आत्मा

आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा वासना आणि कामानामय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात.हिच आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्मात म्हणून संबोधले जाते. 

वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते. भूताप्रेतांची गती तसेच शक्ती अपार असते यांचे वेगवेगळे प्रकार असतात.हिंदू धर्मातात गती व कर्मनुसार मेलेल्या जीवांचे वर्गीकरण केले जाते.आयुर्वेदात 18 प्रकारचे प्रेतात्मा आहेत असे सांगितले आह तसेच पिचाश, प्रेत, आसरा, डाकिन, शाकिन, ब्रह्मसमंध, मुंजा, गिऱ्हा, लावसटीन, हडळ, हाकाट्या, वेताल, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिचाश, विरीकास असेअनेक प्रकर सांगितले जातात .


या प्रेतयोनीत जाणारे लोक अदृश व बलवान बनतात परंतु सगळेच मरणारे जीव प्रेतयोनीत जात नाहीत वा सगळेच बलवान होत नाहीत. ते आत्माच्या कर्म व गतीवर अवलंबून असते.
भूतानमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे

 1. प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत .
 2. हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात.
 3. शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात.
 4. डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात.
 5. जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ' अलवंतीण 'असे म्हणतात ! हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अलवंतीण हमखास दिसते .
 6. ' अस्रा ' सात असून त्या ब्राम्हण स्त्रियांप्रमाणे दिसतात . प्रत्येक अस्रेचा पोशाख वेगवेगळा असतो . या अस्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे वळतात . मुसलमानातील ' परिस ' व हिंदूंमधील ' अस्रा ' एकच होत .
 7. ब्रम्ह राक्षस ब्राम्हणाचा जर खून झाला तर तो ब्रम्हराक्षस होतो . गिऱ्हा पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. गिऱ्हा नेहमी ज्या ठिकाणी मारतो तेथेच घुटमळत असतो .
 8. विद्वान ब्राम्हण मारून जर पिशाच्च योनीत गेला तर “ब्रम्ह्समन्ध” होतो .ब्रम्ह्समन्ध सहसा कोणाला त्रास देत नाहीत उलट लोकांची मदत करतात . ब्रम्ह्समन्ध माणसांप्रमाणेच दिसतो . त्यांना स्पर्श केला तर ते ' केळीच्या खुंट्या ' प्रमाणे थंड स्पर्श जाणवतो.
 9. "वेताळ” हा भूत - पिशाच्चांचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणेच असतात . डोळे हिरव्या रंगाचे असून डोक्यावरील केस ताठ उभे असतात . तो आपल्या उजव्या हातात चाबूक व डाव्या हातात शंख धारण करतो . तो फेरीस जातो त्या वेळी संपूर्ण हिरवा पोशाख करून पालखीतून किंवा घोड्या वरून फिरतो . त्याच्या आगेमागे बरीच भूते असतात . त्यांच्या हातात जळत्या मशाली असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारीत असतात
 10. खवीस- खवीस पठाण लोकांचे भुत आहे, अफगाणिस्तान, गल्फ ई देशांत जास्त प्रमाणात असतें काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखल जात . खविस नेहमी त्यांच्या कुटुंब बरोबर राहतात . खविस लग्न सुध्धा करतात आणि त्यांना मुल देखील होतात. अस म्हणतात की खाविस लोखंडाहून जास्त बळकट असतो. जो पण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व ती व्यक्ती श्रीमंत बनते.
 11. चकवा :- हा भूताचा प्रकार नसून ही एकप्रकारची भूतांची भूल देण्याची पद्धत आहे. हा जास्त करून रात्री दिला जातो . यात त्या व्यक्तीला एकप्रकारचा आभास होतो . आणि तो व्यक्ती त्या आभासाच्या पाठीपाठी जातो . आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेत . अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकाच जागेवर भटकत असते पण तिला त्याच भान राहत नाही .
 12. मानकाप्या :- याला स्वताला मुंडक नसत . हा कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो . अस म्हणतात कि मानकाप्या हा लोकांची मुंडकी उडवतो . हाकाट्या . जे लोक अपघातात मारतात ते हाकाट्या होतात . हाकाट्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो, याला जर चुकून ओ दिलीत की काम तमाम. हाकाट्या निर्जन स्थळी जास्त आढळतो .
 13. कर्णपिशाच्च भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच्च म्हणतात. कर्णपिशाच्च हा साधनेद्वारे प्राप्त करता येतो . पण एकदा का त्याला वश केल का तो आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतो . साधकाचा शेवटी अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो.

© My Horror Experience. A facebook post By Mangesh Padawale

Vishal Khapre

2 comments: