महंमद अफझलला नाही, पण आज अस्मितेला नक्की फाशी आहे ...

नवी दिल्ली, ता. १९ - संसदेवरील हल्लाप्रकरणी दोषी ठरलेल्या महंमद अफझल गुरू याला उद्या (शुक्रवार) फाशी दिली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले. .......अफझलला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी, यासाठी त्याच्या कुटुंबीयांना केलेला माफीचा अर्ज राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडे  प्रलंबित आहे. कायद्यातील तरतुदीनुसार, जोपर्यंत या माफी अर्जावर कोणताही निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत त्या आरोपीला फाशी दिली जात नाही. त्यानुसार फाशी देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार, अफझलला उद्या (शुक्रवार) पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती.

१३ डिसेंबर २००१ रोजी जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीच्या संसदेवर हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली. ही शॄंखला बघा, आज पर्यंतच्या या विषयावरील सगळ्या बातम्या एकत्र बघता येतील, आज पर्यंत या विषयावर एवढा ऊहापोह झाला आहे, आणि परिणाम काय तर आमचे नेते या अतिरेक्यांना सोडा म्हणुन मागणी घालतात? भारताच्या प्रजासत्ताकाची अस्मिता ज्या संसद भवनात नांदते  त्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणाऱ्या देशद्रोहयाची शिक्षा माफ व्हावी म्हणुन राष्ट्रपतींकडे अर्ज करण्यात येत आहेत. पण माझ्या देशाचा अपमान करणाऱ्याला माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही का असावा? त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजते, जे जास्त शिकलेले आहेत हे मला अगदी मान्य आहे. पण हाच विचार करुन निवडुन दिलेल्या राज्यकर्त्यांनी आपली मुक्ताफळे वाटलीच ना की म्हणे या अफझलला माफी द्या. शेवटी एका देशद्रोह्याला शिक्षा मिळते यात कोणत्याही धर्माचा काय संबंध येतो? मुस्लीम समाज या फाशीला धार्मिक वळण का देत आहे? 

फाशीची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांचे खून पडतील.
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.
-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
-----------------------------------------------
महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा
-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा
-----------------------------------------------
भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.
-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर
-----------------------------------------------
अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.
-खुशवंतसिंग

यांनी लिहिल्याप्रमाणे हा अपमान फ़क्त त्या हल्ल्यात मरण पावलेल्या ९ पोलिस जवान आणि एक संसदीय अधिकाऱ्यांच्या घरच्यांचाच नव्हे तर सर्व देशाचा हा अपमान आहे. आज भारताचे सारे मुत्सद्दी नेते त्या महंमद अफझलच्या सुटकेची वाट बघत आहेत, आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यांना लाजही वाटत नाही त्याची? आश्चर्य आहे. जर फाशी रद्द म्हणजे जानेवारी २००२ च्या आसपास भारत-पाकीस्तान लष्करी तणाव हा  वायफळ, मृतांच्या नातेवाइकांचे अश्रु कोरडे, इस्लामाबदेतील भारतीय दुतावासातुन आपल्या राजदुताची हकालपट्टी क्षुल्लकच नाही का? 

Vishal Khapre

No comments: