आज भारतात येऊन १० दिवस होत आहेत. कितीही टाळले तरी महाजालाविना जगणे अशक्य झाले आणि हा मी इथे आलो. काही म्हणा आज इथे धूळ, धूर, आवाज, अशक्य लोकसंख्या... पण सगळे माझे आहे. मुंबईत उतरताना ऊर भरून आला. आपले लोक, आपली भाषा, सगळेच आपले. अगदी झकास....
भारताच्या संविधानाप्रमाणे जर प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळणार असतील तर, आज पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना इतरांच्या पुढे कसे पाठवले? खरे तर येथे पहिला-दुसरा अशी स्पर्धा नसवी. प्रत्येकाला हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करणारे सरकार कधी मिळणार माझ्या भारताला? या राजकारणी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पक्षपाती मंत्रीमंडळांनी आजपर्यंत लोकांना वाईट सवय़ी लाऊन देशाचे नुकसानच केले आहे. त्यात आता मनमोहन सिंग यांची पण भर पडली याची मला खंत वाटली.
देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा - पंतप्रधाननवी दिल्ली, ता. ९ - अल्पसंख्याकांसाठी आणि त्यातही मुस्लिमांसाठी असलेल्या विकास योजनांसाठी देशाच्या साधनसंपत्तीतून प्राधान्याने निधीची तरतूद करावयास हवी. साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केले. ..... राष्ट्रीय विकास परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानांचे वक्तव्य अनुचित, आक्षेपार्ह आणि निषेधार्ह असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
पंतप्रधान म्हणाले, ""विकासाची फळे अल्पसंख्याकांपर्यंत विशेषतः मुस्लिमांपर्यंत पोचण्यासाठी आपण कल्पकतेने योजना आखल्या पाहिजेत. यासाठी राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा अधिक जबाबदारीने वापर करावयास हवा. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांचा नियोजन आयोग आढावा घेईल आणि मूळ उद्दिष्टांपासून दूर गेलेल्या योजना बंद करेल. केंद्राच्या निधीच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्यांनी त्यासाठीचा अधिकाधिक वाटा उचलायला हवा.''
नेहमी दुखावलेल्या समाजाचे लाड करुन भारतात सामाजीक विषमता वाढवल्याने आज कोणताही राजकारणी या विषमतेविरुद्ध बोलण्याचे धाडस करु शकत नाही. आजच्या भारतात जर कोणी तोंड उघडले की लाड करण्याशिवाय ते काही बोलुच शकत नाहीत.
अरे हे झकास झाले, आता भारतात पण न्याय दिसतोय सर्वांना. कोणाचाही "तलाक" कधीच होऊ नये पण तो मिळवण्याचा हक्क मात्र नक्की असावा.
मुंबई, ता. २६ - विवाहादरम्यान महिलांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क देणारा मॉडेल निकाहनामा आज शिया पंथीयांच्या पर्सनल लॉ बोर्डने आज संमत केला; मात्र त्याची अंमलबजावणी सक्तीची राहणार नाही. .......
....... बोर्डची दुसरी वार्षिक सभा आज येथील अंजुमन इस्लाम महाविद्यालयाच्या पटांगणात झाली. त्यावेळी बोर्डने हा निकाहनामा (सनद ए निकाह) एकमताने मंजूर केला. यास पंथाचे राज्यातील व देशभरातील धर्मगुरू; तसेच विद्वान हजर होते. या महत्त्वाच्या निर्णयामुळे महिलांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असले, तरी या निकाहनाम्याची अंमलबजावणी सक्तीची राहणार नाही. विवाहातील दोन्ही पक्षांना मंजूर असेल तरच तो लागू ठरेल, असेही बोर्डच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
अंजलीनाच्या रक्षकांनी माझ्या देशात येऊन आमच्या लोकांना शिव्या द्यायच्या नाहीत किंवा कोणीही माझ्या देशवासींना बोलायचे काहीच कारण नाही. बोलला तेही माझ्या देशात, शाळेतल्या मुलांच्या समोर? कोण ती अंजलीना, आणि तीचा फड्तुस अंगरक्षक? या माजलेल्यांना जामीन का दिला? थोडे दिवस भारतीय तुरुंग बघु दे ना. मला अजुनही समजत नाही की लोकांनी त्याला तेथेच का नाही चेचला? पोलीसांनी त्याला नंतर सरळ केला असेल याची मला शाश्वती नाही. पण लोकांनी नक्की सरळ करायला हवा होता.
बसमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्यावर हे मुंबईकर हात साफ करत असतील तर याला आपण का सोडला? काही वेळा हातापेक्षा प्रसंग जास्त राखावा लागतो हे नक्की. शाळेतल्या मुलांच्या समोर जर एखादा परदेशी देशवासींना शिव्या देत असेल तर त्या मुलांच्या समोर कोणता आदर्श ठेवत आहोत याचे पण भान ठेवणे आवश्यक आहे ना? अभिमान करावा त्या पालकांचा ज्यांनी प्रसंगावधान राखुन पोलीसात तक्रार केली.Jolie bodyguards arrested over racial clash in India
Bruce Loudon, South Asia correspondentNovember 18, 2006
THREE of Angelina Jolie's bodyguards have been arrested after allegedly calling bystanders "bloody Indians" during a film shoot at a Muslim school in Mumbai.
Deputy Police Commissioner Brijesh Singh said the men were arrested on charges of "threatening" and "insulting religion" after parents filed a formal complaint late yesterday.
One of the British-born guards reportedly made a gesture with his hand across his neck, indicating, according to parents, that he would like to slit their throats.
अतिथी देवा प्रमाणे मानावा या तत्वाचा मी फार आदर करतॊ, म्हणुनच आता आदराने त्या जोडप्याची आणि त्यांच्या अंगरक्षकांची रवानगी करायची वेळ नक्की आली आहे. आता पुरे या ब्रॅंजलीनाचे नखरे, जा म्हणावे परत. ते मोठे असतील, खुप पैसेवाले असतील, पण माझ्यालेखी त्यांची किम्मत माझ्या देशातल्या सामान्य माणसापेक्षा कमी आहे.
काही दिवसांपुर्वी वडिलांशी बोलताना पु. ना. ओक यांचा विषय झाला, त्यांनी लिहिलेले नेताजींच्या सहवासात हे पुस्तक मी वाचुन आता वर्षे झाली आहेत. सध्या नव्वदीतील या कु-प्रसिद्ध इतिहासाकाराने लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे. नेताजींच्या स्वभावातील अनेक बारकावे यात अगदी सहजतेने मांडले आहेत. जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा फार मोठा अचंबाच वाटला. नेताजीपेक्षा जास्त मोठा देशप्रेमी मला आठवत नाही, ज्यांनी स्वतंत्रतेचे कार्य स्वतःच्या हिमतीवर पुढे चालवले. मला अजुनही कधी समजले नाही की पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान कसे? जर नेताजींनी त्याच्या कित्येक वर्षे अगोदर स्वतंत्र भारताची स्थापना केली. त्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. ते स्वतंत्र भारताचे पहीले सरसेनापतीपण होते ना?
मृत्यूशय्येवर ते म्हणाले, "मी नेताजी'
गुणा, ता. २९ - बाबा लालजी महाराज सव्वाशे वर्षांचे होऊन गेले... पण मृत्यूशय्येवर असताना त्यांनी स्वतःबद्दलचे गुपित उघड केल्याने एकच खळबळ उडाली. .....
..... ते म्हणाले, ""मीच नेताजी सुभाषचंद्र बोस.'' अर्थात हे गुपित स्वतःच्या मृत्यूनंतरच उघड करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी ही बाब उघड करण्यात आली आणि सरकारी तपासाची चक्रे फिरूही लागली.
बाबा लालजी महाराज हे मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील सईजी गावात राहात होते. त्यांच्याबद्दल गावातील कोणालाच फारशी माहिती नव्हती. उलट ते स्वतःच म्हणत, "मी स्वतःबद्दलची माहिती उघड केली, तर येथे मला पाहायला जनसागर उसळेल.' प्रत्यक्षात बाबा २७ ऑक्टोबरला गेल्यानंतर सईजीमध्ये जनसागर उसळला नाही, तरी सरकारी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
आजची ही बातमी सरकारला जशी हलवणारी आहे, तशी अनेकांना प्रेरणापण देणारी आहे. आता बाबा लालजी खरेच नेताजी होते की नाही हे सरकार ठरवणार असल्याने, शेवटी सरकारी शोधकार्य ज्यावेगात होईल त्या वेगात होईल. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा" हे वाक्य कितीही दबवले तरी दबणारे नाही आणि त्याबरोबर लोकांची मने अजुनही प्रज्वलित होत रहातील.
आता अबु सालेम पण राजकारणात जर शिरणार असेल तर अहो मुंबईत दहशत कोण गाजवणार? काही वर्षांपुर्वी "DON" राजकारण्यांची मदत घ्यायचे आता राजकारणी "DON"ची मदत घेतात. पण जर डॉनच राजकारणी झाले तर कसे चालणार? उद्या दाऊद पण म्हणेल की "त्याला राजकारणात शिरायचे आहे, आणि तो म्हणे दुबईतुन निवडणुक लढवणार आहे." असे जर झाले तर भारतात खरेच दहशतराज येणार.
सालेमला जायचंय यूपी विधानसभेत
[ Monday, October 23, 2006 12:52:32 am]
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गँगस्टर अबू सालेम याला आता आमदारकीचे वेध लागले आहेत. तो उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीत मुबारकपूर मतदारसंघात अपक्ष म्हणून उभा राहील, अशी माहिती सालेमचे वकील अशोक सरोगी यांनी दिली.
सालेम सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. दिवाळी व रमझानच्या शुभेच्छा देणारी सालेमची २० हजार पोस्टर्स, बॅनर्स मुबारकपूरमध्ये सर्वत्र झळकले आहेत. त्यावर सालेमचे गांधी टोपी व कुडत्यातले फोटो आहेत. उत्तरप्रदेश स्थानिक शिवसेना शाखेने सालेमला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा सालेमच्या वकिलाने केला. इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत, असेही हा वकील म्हणाला. काही अभिनेत्री सालेमच्या प्रचाराला येणार असल्याचा दावा या वकिलाने केला खरा, पण त्यांची नावे मात्र घेतली नाहीत.
आता हा सालेम आर्थर रोडच्या कारागृहातुन निवडणुकीला उभे राहण्याच्या गोष्टी करत आहे, प्रचाराला अभिनेत्री येणार आहेत, म्हणजे तो नक्की निवडुन येणार. अबु सालेम महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशचा असल्याने प्रचारात काही अडथळा येईल असे मला वाटते. माझी आता एकच इच्छा आहे की तेथे निवडणुक घेऊच नये, त्यामुळे करदात्यांची थोडीफार संपत्ती वाचेल. निवडुन आल्यावर अबु सालेम ती संपत्ती आपल्या खिशात घालेल यात अजिबात शंका नाही. जगभरातल्या सर्व वृत्तपत्रांनी त्याची ख्याती भारताचा एक दहशतवादी गुंड म्हणुन प्रसिध्द केली आहेच. जर हा निवडुन आला तर आपण एक नवीन प्रथा चालु केली" असा दावा तो करु शकेल. काही वर्षे गेली की भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात त्याचे नाव नक्की येईल....
दहावीच्या विद्यार्थ्यांना १६ गुणांचा "कारणे द्या" प्रश्न असेल की "अबु सालेमने राजकारणात केला."
नवी दिल्ली, ता. १९ - संसदेवरील हल्लाप्रकरणी दोषी ठरलेल्या महंमद अफझल गुरू याला उद्या (शुक्रवार) फाशी दिली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले. .......अफझलला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी, यासाठी त्याच्या कुटुंबीयांना केलेला माफीचा अर्ज राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडे प्रलंबित आहे. कायद्यातील तरतुदीनुसार, जोपर्यंत या माफी अर्जावर कोणताही निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत त्या आरोपीला फाशी दिली जात नाही. त्यानुसार फाशी देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार, अफझलला उद्या (शुक्रवार) पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती.
१३ डिसेंबर २००१ रोजी जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीच्या संसदेवर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली. ही शॄंखला बघा, आज पर्यंतच्या या विषयावरील सगळ्या बातम्या एकत्र बघता येतील, आज पर्यंत या विषयावर एवढा ऊहापोह झाला आहे, आणि परिणाम काय तर आमचे नेते या अतिरेक्यांना सोडा म्हणुन मागणी घालतात? भारताच्या प्रजासत्ताकाची अस्मिता ज्या संसद भवनात नांदते त्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणाऱ्या देशद्रोहयाची शिक्षा माफ व्हावी म्हणुन राष्ट्रपतींकडे अर्ज करण्यात येत आहेत. पण माझ्या देशाचा अपमान करणाऱ्याला माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही का असावा? त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजते, जे जास्त शिकलेले आहेत हे मला अगदी मान्य आहे. पण हाच विचार करुन निवडुन दिलेल्या राज्यकर्त्यांनी आपली मुक्ताफळे वाटलीच ना की म्हणे या अफझलला माफी द्या. शेवटी एका देशद्रोह्याला शिक्षा मिळते यात कोणत्याही धर्माचा काय संबंध येतो? मुस्लीम समाज या फाशीला धार्मिक वळण का देत आहे?
फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांचे खून पडतील.
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.
-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा
-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा
-----------------------------------------------
भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.
-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर
-----------------------------------------------
अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.
-खुशवंतसिंग
समीर भिडे यांनी लिहिल्याप्रमाणे हा अपमान फ़क्त त्या हल्ल्यात मरण पावलेल्या ९ पोलिस जवान आणि एक संसदीय अधिकाऱ्यांच्या घरच्यांचाच नव्हे तर सर्व देशाचा हा अपमान आहे. आज भारताचे सारे मुत्सद्दी नेते त्या महंमद अफझलच्या सुटकेची वाट बघत आहेत, आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यांना लाजही वाटत नाही त्याची? आश्चर्य आहे. जर फाशी रद्द म्हणजे जानेवारी २००२ च्या आसपास भारत-पाकीस्तान लष्करी तणाव हा वायफळ, मृतांच्या नातेवाइकांचे अश्रु कोरडे, इस्लामाबदेतील भारतीय दुतावासातुन आपल्या राजदुताची हकालपट्टी क्षुल्लकच नाही का?
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९९, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"आई, उशीर होतोय, डबा तयार आहे का?"
"डबा कधीचा तयार आहे, पण तुझं आवरलंय का? अरे छत्री घे पाऊस पडेलसं वाटतय आज."
"डॅड, जाताजाता मला स्कुटरवरुन शिवाजीनगरला सोडा ना... pleeeeeessseee"
"चिरंजीव, आता स्वतःची गाडी घ्या..... किती दिवस अशा लिफ्ट मागत फिरणार आहात? आणि लवकर आवरले तर भोसरीपर्यंत सोडेतो"
वडिलपण भोसरीलाच काम करायचे, पण त्यांच्याबरोबर एवढ्या लांब जायचे म्हणजे आज करीअर याविषयावर खुप ऐकावे लागणार म्हणुन मी ती सुविधा नाकारली. कंपनीची बस परवडली असे वाटायचे.
माझी लुना आता कधीच मागे पडली होती. नव्या गाडीची स्वप्ने बघत होतो. नक्की काय घ्यायचे हे अजुन कळत नव्हते.
इसवी सन १९९९, ऑक्टोबर महिना, मु.पो. पुणे.
कोणते काम होते आठवत नाही पण शनिवारी संध्याकाळी वडिलांच्या बरोबर ताई कडे गेलो होतो. अजुनही आमची गाडी काही आली नव्हती त्यामुळे अजुनही "हमारा बजाज" मी चालवत होतो. वडिल मागे बसले होते. आताच्या सारखा शिवाजी रस्ता एकमार्गी नव्हता, शनिवार वाड्यावरुन सरळ डावीकडे वळुन तुम्हाला शुक्रवाराकडे जात होतो, त्यामुळे लाल महालाकडुन येणाऱ्या गाड्या अगदी जीवाच्या आकांताने चढण चढत होत्या. अगदी उतार वयात आलेल्या आजोबांनी जीना चढावा अशी गाड्यांनी अवस्था झाली होती. मी मात्र लकडी पूलावरुन येत असल्याने आमची "बुलंद तस्वीर" (म्हणजे बजाज हो!) उतरत होती.
