मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

खरी ओळख पटली
"गांधीवादाचा बुरखा पडला गळून' या अग्रलेखातून अण्णा हजारे या स्वयंघोषित महात्म्याचा बुरखा फाडला, याचे कौतुक वाटले. ज्या देशातील पंतप्रधानांवर खटले दाखल होतात, न्यायाधीशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते किंवा काही मंत्री, खासदारांना सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळत नाही, त्या देशातील लोकशाहीस्वीकृत संसदेला आपण म्हणू तसा कायदा लागू करू पाहणाऱ्या अण्णा हजारे यांची खरी ओळख आता पटली. शरद पवार व्यक्‍ती म्हणून किती स्थितप्रज्ञ आहेत हे त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर लक्षात आले; पण अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला मात्र आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलताना काय बोलावे हे कळत नाही. हजारेंचा ढोंगी व बुरख्याआडचा गांधीवाद लक्षात आला. श्री. पवार यांच्यासारखा संयमी नेता जनतेला पाहायला मिळाला, तर वाचाळ "समाजनेता' जनतेने अण्णांच्या रूपाने पाहिला. अशा अण्णांना महात्मा पदवी देऊन खऱ्या महात्म्याची मात्र पुन्हा नाचक्‍की केली आहे
.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.

 

http://www.esakal.com/esakal/20111208/4813577296417256611.htm

दैनिक सकाळ मधील अनेक पत्रांपैकी हे एक पत्र. अण्णांबद्दल काय काय लोकांनी विचार केले होते. पण यश अण्णांच्या डोक्यात गेले. काही जणांनी अण्णांना महात्मा गांधींबरोबर नेऊन ठेवले, त्यांनीच विचार करावा गांधी असे बोलले असते काय? त्यांची योग्यता काय? अण्णांची काय? अण्णा आता हे बास झाले. लोक तुमची साथ सोडू लागलेत. तुम्ही संयम बाळगायला हवा. कारण भारतीय जनता कधी कोणाला पायदळी तुडवेल सांगता येत नाही. तेव्हा अण्णा सांभाळून, बरं का!

आम्हांला राज कपूरच्या सिनेमांचे वेड लावणारा एक अवलिया होता, तो म्हणजे पोवळे. आम्ही जिथे काम करत होतो, तेथे तो वेल्डरचे काम करायचा, आणि रहायचा वडगावला. कंपनीपासून साधारण २० कि. मी. वर. त्यावेळेस म्हणजे १९६८चा सुमार असेल, त्याकाळी त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता. एक एक रेकॉर्ड १५ रू. ना मिळायची, आणि तो ती विकत आणायचा. राजकपूरचे चित्रपट आह, श्री ४२०, चोरी चोरी, बरसात, आवारा, जागते रहो, जिस देशमे गंगा बहती है, बूट पॉलिश, अनाडी, अंदाज वगैरे. बस त्याच्या समोर विषय काढायचा.

एक एक गाणे तो अक्षरशः म्हणून दाखवायचा, नव्हे तर रसग्रहण करायचा. बरसात चे गाणे हमसे मिले तुम आणि त्यातील राजकपूरचे व्हायोलीन वाजवणे, आवरा मध्ये दम भर जो उधर या गाण्यातील राजकपूर नर्गिसच्या केसातून जे हात फिरवतो, आह मध्ये राजकपूर आजारी असतो आणि आजारे अब मेरा या गाण्यातील त्याचा आर्त अभिनय, संगम मधील जेव्हा त्याला वैजयंतीमालाचे राजेंद्रकुमारने लिहीलेले पत्र सापडते त्यावेळेसचा त्याचा सर्दी झालेला अभिनय, चोरी चोरीतील गाणे आठवते, ये रात भिगी भिगी किंवा आजा सनम मधील अभिनय, किती किती तो सांगायचा. राजकपूर त्याचे दैवतच होते. खरोखरच त्यावेळेस माणसे अशी रसिक होती. त्याकाळी गाण्यांच्या  तबकड्या मिळायच्या आणि त्या आम्ही जुन्या बाजारात शोधत असू. तो काळच वेगळा होता. प्रवाह वेगळा होता.

http://sanskritworld.in/unicode-sanskrit-books/
मित्रांनो ही साईट पहा. एखाद्याने संस्कृत भाषेतील साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किती कष्ट करावेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्या सज्जन गृहस्थाचे नाव आहे,धवल पटेल. वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य दुसर्‍या साईट वरून कोड बदलून तयार करणे खरोखरच अवघड काम आहे, पण यांनी ते जिद्दीने केले, त्याबद्दल त्यांना सलाम.   

