Saturday, June 12, 2010

गंमत

Saturday, June 12, 2010

१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्रथम ‘D' हे अक्षर आढळते.

१ ते १९९ च्या स्पेलिंगमध्ये ‘A’,`B', आणि ‘C' आढळत नाही. तर १००० च्या स्पेलिंगमध्ये प्रथमच ‘A' हे अक्षर येते.

१ ते ९९९,९९९,९९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये ‘B' आणि `C' अक्षरे नसतात. बिलियनच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदाच ‘B' हे अक्षर येते.

तर इंग्लिश अंकांच्या मोजदादीत कुठेही ‘C' हे अक्षर येतच नाही .

There is no A,B,C and D alphabets in the spellings of 1 to 99 and D alphabet enters first time in the spelling of number 100.

There is no A, B and D alphabet in the spellings of numbers 1 to 199, but A enters first time in the spelling of number 1000.

There is no B and C alphabet in the spelling of numbers 1 to 999,999,999 but alphabet B comes first time in the spelling of number `Billion'.

Very important nowhere there C alphabet in English number counting.


8 comments

Wednesday, June 09, 2010

हिंदुस्थान

Wednesday, June 09, 2010

‘ सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा ’ ‘ दूर हटो दूर हटो ए दुनियावालो, हिंदुस्थान हमारा हैं.’ इंग्रजांच्या काळांत भारताला हिंदुस्थान म्हणत. पण नंतरच्या काळात ‘ हिंदुस्थान ’ हा शब्दच गायब झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत हा शब्द का स्वीकारला गेला? हिंदुस्थान का नाही? खरे तर हिंदूंचा प्रदेश म्हणजेच हिंदुस्थान. पण पध्दतशीरपणे, हा शब्द डावलला गेला. कोणातरी जमातीसाठी हा शब्द उच्चारणे जड होते म्हणून हिंदुस्थान हा शब्द सरकारी कामकाजातून बहिष्कृत केला गेला. ‘ स्टेट बॅंक ऑफ इंडिया ’, ‘ बॅंक ऑफ इंडिया ’ हे कशासाठी? इंडिया हा शब्द इंग्रजांनी आणला आता आपण ‘ स्टेट बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ किंवा ‘ बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ का नाही म्हणू शकत. हिंदुस्थान या नावात एवढे सामर्थ्य होते कि त्यामुळे या प्रदेशाशी असलेले हिंदूंचे नाते प्रकर्षाने जाणवते शिवाय स्वातंत्र्यलढा या हिंदुस्थानसाठीच झाला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी हिंदूंच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठीच हौतात्म्य पत्करले. नंतर मात्र राजकारण्यांनी कांही अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालना साठी हिंदुस्थानातून ‘ हिंदुस्थान ’ या शब्दाला हद्दपार केले.
जर भारतातील शहरांची नावे आपण बदलू शकतो तर हिंदूंची ओळख असलेल्या प्रदेशाचे नाव ‘ भारत ’  किंवा ‘ इंडिया ’ का? जगात हिंदू धर्माला वैदिक परंपरा आहे, हिंदूंना सुध्दा परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, पं जवाहरलाल नेहरु आदींसारखे नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत. हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मग हिंदुस्थान या शब्दाला कोणी हद्दपार केले? ज्याज्या ठिकाणी भारत आणि इंडिया शब्द आहेत ते काढून त्या ठिकाणी हिंदुस्थान हाच शब्द योग्य आहे. जर स्वातंत्र्यावेळेस पाकिस्तान निर्माण होऊ शकते मग हिंदुस्थान का नाही?.