उतारावरुन आल्याने वाढलेला वेग कमी न करताच मी शनिवार वाड्याच्या पुर्व बुरुजाला वळसा घालुन लाल महालासमोरच्या चौकात आलो. लाल दिवाबघुन कर्कचुन ब्रेक मारला. ब्रेकच्या ऒढ्याने पुढे खेचले गेलेले वडिल लगेच माझ्या खांद्याचा आधार घेत म्हणाले, "सावकाश".
"अहो असे मध्येच विचित्र दिवे लावल्यावर काय"
"दिवाबरोबर आहे, तु फक्त बघितला नाहीस इतकेच", निरुत्तर मी हिरव्या दिव्याची वाट बघत होतो.
पहिल्या गियरवर आणण्यासाठी बोटांनी क्लच दाबुन धरला आणि मनगटातल्या सगळ्या जोराने डावे हॅंड्ल वर उचलले, खट्ट असा आवाज करुन गाडीने पहिला गीयर पडला याची पावती दिली. मधुनच "हमारा बजाज" बंद होऊ नये म्हणुन हलकेच रेज करत होतो, तोच मागुन जोरात भोंगा वाजला, मागे बघतोय तोवर "PMT च्या बसमध्ये भोंगाच फक्त हवातसा आवाज करतो" हयाची मला आठवण व्हावी म्हणुन त्या बसच्या चालकाने अजुन एकदा कर्णकर्कश्य ध्वनीयंत्र वाजवले. मी अजुनही काय झाले याचाच विचार करत होतो, बहुतेक मला नाही म्हणुन परत हिरव्या दिव्याची वाट बघु लागलो तोच मागे PMT चा चालकाने त्याच्या खिडकीतुन हात बाहेर काढला होता, आणि मला "आता चला" असा इशारा करत होता.
दिवे लाल असताना कसे जायचे, त्याला मी पण दिवा दिसत नाही का असे दर्शवले.
आता मात्र त्या बस चालकाने डोके बाहेर काढले होते, "ए, अरं चल की, कोण नाय रस्त्यावर मग कशाला दिव्यासाठी थांबतोस?".
"अहो, मला कसली घाई आहे, मी थांबणार तुम्हाला काय त्रास आहे"
"अरं मला आहे ना पण", थोडासा सातारी गावाकडच्या मराठीची लकब आवाजात होती.
"मग घेऊन जा की बस वरनं, अगदी प्रवाशांना पण बसच्या तिकीटात विमान प्रवास करायला मिळेल"
"जरा स्कूटर घे बाजुला, मी जातो" तो आता वैतागला होता.
इतर दुचाकीवाले ही मजा बघत होते. बघ्यांची कधीच कमी नसते. दिव्याला उभे असताना विना-तिकीट मनोरंजन.
"अहो श्रीमंत, थांबा की जरा", वडिल म्हणाले.
आता मात्र चालक उचकला होता. त्याने बळेच बसच्या इंजिनचा घुऱ्र्ऱ्ऱ्ऱ्ऱ्र घुर्मऱ्ऱ्ऱ असा आवाज करवला. मी पण पेटलो होतो, वडिलांना उतरायला सांगितले आणि स्कुटर स्टॅंडवर चढवली, त्याच्या बस कडे तोंड करुन उभा राहीलो, "काय हो या खाली, रहदारीचे नियम आज माझ्याकडुन शिकायचे आहेत का?", आता मात्र माझा आवाज वाढला होता.
मला नक्की माहीत होते की तो काही उतरणार नाही, कारण त्याला Accelerator वर पाय ठेवुन रहावे लागणार होते. जर तो PMT चा खटारा बंद झाला तर काय करा.
तेवढ्यात हिरवा दिवा पडला, आजुबाजुचे दुचाकीवाले जशा मुंग्या लगबगीने कामाला जातात तसे निघु लागले.
"अरे बाबा आता तरी चल की" चालक कळवळला. माझ्या पोकळ धमकीला नाही तर त्याच्या सवयीत न बसणाऱ्या "हिरव्या दिव्याची वाट पहाणे" या प्रकाराला तो कंटाळला होता.
मी गाडी बाजुला घेतली आणि त्याला जागा दिली, बस पुढे जात असताना पुढच्या सीट्वरचे प्रवासी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते.
बस गेल्यावर वडिल म्हणाले, "जे केलेस ते बरोबर होते, पण करायची पद्ध्त चुकली".
"अहो पण माझ्या ओरडण्यामुळे त्या पाच-पन्नास बघे जमा झाले, त्यांच्यापैकी एकालाही आज त्या चालकामध्ये काही चूक दिसली नाही, कदाचीत उद्या त्याच्यातल्या एकाने जरी नियम तोडायला नकार दिला तर आजची माझी आरडाओरड कामी येईल ना?"
वडिल बघत होते, मी शांतपणे गाडी काढली. स्कुटरची कीक मारुन आम्ही बसलोच होतो तोच लक्षात आले की दिवा परत हिरव्याचा लाल झाला होता.
आणि मी पुन्हा हिरव्या दिव्याची वाट बघत होतो......
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९८, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
संध्याकाळी साडेपाच वाजले होते, वडील नुकतेच कामावरुन येत होते, अजुन त्यांनी बजाज सुपर स्टॅंडवर पण लावली नव्हती, तोच मी पळत वाड्यात आलो.
मला त्यातल्यात्यात पांढरट शर्ट, थोडीशी गडद पॅंट आणि बुट घातलेले बघुन, डॅड (आजकाल मी वडिलांना डॅड म्हणत होतो) म्हणाले,
"आजकाय विशेष?"
"मी स्कुटर घेऊन जाऊ?"
"पण आज स्वारी कुठे? PL शिवाय अभ्यास कधीच करु नये असे काय विद्यापीठाने सांगितले आहे का?"
"मी अभ्यास करतो हो, तुम्हाला दाखवुन करत नाही इतकेच आणि मार्क्स मिळतात ना बस्स? आणि मला कॉलेजात जायला उशीर होतोय, मी जाऊ"
खरे तर मी आता BCS च्या एका क्लासमध्ये अर्धवेळ गणित शिकवत होतो. तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या दिवसात दुपारी परीक्षा देऊन संध्याकाळी शिकवायचो. तरीसुध्दा मी विद्यापीठात सातवा-आठवा आलो असल्याने घरचे सगळे माझ्यावर जरा खुष होते.
"तुकाराम महाराज म्हणाले आहेत ना की जास्त मार्क्स मिळवुन कोणाचे भले झाले आहे? मला उशीर होतोय मी स्कुटर नेऊ का ते सांगा"
"हे आता तुकाराम महाराज कधी म्हणाले? आजकाल तुला साक्षात्कार पण होतात वाटतं.... आणि तुझ्या लुनाला काय झाले?"
"अहो ते मीच म्हटलंय, पण तुकाराम महाराजांच्या नावाने जरा वजन वाढतं, आणि ते गांधीजींनी नाही का आपल्या नाटकात लिहिलंय की 'नावात काय आहे?' म्हणुन... आणि माझ्या लुनात पेट्रोल थोडे कमी आहे."
"वाह रे वाह, ते शेक्स्पीयरने लिहिलंय"
"तेच ते हो!! शेवटी 'नावात काय आहे?'" असं म्हणत मी स्कुटरला किक पण मारली, "आणि तुम्हाला सागितलेच नाही ना, मी टाटा इंफोटेकच्या Campus interview च्या पहिल्या फेरीत पास झालो आता शेवटची मुलाखत आहे, तिथेच निघालोय"
"गाडी फार वेगात चालवतोस तु, सावकाश जा रे", वडिलांचे वाक्य संपेपर्यंत मी नक्की फडगेट पार केली असेन.
रात्रीचे दहा वाजायला आले होते, गाडी लावली आणि आत आलो.
आई : "काय रे काय, झाले तुझ्या मुलाखतीचे?"
हातातले पत्र झळकावत मी भसाड्या स्वरात गायला लागलो "अपनी तो निकल पडी, अपनी तो निकल पडी, अपनी तो निक्कssल पssडी".
"अहो पेशवे, इतर लोक झोपलेत, जरा हळु आणि इतक्यात काही पगार मिळत नाही, कामाला पुढच्या वर्षी लागणार ना, मग?"
(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९७, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"ह्रिषी, अरे जरा दादाकडे बघ, तुला पण त्याच्याप्रमाणे मोठ्या कॉलेजात शिकायचे आहे ना?", काकु म्हणाल्या.
"मी काय भारी" असा भाव तोंडावर ठेऊन मी ऐकत होतो.
COEP मध्ये मुलींवर इंम्प्रेशन असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे, ज्यावेळी ती गाडी हवी त्यावेळी मिळाली नाही आता काय उपयोग? इथे बहुतेक सगळे पुलापलिकडल्या वसतीगृहात राहायचे, आणि चालत यायचे. वर्गात मुली म्हणजे एक फार मोठी गोष्ट होती येथे. यंत्र अभियांत्रिकीला (मेकॅनिकलला) दोन मुली होत्या. त्यांना मुलांनी बॉइलरच्या नावावरुन, एकीला बॅबकॉक आणि दुसरीला विल्कॉक्स अशी नावे ठेवली होती. अशा या सौदर्याच्या वाळवंटात फक्त संगणक आणि दुरभाष्य अभियांत्रिकी मध्ये मृगजळे होती. पण माझ्या धातुशास्त्रविभागापासुन ते अगदी दुसऱ्या टोकाला होते. कर्नल गुप्तेंकडे काम करताना समजले की त्यांना दोन सुगुणी नाती आहेत, पण त्या खुपच वरच्या प्रकारात मोडत असल्याने आमचे मुलीला गाडीवरुन फिरवायचे स्वप्न हे अपुर्णच राहणार होते. आता काही सौदर्यस्थळे
म्हणजे एकंदरीत आम्ही आता फक्त बायकोला गाडीवर फिरवणार अशी शक्यता उरली होती. रोहिणी (माझी बायको) ताईच्या लग्नात पुण्याला आलेली असताना तीला एकदा मी स्कुटरवरुन घेऊन गेलो होतो, बस्स यापेक्षा दुसरी मुलगी आमच्या मागे गाडीवर अजुन बसली नाही. अहो माझ्या त्या मोडक्या जुनाट लुनावर मी अजुन किती अपेक्षा ठेवणार होतो?
सध्या मी अमेरिकेत कॉलेजला (इथल्या भाषेत school)जाते. इथे नविन technologyचा वापर शिकवण्यात पुर्णपणे केला जातो म्हणजे power point ,projector वगैरे.फ़ळा नावाला लावलेला असतो. कधीतरी त्याचाही वापर होतो.परवा एक नवीन गम्मत बघितली, हो गम्मतच वाटली मला!
माझ्या एका मास्तरांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि मी बघतच बसले. त्यांनी(हो त्यांनी ,कारण माझ्या भारतीय मनाला अजून मास्तरांना एकेरी नावाने हाक मारायला जमत नाही) खडू chalk holder मध्ये पकडला होता.मला ते विचित्र वाटलं. असं का? अंगाला, हाताला खडू लागू नये म्हणून? हे म्हणजे कोळिणीला मच्छीचा वास सहन न होण्य़ासारख आहे. मला नाना पाटेकरचा अग्निसाक्षि चित्रपटाचा संवाद आठवला. नाकावर रुमाल घेऊन चामड्याच्या फॅक्टरीत काम करणारया माणसाला नाना पाटेकर अत्तराच्या फॅक्टरीत काम करण्याचा सल्ला देतो. अहो,हे अगदी स्वच्छ आहे कि,तुम्ही जिथे काम करता तिथे लागणारया किंवा तिथे वापरल्या जाणारया वस्तु आणि तुमचं वेगळ्चं नातं जोडलेले असतं. त्या वस्तुंची allergy असून चालत नाही.
मला लगेच आठवलं ती माझी शाळा... जिथे सर खडूमध्ये माखतं फळाभरुन गणिते सोडवायचे, कधीतरी वर्गात वात्रटपणा करणारया एखाद्या मुलाला अगदी नेम धरुन खडूचा छोटासा तुकडा मध्येच मारायचे. बाई रंगेबिरंगी खडू वापरुन जीवशास्राच्या आकृत्या अगदी तन्मयतेने काढायच्या ( अगदी साडी खराब होईल का याचा विचार न करता). तिथे खडू म्हणजे शिकवण्याचा अविभाज्य भाग असायचा, आहे. पण तॊ पुढे राहिल की नाही याची शाश्वती नाही. ज्या पद्धतीने आणि आंधळेपणाने आपण अमेरिकेच्या पाउलावर पाउल टाकतोय, त्यामुळे भारतातपण खडूची allergy व्हायला वेळ लागणार नाही.
जसं छडीने येणारई विद्या भुतकाळ झाली त्याप्रमाणॆ खडू आणि फ़ळा कालवश होण दुर नाही. दुख: याच नाही की शिकवण्यासाठी नविन नविन गोष्टींचा वापर होतोय, पण त्या power point दाखवत chalk holder मध्ये खडू पकडून शिकवणारया मास्तरांसाठी (त्यांना मास्तर पण म्हणता येत नाही) हा श्लोक ओठांवरती येईल ??
गुरुऱ ब्रम्हः गुरुऱ विष्णु गुरुऱ देवो महेश्वरः ॥
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥
माझ्या एका मास्तरांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि मी बघतच बसले. त्यांनी(हो त्यांनी ,कारण माझ्या भारतीय मनाला अजून मास्तरांना एकेरी नावाने हाक मारायला जमत नाही) खडू chalk holder मध्ये पकडला होता.मला ते विचित्र वाटलं. असं का? अंगाला, हाताला खडू लागू नये म्हणून? हे म्हणजे कोळिणीला मच्छीचा वास सहन न होण्य़ासारख आहे. मला नाना पाटेकरचा अग्निसाक्षि चित्रपटाचा संवाद आठवला. नाकावर रुमाल घेऊन चामड्याच्या फॅक्टरीत काम करणारया माणसाला नाना पाटेकर अत्तराच्या फॅक्टरीत काम करण्याचा सल्ला देतो. अहो,हे अगदी स्वच्छ आहे कि,तुम्ही जिथे काम करता तिथे लागणारया किंवा तिथे वापरल्या जाणारया वस्तु आणि तुमचं वेगळ्चं नातं जोडलेले असतं. त्या वस्तुंची allergy असून चालत नाही.
मला लगेच आठवलं ती माझी शाळा... जिथे सर खडूमध्ये माखतं फळाभरुन गणिते सोडवायचे, कधीतरी वर्गात वात्रटपणा करणारया एखाद्या मुलाला अगदी नेम धरुन खडूचा छोटासा तुकडा मध्येच मारायचे. बाई रंगेबिरंगी खडू वापरुन जीवशास्राच्या आकृत्या अगदी तन्मयतेने काढायच्या ( अगदी साडी खराब होईल का याचा विचार न करता). तिथे खडू म्हणजे शिकवण्याचा अविभाज्य भाग असायचा, आहे. पण तॊ पुढे राहिल की नाही याची शाश्वती नाही. ज्या पद्धतीने आणि आंधळेपणाने आपण अमेरिकेच्या पाउलावर पाउल टाकतोय, त्यामुळे भारतातपण खडूची allergy व्हायला वेळ लागणार नाही.
जसं छडीने येणारई विद्या भुतकाळ झाली त्याप्रमाणॆ खडू आणि फ़ळा कालवश होण दुर नाही. दुख: याच नाही की शिकवण्यासाठी नविन नविन गोष्टींचा वापर होतोय, पण त्या power point दाखवत chalk holder मध्ये खडू पकडून शिकवणारया मास्तरांसाठी (त्यांना मास्तर पण म्हणता येत नाही) हा श्लोक ओठांवरती येईल ??
गुरुऱ ब्रम्हः गुरुऱ विष्णु गुरुऱ देवो महेश्वरः ॥
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९७, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.
"हे बघ ही लुना माझ्या कमाईत घेतलेली पहिली वस्तु आहे, आता मी ती वापरत नाही म्हणुन काय झाले? जरा जपुन वापर तीला." भाऊजी धमकी-वजा विनंती करत म्हणाले.
माझ्या त्या पादचारी किंवा सायकलारूढ जगात प्रत्येक वाहनधारक हा "भाईगिरी" करत होता. या जगात माझा जन्म हा इतरांना कोणीतरी झापायला मिळावा म्हणुन झाला आहे असे मला कायम वाटते. अरे जो येतो तो मोठेपणा गाजवतो. पण काय करणार दुसऱ्याची लुना जर मला फुकट वापरायची असेल तर असे सगळे ऐकुन घ्यावे लागते. तसे ते प्रेमळ आहेत, मला पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात (COEP हो!) प्रवेश मिळाल्यावर दोन वर्षे झाली पण माझ्या कठोर पालनकर्त्यांना गाडीचा पाझर फुटत नाही म्हटल्यावर माझ्या मेव्हण्याने त्यांच्या छातीवर दगड ठेऊन मला त्यांची ताईपेक्षा लाडकी लुना मला दिली होती. आता माझ्या किर्तीप्रमाणे मी तिची थोडीफार वाट पण लावली होती. आता सांगा, COEP च्या विद्यार्थी भांडारात वस्तु जशा सरकारी subsidy-ने मिळतात, तसे त्यांनी पेट्रोल पण का विकु नये? दरमहा आईकडुन खर्चाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात मी पण काय काय करणार? सारी हातखर्चाची रक्कम पेट्रोलमध्येच संपायची आणि तरी बरेचदा पेट्रोल मध्येच संपल्याने लुनाची सायकल व्हायची, मग तीच्या दुरुस्तीला पैसे आणायचे कोठुन? आणि म्हणे नीट वापर.
"हो, परत करताना नवीन बनवुन देईन तुमच्या खटाऱ्याला" मी उत्तरलो, "पण कमवायला लागल्यावर बरं का".
"अरे, परत नको देऊस वाटले तर पण आत्तातरी नीट वापर", जवळपास निरुत्तर झालेल्या भाऊजींनी परत झापले.
***************************************************************
आकाशच्या मोठ्या भावाचे लग्न होते. स्वागत सभारंभाच्या चमचमीत जेवणानंतर बरीच कलाकार मंडळी खुप दिवसांनी रंगात आली होती. रात्री उशीरा आम्ही इतरांच्या डोक्याचा "चहा" करत होतो... आणि मुक्त कट्टा. चेष्टा बहरात आलेली... रात्रीच्या अंधारात लोचा-पोचा झालेला पुना क्लबच्या पोर्च आमच्या हसण्याने घुमत होता. आम्ही वऱ्हाडी असल्याने रखवालदार पण गप्प होता. खरे तर आमच्यातल्यांनी त्याच्या बिडीकाडीची सोय केल्याने तो खुष होता.
"अरे पकलोय यार", आशिष उभा होत म्हणाला.
"बरं मगं? थांब थोडा वेळ पडशील खाली आपोआप", राहुलने त्याच्याकडे न बघताच त्याला उधळला.
"अरे मी काय पेरू आहे, पिकलो की पडायला", कावलेला आशिष.
"नाही चिक्कू आहेस, चल पैसे काढ बिलाचे", त्याचे सांत्वन करणारा केरी
"अरे चला सिंहगडावर चहा-भजी खायला जाऊ", जयदीप डोक्यात दीप लागल्यासारखा ओरडला.
"याला कोणी पाजली रे, येडा झालायस का रे? एक वाजलाय आता.." आशिषचा नेहमीचा अतिशहाणपणा ...
रात्रीच्या एक वाजता गडावर जाऊन भजी खायची कल्पना कितीही मुर्खपणाची असली तरी आशिष नाही म्हटला म्हणजे झाले आम्ही सहा-सात जणं मनात बंगाळांच्या जयदीप नामक नक्षत्राला कोसत.. तयार झालो, त्या भज्यापेक्षा पडलेला आशिषचा चेहरा लोकांना जास्त महत्वाचा वाटत होता.
"ए, मी आज वडीलांची बाईक आणलीये... ती घेऊन मी काही येणार नाही, माझी आणतो जरा माईलेज कमी आहे पण तुम्ही उदार लोक स्वतःच्या गाडी पेट्रोल भरताना माझ्याही भरालच" आमचा केरी म्हणजे... त्याच्याविषयी आज सांगायला नको, या पात्रावर मी PhD करण्याचा विचार करत आहे.
"हो आमचे आईबाप कुवेतचे आहेत ना ... " मी बोंबललो
"हो का? अरे माझ्या कायनेटिक मध्ये पण एखाद दुसरा लिटर भर मग", राहुल
"अरे चालतीये का आधी ते बघ", मी मुद्द्याचे बोला असा आव आणला.
"ब्रेक थोडा जास्त दाबावा लागतोय आणि हॉर्न हवा असेल तर मागच्याला कोपर मारावे लागते, दिव्याचे असे आहे की तु खापरेंचा दिवा आहेसच.." राहुलने आपल्या छडमाड कायनेटिकचे कौतुक सांगितले.
"विशाल ती तर तुच चालवणार आहेस, नाही तरी तुझी लुना काही चढणार नाही", केरी उगाच उवाच.
"त्या जयदीपची घ्या की, बोलताना काही वाटले नाही बरे", चंद्या त्याच्या गाडीचा विषय निघु नये म्हणुन.
"मी केरीच्या मागे बसणार, चला स्वारगेटचा पंप उघडा असतो रात्रभर, स्टॅंडावर तुमच्या धुरनळ्यांची पण सोय होईल " निहारने त्याच्या बुडाची निश्चिंती केली.
"अरे तो स्वारगेटचा, पेट्रोल कमी आणि रॉकेल जास्त घालतो" जयदीपला शिव्याखायची सवय असल्याने कारण देण्यासाठी बरळला.
"फुकण्या, त्या आशिष समोर बोलताना नाही आठवले का रे? आता भज्याचे पैसे भरणार आहेस हे लक्षात ठेव" केरी खेकसला.
सगळा जामानीमा करुन आमच्या टोळक्याने सिंहगडावर चढाई केली अर्थात गाडीवरून. चांगल्या दिव्याची पुढे आणि त्याच्या उजेडात इतर असे आम्ही पोहोचलो. पहाटे ४ वाजता गडावर आलेल्या या वटवाघळांना तेथे गरम चहा-भजी मिळाली. तिथल्या टपरीवाल्याला उठवावे लागले नाही. जोरात गोंधळ, विचित्र आवाज करणाऱ्या गाड्या त्याची गरम घोंगडीतली झोप उडवायला पुरेशा झाले. त्या पहाटेच्या भज्यांची चव अजुनही जीभेवर आहे. त्यानंतर गडावर मी अनेकदा गेलोय, पण काही म्हणा आता ती भजी काही मिळत नाहीत.
(या अंकातील संवाद बऱ्याच वेगळ्या शब्दकोषाच्या अनुशंगाने झालेले असल्याने त्या शब्दांना गाळुन अथवा सौम्य भाषेत मांडताना माझी फारच कसरत झाली आहे. त्यामुळे अनेक बारकावे न साकारल्याबद्द्ल क्षमस्व.)
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९३, ऑगस्ट महिना, मु.पो. पुणे.
मी अजुन सायकल लावत होतो तर आईनं विचारलं, "काय रे, लवकर आलास? तु तर म्हणालास की सात वाजतील म्हणून आणि तुझं कॉलेज कसं आहे?"
"अगं, कॉलेज एकदम झकास आहे, खुप मोठं आहे, अगं पण सायकल एकदम कोपऱ्यात लावावी लागते, सायकल तळ एकदम लहानसा आहे"
"तु नक्की फर्गुसनलाच गेला होतास ना रे? ", दारात पाय अजुन आत टाकत ताई म्हणाली. आमच्या भगिनी अशा नेमक्या वेळी कशा टपकतात कोण जाणे, आणि तीला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला काय जातेय.
"तुझे काय माहीतीये, सायकल चालवुन बघ तिथं, मग कळेल, सगळे जण गाड्यांवरच येतात, सायकल तळ पुढच्या वर्षी काढुन टाकणार आहेत म्हणे", आईकडे बघत म्हणालो, "आई, मला पण कायनेटिक होंडा हवीये."
"माझे ऑफिस पण फर्गसन रस्त्यावरच आहे समजलं? फर्गसनमध्ये बरेच जण सायकलीवर येतात. तुला अकरावीत गाडी कशाला हवी? पोरींवर इंम्प्रेशन मारायला?"
"आता बास, तुमचं कधी संपेल तर नशीब", आई दरडावत म्हणाली, "रावसाहेब, तुम्ही जरा अभ्यासात लक्ष जास्त द्या, अकरावी ही बारावीचा पाया असते. नीट पास झालास तर तुम्हाला पण गाडी घेऊ आपण आणि तु गं कधी कधी विशालला तुझी लुना चालवायला देत जा. आणि आता चला, जरा स्वच्छ व्हा, भुका लागल्यात ना?".
आईने टाकलेली अट माझ्याकडुन पुर्ण होण्याची अपेक्षा मला अजिबात नव्हती. वैशाली-सवेरामध्ये जर वर्ग भरला तरच सगळे जण वर्गात असणार अशी तर आमच्या वर्गाची परिस्थिती. मला अकरावी-बारावीची दोन्ही वर्षे माझ्या सायकल-महोत्सव म्हणुन साजरी न करावी लागली तरच आश्चर्य. अकरावीला जेमतेम ५१% मिळवुन नव्हे तर पाडुन आम्ही बारावीत शिरलो आणि गाडीला किक मारुन जाण्याचे माझे स्वप्न मी सायकलवर टांग मारुन बघत राहीलो.
कधी कधी ताईची लुना "लायसेंस नसताना" पण कॉलेजात घेऊन जायचो, पण वर्गातल्या मुलामुलींमध्ये ९०% जण गाडीवर येत असल्याने, माझी आणि त्या जुनाट लुनाची किम्मत गॅस उडुन गेलेल्या सोडापेयापेक्षा जास्त नसावी. अहो एकदा येताना पेट्रोल संपले, पण भरायला पैसे हवेत ना? मग काय, लुनाच्या मागच्या चाकाजवळचा खटका आत दाबुन लुनाची सायकल केली आणि घरी येऊन ताईची मंत्रपुष्पांजली ऐकली. नशीबापुढे काय चालतंय का कुणाचे, लुना वापरली ती पण बरेचदा सायकल करुनच.
पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९८८, फेब्रुवारीचा महिना, मु.पो. पुणे.
ताई पटकन खेकसली, "तुला मी सांगितले होते ना, माझ्या सायकलीला हात लावु नकोस म्हणुन, खरचण्यावर भागले, हात पाय मोडला असता म्हणजे.., जा जरा पाय धुऊन घे."
"मला काही झालेले नाहीये", पायावरच्या लाल रेघा लपवत मी म्हणालो.
"आईSS, ह्याने माझी सायकल पुन्हा पाडली बघ, पुढचं चाकपण वाकडे करुन आणले आहे यावेळी"
"आईने मला सायकल घेऊन दिली की मी पण तुला हात लावु देणार नाही", मी उसने अवसान आणुन ओरडलो.
"नको मला तुझी सायकल, त्यावेळी माझ्याकडे लुना असेल, मग नको मला लिफ्ट मागुस.."
"हॅहॅहॅ, तोंड बघितलंय का आरशात, लुना चालवायला त्याला लायसेंस लागते आणि त्यासाठी गाडी चालवायची परीक्षा द्यावी लागते.."
"पाहीलंय बरं, छानच आहे मी आणि माझं तोंड, आणि परीक्षा पण देईल की"
"बाई, पण पास झालात तर... हो हो हो", रामानंद सागर निर्मित रामायणात विजय अरोराने (इंद्रजीतने) लंका जाळणाऱ्या दारासिंगला पकडुन आणल्यावर अरविंद त्रिवेदी म्हणजे रावण जसा हसला, तसे काहीतरी हसत मी पळालो.
खरे तर, शुक्रवारात राहणाऱ्याला नूमवित शिकण्यासाठी सायकल म्हणजे चंगळच होती, पण ताईची जुनी सायकल आता हळुहळु माझी झाली होती, "लेडिज" का असेना, पण सायकल होती. मला स्वतःची सायकल मिळायला दहावीचे वर्ष उजाडले. दातार क्लास आणि शाळा यात वेळ वाचेल, माझी नेहमीची जुन्या सायकलची कुरकुर पण थांबेल म्हणुन तीर्थरुपांनी सायकलला मंजुरी दिली आणि आमच्या वाड्यात हिरो रेंजर ए. टि. बी. येऊन लागली.
एका अमेरीकन मित्राने जेवायला घरी बोलवले होते, तो, त्याची "बायको", "बायको" असे लिहिलंय कारण अमेरीकेत तुम्ही सखी किंवा सखा यापैकी कोणाबरोबरही संसार थाटु शकता, असो आणि "त्याची आणि तीची" तीन मुले. अमेरीकेत घरातली मुले त्याच दोघांची असतील अशी हमी कधीच देता येत नाही, येथे सोडचिठ्ठी झालेले मुलांसहित नवा संसार मांडतात. "छोटा परिवार सुखी परिवार". तीघांपैकी जुळी त्यांची पण एक मुलगी ग्वांटामाला य देशातुन दत्तक घेतलेली. अमेरीकन यजमान नेहमीच चांगला म्हणतात. सारे घर दाखवले, राहण्याच्या खोल्या, उठबस करायच्या खोल्या, त्याच्या गोंडस जुळ्या मुलांच्या खोल्या. मी मुलांना गोंडस हा शेरा द्यायला विसरलो नाही, पण बोलताना "आईवर गेली आहेत" अशी पुणेरी धार त्याला होतीच. त्याबरोबर त्याच्या ४ वर्षाच्या मुलीची अप्रतिम सजवलेली खोली बघताना, मन हरखले आणि विचार सुरु झाले....
