ्यायची, का तर म्हणे मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो. दिवसेदिवस शिक्षण फारच सोपे होत चालले आहे. आम्ही मागे एकदा ब्लॉग मधून लिहीले होते की मुलाची एवढी काळजी असेल तर सर्व इयत्तांच्या परिक्षाच रद्द कराव्यात, म्हणजे मुलांना परिक्षेचा ताण येणार नाही, पर्यायाने पालकांची सुद्धा या प्रकारातून सुटका होईल. सर्वांना फक्त पुढील वर्गात ढकलायचे. अशा प्रकारे दहावीच्या मुलांना किती सोईस्कर होईल. परिक्षा मंडळाचा किती खर्च वाचेल. शिवाय सगळे पास. टक्केवारी प्रमाणे पुढील प्रवेश द्यावेत. कॉपी अजिबात होणार नाहीत. कॉपी कशासाठी होते पास होण्यासाठीच ना! सगळेच पास तर कॉपी कोण करणार.कल्पना करा परिक्षाच रद्द केल्यातर किती पैसा वाचेल. कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचतील. ज्याला गरज आहेत तो अभ्यास करेल. नाही केला तरी बिघडत नाही पास होणारच आहे. अजून एक सुचवावेसे वाटते, मुलांना विषय ऐच्छिक ठेवावेत, भले त्याने एक विषय का घ्यायना, पण त्याने त्या विषयात पास व्हायचे. मग त्याच्या करियरचा त्यानेच विचार करावा. कशाला त्या बिचार्‍यावर विषयांचे ओझे लादायचे. मग सर्व मंडळी खुष.

आपल्याला या भारतात एक कर्तबगार बाबा, महाराज, अम्मा, ताई वगैरे बनून नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असेल तर खालीलप्रमाणे कमीतकमी पात्रता (qualification) पाहिजे.

१) आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे.

२) नावापुढे किंवा नावाआधी पुरूषांनी परमपूज्य, कृपालू, दास, महाराज, नाथ, बाबा, ह.भ.प., राधा, स्वामी, योगी, बालयोगी, सिद्धयोगी आणि स्त्रीयांनी अम्मा, अक्का, मा, माता, बाई, देवी, बहेना अशा उपाध्या लावण्याची तयारी ठेवावी.

३) स्वतःच्या जयंत्या साजर्‍या करताना लाज बाळगू नये.

४) लाज, शरम, मान, अभिमान सर्व गहाण टाकावे.

५) धर्माचा अभ्यास चांगला असावा, शिवाय लोकांना न समजेल अशा भाषेत धर्म, अध्यात्म समजावून देता आले पाहिजे.

६) छोटेमोठे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत.

७) शिष्यगण भरपूर असावा, त्यात महिलांना प्राधान्य द्यावे.

८) स्वतःचे माहात्म्य सांगणारी पुस्तके, हॅंडबिले छापून वाटण्याची तयारी ठेवावी.

९) कोणतीही तक्रार आल्यास तक्रार निवारण न करता, तक्रारदारालाच निवारण करता आले पाहिजे.

१०) कमितकमी बोलावे, शक्यतो शिष्यगणांनाच बोलू द्यावे.

११) नकली गिर्‍हाईक ओळखण्याची क्षमता पाहिजे.

१२) खालील वस्तु जवळ बाळगाव्यात - लिंबू, सुई, टाचण्या, भगवी कफणी, पांढरे कपडे, कमंडलू, रूद्राक्ष, शंख, बिब्बा, कवड्या, उडीद काळे आणि पांढरे, काळे दोरे, अंगारा, पाणी,जानवे, लाल दोरा, भंडारा, नारळ, देवांच्या मूर्ती, हळदीकुंकू, त्रिशूल, तावीज वगैरे.( हे सर्व साहित्य विकण्याचे दुकान नातेवाईकालाच द्यावे.)

आमचे असे ऐकिवात आहे की,या देशातील सर्व बाबा आणि अम्मा लोक एकत्र येऊन एक अधिवेशन भरवणार आहेत आणि त्यात खालील ठराव पास करून घेणार आहेत.(अगदी संस्कार आणि आस्था चॅनेलवरील सुद्धा)

युनियन करणे, अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठाची स्थापना करणे, सरकारकडे अनुदान मागणे, मठ आश्रमासाठी आरक्षण मागणे, लोकसभेत जागा राखीव, झेड सिक्युरिटी. 