4 comments

Monday, June 07, 2010

लिव्ह इन रिलेशनशिप

Monday, June 07, 2010

भारतीय न्यायव्यवस्थेने “ लिव्ह इन रिलेशनशिप ” ला मान्यता दिली आणि एक समुदाय या निर्णयामुळे सुखावला गेला, आता मजेत राहता येईल, कशाचीही जबरदस्ती नाही, कोणतेही पाश नाहीत. पण हा विचार तेवढ्या पुरताच होता. भविष्यात काय अडचणी येतील, याचा विचार ना न्यायव्यवस्थेने केला, ना संबंधित जोडप्यांनी केला. भारतात जाती, धर्म व्यवस्था किती कट्टर आहे, याचा अनुभव पदोपदी येतो, यात भर म्हणूनच काय, सध्याची जनगणना सुध्दा जातीनिहाय होणार आहे.अर्थात, याचेही दुष्पपरिणाम जाणवणार आहेत आणि ते एवढे भयंकर असणार आहेत कि, मागे फिरु म्हणता ही फिरता येणार नाही, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.
असो. तर परवा न्यायालयासमोर अजून एक प्रश्न आला, “ लिव्ह उन रिलेशनशिप ” मध्ये राहणार्‍या प्रेमींना अपत्य झाले, आणि पूर्वजांच्या मालमत्तेत वाटणी करताना या अपत्याचा प्रश्न आला कारण एकाच कुटुंबातील काही लग्न केलेले तर एखादा लग्न न करता तसाच संसार करीत असेल, आणि त्यांना अपत्य झाल्यास त्याला वाडवडिलांच्या संपत्तीत वाटा मिळेल का? यावर हा वाद गेला कोर्टात.कोर्ट पण किती अजब त्याच कोर्टाने निकाल दिला लिव्ह इन रिलेशिपमधून झालेल्या वारसास वाडवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही. आता आली का पंचाईत. एकीकडे कोर्ट परवानगी देते पण दुसरीकडे त्यांच्या अपत्यांना न्याय नाही. आता असा विचार होतो, कि त्या बिचार्‍या मुलाची काय चूक, की त्याचा जन्म “ लिव्ह इन रिलेशनशिप ” मधून झाला !
हा ! तर आता खरे त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागलेत. उद्या त्या मुलांच्या लग्नाचे काय? कोण त्यांच्याशी सोयरिक करणार? जी विवाहसंस्था जगाने, सर्व धर्मानी मान्य केली त्याचे काय? जर त्या पतीपत्नीत वाद निर्माण झाले तर ते समाजाने सोडवायचे का? कोणत्या समाजाने? जर कोणाचा मृत्यु झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार कशा प्रकारे करायचे? शेवटी त्या दोघात काही भावनिक जिव्हाळा असेल काय? जर जोडीदारांपैकी कुणा एकाचा मृत्यु झाला तर दुसर्‍याची जबाबदारी कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या आधाराने घ्यायची? या सर्व प्रश्नांना आणि त्यांच्या परिणामांना फक्त तेच जबाबदार आहेत, ज्यांना या अशा अधार्मिक, नियमबाह्य, विवाहसंस्था मोडीत काढून परवानगी दिली. 


1 comments

Saturday, June 05, 2010

मेरा भारत महान

Saturday, June 05, 2010

२८ मे २०१० रोजी रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि कित्येक लोकांनी प्राण गमावले हा हल्ला माओवादी संघटनेने केला असे बोलले जाते. या हल्ल्यास जबाबदार असणार्‍या पीसीएपीए या संघटनेचा नेता म्हणतो, “ सॉरी, मला माफ करा, आम्हाला मालगाडी उडवायची होती पण, चुकीने प्रवासी रेल्वे उडवली गेली ”. अरे वा ! काय पण विनयशीलता ! अगदी क्षमा मागून मोकळे झाले, संघटनेचे नेते, बापी महातो. मग ज्यांचे नातेवाईक गेले, ज्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांचे काय? पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय? त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर? त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर? फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय? प. बंगालचे पोलिस महासंचालक जेव्हा या हल्ल्याचा सूत्रधार बापी महातोच आहे म्हणतात आणि त्याचा शोध घेण्याचे जारी करतात, तेव्हा या बापी महातोला कोलांटी उडी मारण्याची बुध्दी होते, आणि आपले सरकारही त्याने माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करेल.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीच तर औरच, त्यांनी रात्रीच्या गाड्याच बंद करण्याचे फर्मान सोडले. जर दिवसा हल्ले झाले तर मग काय दिवसाही गाड्या बंद करणार? अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल? एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय? हे सरकारचे धोरण आहे, हेच अतिरेक्यांना धीट करते. जर फाशीचे शिक्षा झाली आणि लगेचच त्या आरोपीला फाशी दिली गेली तरच त्या फाशीला अर्थ आहे, नाहीतर कागदोपत्रीच फाशीचा काय उपयोग. कसा आरोपींना धाक राहणार.
संसदेवर हल्ला झाला तर काय लोकसभेचे कामकाज दुसरीकडे जंगलात चालू करणार का? हा शुध्द पळपुटेपणा आहे आणि हा भारतीय नेत्यांनीच करावा, आणि त्याचे परिणाम भारतीय जनतेने भोगावेत, हेच भारतीयांच्या नशीबाचे भोग आहेत. तेव्हा चला पासपोर्ट व्हिसा काढा आणि परदेशी स्थायिक व्हा. मग तिथे बसून म्हणा ‘ मेरा भारत महान ’.


1 comments

Friday, June 04, 2010

जात

Friday, June 04, 2010

भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात आली होती. नंतरच्या १९०१ च्या जनगणनेत भारतात एकंदर १६४६ विविध जाती आढळून आल्या, आणि त्याच जातींची संख्या १९३१ च्या जनगणनेत ४१५० पर्यंत वाढल्या म्हणजे हा फरक काय असावा? १९०१ च्या गणनेत लोकांनी आपली जातच लपविली का? पण ते कसे शक्य आहे.?
एकेकाळी आपण उच्च जातीचे आहोत हे सांगण्यासाठी लोक पुढे सरसावत. उदा०. १९२१ च्या जनगणनेत एकाने हलकी जात सांगितली असेल तर तोच मनुष्य १९३१ च्या जनगणनेत ब्राह्मण जात सांगत असे. कारण त्या काळी जातीवरुन राजकारण होत नव्हते तर, सामाजिक वर्तनात फरक पडत होता. १९५३ मध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर सरकारने हि पध्दत बंद केली.
काय जमाना बदलतो बघा, लग्न करताना लोक उच्च जात बघतात तर सरकारी नोकरी,शैक्षणिक फायदे, आरक्षण मिळविण्यासाठी आपण अनुसूचित जमातीचे कसे आहोत हे सांगण्याची स्पर्धा होते. उच्च जातीचे लोकही आज सरकारकडे अर्ज करत आहेत, त्यांना ओ. बी. सी. मध्ये समावेश हवा आहे. त्यासाठी समाजकल्याण मंत्रालयात कोटींनी लाच देण्यासाठी वर्गणी काढायला समाजातील घटक तयार आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयही जातीची नोंद करण्याचा आग्रह धरतात. हा सर्व खेळ राजकारण्यांचा आहे. सर्व गणना झाल्यावर प्रदेशाप्रमाणे जातींची संख्या लक्षात घेऊन, निवडणूक लढवताना त्याप्रमाणे आराखडे आखता येतील, हे उघड आहे. विशिष्ट नेत्यांची पोळी भाजली जाणार हे उघड सत्य आहे.
या जातीनिहाय जनगणनेस शिवसेनेने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. या नोंदणीतून जातीजातीतील युध्द भडकणार हे निश्चित आहे. संसदेत आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण हवे आहे, त्यामुळे जातीव्यवस्था आणखी संवेदनशील होणार यात शंका नाही. आत्ताच नक्की आकडेवारी नसताना टोकाचे राजकारण खेळले जाते तर जातगणना झाल्यावर ठराविक प्रदेशांवर, वस्त्यांवर किती अत्याचार होतील, याचा कोणी विचार केला आहे काय?
उदा. मुंबईतील परळ भागात कोणत्या जातीचे लोक, काय संख्येने आहेत हे समजल्यावर नेते मंडळी त्या भागासाठी काय भूमिका घेतील हे देवच जाणो. जर प्रेमविवाह जातीपातीच्या पुढे जाऊन होतात तर जात गणना काय कामाची? स्त्री आणि पुरुष, हे सध्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वागतात तर ते आपली जात आता कोणती सांगणार. आत्ताच्या जमान्यात आंतरजातीय विवाह होतायेत त्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप येत नाही तर उद्या आंतरधर्मीय विवाह होऊ लागले तर, जात हा शब्द जातच राहील आणि हातात काय उरेल? भली मोठी पोकळी.


0 comments