इथे सगळेच वेगळे, वयाचे काही महीने झाल्यावर तुमच्यासाठी वेगळी खोली असते. वाढदिवसाला किंवा काही महत्वाच्या दिवशी आजी-आजोबा पण दिसतात. तुमचे जीवशास्त्रीय जन्मदाते, जन्मदाते आणि पालनकर्ते यात फरक असु शकतो. कदाचित तुमच्या नशीबाला यापैकी एकच काही तरी असते. माझ्या देशी मात्र हे सगळे एकच असतात. अमेरीकन मुलांना त्यांच्या आयुष्यात फार लवकर "PRIVACY" नावची सखी आलेली असते. जीची त्यांचे पालनकर्ते मुलांपेक्षा जास्त काळजी घेतात. मला अजुन असे काही माहीत नाहीये पण इंग्रजी सिनेमात बघितले आहे की मुले वडलांना "Mind your business" असे काहीतरी म्हणतात. माझे आज २८ वर्षे वय आहे, पण जर असे काही मी माझ्या तीर्थरुपांपाशी म्हटले तर ते आजही कानफाटाखाली गणेशोत्सव साजरा करतील. येथे जर बापाने, बऱ्याच अमेरीकन मुलांना बाप असतात वडिल असण्यासाठी वडलांनी आयुष्यात पुण्य करावे लागते, असो जर बापाने जर तुमच्यावर हात उगारला तर तुम्ही ९११ (म्हणजे भारतातला १००) फिरवु शकता. हे ९११ चे धडे अमेरीकन शाळेत पहील्या दिवशी देतात म्हणे, आणि त्याला "Child Harassment" म्हणतात. मला शाळेत उपासनी नावाचे मास्तर होते, त्यांनी पोरांना बडवले नाही असा एकही दिवस मला आठवत नाही आणि घरी हे सांगायची सोयच नाही. नूमविच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते माहीत आहेत, पण आज एकालाही त्यांनी बडवल्याचे वाईट वाटत नाही. ते शिक्षक आमच्यावर पालकांसारखे प्रेम करतात याची आम्हाला खात्री आहे. अमेरीकेत वयाची काही वर्षे झाल्यावर तुम्ही लहान मोठी कमाई करू लागता, तुमचे स्वतःचे पैसे असे काही काही असते. मला फक्त गल्ल्यात साठवलेले पैसे माहीत आहेत, जे कोणी घरी आलेल्याने हातात ठेवलेले असत. गरज नसेल तर भारतीय आईवडील शालेय जीवनात तुम्हाला कमाई करु देत नाहीत, वाईट सवयी लागतात म्हणे. अमेरीकेत तुम्हाला हवे ते कपडे घालायचे स्वातंत्र्य असते, येथे रस्त्यावर काही मुले जे कपडे घालतात ते बघून लहानपणच्या हडळीची आठवण येते. ओठाला काजळी रंग, काळे कपडे, बापरे. हे नसेल तर जास्तीत जास्त अंगप्रदर्शनीय कपडे, आतली अंतर्वस्त्रे दिसवीत अशी फॅशन आहे म्हणे. मग त्यांना अंतर्वस्त्रे का म्हणायची कोण जाणे? माझ्या लेखनात काही चुक नाहिये पुन्हा सांगतो की असे कपडे शाळेतली मुले घालतात म्हणुन. अहो, मी अजुनही पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट घालत नाही, शाळेत चाललॊय असे वाटते. लहानपणी स्वातंत्र्य म्हणजे जे फक्त देशाला मिळते हे माहीत होते, इथे ते सगळ्यांना असते. वयाची अठरा वर्षे झाल्यावर आईबाप तुम्हाला घराबाहेर काढतात आणि त्यावयानंतर पालकांबरोबर राहणाऱ्याला येथे विचित्र नजरेने बघतात. मीच काय माझे वडील पण अजुन त्यांच्या पालकांबरोबर राहतात, बहुतेक त्यांनापण हे स्वातंत्र्य अजुन माहीतच नाहीये . "आयुष्यातले बरेच निर्णय आई वडीलांच्या संमतीने घेणे याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र नाही" हे अमेरीकन तत्वज्ञान १०० टक्के चुक आहे.
येथे लोक आपापली लग्ने आपणच ठरवतात आणि उरकतात. हो!!, उरकतात ५० लोकात लग्न करण्याला पुण्यात अजुनही "लग्न घाईत उरकणे" असाच वाक्यप्रचार आहे. फार कमी लोक तीशी अगोदर विवाहबद्ध होऊ शकतात. त्या अगोदर बरेचदा त्यांना मुले पण झालेली असतात. अहो मुले झाल्यावर पण त्यांच्या तोंडी "I am not sure if she or he is the ONE" असे असते. माझ्या बहीणीचे जेव्हा पुण्यात लग्न झाले तेव्हा दोन्ही बाजुची मिळुन जवळपास १००० पाने उठली. हे आता मी अमेरीकेत कॊणाला सांगतच नाही, त्यांचा पहीला प्रश्न, तुम्ही एतक्या लोकांना ओळखता? अरे हो ओळखतो. आईवडील यापेक्षा जास्त लोकांना नावानेच नव्हे तर, पत्ता, शिक्षण, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मागच्या कमीत कमी दोन पिढ्यांसहीत ओळखतात. आजी, आजोबा, नात, नातु, नातसुन, नातजावई, पणती, पणतु, काका-काकु, मामा-माम्या, आत्या-मामा, मावशा-काका, त्या सगळ्यांची मुले, त्यांच्या बायका-मुले, त्यांच्या नणदा, दीर, सुना, जावई, व्याही, विहीण, सासु, सासरे, साडु, मेव्हणे, मेव्हण्या, बहीणी, भाऊ, भावजय, शेजारी, परत मानलेले भाऊ-बहीण, मित्रमंडळी, तुम्हीच मोजत बसा, १००० नक्की पार होणार. मला आश्चर्य वाटते, अमेरीकेत तर प्रत्येकाला खुप नातेवाईक असायला हवेत, कारण येथे नात्यात बऱ्याच जणांची एकापेक्षा अधिक लग्ने झालेली असतात, त्यामुळे सगळे गणित "Exponentially" बदलते. तरीसुद्धा इथल्या लग्नात नातेवाईक सोडुन मित्रमंडळीच जास्त असतात कारण जवळचे नातेवाईक कॊण आणि कुठे आहेत हेच माहीत नसते किंवा त्यांना बोलवायची इच्छा नसते म्हणुनच म्हटले उरकतात.
अशी ही अमेरीका जेथे घराला घर पण नाही, माणसाला माणूस नाही, नाते म्हणजे कळत नाही, म्हातारपणी आईवडील वेगळे राहतात त्यांच्या यातना तेच भोगतात, अशात तुम्ही पण म्हातारे होता, आणि तुमच्या यातना तुम्हीच भोगता. हे एक चक्र आहे. तुमचे कायम तुमच्यापाठी येते. तरूणपणी, उमेदीत कोणाचीच गरज लागत नाही, जसजसे वय सरते तसे याची नक्की आठवण येते. चांगल्या आठवणीच्या देशात कुठेतरी बालपण आठवते.. आणि बालपण म्हणताच मी पुण्यात शिरलो...
मी पुण्यातल्या शुक्रवार पेठेत दोन खोल्यांच्या घरात वाढलो, दोन कसल्या दीडच खोल्या त्या. घरात माणसे सात, आईवडील, तीन भावंडे, आजी-आजोबा. कसे राहात होतो हे आम्हालाच माहीत आहे. त्यात आमचे कौतुक असे काही नाही, आमच्याप्रमाणे भारतात अनेक कुटुंबे जगतात. मुंबई-पुण्याच्या मानाने मी अगदी सर्वसामान्य घरात वाढलो कारण या शहरात सरासरी लोक याच आकाराच्या घरात राहतात. आईच्या मायेत, वडलांच्या शिस्तीत, आजोबांच्या लाडात आणि सुगरण आजीच्या हातचे खाऊन आम्ही भाऊ-बहीण मोठे झालो, घरच्या परिस्थितीत जमेल तेवढे शिकलो आणि कामधंद्याला लागलो, देशाबाहेर आलो. चांगल्या पगाराच्या जीवावर घराचा आकार वाढवला. आईवडील आता बऱ्याच मोठ्या घरात राहायला आले, नाना प्रकारच्या सुखसुविधेच्या चीजवस्तु घरात आल्या, आराम वाढला, समाजात स्थान वाढले. दोनवर्षात एकदा पुण्याला जाणारा "माझा मी" परवा "स्वप्नात" पुण्यात गेलो होतो, सुखाची चादर मनावर पांघरून घरच्या मायेची ऊब घेणारे ते स्वप्न. घर दिसले ते शुक्रवार पेठेतले घर, छोटे का असे ना. एक समजले की नवे घर मोठे असले तरी ते माझे कधी झालेच नव्हते, मी अजुन लहानच होतो, जुन्या वाड्याच्या त्या इवल्याशा भाड्याच्या घरातच अजुन माझे सारे सुख अडकले होते. घर म्हटले की मला फक्त तेच घर का दिसते? हा प्रश्न इतिहासाच्या परीक्षेतला "पहील्या महायुद्धाची कारणे सांगा" सारखा अवघड दिसणारा पण पाठांतराने सहज जमणारा नाही. या प्रश्नाला महायुद्धाचे महत्व नाही की पहीला-दुसरा असा क्रमही नाही, ह्याला गुण पण मिळणार नाहीत. पण जर नवीन घर मोठे होते, सोयीचे होते, पण ते माझे झाले नसेल तर वाटते की मी या परीक्षेत नक्की नापास झालो. कारण शोधायची गरजच पडली नाही. नवीन घर घेतले पण त्या घरी मी फक्त महीनाभर राहीलो असेन. सुट्टीवर जातो आणि पाहुण्यासारखा राहतो. जुन्या घराची त्याला सर नाही, आधी शाळेतुन मी परत यायची वाट बघणारी आई आता मला सुटी मिळण्याची वाट पहाते आहे. मला प्रगतीपुस्तकावर झापणारे वडील आता माझ्याशी ईमेलवर/चॅटवर बोलतात. अगदी पाककृतीचे पेटंट घ्यावेत असा स्वयंपाक करणारी आजी आज मला तीच चव मिळावी म्हणुन तीच्या नातसुनेला (माझ्या बायकोला) फोनवर "Tips & Tricks" देते. ते घर आता आहे कुठे? बहुतेक माझ्या मनात, कुठेतरी खुप खोल दडलंय.... त्याला आजी-आजोबांच्या लळ्याचा पाया आहे, त्याला वडलांच्या धाकाच्या भिंती आहेत, आईच्या मायेचे छत आहे, काका-मामा-आत्या-मावशा नावाच्या खिडक्या आहेत, समाजाचे कुंपण आहे, मास्तरांची दारे आहेत, त्यात भावाबहीणींचे झरोके आहेत... प्रत्येक भारतीयाच्या घराची "Recipe" सेम नसली तरी त्याची चव मात्र सेम आहे... आणि जाताजाता अमेरीकन मित्राच्या घराचे कौतुक करत म्हटले,
घर म्हणजे घर असतं,
तुमचं आणि आमचं सेम नसतं....
तुमचं आणि आमचं सेम नसतं ....

लग्नानंतर बदलणाऱ्या सवयींमधली सर्वात महत्वाची म्हणजे दारुची सवय. हवी तेव्हा हवी तशी पिणारे, बरेचदा पासधारक बनतात. काही महिन्याचे असतात, काही आठवड्यावाले होतात, मला अजुन वार लावुन पास मिळवणारे भेटायचे आहेत. ऐकुन आहे की लग्नाला वर्षे उलटल्यावर पासाची मुदत वाढते, आणि बसमध्ये जशी "जेष्ठ नागरीक" सुट मिळते तशी मिळु लागते. कितीही झाले तरी जुन्या मित्रांबरोबर ढाब्यावर बसण्याची (अर्थातच प्यायला) मजा वेगळीच.
"सुखमे पियो, दुःख मे पियो, दोनोभी नही इस लिये पियो" असे असणाऱ्यांना दारुडा/बेवडा/पेताड असे अनेक शब्द आहेत. त्यांच्याविषयी मी बोलत नाहीये.
मला म्हणायची आहे सर्वसामान्य जनता, जी मित्रांबरोबर सामाजीक बांधीलकी अशा आदरजन्य नावासाठी पिते. दारु पिणे वाईट आहे हे माहीत असुनही फक्त मित्रांबरोबर चांगला वेळ घालवताना उर्जाद्रव्य (Energy Drink) म्हणुन पिते. असे लोक दारुच्या आहारी कधीच जात नाहीत. यांना फार कमी गोष्टीची चिंता करावी लागते, आज बील कोण देणार? आणि आज रात्री झोपायची व्यवस्था कोठे आहे? घर वर्ज असते, मग मित्राची गच्ची, रिकामा फ्लॅट, होस्टेलचा बंक असा सारासार विचार करुन प्लान बनायचा. काहीजण असतात जे फक्त सावरकर म्हणुनच जन्माला आलेले असतात, डोलकर होण्यात त्यांना अजिबात रस नसतो. माझे काही मित्र तर असे आहेत की चेहऱ्यावरुन पक्के लावाडी कामगार दिसतात, पण त्यांनी दारु कधीही प्यायलेली नसते. कॊणालाही सांगा ते पीत नाहीत, विश्वास बसणे अशक्य, आरश्यात बघता त्यांचा पण बसत नाही. म्हणजे असे लोक जे जन्मजात काळे ओठ घेऊन आले, आणि विना धुरकांडीचे धुराडे झाले. अशा सर्व बांधवांना साष्टांग दंडवत. ह्यानी फक्त धुंदी ठेवायची आणि वाईट सवयी न लाऊन घेता मजा घ्यायची...
अर्थात जर शिकत असाल तर असे प्लान फक्त होस्टेल मध्येच होतात आणि होस्टेल मध्ये अमलात येतात, बाटलीसाठी वर्गणी असते आणि फुकटे जीव एकदम निषिद्ध असतात. कधीतरी बकरा असेल तर, आमंत्रणे "आईजीच्या जीवावर... " या नियमाने वाटली जातात. पण जर थोडे फार कमवत असाल तर बाहेरची चंगळ असते. कितीही कमवत असला तरी ज्याला वर्गणीची पुर्ण चिंता असते, पुर्ण प्यायल्यावर ज्याला जुनी उधार पण आठवते, ज्याला बारमधुन बाहेर पडताना बील चेक करता येते, असे मित्र जगात फक्त मलाच आहेत का? अगोदर दारु न पिणारे पण मजेसाठी येणारे मित्र यायचे, चकणा खाण्यासाठी सगळ्यात पुढे असायचे, मग नियम आले, शिस्त आली, टेबलावर असणाऱ्या साऱ्यांनी समान वर्गणी द्यावी असे ठरल्यावर नेहमीचे चकणे सुधारले. चीज, शेंगदाणे, किंवा बारमध्ये मिळ्णारे फुकटचा चकणा आता आवडेनासा झाला. मग चीज-पाईनॅपल किंवा शेझवान सॉस-नान असे येऊ लागले. कारण न पिता वर्गणी द्यावी लागत असेल तर चकण्यात वसुली करावी हा भोळाभाबडा विचार हे सावरकर करू लागतात.त्यात भारतात शराबी गाणी न पिता पाजतात. अशी अनेक गाणी आहेत जी दारू बरोबर चकण्यासारखी जातात. महाविद्यालयीन दिवसात मिळेल ते पिणारे लोक हळुहळु "ब्रॅन्ड" धारक होतात. मग रॉयल स्टॅग, जोहनी वोकर परवडु लागते. काहीजण अजुनही बीअरच चाखत असतात. फक्त त्याचे नंबर वाढु लागतात, Cannon 5000, 10000....
जीन, रम, व्हिस्की आणि बीअर यातच लोक अदलाबदल करतात. इतर ग्लासांच्या गर्दीत आपला ग्लास ओळखणे हे पण एक कौशल्य असते. ते फक्त सरावाने जमते. टेबलावरचा एखादा पोटातले पाणी कमी करायला गेला की त्याच्या ग्लासात इतर प्रकारची दारु मिसळली जाते, तुम्हाला काय मी सांगणार की याला कॉकटेल म्हणतात. सराईत असणाऱ्याला ग्लासातला फरक समजतो, पण नवा मात्र मित्रविश्वासावर हे नवे सरबत घशाखाली उतरवतो, आणि भसाभस ओकतो. त्याला सावरकर प्रेमात सांभाळतात. पाठीवरुन हात फिरवताना आपण जगातले सर्वात प्रेमळ पात्र असल्याचा भाव तोंडावर असतो. असे सावरकर ही कथा स्वतःच्या प्रेमकथेपेक्षा जास्त चवीने ओकतात, म्हणजे कथन करतात. जमले तर लिंबु सरबत, कॉफी असे घरगुती उपचार पण होतात. ओकणारा परत कधी पिणार नाही असे ठरवतो. असे कधीच होत नाही, एकंदरीत दारु प्यायल्यावर तुमची स्मरणशक्ती कमी होते, दुसऱ्या दिवशीच तो हा प्रण विसरतो आणि लवकरच अशा स्नेह-संमेलनात हौशी कलाकार म्हणुन सामील होतो.