भारतात बुवाबाजीचे आणि माताजींचे प्रमाण एवढे आहे की, पदवीधर, अनाडी, गरीब, श्रीमंत, राजकारणी सर्व त्यांच्या नादी लागलेले असतात, आणि त्यांच्यात आपले भले, शांतता, पैसा शोधत असतात. यातील काही नमुने -

१) बाबुभाई पठाण - कारंजा, ता.राहुरी  २) माऊली - नारायणपूर  ३) रमजान गुंडू शेख - कोल्हापूर ४)अरुणा लोखंडे उर्फ ताईमाऊली - आळंदी  ५) हनुमानभक्त शिवाजी कोते - शिर्डी  ६) भास्कर शंकर वाघ, धर्मभास्कर - धुळे  ७)नरेंद्रमहाराज उर्फ जगदीश सुर्वे - नाणीज  ८)विनोदानंद झा उर्फ स्वामी सदाचारी उर्फ ॐ महाराज  ९) नेमीचंद गांधी  १०) मल्लीनाथ महाराज - लातूर    ११) लीलाताई कर्वे - बदलापूर  १२) बैठक पंथ - रेवदंडा,जि.रायगड  १४) बशीर पटेल - शहादा  १५) माणिक अवघडे - सातारा  १५) तात्या सरमळकर - नेरूळ  १६) निर्मला माता  १७) मानसी देवस्थान - वेंगुर्ला  १८) मल्लीनाथ आश्रम - भिगवण  १९) महादेव मोरे - जयसिंगपूर  २०) करमालीबाबा - खेडशिवापूर  २१) तुर्रेवालाबाबा - जुन्नर  २२) दत्तईदास - तळेगाव देवशी  २३)सिद्ध सायन्स - वडगाव शेरी, पुणे  २४) भानुदास गायकवाड उर्फ गोडबाबा - बारामती  २५) अनुराधाबाई देशमुख - मोहोळ, सोलापूर  २६) सत्यसाईबाबा - पोट्टपर्ती, आंध्र प्रदेश  २७) जयराम पवार - रत्नागिरी  २८) जयरामगिरी - सांगली  २९) साहिबजादी - सातारा  ३०) बेबी राठोड - यवतमाळ  ३१) श्री डुंगेश्वर - कोचरे  ३२)श्री देवभोम - आंबुर्ले  ३३) शेषचंद्र महाराज - बुलढाणा  ३४) अमृता काळे - पंढतपूर  ३५)  बाल दत्तमहाराज - नांदेड   ३६) करीमबाबा -   मिरज  ३७) संतोष शेवाळे -  औरंगाबाद   ३८) रईसाबेगम - परभणी  ३९)  दत्त भगत - परभणी   ४०) कोंडीराम बढेबाबा - पारनेर, नगर  ४१) डॉक्टरबाबा - असलोद, शहादा  ४२) गुरव बंधू - कोल्हापूर  ४३) रनाळकर महाराज - डोंबिवली, कल्याण  ४४) विलासबाबा - लोणंद, सातारा.असे अनेक महाराज, बाबा, आनंद, गुरू, योगी, बालयोगी, स्वामी राधा, दास, नाथ, नागनाथ, सखा, तारणहार, परमपूज्य, ह.भ.प., माता, ताई, अम्मा, अम्माभगवान, अक्का, देवी अशी  नावे लावून हा बुवाबाजीचा धंदा खोलतात.

हा धंदा एवढा   तेजीत चालतो की बस्स‍! फक्त थोडी चलाखी पाहिजे.

आजमितीला पुणे शहरात देवऋषी बघणारे ८०० ते ९०० देव्हारे आहेत, जे अधिकृत आहेत. शिवाय लहानलहान तर जवळजवळ ५०००च्या आसपास आहेत. यांची दुनिया निराळी आहे. यांचे कायदे, नियम वेगळे आहेत. यांच्याबद्धल पुन्हा बघू.

भारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत? त्यांना हे आधीच का कळले नाही.

सरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.

काही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे?  रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले? मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का? तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार? इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार? त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का ? जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे ?.
थोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.
त्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का ? मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.
अचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का ? मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे ? डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.
आता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.
सकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल ?
पण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.
आता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब? आणि आपण इथे कसे? इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.
मी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.
साहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.
मी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...
  • भारतीय जनता
    खूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...
  • वास्तुपुरुष
    मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ▼  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ▼  March (5)
      • परिक्षाच रद्द करा
      • बाबा आणि अम्मा
      • बुवाबाजी
      • कॄपालू महाराजांची कृपा
      • किडनी
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose