सगळेच जर राजकारणी झाले तर कसे होणार...

आता अबु सालेम पण राजकारणात जर शिरणार असेल तर अहो मुंबईत दहशत कोण गाजवणार? काही वर्षांपुर्वी "DON" राजकारण्यांची मदत घ्यायचे आता राजकारणी "DON"ची मदत घेतात. पण जर डॉनच राजकारणी झाले तर कसे चालणार? उद्या दाऊद पण म्हणेल की "त्याला राजकारणात शिरायचे आहे, आणि तो म्हणे दुबईतुन निवडणुक लढवणार आहे." असे जर झाले तर भारतात खरेच दहशतराज येणार.  

सालेमला जायचंय यूपी विधानसभेत
[ Monday, October 23, 2006 12:52:32 am]
 
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
गँगस्टर अबू सालेम याला आता आमदारकीचे वेध लागले आहेत. तो उत्तरप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीत मुबारकपूर मतदारसंघात अपक्ष म्हणून उभा राहील, अशी माहिती सालेमचे वकील अशोक सरोगी यांनी दिली. 
सालेम सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. दिवाळी व रमझानच्या शुभेच्छा देणारी सालेमची २० हजार पोस्टर्स, बॅनर्स मुबारकपूरमध्ये सर्वत्र झळकले आहेत. त्यावर सालेमचे गांधी टोपी व कुडत्यातले फोटो आहेत. उत्तरप्रदेश स्थानिक शिवसेना शाखेने सालेमला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा सालेमच्या वकिलाने केला. इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत, असेही हा वकील म्हणाला. काही अभिनेत्री सालेमच्या प्रचाराला येणार असल्याचा दावा या वकिलाने केला खरा, पण त्यांची नावे मात्र घेतली नाहीत.

आता हा सालेम आर्थर रोडच्या कारागृहातुन निवडणुकीला उभे राहण्याच्या गोष्टी करत आहे, प्रचाराला अभिनेत्री  येणार आहेत, म्हणजे तो नक्की निवडुन येणार. अबु सालेम महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशचा असल्याने प्रचारात काही अडथळा येईल असे मला वाटते. माझी आता एकच इच्छा आहे की तेथे निवडणुक घेऊच नये, त्यामुळे करदात्यांची थोडीफार संपत्ती वाचेल. निवडुन आल्यावर अबु सालेम ती संपत्ती आपल्या खिशात घालेल यात अजिबात शंका नाही. जगभरातल्या सर्व वृत्तपत्रांनी त्याची ख्याती भारताचा एक दहशतवादी गुंड म्हणुन प्रसिध्द केली आहेच. जर हा निवडुन आला तर आपण एक नवीन प्रथा चालु केली" असा दावा तो करु शकेल. काही वर्षे गेली की भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात त्याचे नाव नक्की येईल....
दहावीच्या विद्यार्थ्यांना १६ गुणांचा "कारणे द्या" प्रश्न असेल की "अबु सालेमने राजकारणात केला."

Vishal Khapre

No comments: