अक्षयतृतीया

रविवार दि.१५ मे रोजी ’अक्षयतृतीया’ आहे, त्या निमीत्ताने. अक्षयतृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही. वैशाख मासातील शुद्ध तृतीयेला ’अक्षयतृतीया’ म्हणतात. यादिवशी कृत युगाला सुरूवात झाली, म्हणून कृत युगात या देवसाला पाडवा म्हणत. यादिवशी ब्राह्मणाला पाण्याचा कलश दान करतात, त्याने विष्णू, शिव आणि पितरांचे तृष्णाशमन होते. या दिवशी शेतकरी शेताच्या कामाला सुरूवात करतात. ते लोक वसंतोत्सव साजरा करतात. या दिवशी दान, हवन केलेले क्षयाला जात नाही, आणि पितरांविषयी केलेले कार्य अविनाशी होते. महत्वाचे म्हणजे या दिवशी सोने खरेदी करून घरातील सोन्यात ठेवल्यास सोने कधिही चोरीला जात नाही, ते अक्षय मालकाजवळच राहते. जर बुधवारी अक्षयतॄतीया आल्यास, त्या दिवसाचे दान जन्मजन्मांतरी प्रभावी ठरते. या दिवशी जो ताक दान करतो तो धनवान होतो.

अक्षयतृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला. त्यावेळेस सत्ययुग आणि त्रेतायुग यांवा संधिकाल होता म्हणजेच सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू होत होते. त्रेतायुग आणि द्वापारयुगाच्या संधिकाली श्री प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला. यादिवशीही अक्षयतृतीयाच होती. म्हणजेच युग प्रारंभ अक्षयतृतीयेला होते, एवढे महत्व या तिथीला आहे. श्रीराम आणि परशुराम यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकात अनेक गैरसमज आहेत. या दिवशी परमपिता भगवानांच्या दिव्य आणि भव्य कार्याचे स्मरण करावे.

जे लोक या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदन विलेपन करतात, ते वैकुंठ लोकाला जातात. यादिवशी आपण जे जे काही करू ते  निरंतर अक्षय राह्ते, म्हणून पुण्य कर्मच करावे. या दिवशी श्राद्ध अथवा तर्पण केल्यास पितर मुक्त होतात. यादिवशी कुलदेवतेची पूजा केल्यास अक्षय कृपा राहते. यादिवशी आंबरसाचा नैवेद्य दाखवावा, आणि आंबे खायला सुरूवात करावेत.

रविवारी अक्षयातृतीया असून मृग नक्षत्र आहे. सुकर्मा योग आहे. तैतिल करण असून चंद्र मिथुनेत आहे. गुरू मीनेत असून सूर्य वृषभेत आहे.

या दिवशी थोडेका होईना, आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करा.

Unknown

1 comment:

Anonymous said...

एक कळलं नाही. रामाचा जन्म रामनवमीला का अक्षयतृतीयेला?