अमेरीकेत जर आल्यावर तर मात्र सगळे बदलते. बाटलीतल्या पाण्यापेक्षा कुपन लावुन मिळालेली कॅनवाली बीअर स्वस्त असते. नेहमीच्या जेवणाखाण्यातच मदिरा असते, येथे सामाजीक जीवनात दारुचे फार महत्व आहे. अगदी रुळलेली "Pick-up line" म्हणजे, "Can I buy you a Drink?" अशी आहे. शॅम्पेनचे नाव घेताच सुखाची भावना येते.... किंवा तकीला म्हणतात जल्लोष आठवतो कारण येथे दारुला चवीचा अंतरा आहे, निरनिराळ्या ग्लासांचा मुखडा आहे, प्रत्येकीला जन्मगांव आहे, आणि गांवावर तीचे नाव आहे. येथे दारु आणि प्रसंग यांचे नाते आहे, त्यात प्रत्येक प्रकाराची आपली आपली ओळख आहे. बाटलीतुन ग्लासात येण्या अगोदर तीला नटवण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्याप्रकारे चढवण्याची लकब आहे. काही ठिकाणी जर ती मनोरंजनाचे साधन असेल तर, काही थंड ठिकाणी ती जीवनावश्यक पण आहे. सर्वात महत्वाचे येथे पिण्याच्या प्रमाणाला पण चवी एवढीच किम्मत आहे आणि येथे दारुच्या आहारी जाणाऱ्याला जगात इतर ठिकाणी मिळते तेवढीच किम्मत आहे.
शॅम्पेन, रम, व्हिस्की, ब्रॅन्डी, तकीला, व्होडका, बीअर अशा अनेक प्रकारच्या दारुंपासुन बनवलेले हजारो कॉकटेलस मिळतात. दारु बरोबर दुध, मध, फळांचे रस, फळे, मलाई, काही मसाले, सोडापाणी, काही फुले अशा नानाप्रकारच्या साधनांपासुन बनवली जातात. ती नुसती प्यायला नव्हे तर दिसयला पण मोहक असावीत यावर भर असतो. त्याशिवाय काही लोकांची आवडती कॉकटेलस, शॉट्स म्हटली जातात. मार्टीनी, यीगर बाम, स्क्रु-ड्रायव्हर अशा अनेक प्रकारांनी अमेरीका वेडी आहे. बरेचदा काय प्यावे हा प्रश्न पडावा अशी मायानगरी म्हणजे बार. अमेरीकेत सलान-हाऊस हा प्रकार कित्येक पिढ्या करत आहेत. Jack-Daniels, Johney Walker, Chiva's Regal अशा अनेक कंपन्या जगप्रसिध्द आहेतच.
सर्वात महत्वाची शौकीन दारू म्हणजे, वाईन, लाल-पांढरी, बनवण्याची पद्धत, चव, रंग, द्राक्षाचे प्रकार, द्राक्षे होणारी जागा, वय आणि बनवणारी वाईनरी अशा अनेक प्रकारे हीचे वर्गीकरण होते. वाईनच्या बाटल्या जमा करणे हा अनेकांचा छंद असतो. लोक वाईन मुरवुन पितात, त्यासाठी त्यांच्या पोटमाळ्यावर साठवण्याची सोय करुन ठेवतात. वाईन-चाखण्याचे वेगळे कार्यक्रम होतात, फक्त वाईनचे बार असतात.
देसी भारतात जाताना प्रियजनांसाठी येथुन दारु अवश्य घेऊन जातात. जमली तर युरोपात खरेदी करतात. पण फार कमी देसी बायकोच्या संमतीने पितात. भारतीय स्त्रीजनांमध्ये दारू शौकीन फार कमी आहेत, पण ते प्रमाण नक्कीच वाढते आहे. त्यांना पण समजते आहे की, "नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!" अमिताभचा शराबी बघताना हे वाक्य कोणीच विसरु शकणार नाही, जे अगदी खरे आहे, नशा दारुत नसते, मित्रांच्या संगतीत असते, प्रसंगाच्या महत्वात असते, पाजणाऱ्याच्या डोळ्यात असते, पिणाऱ्याच्या मनात असते, चकण्याच्या थाळीत असते, बील देणाऱ्याच्या पाकीटात नसेल तर फुकट पिणाऱ्याच्या समाधानात असते, फक्त टेबलावर बसला म्हणुन बीलाची वर्गणी देणाऱ्या मित्राच्या चिडचिडीत असते. ज्यांना ही आंतरीक नशा कमी पडते ते दारू पिऊन त्याची गोडी चाखतात, धुंद होऊन वेळेची किम्मत राखतात. प्यावी, मी म्हणतो पिण्यात काही गैर नाही, त्याचा अतिरेक वाईट आहे. उगाच न पचेल एव्हढी पिऊन इतरांच्या नशेत कमी आणणारे पेताड/बेवाडे ही धुंदी कधी समजलेच नाहीत .. आणि त्यांना ती कधी समजणारही नाही....

शाळेत गेला होतास का रे? ह्या प्रश्नाला तुम्ही जर सरळ उत्तर दिलेत तर तुम्हाला नक्कीच पुण्याची शब्दावली माहीत नाही. "शाळा = दारुचा गुत्ता", हे पेठेत राहणाऱ्या अगदी सामान्य पुणेकराला नक्की माहीत असते. कर्म-धर्म संयोगाने म्हणा किंवा मागच्या जन्माच्या पुण्याईने म्हणा मी शुक्रवार पेठी. पुण्यनगरीवासी म्हणजे औंधाला किंवा कल्याणीनगर मध्ये राहणारे नाहीत, जर तुमच्या घरचा पत्ता पेठेतला असेल तर. बाकीच्यांना अशा आज्ञावल्या माहीत असणे शक्यच नाही. तुम्ही नुमवि, भावे अथवा न्यु इंग्लिश स्कुल अशा मराठी शाळेत शिकलात तर तुम्हाला असे शब्द माहीत असणे सहाजिक आहे. हे साहीत्य वाचुन अथवा शिकवुन येतच नाही. त्यासाठी तेथे जगावे लागते. त्यासाठी कट्ट्यावर वेळ घालवावा लागतॊ.
काही सदाशिव पेठी (शब्दशः अर्थ घ्यावा, कारण "सदाशिव पेठी = कंजुष") मला माहीत आहेत जे बालशिक्षण वै. मध्ये शिकले. त्यांच्याशी बोलताना मी कधीतरी बोललो, "छान शर्ट आहे खाली एक जीन्स टाक म्हणजे झकास". त्या केशवाला ते समजलेच नाही ("केशव = साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा"). आता सांगा मी काय चुकीचे बोललो? अशांना सामान (सामान = त्याची प्रेयसी, चिकणी) वै. शब्द निषिद्ध असतात, लोकांना वाईट बोलण्याची पराकाष्ठा म्हणजे "बावळ्या" असे असेल तर तुम्ही डोलकर ("डोलकर = दारु पिवून झिंगणारा") कधीच झाला नाहीत आणि सावरकर ("सावरकर = दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा") होण्यासाठी पण तसे डोलकर मित्रमंडळ असावे लागते. असे हे दांडेकर (दांडेकर = मुलगा) तर होळकर ("होळकर = मुलगी") कसे त्याचा विचार करा. तरी पण अशा होळकरांपासुन नेत्रसुख घेण्यासाठी नक्की जाणारे पेठकरीच.शुध्द विंग्रजीत "नेत्रसुख = Bird-watching", तरी पण तुम्हाला नेत्रसुख कळले नाही तर तुम्हाला ससुनमध्ये उपचार घ्यायला हवा. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे कट्टा ही मराठी भाषेची खाण आहे, हे अगदी खरे आहे. असे अनेक शब्द दररोज येथे बनतात. हजारो वेळा वापरले जातात, जर व्यवस्थित जीभेवर रुळले तर कायमचे शब्दकोषात सामील होतात. असे शब्दकोष कोणीच लिहीत नाहीत, त्यांचे व्यावसायीक हक्क (copyrights) कोणी मागत नाहीत. पिढी दर पिढी अशी वाढ होत असते. शब्द जर जबरदस्त (जबरदस्त = अगदी चांगला) असेल तर तो बोली भाषेत जमा होतो. असे किती शब्द सांगु मी, बत्ता टाकणे (दोन नंबरला जाणे), कावकाव करणे, मनमिळाऊ आणि मोठ्या मनाची, मामा बनवणे, बाळु असणे, श्रीमुखात गणपती काढणे.
भांडारकरांच्या शब्दभांडाराला आणि विक्षनरीला नक्की भेट द्या. जीभेला अवघड होणारे पण इंग्रजी शब्दांना समांतर शब्द येथे सापडतात. पण तरीसुध्दा हे अजुन काही शब्द तुमच्या वापरासाठी. तुम्हाला अजुन काही आठवले तर नक्की कळवा.
केशव - साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा
सामान - त्याची प्रेयसी
खडकी - एकदम टुकार
झक्कास - एकदम चांगले
काशी होणे - गोची होणे
लई वेळा - नक्की, खात्रीने
चल हवा - येवू देनिघून जा
मस्त रे कांबळे - छान, शाब्बास
पडीक - बेकार
मंदार - मंद बुध्दीचा
चालू - शहाणा
पोपट होणे - फजिती होणे
दत्तू -एखाद्याचा हुज~या
बॅटरी - चश्मेवाला / चश्मेवाली
पुडी - माणिकचंद व दुसरा गुटखा
राष्ट्रगीत वाजणे - संपणे / बंद पडणे
पुडी सोडणे - थाप मारणे
खंबा - दारुची / बीयरची बाटली
पावट्या - एकदम मुर्ख
खडकी दापोडी - हलक्या प्रतीचे
टिणपाट - काहीच कामाचा नसलेला
पेताड / बेवडा - खुप दारु पिणारा
डोलकर - दारु पिवून झिंगणारा
सावरकर - दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा
वखार युनूस - दारु पिवून ओकारी करणारा
सोपान - गांवढंळ माणुस
श्यामची आई - लैंगीक सिनेमा (B.F.)
सांडणे - पडणे
जिवात जिव येणे - गरोदर रहाणे
पाट्या टाकणे - रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे
भागवत - दुस-याच्या जिवावर जगणारा
पत्ता कट होणे - शर्यतीतुन बाहेर होणे
फणस लावणे - नाही त्या शंका काढणे
फिरंगी - कोकाटे इंग्लीश फाडणारा
पेटला - रागावला
बसायचे का? - दारु प्यायची का?
चड्डी - एखाद्याच्या खुप जवळचा
हुकलेला - वाया गेलेला
डोळस - चष्मेवाला/ली
यंत्रणा - जाड मुलगी
दांडी यात्रा - ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा
चैतन्य कांडी - सिगारेट/बिडी
चैतन्य चुर्ण - तंबाखु
चेपणे - पोट भरुन खाणे
कल्ला - मज्जा
सदाशिव पेठी - कंजुष
बुंगाट - अती वेगाने
टांगा पल्टी - दारुच्या नशेत `आउट' झालेला
थुक्का लावणे - गंडवणे
एल एल टी टी - तिरळा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो
घ्या श्रीफळ - जा आता घरी
कर्नल - थापा थापाड्या
सत्संग - ओली पार्टी
काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त

ही म्हण मला फार खरी वाटते, जगात कोठेही जा, पंजाबी आणि बटाटा जगात सगळीकडे सापडतात. आपण भारतीय पोटापायी आपला देश सोडुन कोठेही जाण्यासाठी तयार असतो. बायकोने कोठेतरी वाचले, आजकाल काय तर म्हणे भारतीय पोटासाठी भारतातपण (परत?) जात आहेत. अहो आम्हाला पैसा पाणी ठिक मिळत असेल तर, का नाही? नेहमी आम्ही या पोट-स्थलांतराला गोडगोड नाव देतो, आधी काय तर "Brain Drain"... याला मराठीत काय म्हणतात, मला पण सांगा. आता काय तर म्हणे, "Brain Gain", बायकोला म्हटलं, "तु पण भारतात जाऊन ये, तुला पण थोडासा वाढवुन मिळतोय का ते बघ". काही नाही हो, याचा आणि मेंदुचा काही संबंध नाही. लवकरात लवकर कोठेही कमवता येते त्यावर सगळे ठरते आहे. आजकाल अमेरीकेतील बहुतेक सारे काम भारतात जात आहे त्यामुळे भारतात पगार वाढले आहेत, अमेरीकेपेक्षा भारतातच सुखसुविधा चांगली मिळते आहे. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरीकेत आजकाल वीसा, GC, आणि चांगला पगार मिळणे फार अवघड झाले आहे.
आजकाल अंतराळात पण पर्यटन शक्य आहे, मला हे नक्की माहीत आहे की जर वृद्धीला जागा असेल तर आम्ही तेथे नक्की असु. नुसते असणार नाही, खुप असणार. बऱ्याच आफ्रिकन देशातली अर्थव्यवस्था भारतीय लोकांच्याहाती आहे. भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या राष्ट्रीय जेवण-खाण्यात "Chicken Tikka Masala" आला आहे. शिकागो, न्यु जर्सी सारख्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिनी देशप्रेमाची मिरवणूक निघते. अमेरीकन Party मध्ये भारतीय जेवण येते आहे. अमेरीकन माणुस Infosys, TCS सारख्या देशी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे, काहीजण तर बंगळुरात नोकरी पण करायला तयार आहेत. अशा लहान सहान गोष्टी जर जवळून निरखल्या तर मला सांगा या brain drain आणि brain gain च्या बोलण्यात काय अर्थ आहे? मला असे म्हणायचे नाहिये की आम्ही डोक्यासाठी काम करत नाही, पण हे नक्की आहे की अशा गोष्टी नुसत्या दिखाव्याच्या आहेत. लोक कोणाला समजावत आहेत की मी भारतात "Brain Gain" साठी जात आहेत. असे काही नाहीये. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे, लोकांच्या अपेक्षा लवकर आता भारतात पण पुर्ण होत आहेत. सगळा पोटाचा खेळ आहे. भारतीय कंपन्या आता अमेरीकन/युरोपीयन कंपन्यासाठी सेवा उद्योग करणार असतील तर त्यांना परदेशी स्थाईक/शिक्षित भारतीय हवे आहेत, त्या लठ्ठ पगार द्यायला तयार आहेत, जो घ्यायला तरूण तंत्रज्ञपण तयार आहेत, मग हा Brain Gain झाला कसा?

काही वर्षांपुर्वी एका मित्राचे आई वडील अमेरीका फिरायला आले होते, जन्माने मारवाडी हा मित्र. आई वडीलांनी आयुष्यात पहिल्यांदा जोधपुर सोडले आणि सरळ अमेरीकेत आले. त्यांच्या बरोबर न्युयॉर्कला जाण्याचा प्रसंग आला आणि मी घाबरलॊ, एवढा तर मी मलेशियात सापाचे सार (snake soup) पिताना पण घाबरलॊ नव्हतो. त्या चार दिवसांच्या प्रवासात काका-काकूंनी तीन उपवास केले किंवा करावे लागले. जन्मात कधी अभक्ष भक्षण न केलेल्याना हा अनुभव म्हणजे सामाजीक, मानसिक आणि सांस्कृतीक धक्का होता. त्यांना देसी मध्ये जेवायला घेऊन गेलॊ, अहॊ त्यांना त्या बफ़ेवर दुसऱ्या बाजूला असणारे मांसाहारी पदार्थ बघुनच भोवळ यायला लागली. काका उठूनच गेले.... यात त्यांचा दोष नाही. पण अमेरीकेत असे हॊणे सहाजीक आहे. आता प्रश्न राहीला खाण्याचा, इच्छा असेल तर अमेरीकेत पण शाकाहारी पोटाचे लवकरच ढेरपोट नक्कीच हॊऊ शकते.
