लिव्ह इन रिलेशनशिप

भारतीय न्यायव्यवस्थेने “ लिव्ह इन रिलेशनशिप ” ला मान्यता दिली आणि एक समुदाय या निर्णयामुळे सुखावला गेला, आता मजेत राहता येईल, कशाचीही जबरदस्ती नाही, कोणतेही पाश नाहीत. पण हा विचार तेवढ्या पुरताच होता. भविष्यात काय अडचणी येतील, याचा विचार ना न्यायव्यवस्थेने केला, ना संबंधित जोडप्यांनी केला. भारतात जाती, धर्म व्यवस्था किती कट्टर आहे, याचा अनुभव पदोपदी येतो, यात भर म्हणूनच काय, सध्याची जनगणना सुध्दा जातीनिहाय होणार आहे.अर्थात, याचेही दुष्पपरिणाम जाणवणार आहेत आणि ते एवढे भयंकर असणार आहेत कि, मागे फिरु म्हणता ही फिरता येणार नाही, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.
असो. तर परवा न्यायालयासमोर अजून एक प्रश्न आला, “ लिव्ह उन रिलेशनशिप ” मध्ये राहणार्‍या प्रेमींना अपत्य झाले, आणि पूर्वजांच्या मालमत्तेत वाटणी करताना या अपत्याचा प्रश्न आला कारण एकाच कुटुंबातील काही लग्न केलेले तर एखादा लग्न न करता तसाच संसार करीत असेल, आणि त्यांना अपत्य झाल्यास त्याला वाडवडिलांच्या संपत्तीत वाटा मिळेल का? यावर हा वाद गेला कोर्टात.कोर्ट पण किती अजब त्याच कोर्टाने निकाल दिला लिव्ह इन रिलेशिपमधून झालेल्या वारसास वाडवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही. आता आली का पंचाईत. एकीकडे कोर्ट परवानगी देते पण दुसरीकडे त्यांच्या अपत्यांना न्याय नाही. आता असा विचार होतो, कि त्या बिचार्‍या मुलाची काय चूक, की त्याचा जन्म “ लिव्ह इन रिलेशनशिप ” मधून झाला !
हा ! तर आता खरे त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागलेत. उद्या त्या मुलांच्या लग्नाचे काय? कोण त्यांच्याशी सोयरिक करणार? जी विवाहसंस्था जगाने, सर्व धर्मानी मान्य केली त्याचे काय? जर त्या पतीपत्नीत वाद निर्माण झाले तर ते समाजाने सोडवायचे का? कोणत्या समाजाने? जर कोणाचा मृत्यु झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार कशा प्रकारे करायचे? शेवटी त्या दोघात काही भावनिक जिव्हाळा असेल काय? जर जोडीदारांपैकी कुणा एकाचा मृत्यु झाला तर दुसर्‍याची जबाबदारी कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या आधाराने घ्यायची? या सर्व प्रश्नांना आणि त्यांच्या परिणामांना फक्त तेच जबाबदार आहेत, ज्यांना या अशा अधार्मिक, नियमबाह्य, विवाहसंस्था मोडीत काढून परवानगी दिली. 

Unknown

1 comment:

Dattadas said...

Today every human has become materialistic. Everybody has embrassed the material things and nobody thinks that these material things can give only momentum pleasure, but not eternal "Anand". The only eternal "Anand" is in "giving" to others and "giving up" for the God. Adhatmya and our spiritual thinking only will put you in the peace and not the things like "Living Relationship". Fulfilling responsibilities and duties towards others (including society) and being obliged to the whole world including all creations of the God will only give everybody "Anand".


Dattadas