Thursday, December 08, 2011

अण्णा विचार करा

Thursday, December 08, 2011

खरी ओळख पटली
"गांधीवादाचा बुरखा पडला गळून' या अग्रलेखातून अण्णा हजारे या स्वयंघोषित महात्म्याचा बुरखा फाडला, याचे कौतुक वाटले. ज्या देशातील पंतप्रधानांवर खटले दाखल होतात, न्यायाधीशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते किंवा काही मंत्री, खासदारांना सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळत नाही, त्या देशातील लोकशाहीस्वीकृत संसदेला आपण म्हणू तसा कायदा लागू करू पाहणाऱ्या अण्णा हजारे यांची खरी ओळख आता पटली. शरद पवार व्यक्‍ती म्हणून किती स्थितप्रज्ञ आहेत हे त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर लक्षात आले; पण अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला मात्र आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलताना काय बोलावे हे कळत नाही. हजारेंचा ढोंगी व बुरख्याआडचा गांधीवाद लक्षात आला. श्री. पवार यांच्यासारखा संयमी नेता जनतेला पाहायला मिळाला, तर वाचाळ "समाजनेता' जनतेने अण्णांच्या रूपाने पाहिला. अशा अण्णांना महात्मा पदवी देऊन खऱ्या महात्म्याची मात्र पुन्हा नाचक्‍की केली आहे
.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.

 

http://www.esakal.com/esakal/20111208/4813577296417256611.htm

दैनिक सकाळ मधील अनेक पत्रांपैकी हे एक पत्र. अण्णांबद्दल काय काय लोकांनी विचार केले होते. पण यश अण्णांच्या डोक्यात गेले. काही जणांनी अण्णांना महात्मा गांधींबरोबर नेऊन ठेवले, त्यांनीच विचार करावा गांधी असे बोलले असते काय? त्यांची योग्यता काय? अण्णांची काय? अण्णा आता हे बास झाले. लोक तुमची साथ सोडू लागलेत. तुम्ही संयम बाळगायला हवा. कारण भारतीय जनता कधी कोणाला पायदळी तुडवेल सांगता येत नाही. तेव्हा अण्णा सांभाळून, बरं का!


0 comments

Wednesday, December 07, 2011

राजकपूरचा अवलिया

Wednesday, December 07, 2011

आम्हांला राज कपूरच्या सिनेमांचे वेड लावणारा एक अवलिया होता, तो म्हणजे पोवळे. आम्ही जिथे काम करत होतो, तेथे तो वेल्डरचे काम करायचा, आणि रहायचा वडगावला. कंपनीपासून साधारण २० कि. मी. वर. त्यावेळेस म्हणजे १९६८चा सुमार असेल, त्याकाळी त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता. एक एक रेकॉर्ड १५ रू. ना मिळायची, आणि तो ती विकत आणायचा. राजकपूरचे चित्रपट आह, श्री ४२०, चोरी चोरी, बरसात, आवारा, जागते रहो, जिस देशमे गंगा बहती है, बूट पॉलिश, अनाडी, अंदाज वगैरे. बस त्याच्या समोर विषय काढायचा.

एक एक गाणे तो अक्षरशः म्हणून दाखवायचा, नव्हे तर रसग्रहण करायचा. बरसात चे गाणे हमसे मिले तुम आणि त्यातील राजकपूरचे व्हायोलीन वाजवणे, आवरा मध्ये दम भर जो उधर या गाण्यातील राजकपूर नर्गिसच्या केसातून जे हात फिरवतो, आह मध्ये राजकपूर आजारी असतो आणि आजारे अब मेरा या गाण्यातील त्याचा आर्त अभिनय, संगम मधील जेव्हा त्याला वैजयंतीमालाचे राजेंद्रकुमारने लिहीलेले पत्र सापडते त्यावेळेसचा त्याचा सर्दी झालेला अभिनय, चोरी चोरीतील गाणे आठवते, ये रात भिगी भिगी किंवा आजा सनम मधील अभिनय, किती किती तो सांगायचा. राजकपूर त्याचे दैवतच होते. खरोखरच त्यावेळेस माणसे अशी रसिक होती. त्याकाळी गाण्यांच्या  तबकड्या मिळायच्या आणि त्या आम्ही जुन्या बाजारात शोधत असू. तो काळच वेगळा होता. प्रवाह वेगळा होता.


1 comments