नातवाला/नातीला पहिला दात आल्यावर आजोबा मटण घेऊन येतात, अगदी सालंकृतपणे त्याला मांसाहारी बनवणा~या घरातला मी. ते एवढेसे पिल्लु नळी चोकुन आतले ऒढायचा प्रयत्न करते, आजोबा किंवा आजी नळी फोडुन आतले मऊ मांस खाऊ घालतात. असे आजोबा पण एथले मांसाहारी पदार्थ नको म्हणतील.मी मलेशियात प्रथम जेव्हा मॅकडोनाल्ड मध्ये बिग मॅक खाल्ला, बस्स तेव्हापासुन काही ठेवले नाही, खाण्यासाठी पाळलेले सारे खाऊन झाले. भारतातली मॅकडोनाल्ड आवड बघुन आश्चर्य वाटते, अरे ज्यांनी बिग मॅक खाल्ला नाही त्यांनी अजुन मॅकडोनाल्ड मध्ये काहीच खाल्ले नाही. ते असो. अमेरीकेत सगळ्यात आवडते मांस म्हणजे "beef", गायीचे, ब~याचदा डुकराचे. आवडते म्हणजे हॅमबर्गर, किंवा हॉट डॉग. किती प्रकारचे मांस हो. चिकन, बीफ, सॉसेज, बेकोन, पोर्क, हॅम. भारतीय माणसाच्या जीभेला हाड नसेल, पण धर्म नक्की असतो. बहुतेक भारतीय जगभर फिरतात, त्यांना पैशाचा विचार नसतो, फक्त विचार असतो, जेवणाचा. भारतात, पनीरने बनवलेला अमेरीकन वडापाव (बर्गर हो!) विकणारा रोनाल्ड मॅकडोनाल्ड, अमेरीकेत मात्र सगळे मांसाहारीच विकतो. जर तुम्ही शाकाहारी असाल तर घरूनच जेवण घेऊन गेलेले बरे. हिंदु धर्माचा गाय खाऊ शकत नाही, मुसलमान पोर्क खात नाही, आणि हलालशिवाय काहीच नाही. एकंदरीत सगळीकडे भारतीय वंशाच्या लोकांना अमेरीकेत जेवणाचा त्रास होतो. पन काहीजण ठराविक दिवशी खात नाहीत, तर काहीजण ठराविक महिन्यात. काहीजण तर कधीच खात नाहीत. अमेरीकन माणसाला हे शास्त्र समजवण्याचा प्रयत्न करा, जमले तर मला पण सांगा कसे समजवलेत ते.
आजकाल तरी बरेच सुधारले आहे, बहुतेक देसी लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे. अगोदर शाकाहारी म्हणजे काय हे ब~याच अमेरीकन लोकांना कळतच नसे. बीफ म्हणजे त्यांच्या मते "veg" असायचे. अजुनही माझे बरेच अमेरीकन मित्रमंडळी शाकाहारी जेवणाची कल्पनाच करू शकत नाहीत. आई लहानपणी म्हणायची, "जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारू नयेत, अन्नाचा अपमान होतो. पानात वाढलेले सारे खावे." आता नाही, ही शिकवण थोडी घरापुरतीच वापरावी. अशा या दुष्ट अमेरीकेत, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल तर जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारणे ही तुमची गरज आहे. Foie Gras म्हणुन बघा जमते क बरे, खरा उच्चार "फ्वा ग्रा". झकास, चवीष्ट पाकपदार्थ अर्थातच तोंडाला पाणी. पाणी येण्या अगोदर काय आहे ते समजुन तर घ्यायला नको का? खुप चरबी असलेल्या बदकाच्या यकृतापासुन बनवलेली ही पाकक्रीया अगदी चविष्ट असते. अशा अनेक पाकक्रिया आहेत ज्या माहीत केल्या तर नको वाटतात. त्यामुळे प्रश्न विचारा, अंडे, मांस किंवा अजुन काही तुम्हाला चालत नसेल तर वेटरला स्पष्ट सांगणे फार आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात सलाड खाल्ले की झाले, पण त्यावर जे dressing ओततात त्याचे काय? बरेच जणांना इटालीयन किंवा मेक्सिकन जेवण आवडायला लागले आहे. हवे तर शाकाहारी आणि जमले तर थोडेसे तीखट पण जेवयाला मिळते. पण अमेरीकेत काही उडुपी सारखी उपहारगृहे पुर्ण शाकाहारी जेवण बनवतात. तुम्हाला "veggie burger" मिळॆल पण तो आणि हॅमबर्गर एकाच तव्यावर बनवला नसेल कशावरून? मॅकडोनाल्डच्या फ़्राईज मध्ये बीफ असते हे आता सगळ्यांना माहीत असेल. तर मग तुम्ही थाई उपहारगृहे पण ढुंढाळु शकता. तेथे पण तुम्हाला काही मिळण्याची शक्यता असते.
आजकाल वीगन (Vegan) हा नवा प्रकार आला आहे, हे लोक प्राणीजन्य काहीही खात नाहीत, वापरत नाहीत. मध, दुध किंवा त्यापासुन बनवलेले पदार्थ पण खात नाही. नशीब असे काही भारतात नाही. आपण आपली साधी माणसे. भारतातले अमेरीकन प्रेम लक्षात घेता तेथे पण वीगन सापडत असतीलच. तुम्हाला जर असे काही पाळायचे असेल तर तुम्ही खुशाल पाळा. मी मात्र पुर्ण मांसाहारी रहायला तयार आहे. माझे काही मित्र ज्यांना beef खुप आवडते, अशांच्या घरी समजले की beef खातो, आईला समजवताना हे म्हणे "अगं आई, भारतातली गाय निषिद्ध आहे, अमेरीकेतली नाही". हे आमचे नवे संगणकी मित्र ज्यांना सगळीकडे फक्त "if... else.." अशा आज्ञावल्याच दिसतात, म्हणे की " if(!India) hiduism="allow everything" else hinduism="strict" ". हे जरा संगणकीवाल्यांना समजेल. आई म्हणते तुला काय हवे ते कर, पण आमच्या समोर नकॊ आणि आम्हाला सांगु पण नकॊ. काही झाले तरी शेवटी निर्णय आपला आहे. शाकहारी आणि मांसाहारी ही फक्त जीभेची आवड आहे, धर्मात काय आहे त्याचा विचार करा, जर मानत नसाल तर जीभेचा करा. पण असे खा की ज्यामुळे निरोगी रहाल, आणि खुप वर्षे जगाल. धाराची जाहिरात आठवली, "हम कमाते किस लिये है? खाने के लिये". त्यामुळे आयुश्यभर खाता यावे, शारीरिक बंधनाने अर्धे आयुष्य अळणी खावे लागणार असेल तर आजच जीभेवर ताबा नको का?

ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका....
हे गाणं आम्ही लहानपणी गणपती विसर्जनला गात असु. वडिल सुरुवात करायचे आणि आम्ही सर्व मागुन सुर लावायचो.काल मराठी चित्रपट जत्रा ( दिग्दर्शक केदार शिंदे) बघितला. त्याची सुरुवात ह्या गाण्याने झाली.मराठी चित्रपटात item song सारख्या गाण्याने सुरुवात म्हणजे आम्ही थोडं चाटच पडलो. पण गाण बघितल्यावर मात्र खरच नाचावसं वाटू लागलं... अगदी गणपती विसर्जनला नाचतो ना तसं..
हे गाणं तुम्हासर्वांसाठी जे अशा गाण्यांवर नाचायला केव्हाही तयार असतात.
इथे बघा - ye go ye ye maina

फिरतीवर असणारे जाणतात दहशतवादाचे परिणाम. विलायतेत कोणीतरी पकडला गेला की विमानात रासायनिक द्रव्ये वापरुन स्फोट करणारेत म्हणून. अमेरिका लगेच जाग्रुत झाली. विमानात आणि विमानतळावर द्रव्य स्वरुपातले काहीही घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. "जीवनावश्यक" पाणीसुद्धा घेऊन जायला मनाई झाली. आज सकाळी CNN वर बघत होतो, व्यावसायीकतेची परकोटी झालेल्या अमेरीकेत फक्त तीन दिवसात नवीन पद्धतीचे द्रव्य रसायने सापडवणारे scanners आले आहेत. प्रत्येक विमानतळावर ते लवकरच दिसु लागतील. ९११ नंतर अमेरीका दर वर्षी अब्जोवधी डॉलर फक्त हवाई सुरक्षेवर खर्च करते आहे मी बाकीच्या देशांबद्दल बोलतच नाहीये. का होते आहे हे सारे?
चोर कायम पोलीसापेक्षा ४ पाऊले पुढे असतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही कडक सुरक्षा ठेवा, जगातले चोर कमी होणार नाहीत. प्रत्येक सामाजीक व्यवस्थेने मागची हजारो वर्षे समाजातून वाईट गोष्टींच्या निर्मुलनासाठी वाया घालवली का? पण हे निर्मुलन कधी झालेच नाही ना? चोर कायम नव्या प्रकारांच्या शोधात असतो. चोर काय आणि दहशतवादी काय, दोघांचा धर्म एकच, जात वेगळी. दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाला वैतागलेले असतात, आणि समाजावर सूड उगवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. कोणी देशाप्रेमाच्या नावावर, कोणी फक्त पैशासाठी.
मग हे थांबणार कसे? "हम ईट का जवाब पत्थर से देंगे।" या नियमाने प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते. पण माझ्यामते, कोणी काही म्हणो, अमेरीकेने जगभर लोकांना दुखावले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात लोक दुखावले जातात, जर ते स्वभावाने सनातनी असतील तर ९११ होते. प्रत्येक जण झाले गेले विसरून जा अशा मताचा नसतो. बदल्याने उठतो. देशप्रेमाच्या नावावर लोकांना दहशत निर्माण करतो. "जिहाद" आणि "दहशतवाद" याच्यात अगदी बारीक फरक असतो. तो जर बघायचा नसेल तर त्याला अजुन एखादा गांधी जन्माला यावा लागेल. ज्याला दबलेला/दुखावलेला देश/धर्मप्रेमी "जिहाद" म्हणतात त्याच भावनेला साम्राज्यवादी .. दाबणारा ... किंवा स्वतःला भारी समजणारा दहशतवादी म्हणतो. आठवा, आपल्या मदनलाल धिंग्राला, सावरकरांना इंग्रज दहशतवादीच म्हणाले होते ना? आज स्वराज्यानंतर ते स्वातंत्र्यवीर झाले ना? इटलीतला गॅरिबाल्डीची पण कथा अशीच. मला असे अजिबात म्हणायचे नाही की ओसामा हा स्वातंत्र्यवीर आहे, तो नक्की दहशतवादीच आहे.... फरक फक्त नजरेचा असतो.... गांधीवादी असल्याने म्हणा पण माझ्या नजरेत तो खुनी आहे, दहशतवादीच आहे.... फक्त नजरेचा फरक.
आज इराक मध्ये दररोज लोक मरत आहेत, आधीपण मरत होते, कमीतकमीत अगोदर आपण सद्दामला दोषी ठरवू शकत होतो, आता कोणाला ठरवणार? इराक, अफगाण... असे अनेक देश या नवीन प्रकारच्या साम्राज्यवादाच्या आहारी जात आहेत. भारत, पाकीस्तान, इस्त्राइल पण अणुशक्ती राबवत होते ना? पण आता नवीन त्रास इराणला होणार आहे असे दिसते आहे. देशामागून देश अमेरीकन मांडलीकत्व स्विकारत आहेत. असे जर होत राहीले तर नवीन दहशतवादी निर्माण होतच राहतील. अमेरीकेची ही इतर देशांमधील ढवळाढवळ थांबली नाही तर असे स्फोटवादी परत परत येत राहतील. अमेरीकेला धमकवणारे दहशतवादी पण घुसखोर पाकचे असुन "पाक" कसे?
मी गांधी तत्वज्ञानाचा चाहता आहे त्यामुळे कधी वाटते की जर अमेरीकी राष्ट्रपतींनी जर जाहीर माफी मागितली की "भुतकाळात आमच्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफी असावी, लोकांचे हीत हेच ध्यानात ठेवून आम्ही जे काही केले त्यामुळे जर कॊणी दुखावले गेले असेल तर क्षमा असावी". यामुळे जर अमेरीकन जनतेचे जीव आणि करदात्यांचे अब्जो डॉलर वाचणार असतील तर काय हरकत आहे? हेच "Aireline Securty/ Airport Security" चे अब्जो डॉलर जर चांगल्या कामाला वापरता येतील. कदाचीत ते अशा दहशतवादी देशांमध्ये आशा उत्पन्न करायला वापरता येतील ना? मला लहानपणापासून एक शिकवले आहे की माफी मागितल्याने कॊणीही लहान होत नसतो. पण याच्याने प्रश्न सुटले तरे बरे नाही तर "तेल ही गेले आणि तूप ही" असे व्हायचे.
मला हे पण माहीत आहे की काही प्रश्न माफी मागुन सुटणारे नाहीत. मला सांगा पाकीस्तानची माफी मागुन काश्मीरातला प्रश्न सुटला तर किती बरे होईल नाही? मग कमीत कमी स्वतःच्या ताकतीवर असे विषय सोडवायची हिम्मत पहिजे. जसा इस्त्राइलने जसा हिजबॊला स्वतःच सोडवायचा निर्णय घेतला. आपल्या घरचा प्रश्न बराच अवघड जागी दुखणे आहे. जितके दिवस जातात तितके ते चिघळते, अशाच चिघळलेल्या जखमेसाठी दोन अणुशक्ती देश ज्यावेळी जीवावर उठतात तेव्हा जगाला विचार करावा लागतॊय. खरे सांगायचे तर, मला या ओसामा आणि अमेरीकेतल्या भांडणाशी काही कर्तव्य नाही. मुंबईतल्या स्फोटांनी मरणारी लोक्संख्या माझी आपली होती/आहे. ती काही करुन थांबायला हवी. मानवतावादी विचार करुन निष्पाप लोक जगात कोठेही मरु नयेत असे म्हणणे शोपे आहे. पण जगात सगळीकडे बघा, अमेरीकन मेला तर अमेरीकेने जग वर खाली करायचा प्रयत्न केला ना? पण मुंबईत मरणारी जनता त्यांना कोणीच नाही. अरे जगाने आपले प्रश्न सोड्वायचे अशी अपेक्षा जे भारतीय सरकार ठेवते आहे, ती चूक आहे. दहशतवाद कधीच संपणार नाही, कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच. पण तो संपवण्यासाठी जगाची मदत मागणे आणि त्यांनी काही करावे अशी अपेक्षा करणारे सरकार फक्त भारतातच बघायला मिळेल....

देशाबाहेर देशप्रेमाचा "उबाळ" आणणारा हा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट.... कितीही देशाबाहेर राहून झाले तरी, आजचा दिवस फार महत्वाचा. आज छान वाटते, भारतीय असल्याचा अभिमान आज उफाळून बाहेर येतो. ज्याला बघुन मन भरुन येते त्या झेंडयाबद्द्ल थोडी माहीती एथे बघा.
