पुण्यातल्या प्रत्येक घरात दुचाकीचे कौतुक असते. अशा प्रत्येक घरात सरसरी दोन दुचाकी दिसतात असे शहर म्हणजे पुणे. फार वर्षांपुर्वी सायकलींचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते पुणे. आता मात्र ते स्वयंचलीत दुचाकी शहर बनले आहे. त्या शहरातल्या माझी ही ओढ दुचाकीसाठीची. स्वतंत्र भागात लिहितोय कारण तुम्हाला वाचायला बरे पडेल आणि मला लिहायला पण. या तुम्हीपण बघा मी शोधतोय माझी दुचाकी... बहुतेक तुम्हालाही सापडेल तुमची.
इसवी सन १९९७, सप्टेंबर महिना, मु.पो. पुणे.
"ह्रिषी, अरे जरा दादाकडे बघ, तुला पण त्याच्याप्रमाणे मोठ्या कॉलेजात शिकायचे आहे ना?", काकु म्हणाल्या.
"मी काय भारी" असा भाव तोंडावर ठेऊन मी ऐकत होतो.
COEP मध्ये मुलींवर इंम्प्रेशन असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे, ज्यावेळी ती गाडी हवी त्यावेळी मिळाली नाही आता काय उपयोग? इथे बहुतेक सगळे पुलापलिकडल्या वसतीगृहात राहायचे, आणि चालत यायचे. वर्गात मुली म्हणजे एक फार मोठी गोष्ट होती येथे. यंत्र अभियांत्रिकीला (मेकॅनिकलला) दोन मुली होत्या. त्यांना मुलांनी बॉइलरच्या नावावरुन, एकीला बॅबकॉक आणि दुसरीला विल्कॉक्स अशी नावे ठेवली होती. अशा या सौदर्याच्या वाळवंटात फक्त संगणक आणि दुरभाष्य अभियांत्रिकी मध्ये मृगजळे होती. पण माझ्या धातुशास्त्रविभागापासुन ते अगदी दुसऱ्या टोकाला होते. कर्नल गुप्तेंकडे काम करताना समजले की त्यांना दोन सुगुणी नाती आहेत, पण त्या खुपच वरच्या प्रकारात मोडत असल्याने आमचे मुलीला गाडीवरुन फिरवायचे स्वप्न हे अपुर्णच राहणार होते. आता काही सौदर्यस्थळे
म्हणजे एकंदरीत आम्ही आता फक्त बायकोला गाडीवर फिरवणार अशी शक्यता उरली होती. रोहिणी (माझी बायको) ताईच्या लग्नात पुण्याला आलेली असताना तीला एकदा मी स्कुटरवरुन घेऊन गेलो होतो, बस्स यापेक्षा दुसरी मुलगी आमच्या मागे गाडीवर अजुन बसली नाही. अहो माझ्या त्या मोडक्या जुनाट लुनावर मी अजुन किती अपेक्षा ठेवणार होतो?
No comments:
Post a Comment