कृषीमंत्री शरद पवारांवर दुर्दैवी हल्ला झाला आणि काही म्हटले तरी हे दुर्दैवीच. म्हणजे लोकशाहीत हे दुर्दैवी्च. श्री. अण्णा हजारेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तर अण्णा पटकन म्हणाले, एकही मारा क्या? हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात? सगळं खोटं आहे. ढोंग आहे. यामुळे सर्व युवकांचा पाठिंबा अण्णा गमावतील हे नक्की.

आता प्रश्न असा आहे, हाच हल्ला अण्णांवर झाला असता तर? ते हेच म्हणाले असते काय? या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात? कमाल आहे.

भारतात हा प्रकार अजिबात खपवून घेऊ नये. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावतो आहे त्याचे काय?

आणखी किती दिवस महाराष्ट्रात भीक मागणार?

अलाहाबाद - "गरिबांच्या घरचे खराब अन्न खाऊन पोट बिघडवून घेतले नाही तर त्यांचे प्रश्‍न समजणार कसे,'' असा सवाल कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (सोमवार) नेत्यांना केला. "गरिबांची परिस्थिती समजलीच नाही, तर तुम्हाला संताप येणार कसा? मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. ""आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार?'' असा खडा सवाल उत्तरेतील तरुणाईला करत राहुल यांनी
विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुलपूरमध्ये फोडला.

साहेब, बरे झाले हे तुम्हीच कबूल केलेत. तुम्ही त्या राज्याची एवढी प्रगती करा, भीक मागायला कोणी कुठे जायलाच नको. आणि आता एक करा त्यानिरूपमला सुद्धा बोलावून घ्या तिकडे तोही भीक मागतो आहे. तुम्हीही आता हे भीकेचे राजकारणा सोडा. एवढेचे सांगणॆ.

http://sa.wikisource.org/wiki

मित्रांनो, संस्कृत विषयावरील एक उत्कृष्ट साईट. जरूर पाहण्यासारखी आहे. कोण किती कष्ट घेतात हे जाणून घ्यावे. जगात कोणीतरी काहीतरी सतत महान कार्य करत असतात, हे आपल्याला माहित नसते. पण हे जग चालत असते. इंटरनेट उघडल्याव्ररच कळते कोण किती कष्ट घेत असतात, मोबदल्याचा विचार न करता.

भारतात बाबा, ताई, माई, अक्का, कालीबाबा, बंगाली बाबा खूप मोठा धंदा करतात. कारण त्यांच्या मागे धावणारे भारतात खूप आहेत. लोकांना जरा त्रास झाला तर आहेच सल्ला देणारे. गंडा, तावीज, यंत्र, लिंबू कचर्‍याच्या किमतीमध्ये घेऊन खूप भारी किंमतीला देतात. लोकांना हे कळत नाही की, जे हे सर्व सांगतात त्यांचे पूर्वायुष्य कोणी पाहिले आहे काय? त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय? पण लोकांना एवढे प्रश्न असतात त्यापुढे बाकी कोण विचार करतो. पोलीस, सरकारी कर्मचारी, शिक्षणसंबंधी लोक सुद्धा या मागे असतात.

असे प्रश्न ज्या ठिकाणी पाहिले जातात, त्याला देव्हारा म्हणतात. अशा ठिकाणी एक भगत बसतो, त्याच्या अंगात येते किंवा तो कवड्या  टाकून प्रश्न विचारतो, मग काय पैशाची लूटच. अशा प्रकारचे देव्हारे एकट्या पुण्यात जवळ जवळ पाच हजार असावेत असा अंदाज आहे. आणि त्यात वर्षाला अंदाजे करोड रूपयाची उलाढाल होत असावी अंदाज आहे. त्यात सुद्धा ज्युनियर सिनीयर असतात. त्यांचा सुद्धा एक मोठा गुरू असतो. _______