वन्दे मातरम्सुजलां सुफलां मलयजशीतलाम् बहुबलधारिणीं नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीं मातरम्॥ सुजलां सुफलां मलयजशीतलाम् शस्य श्यामलां मातरंम् . शुभ्र ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्, सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् . सुखदां वरदां मातरम् ॥ सप्त कोटि कन्ठ कलकल निनाद कराले द्विसप्त कोटि भुजैर्ध्रत खरकरवाले के बोले मा तुमी अबले बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ तुमि विद्या तुमि धर्म, तुमि ह्रदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति, तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलां अमलां अतुलाम् सुजलां सुफलां मातरम् ॥ श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम् धरणीं भरणीं मातरम् ॥ | बंगालीत तर अजुन गोड...বন্দে মাতরম্ সুজলাং সুফলাং মলয়জশীতলাম্ শস্যশ্যামলাং মাতরম্॥ শুভ্রজ্যোত্স্না পুলকিতযামিনীম্ পুল্লকুসুমিত দ্রুমদলশোভিনীম্ সুহাসিনীং সুমধুর ভাষিণীম্ সুখদাং বরদাং মাতরম্॥ কোটি কোটি কণ্ঠ কলকলনিনাদ করালে কোটি কোটি ভুজৈর্ধৃতখরকরবালে কে বলে মা তুমি অবলে বহুবলধারিণীং নমামি তারিণীম্ রিপুদলবারিণীং মাতরম্॥ সুজলাং সুফলাং মলয়জশীতলাম্ শস্যশ্যামলাং মাতরম্॥ শুভ্রজ্যোত্স্না পুলকিতযামিনীম্ পুল্লকুসুমিত দ্রুমদলশোভিনীম্ সুহাসিনীং সুমধুর ভাষিণীম্ সুখদাং বরদাং মাতরম্॥ কোটি কোটি কণ্ঠ কলকলনিনাদ করালে কোটি কোটি ভুজৈর্ধৃতখরকরবালে কে বলে মা তুমি অবলে বহুবলধারিণীং নমামি তারিণীম্ রিপুদলবারিণীং মাতরম্॥ তুমি বিদ্যা তুমি ধর্ম, তুমি হৃদি তুমি মর্ম ত্বং হি প্রাণ শরীরে বাহুতে তুমি মা শক্তি হৃদয়ে তুমি মা ভক্তি তোমারৈ প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে॥ ত্বং হি দুর্গা দশপ্রহরণধারিণী কমলা কমলদল বিহারিণী বাণী বিদ্যাদায়িনী ত্বাম্ নমামি কমলাং অমলাং অতুলাম্ সুজলাং সুফলাং মাতরম্॥ শ্যামলাং সরলাং সুস্মিতাং ভূষিতাম্ ধরণীং ভরণীং মাতরম্॥ |
तुम्हाला हा जर अमिताभचा हम मधला डायलॉग आठवत असेल तर सांगतो, भारताबाहेर अमेरीकेत दोन प्रकारचे भारतीय असतात, एक जे जन्माने भारतीय असतात, दुसरे फक्त भारतात जन्मलेले असतात. मी तर भारतात बाहेर जन्मलेल्यांना भारतीय समजतच नाही. अहो त्यांना भारत फक्त "Third World Country" वाटतो. ते हिंदी चित्रपटात दाखवतात तसे भारताबाहेर जन्मलेले आणि भारतावर प्रेम करणारे मला अजुन भेटायचे आहेत. आई-वडील किंवा आजी-आजोबा अमेरीकेत पोटापाण्यासठी आलेले, आणि आता ते म्हणतात म्हणुन ४-५ वर्षात देशात येतात. रंग बदलता येत नाही आणि आडनाव तर लगेच दाखवते ... तु तर देसी. पण अशांनी तोंड उघडले अरे हा तर ABCD (America Born Confused Desi). त्यांचा काय दोष जन्मले इथॆ ... शिकले इथे. आई-बापाने खूप प्रयत्न केले पण ते काही बदलले नाहीत.
ते असो, पण आपले कीडे दोनच प्रकारचे, माझा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक मित्र होता. पंजाबी ... त्याला अमेरीकेचा भलताच शौक, म्हणायचा, अमेरीकेत जायचे, खुप कमावयचे, मग खुप पुण्य कमवता येईल, जास्त पुण्य म्हणजे एक तर स्वर्ग किंवा पुढचा जन्म चांगल्या ठिकाणी, म्हणजे अमेरीकेत. दोन - तीन जन्मात नक्की स्वर्ग मिळणार. माझ्या अगोदर आला, पुण्य किती कमावले ते माहीत नाही पण त्याच्या मते स्वर्गाच्या जवळ आला. असे बरेच आहेत हो. ज्यांना भारत म्हणजे घाणच दिसते.या लोकांची चिडचिड होते. सर्वात वाईट भारतीय जमात म्हणजे ही. अमेरीकेत अजून ग्रीन कार्ड नाही, भारतात जायची इछा नाही. गोरी कातडी म्हणजे यांना फार प्रिय. अरे देसी दिसला रे दिसला की यांचे चेहरे बदलतात. का ते यांनाच माहीत. यांचे संकट असे की हे ग्रीन कार्डच्या रांगेत उशीरा आले. आता ती रांग ५-६ वर्षे लांब असल्याने मनातच आपला देश दुर दिसू लागतो. धुळ -धूर-पाणी सगळेच नको वाटते. मनापासुन नको वाटते त्यांना. "ऎसा लगता है तो लगने मैं कोई बुराई नही। ..." काही दोष नाही. परीस्थिती वाईट बनवते. देशात एवढी गरीबी आहे, भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीला स्पर्धा आहे. भारतातले मित्र छान म्हणतात, कारण अमेरीका अजुनही प्रतिष्ठाप्रतीक आहे. जरी पुण्यात प्रत्येक घरातला कोण ना कोण अमेरीकेत आहे. आज काल सगळ्या मुली लग्ना अगोदर GC आहे का विचारतात. यांना लग्नासाठी GCवाला/वालीच मिळावी लागते, नाहीतर त्या नवविवाहीत जोडप्याचे खूप हाल व्हायची संभावना दाट असते. यांची लग्ने "Arranged" झाली तर त्यांच्या आईने अमेरीकेत असणारी(रा) शोधलेला(ली) असते. आजकाल सगळ्या मराठी नट्यापण अमेरीकेतच आहेत. इथे चितळेच्या बाकरवडी पासुन हाजमोलाच्या गोळीपर्यंत सगळे मिळते. सारे भेसळ शून्य. "एक्सपोर्ट क्वालिटी", लोकसंख्या कमी त्यामुळे लोकांना लोकांची किम्मत आहे. जर नीट बघितले तर आयुष्य एकंदरीत चांगले आहे. GC असेल तर पगार पण चांगलाच मिळतो. इथल्या वर्षाच्या बचतीमध्ये भारतात घरे बनवता येतात. माझे बरेचसे नातेवाईक भारतात आहेत, त्यामुळे मी भारतात जायची इच्छा करतो. पण मला माहीत नाही कसे, यांचे खुप नातेवाईक पण अमेरीकेतच असतात. भारतात गेले तरी, अर्थात सुटीलाच, तन साथ देत नाही, सर्दी-पड्से परत येईपर्यंत सुटत नाही. याप्रकारच्या लोकांनी फक्त अमेरीका बघितलेली असते, त्यामुळे सिडनी, सिंगापोर, किंवा जपान खुपशा गोष्टीत अमेरीकेपेक्षा पुढे असु शकतो हे ते कधीच मानु शकत नाहीत. पासपोर्ट अजुन भारतीय असला तर तन-मन-डॉलररुपी धनाने हे अमेरीकन असतात.
दुसरा कीडा हा भरकटलेला, पोटापाण्यासाठी अमेरीकेत आलेला. भारतात बरेच मित्र-मैत्रिणी GRE-TOEFL चा अभ्यास करतात म्हणून आपणही करणारा. अमेरीकेत आल्याच्या पहील्या दिवसापासुन परत जाण्याच्या गोष्टी करणारा. थोडा पैसा कमवून जाईन असे मनी बाळगणारा. कदाचीत, एखाद्या प्रतिष्ठीत भारतीय संगणकीय कंपनीतुन अमेरीकेत आलेला. GC चे महत्व यांना उशीरा कळते, जर कळले तर त्या मॄगजळाच्या लागतात, बरेचदा डोळे उघडेपर्यंत व्हीसाची ६ वर्षे संपत आलेली असतात, मग एखादे मूल अमेरीकेत जन्माला घालतात. ते मूल अमेरीकन नागरीक असते, त्याला नंतर फायदा होईल असा प्रांजळ भाव मनी ठेवतात. मूलं लवकर मोठी झाली तर ती भारतात राहू शकत नाही. मग कुठे कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये नागरीकत्व पण मिळते का बघतात. काही नाही झाले तर भारतीय आहोत असे म्हणत भारतात जातात. जाण्या अगोदर यांची चिडचिड बघवत नाही. जे येणकेण प्रकारेण राहतात, ते GC ची वाट बघत म्हातारे होत राहतात. पण तोंडी कायम परत जाण्याच्या कथा असतात, यांचे परत जाण्याच्या अटीला हवे इतके पैसे कधीच साठत नाहीत. मग दर वर्षी सहल म्हणुन देशाला जातात, येताना मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके नक्की आणतात. पुण्यातल्या तुळशीबागेत खरेदी केलेली तोरणे भाड्याच्या घराच्या दारावर लावून मराठीपण आणतात. यांना परदेशात देशाचा खुप पुळका येतो, त्यामुळे बरेच देशी सणवार पण करतात, सत्यनारायण काय, आणि दिवाळीत घरावर कंदील काय. मुले जर शाळेत जाणारी असतील तर त्यांना गणेशोत्सवाऎवजी, नाताळाचे जास्त कौतुक असते. जर लग्न झाले नसेल (अर्थात लग्न झाले असेल तरीसुद्धा) तर अमेरीकन उघड्या अंगाच्या मुली बघण्याची गम्मत न्यारीच असते. जमले तर अमेरीकन पटवायची इच्छा कायम मनी असते. आई-वडिलांना आवडणार नाही अमेरीकन सुन असे म्हणुन काही जण मन मारतात, काही जण आपल्या जमणार नाही असे मनी समजून घेऊन फक्त देसीच जमतात का ते बघतात. काहींचे नक्की असते की "Arranged" च करणार. काही ABCD मिळतात का ते पण बघतात, एक तीर मॆं दो पंछी. जमले नाही तर भारतात आईने जीवनसाथी - रोहिणी अशा ठिकाणी प्रयत्न चालु ठेवलेले असतात. scanned photo गठ्ठ्याने येतात. सारासार विचार हॊतो, भारतात लग्न करून तीच्या/त्याच्या बरोबर परत अमेरीकाप्रयाण करतात. मनाने नसले तरी देहाने अमेरीकन झालेले असतात.
माझ्यामते, अमेरीका हा एक रॊग आहे, मलाही याची लागण झाली आहे, काही जणांवर परीणाम उठून दिसतात, काही जणांवर फक्त मानसिक जखमा दिसतात. याला मात्रा नाही, भारत यांचा रहात नाही, आणि अमेरीका यांची होत नाही. काहीही म्हणा, वय वाढू लागलं की आठवणी घिरट्या घालु लागतात. मुले अमेरीकेची झालेली असतात, तुम्ही मात्र मनाच्या कुठेतरी कोनाड्यात भारतीय असता. मला माहीत नाही याला उपाय काय, पण यातुन सुटका फारच कमी जणांची होते. पोटापाई त्रिशंकू होणारी ही जमात अमेरीकेत बरीच मोठी आहे, आणि दरदिवसागणी ही शिरगणती वाढत आहे....

परवा tops मध्ये असताना नवरयाचा फोन आला कि मुंबईला bomb blasts झाले. एक क्षण काही सुचले नाही,घरी फोन केला आणि सगळे ठीक आहेत कळल्यावर सुट्केचा निश्वास सोडला. पण लगेच आठवले सगळॆ मुंबईकर ... News channel वर बघितला तो लोकांचा आक्रोश, मुंबईकरांची मदत, रक्तदानासाठी लागलेल्या रांगा, पोलिसांची लगबग... आणि आठवल कुठेतरी वाचलेल..Mumbai is the rudest city...
विचार आला rude म्हणजे कसा असतो?? स्वतःच कोणी नसताना मदत करणारे मुंबईकर.. रक्तासाठी आवाहन केल्यावर अगदी 'आता पूरे ..' म्हणायची वेळ यावी,इतके धावून जाणारे मुंबईकर...जी लोक घरी पोहचु शकत नाही त्यांच्यासाठी जेवण,पाणी आणि रहायची व्यवस्था करणारे मुंबईकर..
ह्यांना rude म्हणणार का ?
अरे रोज येता-जाताना फ़क्त hi..how u doing? म्हणण ,म्हणजे सभ्यपणा असतो का? हिच लोक फ़क्त चांगली असतात का?
अहो, इथे लोकलच्या चौथ्या seat साठी पण मुंबईकर (अगदी offices मध्ये काम करणारे ,अगदी कुठल्याही post वर ) जीवतोडून भांडतात, पण ते तेवढ्यापुरतच असत. परत संध्याकाळी लोकलमध्ये भेट्ल्यावर सकाळच भांडण कुठ्ल्याकुठे गेलेल असत..
तुम्हाला हे अजुन कुठे दिसणार नाही ,यासाठी मुंबईच हवी आणि मी जे बोलतेय ते तुम्ही मुंबईकर असाल तर नक्की कळेल. जे कोणी मुंबईला नाव ठेवतात त्यांनी हे नक्की बघाव,कदाचित त्यांना rude ची definition बदलायला लागेल.
एक पक्की मुंबईकर म्हणुन माझी खूप चिडचिड होते कि , किती काय चालु आहे मुंबईत...
पण मग विचार येतो अरे मी कसे विसरले ,ये मुंबई है मेरी जान !!! मुंबईला आणि मुंबईकरांना या गोष्टींनी काही फरक पडत नाही. अगदी bomb blasts झालेली western line सुध्दा ३ तासात सुरु झाली.
लोकांनी त्यात प्रवास करायला पण सुरुवात केली.
आमचे मोटरमन पण तितकेच तत्पर आणि कुशल .. त्यांना लोकल चालवायला कोणीही थांबवु शकत नाही, अगदी ट्र्क वाहुन नेणारा पाऊससुध्दा... आमचे पोलिसही मागे नाहीत बर ! अगदी हिन्दी सिनेमामध्ये काहिही दाखवल तरी आम्ही त्यांची प्रसंगाला लागणारी तत्परता बघितली आहे.
कितीही काही झाल तरी मुंबईकर लगेच आपल्या रहाटगाड्याला जुंपून जातो.
मला ह्या मुंबईचा आणि मुंबईकरांचा प्रचंड अभिमान आहे आणि मी तितक्याच अभिमानाने सांगते,
मी आहे पक्की मुंबईकर!!!!

आकाश मेहता, माझा बालपणीपासुनचा मित्र. एकत्र शिकलॊ, खेळलो, आयुष्यात आपापल्या पायावर उभे राहीलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा माझा मित्र, आम्ही मात्र विनाचमच्याचे. प्लास्टीकचे त्यावेळी प्रस्थ नव्हते, नाही तर मी पांढरा चमचा घेऊनच आलो असतो. मी परिस्थिती बघून संगणकी शिकलो. तो मात्र builder and jeweler झाला. व्यवसायाच्या बोटाला धरुन अमेरीकेत आलो. सुटीला भारतात गेलो की नेहमी भेटतो. आम्ही दिवस-रात्र एकत्र असतो. मागे अशाच एका सुटीला त्याचा वाढदिवस होता. पार्टी पुण्याच्या एका आलिशान pub मध्ये होती. pub मध्ये पैसा उडवण्याएवढे कमवायला लागलो तर अमेरीकेत आलो त्यामुळे आयुष्यात भारतीय pub बघायची संधी प्रथमच. पार्टी झकास होती. अमेरीकेतल्या pub प्रमाणे कमी कपड्यातल्या आणि दारुच्या नशेतल्या मुली तिथेही. अजुन लग्न झाले नव्हते. त्यामुळे ते कायम एक प्रोत्साहन असायचे. इंग्रजी गाणी आणि त्यावर थरकणारे बघुन मी पण हलत होतो. आकाशला म्हटले, अरे हिंदी लावा रे. तो आणि आणखी चार जणांचा चेहरा उतरला जणू काहि सगळेजण म्हणत होते "न जाने कहां कहां से चले आते हैं।". शेवटी माझ्यासाठी आकाशने "It's the time to disco" लावायला लावले.
नेहमी भारतात जातो आणि घाबरतो. गावाकडे दहावी पास झाल्यावर मुंबई बघायला आलेल्या मुलासारखी माझी अवस्था होते. नवे रस्ते flyovers हे सारे ठीक आहे. पण अमेरीकन जेवणाची आवड, नवे मॉल्स, अमेरीकन गाण्याची रेलचेल. सारे मला नवे. जणू काही सगळेच अपरिचित. भारताने पुढे जावे, पण दुसरयाचे बघुन नको. आपले काहीच नाही? शेखर कपूर म्हणे भारताचा Spielburg? लिसा रे म्हणजे भारतीय अंजेलिना जोली? ह्यांना भारतीय व्यक्तित्व नाही?
