महिलांनी प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात का जावे?
मुंबई, ता. ८ - महिलांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांनी का जावे व त्यासाठी आग्रह का धरावा? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती जयनारायण पटेल यांनी विचारला. त्याऐवजी फक्त महिलांसाठी स्वतंत्र मंदिरे बांधावीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. .......
वरील लेख वाचल्यावर माझ्या मनात एकच विचार आला, कि माननीय न्यायमुर्तींनी हे मत व्यक्त करण्याअगोदर नक्की काय विचार केला. मुख्य न्यायमुर्तींनी असे मत करणे म्हणजे निव्वळ बालिशपणा वाटतो.
महिलांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरांमध्ये महिलांनी जावे कि नाही,हा मुद्दा वादाचा आहे,पण त्यावर न्यायमुर्तींनी सांगितलेले मत अतिशय चुकीचे आहे,असे मला वाटते. उद्या आम्हा महिलांना आम्ही बरोबरीचे हक्क मागतो म्हणून स्वतंत्र देश बनवायला सांगाल का ?