बाकी सविस्तर पुढे पाहू यात.

http://www.esakal.com/esakal/20111019/4629862082212766565.htm

टीम अण्णा"त फूट

(सकाळ न्यूज नेटवर्क)

Wednesday, October 19, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: snn,  team anna,  anna hazare,  lokpal bill

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराला विरोध आणि जनलोकपाल विधेयक या मुद्यांवर एकत्र आलेल्या "टीम अण्णा'मध्ये फूट पडली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "कोअरग्रुप'मधील पी. व्ही. राजगोपाल आणि राजेंद्र सिंह यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने राजकीय वळण घेतल्यामुळे आपण बाहेर पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिस्सारमध्ये कॉंग्रेसविरोधात प्रचार करण्याचा निर्णय हा संपूर्ण "कोअर ग्रुप'चा नव्हता, असाही दावा राजगोपाल आणि राजेंद्रसिंग यांनी केला आहे.

अण्णा आपण खरे तर चांगले काम करत होतात, पण कुठे माशी शिंकली आपल्यात फूट पडली. ते होणार होतेच. कारण अण्णा आपण आपल्या आंदोलनात राजकारण आणलेत. कॉंग्रेसविरोधी प्रचार केलात, म्हणजे बाकी सर्व पक्ष धुतल्या तांदळासारखे काय? अण्णा आपण अफजल गुरू, कसाब बद्दल काहीच बोलत नाही आहात. का? कितीतरी शिक्षणा संस्थेतील घोटाळे आपण का पहात नाही? किती किती सांगायचे अण्णा. आता देवाची मर्जी.

भारतात हवामान खाते जेव्हा अंदाज व्यक्त करते तेव्हा लोक त्याची चेष्टा करतात. जसे जेव्हा खाते पावसाचा अंदाज सांगते तेव्हा हमखास पाऊस पडणार नाही याची खात्री असते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवामान खाते सांगते, यापुढे तीन चार दिवस पाऊस पडणार, पण जर पाऊस पडला नाही तर लगेच सूर्यप्रकाशाचा अंदाज होणार. अगदी ठरवून अंदाज चुकतात. पण एक बरे कधितरी अंदाज बरोबर येतात. आणि हवामान खात्याची लाज राखली जाते.

पण आता मी इथे अमेरिकेत आहे, या ठिकाणी हवामान खात्याची  वेब साईट आहे, त्यावर अगदी तासातासाचाही अंदाज असतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी अगदी त्याप्रमाणेच हवामानात बदल होतो.

असे वाटते, निसर्गच या हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे बदलतो. त्याला स्वतःचे असे मत नाहीच.

योगायोग - १३ ऑक्टोबर हा किशोरकुमारचा मोठा भाऊ अशोककुमारचा वाढदिवस होय.

हरहुन्नरी गायक किशोरकुमार यांची १३ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी. अगदी डोळ्यासमोर येतो तो माणूस. त्याचे लक्षात राखण्याची भूमिका म्हणजे एक चतुर नार मधील गायक. दूर गगन की छाव मे मधील बाप. चलती का नाम गाडी मधील मेकॅनिक. किती गोष्टी आठवाव्यात.

त्याचे मूळ नाव आभास कुमार गांगुली, जन्म ४ ऑगस्ट १९२९. पण या आकड्यांना काय महत्व आहे. त्या दिचशी कितीतरी माणसे जन्मली असतील. पण या तारखेचे महत्व वाढवणारा एकच, किशोरकुमार.

पहा त्याची कारकीर्द.

Winner:

Year
Song
Film
Music director
Lyricist

1969
Roop tera mastaana
Aradhana
Sachin Dev Burman
Anand Bakshi

1975
Dil aisa kisi ne Mera
Amanush
Shyamal Mitra
Indeevar

1978
Khaike Pan Banaras Wala
Don
Kalyanji-Anandji
Anjaan

1980
Hazaar raahen mudke dekheen
Thodisi Bewafaii
Khayyam
Gulzar

1982
Pag ghungroo baandh ke meera nachi
Namak Halaal
Bappi Lahiri
Anjaan

1983
Hamen aur jeene ki
Agar Tum Na Hote
Rahul Dev Burman
Gulshan Bawra

1984
Manzilen apni jagah
Sharaabi
Bappi Lahiri
Anjaan

1985
Saagar Kinaare
Saagar
Rahul Dev Burman
Javed Akhtar

Nominated:

Year
Song
Film
Music Director
Lyricist

1971
Zindagi Ek Safar
Andaz
Shankar-Jaikishan
Hasrat Jaipuri

1971
Yeh Jo Mohabbat Hai
Kati Patang
Rahul Dev Burman
Anand Bakshi

1972
Chingari Koi Bhadke
Amar Prem
Rahul Dev Burman
Anand Bakshi

1973
Mere Dil Mein Aaj
Daag: A Poem of Love
Laxmikant-Pyarelal
Sahir Ludhianvi

1974
Gaadi Bula Rahi Hai
Dost
Laxmikant-Pyarelal
Anand Bakshi

1974
Mera Jeevan Kora Kagaz
Kora Kagaz
Kalyanji Anandji
M.G.Hashmat

1975
Main Pyaasa Tum
Faraar
Kalyanji Anandji
Rajendra Krishan

1975
O Manjhi Re
Khushboo
Rahul Dev Burman
Gulzar

1977
Aap Ke Anurodh
Anurodh
Laxmikant-Pyarelal
Anand Bakshi

1978
O Saathi Re
Muqaddar Ka Sikander
Kalyanji-Anandji
Anjaan

1978
Hum Bewafa Harghiz
Shalimar
Rahul Dev Burman
Anand Bakshi

1979
Ek Rasta Hai Zindagi
Kaala Patthar
Rajesh Roshan
Sahir Ludhianvi

1980
Om Shanthi Om
Karz
Laxmikant-Pyarelal
Anand Bakshi

1981
Hameh Tumse Pyar
Kudrat
Rahul Dev Burman
Majrooh Sultanpuri

1981
Chhookar Mere Mann Ko
Yaraana
Rajesh Roshan
Anjaan

1983
Shayad Meri Shaadi
Souten
Usha Khanna
Sawan Kumar

1984
De De Pyar De
Sharaabi
Bappi Lahiri
Anjaan

1984
Inteha Ho Gayi
Sharaabi
Bappi Lahiri
Anjaan

1984
Log Kehete Hai Main
Sharaabi
Bappi Lahiri
Anjaan

सौजन्य -

http://en.wikipedia.org/wiki/Kishore_Kumar

अण्णांचा कॉंग्रेस विरोधी प्रचार अयोग्य - हेगडे

वृत्तसंस्था

Monday, October 10, 2011 AT 04:20 PM (IST)

Tags: congress,  satosh hegade,  anna hazare

बंगरूळ - हरियानातील हिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायाधीश संतोष हेगडे यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.
यासंदर्भात हेगडे म्हणाले,""प्रत्येक राजकीय पक्षात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असतात. एखाद्या पक्षात काही वाईट प्रवृत्ती असल्या तर याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पक्ष एकाच विचाराचा आहे. त्यामुळे कॉंगेसला विरोध करणे योग्य नाही. अशा प्रचाराला माझा विरोध आहे. मात्र भ्रष्ट व्यक्ती किंवा भ्रष्ट समूहाविरोधात प्रचार करण्यास माझा पाठिंबा राहील. टीम अण्णांनी कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता वाईट प्रवृत्तीच्या उमेदवारांना विरोध करावा.''
हिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणार असल्याचे टीम अण्णांनी जाहीर केले आहे.

अण्णा आपण जे कार्य करता ते योग्यच आहे पण एखादा पक्षच योग्य नाही असे समजून त्या विरूद्ध प्रचार करणे योग्य नाही. कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी नाही तर त्यातील मंडळी ब्रष्टाचारी आहेत. त्या व्यक्तिंविरूद्ध प्रचार करावा. पक्ष श्रेष्ठ असतो, हे आपणास काय सांगावे.

'त्या' बेकरीत अल्पवयीन मुले कशी?