पुण्या-मुंबईची अमेरीका होते आहे. अमेरीकेत योगा जसा अगदी अमेरीकन झाला आहे. त्याप्रमाणे भारतात इतर गोष्टी भारतीय बनून का येत नाहीत? प्रत्येक गोष्ट अनुकरणीय नसते हे अजुन आपण शिकायचे आहे. सध्या जे चालु आहे ती आंधळी कोशिंबीर आहे. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर न्युयॉर्कर मध्ये दोश्यासारखा burrito खाणारे वाढत आहेत, पण त्यांना खरा burrito माहीतच नाही. बहुतेक तो मेक्सीकन आहे हे पण माहीत नसते. ती फक्त क्रेझ आहे. लोकांना या अनुकरणाचे तोटे अजुन माहीत नाहीयेत. हे सगळे परिवर्तन अमेरीकेत पण झाले. पण त्याचे नुकसान २०-३० वर्षांनी दिसते आहे. इथे घराला घरपण नाही. मुले आई-बापाचे तोंड बघायला नको म्हणतात. सुनेला सासुसासरे म्हणजे "devils" वाटतात. (अजून तरी भारतात ते नकोसेच वाटतात, ही पण वेळ येईल). मी माझ्या एका अमेरीकन मैत्रीणीला म्हटले, "मला भारतात जाऊन आजीला भेटायचे आहे", ती वेडीच झाली. तीला स्वतःची आजी कशी दिसते हेच आठवत नव्हते. तीच्या मते तिची आजी म्हणजे एक "Bitch" होती. हे मला मात्र नवीन होते. वयाच्या अठराव्या वर्षानंतर स्वतःचे स्वतः बघा अशा संस्कृतीत वाढलेल्यांना मी अजुनही आई-वडिलांबरोबर राहतो, आणि माझे तीर्थरुप अजुनही माझ्या आजी बरोबर राहतात हे जगातले दहावे आश्चर्य वाटते.
अमेरीकेतील भारतीय आपली मुले मोठी व्हायच्या अगोदर त्यांना भारतात पाठवतात हे किती जणांना माहित आहे? परिस्थितीच अशी आहे इथे. त्यांना भीती वाटते ती या अमेरीकन हवेची, ती एकदा डोक्यात गेली की मुले कामातून जातात असे ते म्हणतात. मुलांचे स्वातंत्र्य आणी काय काय !! इथे "Child Privacy Law" आहे. पालक मुलांच्या सगळ्या गोष्टीत दखल देऊ शकत नाहीत. आपण मात्र या सगळ्याचे आंधळे अनुकरण करतो आहोत.
भारतात असताना मला ही हे पटत नव्हते. सकाळ मध्ये फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे लेख यायचे. मनाला भोक पाडतील असे दाखले असायचे. त्यावेळी नाही पटले पण आज ते दिसतात इथे. ते खरे मानावे लागतात आता. मला मात्र ते भारतात बघवणार नाहीत. अमेरीकेत सगळेच वाईट नाही. इथे पण लोक सुसंस्कृत आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि अजून कमी होत आहे.

आजकाल मी फीरतीवर आहे. दर सोमवार ते गुरुवार शिकागोत आणि बाकीचे दिवस क्लिव्हलॅंड मध्ये. Consultant चे आयुष्य असेच हो. दररोज १० तास पाटया टाकायच्या, ४० झाले की घरी परत. दररोज नवीन उपहारगृह शोधावे. देसी मिळाले तर उत्तमच. Starbucks च्या ताझो चायवर झोप टाळावी, कधी कंटाळ्लो तर समोरच्या सीअर्स इमारती भोवती एक चक्कर टाकावी. बरेच घाई गडबड असते ती काम-धंद्यावाल्यांची, पर्यटक मात्र सारे निवांत असतात. दूरुन सीअर्स कसा दिसतो, आणि त्याची छायाचित्रे घेण्यात मग्न असतात. मध्येच कोणी भिकारी जेवणासाठी डॉलर मागतो. लोक सहजतेने दुर्लक्ष करतात. सुना-मुलींच्या बाळंतपणाला आलेले एखादे म्हातारे जोडपे बघुन न बघितल्यासारखे करत कुजबुजतात, "अमेरीकेत पण भिकारी?". मुलगा किंवा सून म्हणते, बरेच असतात. पण आजोबांना आश्चर्य वाटते डॉलरची भीक म्हणजे ५० रुपये. एवढ्या श्रीमंत देशात पण कुणी बेघर असू शकतो. भारतात जाऊन मित्रांना सांगण्यासाठी मानसिक नोंद करतात.
अशाच एका मंगळवारी काम संपले, निघताना Chipotle मध्ये Burrito घ्यायचा ठरवला. उपवासाचा दिवस, घराबाहेर असताना पण पाळ्तो, शाकाहारी खाऊन सोडतो. बाकी काही पाळणे होत नाही. निघताना कुठुन तरी एक गोरी बाई सामोरी आली आणि हात पसरुन म्हणाली, "जेवायला काही घेऊन द्याल का?, मला घर नाहीये". पट्कन तोंडातुन नाही निघून गेले. मनात काहीतरी चुकले. आई म्हणायची जेवायच्या वेळेला कोणी मागितले तर नाही म्हणू नये, उपवासाच्या दिवशी तर दिल्याशिवाय स्वतः जेवू नये. मागे वळलो तो पर्यंत ती बाई जशी आली तशी गायब झाली होती. आईची शिकवण वापरायची संधी जशी आली तशी गेली. हुरहुर बराच वेळ राहीली, ही वेळ परत येईल त्यावेळी देवू असा विचार करत पाय उचलते घेतले. राहायच्या ठिकाणापर्यंत चालत जाताना, भूतकाळ डोळ्यांसमोरुन धावू लागला, चालता चालता आठवला रसिकलाल त्रिवेदी. ठाण्याला मोल्डींगचा व्यवसाय करणार मारवाडी माणूस. वडलांचा मित्र, तो त्याच्या ऎन चाळीशीत. मुंबईत मुरलेला. स्वभावाने रगेल आणि रंगेल. मी मात्र १५-१६ वर्षांचा. त्याच्या गाडीतुन जाताना सिग्नलवर एक म्हातारी भीक मागत होती. नेमकी आमच्या गाडीला लाल बत्ती मिळाली. "बेटा, वडापाव के लिये दो रुपॆ दे दे". रसिकलाल म्हणे, "आगे जाओ, पॆसा लेके दारु पियेगी". म्हातारी काही ऎकेना, दारु नाही पीत म्हणाली. रसिकलाल पण पेटला. तिला गाडीत बसवून वडापावच्या स्टॉलपाशी घेऊन गेला, दुकानदाराला म्हणे, हि जेवढे खाईल तेवढ्याचे पॆसे मी देतो. म्हातारी काही खाईना, तीला दोन रुपयेच हवे. नंतर रसिकालाल मला म्हणाला "अरे, आजकल भिक मांगना भी एक धंदा हॆ। दो मॆंसे एक रुपीया बुढी उसके ठेकेदार को देगी, एक में मस्त दारु पिके फुटपाथ पे सोयेगी". खरे किती खोटे किती देव जाणे. मी मात्र पुढची संधी न सोडण्याचा निर्णय घेतला.
अमेरीकेन सरकार असे भिकारी काही शहरातुन हाकलुन लावते. त्यांची काही संघटना नसल्याने जावे तर लागतेच. आधीच घर नाही. मग एका ठिकाणाहुन निघतो आणि दुसरीकडे तो उभा राहतो. पण शेवटी हा भिकारी आणि तुळजापूरचा भिकारी सारखाच. दोघे पोटाला मागतात्त. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीथे जास्त दिसतात. सगळे जण मात्र भारताला वाईट म्हणतात. जगात सगळीकडे भूक मात्र सारखीच असते, कोणी देवचे नाव घेऊन हात पसरतो, कोणी नुसतेच पोटाला मागतो. कधी कधी वाटते, ही लोक भुकेची भीक मागुन पोटाचाच धंदा करतात. सरकार फक्त करदायकांचे ऎकते, भिकेवर कर लागला तर त्यांना शहराबाहेर काढणार नाही. पण मग भीकेचा व्यवसाय मात्र चालणार नाही.

खूप आले खूप गेले ... धर्म हो!! भारताला धर्म ही काही अपूर्वाई नव्हे. आम्ही "सर्वधर्मसमभाव" ही संज्ञा फार वेगळ्या अर्थाने वापरली. इंग्रजीत सांगायचे झालेच तर "loosely". DaVinci Code हा जगभर चालला, भारतात त्याच्यावर बंदी घाला म्हणे!! का? अरॆ युरोपात चालला. अमेरीकेत पळतोय अजून. मग भारतातल्या ख्रिस्ती समाजाला काय त्रास आहे? मी मानतो की, तो चित्रपट कॅथॉलिक चर्चच्या कल्पनेला धक्का पोहचवणारा आहे. पण तो ख्रिस्ती धर्माच्या विरोधात नाही. मग कसला हा विरोध?
सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे "डॅन ब्राऊनची ही कथा निव्वळ कादंबरी आहे" हे सर्वांना मान्य असताना कसला न्याय मागता? तीन वर्षांनी जागे होऊन पुस्तकावर बंदी नकॊ तर, चित्रपटावर बंदी हवी असेल तर हे चूक आहे. बोला न्यायदेवता विजयी भवः।
अरे हे तर काहीच नाही, Jyllands-Posten ची महंमदावर व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली तेंव्हा भारत कुठॆही मागे नव्हता. आम्ही जगभर उठाव केला. मुसलमानी देशांनी करो अथवा न करो, आम्ही केला. मी त्या व्यंगचित्रांची प्रशंसा करत नाहीये.
हे तर जरा जास्त झाले की हिंदु मागे राहीले, बाबरी मशीद पाडताना त्यांनी स्वतःची मनमानी केलीच की. ते जर कमी असेल तर मुंबईत बाळ ठाकरेंचा फोटॊ लावा. आंधळॆ हिंदुत्व हे सगळ्यांना माहीतच आहे, जे राजकारणी लोकांनी देशाला शिकवले. हुसेनसाहेबांनी देवाची गलीच्छ चित्रॆ काढली त्यावेळी पण आम्ही संप केलाच होता ना?
मला फक्त इतकेच म्हणायचे की भारतात सर्व धर्मांना पुरेसा वाव आहे आणि त्याचा अनुयय करायला पुर्ण अधिकार आहे. कॊण कसा त्याचा वापर करतो, हा आपापला प्रष्ण आहे. एकंदरीत काय? सगळॆ धर्म अनुयायी मनमानी करण्यासाठी भारतात येतात. भारतीयत्व विसरून धर्माचं राजकारण करतात. त्यानंतर राजकारणात, करदायकांचा पॆसा स्वताःच्या खीशात भरतात. परदेशी दौरे करतात. प्रत्येक पश्चिमी देश भारताचा नकाशा काश्मिर सोडुन दाखवतो, सगळ्या परकीय विमान कंपन्या काश्मिर पाकीस्तानात दाखवतात. मला सांगा एका तरी भारतीय नागरीकाने सर्वोच्च न्यायालयात फर्याद दाखल केली का? त्या मध्ये कोणाचाच फायदा नाही. मग का ही उठाठेव करायची?
मुसलमानांना एकापेक्षा जास्त लग्ने करण्याची मुभा आहे, तसे हिंदुंना आरक्षण आहे. ख्रिस्ती लोक भारतात beef खाऊ शकतात. आपण सर्वधर्मनिरपेक्ष की सर्वधर्मिय? सगळ्यांना आपापल्या प्रमाणे वागु दिले आणि त्यासाठी कायदे बनवत राहीलो तर समानता येणार कशी?

अरे त्या राखीला मराठी चित्रपट दाखवा. "७ च्या आत घरात" हा चित्रपट फक्त तिच्यासाठीच बनवला आहे. आधीच तीला शरीर प्रदर्शनाची फार हौस, मग त्या मिकाला का दोश द्यावा. कोल्हापुरची केस मिटली नाही तोच हे नवे खूळ. कायम पडद्यावर असवे, गीतवाहिनिवर आणि नाही जमले तर वृत्तवाहिनिवर. लोकांनी तिला विसरू नये म्हणजे झाले. बहुतेक सगळी जहिरातबाजी आहे. मिकाला पण आजकाल publicity हवी आहे, टेपस खपत नाहीत, नवीन pop singers आल्यामुळे याला मागणी नाही. मोठा भाऊ पण आता मदत करण्यालायक नाही. ही publicity काही देऊ शकली तर बरे.
कमी कपडे घालून टीव्हीवर नाचणारी मुलगी.. सेटवर येण्यासाठी काय करत असेल? एक chance मिळावा म्हणून काहीही करायला तयार मुलींची कमी नाहिये आजकाल. बहुतेक ती चणचण आधी पण नसावी.. फक्त आता ते प्रेक्षकांनाही बघायला मिळत आहे. पण हे मात्र बरे झाले की तिकीट प्रेक्षक काढणार आणी मजा मात्र फक्त निर्माता घेणार असे आता होणार नाही. ग्राहक अधिकार कायद्याचा विजय असो!!!
सगळीकडे आता अमेरीकन जीवनशैली आहे..... अमेरीकन माणूस जर नागवा नाचला तर भारतात नक्कीच नागवे नाचतील. ही राखी सावंत काही भारतीय डोक्यातुन आली का? अमेरीकेत Hip Hop गाण्यात कृष्णवर्णीय मुली अंग हलवीत Booty Dance करतात, भारतात ते नक्कल करतात. जर भारतीय गाण्यात हे झाले नाही तर लोक hip hop बघणारच ना!! मग काय हे सगळे "Demand Supply Chain" आहे. जे खपते तेच पीकते असा जमाना आहे. अहो कोणी काय करावे हा आपापला प्रष्ण आहे. मी पण अमेरीकन मताचा आहे. दाखवणाऱ्याला काही वाटत नाही, बघणाऱ्याला काय बोलणार? मला अचंबा वाटतो तो त्या मुलींच्या आईबापांचा. काय वाटत असेल त्यांना? आई म्हणत्त असणार "ही बिकिनी की नाही राखीची आवड्ती हो!!, सगळे दिसते पण काहीच दिसत नाही. अहो त्या कोल्हापूरच्या शोला हीच घातली होती". वडीलांनी तर scrapebook बनवली असेल. हा मिका बरोबरचा, हा तिच्या दुबईतल्या खाजगी पार्टी मधला. "तीला प्रेमात Item Girl of Bolywood म्हणतात बरे". आश्चर्य आहे.

Rahul Mahajan, Son of BJP top gun Pramod Mahajan, he is really a mole in our society. There are always time when everybody gets their bad times in their life, that does not entitle you to make such acts that will ruin image of your family. I am not trying to glorify late Pramod Mahajan here. He was a politician in himself, so without any comments, Pramod Mahajan was never clean. What culture and values does Rahul carry forward when he drinks and get highly intoxicated with cocaine, just before his father's funeral?
Rahul is really not a criminal here, everybody will try to point to him to make him feel guilty. Apperently, there can be another side to reality. There is a very great opportunist who worked much more cleverly and got Rahul framed with his act with drugs. Considering Rahul was already involved in drugs, he was an addict and also a dealer, spoiling thousands of lives with cocaine. This fact never came out in public until he was eligible for a public figure. There is a very high chance that Rahul was next candidate in the list for Constituency in Mumbai. He would have won the race to Loksabha with much more promisingly than his father. Pramod Mahajan has been to parliament but mostly in Rajyasabha. But Rahul would have won the elections very easily with his father's name and sympathy wave created by brutal murder of his father. Major threat to Rahul was inside BJP than other parties. The politics make it all dirty.
Rahul is definitely not innocent, he is liable for a lifetime career ruin. Bigger concern is there is higher society "rich" youth who is addicted with drugs. They have money and power to commit and hide such crime. Rahul's arrest does not mean anything right now. He will not be able to run election in close future, mob has short memroy people will forget his act. They will forgive him as recoverer. They will elect him with same spirit. Who will solve this drug crime then? Do you think he will stop this drugs or their dealing after he is out of payback in jail? Mostly his well wishers will blame it on Sahil Zaroo. "Sahil supplied and got Rahul framed" will be the headline very soon.
There is a lot to think about, why Pramod's real brother shot him? How can Rahul got involved in drugs? Why there is Gopinath Munde forced doctors to give forged medical reports?

आज माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. weblog मराठीत लिहायला शिकत आहे. लिहायला वेळ लागतो पण ठीक आहे, सवय होइल....
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...