Friday, October 07, 2011 AT 02:45 AM (IST)

Tags: bakery burn case,  pune

पुणे - जुन्या बाजारात आग लागलेल्या समता बेकरीत बारा सिलिंडर ठेवण्याची परवानगी कशी मिळाली, तेथे अल्पवयीन मुलेही काम करीत होती; त्याची कोणी दखल का घेतली नाही, आदी प्रश्‍न उपस्थित करून, अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेत पोचले असते तर एका निष्पाप जिवाचा बळी गेला नसता, अशी खंत स्थानिक नागरिकांकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आली.

दैनिक सकाळ मधील एक बातमी. आतही भारतात अल्पवयीन मुलांना कामाला लावले जाते. सरकार मुलांना शाळेसाठी किती मदत देण्याचा प्रयत्न करते, पण लोकांची मानसिक स्थिती बदलण्याची आज गरज आहे. भावी पिढी शिकली नाही तर भारत कशी प्रगती करणार? आता यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायला सर्वात जास्त कष्ट घेतले ते महात्मा गांधींनी. पण आज त्यांची आठवण कोणाला आहे? परवाच २ ऑक्टोबर गांधी जयंती होती पण भारतात त्याची आठवण कोणाला होती काय? सर्व टी.व्ही. चॅनेलवाले नको नको त्या बातम्या दाखवतात, पण त्यांना गांधींबद्दल १० मिनीटे सुद्धा वेळ नव्हता. रविवारी गांधी जयंती आली, आणि एक दिवसाची सुट्टी बुडाली म्हणून कित्येक नोकरदार हळहळले असतील. फक्त आठवण असेल ती दारू पिणार्‍यांना कारण त्या दिवशी भारतात दारू मिळत नाही ना?

कोणत्याही वर्तमानपत्रातून लोकांना आठवण केली गेली नाही?

जर महात्मा गांधी नसते तर? किंवा त्यांनी या भानगडीत न पडता वकिली करून पैसा मिळवायचा विचार केला असता तर?

खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे !

नगर, २ ऑक्टोबर/प्रतिनिधी
altपारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी  देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आज सायंकाळी राळेगण येथे झालेल्या या ग्रामसभेला हजारे यांच्यासह करप्शन अगेन्स्ट इंडियाचे अरविंद केजरीवाल, उद्योगपती अभय फिरोदिया, त्यांच्या पत्नी इंदिरा फिरोदिया आदी उपस्थित होते. या सभेत राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी हजारे यांना गावाच्या वतीने ‘महात्मा’ उपाधीने गौरविण्याचा ठराव मांडला. हा ठराव मांडताना त्यांनी हजारे यांच्या ग्रामविकास व भ्रष्टाचार विरोधी कार्याचा आढावा घेतला. हजारे यांना विविध संस्थांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार व सन्मान दिले, मात्र गावाने त्यांना अद्यापी काहीही दिलेले नाही. सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांना ‘महात्मा’ पदवी देण्यात यावी असे मापारी यांनी सांगितले. टाळ्या व घोषणांच्या गजरात हा ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केल

अण्णा हजारे यांची माफी मागून, खरोखरच अण्णा महात्मा गांधींइतके थोर आहेत काय?

विद्यार्थी शाळेत जातात. पण काही विद्यार्थी जास्त तर काही कमी मार्क मिळ्वतात. समजा जाणकार भविष्यवेत्त्यांनी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, आणि त्यांना मार्ग सुचविले तर? शिवाय भारतात संमोहनशात्रातील जाणकार मंडळी आहेत त्यांनी या बाबतीत पावले उचलली तर?  वास्तुशास्त्रज्ञांनी याबद्दल मार्गदर्शन केले तर? भारतातील भावी पिढी पूर्ण सुशिक्षीत होईल आणि भारत जगात एक नंबर होईल ना?

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ▼  2011 (15)
    • ▼  December (2)
      • अण्णा विचार करा
      • राजकपूरचा अवलिया
    • ►  November (5)
      • धवल पटेल
      • अण्णा काय हे?
      • भीक
      • संस्कृत साहित्य
      • देव्हारा
    • ►  October (8)
      • अण्णा टीम
      • हवामान खाते
      • किशोरकुमार
      • अण्णा हे योग्य नाही
      • अल्पवयीन मुले
      • म. गांधींचे विस्मरण
      • अण्णा हजारे आणि म. गांधी
      • शक्य आहे काय?
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose