काही दिवसांपुर्वी वडिलांशी बोलताना पु. ना. ओक यांचा विषय झाला, त्यांनी लिहिलेले नेताजींच्या सहवासात हे पुस्तक मी वाचुन आता वर्षे झाली आहेत. सध्या नव्वदीतील या कु-प्रसिद्ध इतिहासाकाराने लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे. नेताजींच्या स्वभावातील अनेक बारकावे यात अगदी सहजतेने मांडले आहेत. जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा फार मोठा अचंबाच वाटला. नेताजीपेक्षा जास्त मोठा देशप्रेमी मला आठवत नाही, ज्यांनी स्वतंत्रतेचे कार्य स्वतःच्या हिमतीवर पुढे चालवले. मला अजुनही कधी समजले नाही की पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान कसे? जर नेताजींनी त्याच्या कित्येक वर्षे अगोदर स्वतंत्र भारताची स्थापना केली. त्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. ते स्वतंत्र भारताचे पहीले सरसेनापतीपण होते ना?
मृत्यूशय्येवर ते म्हणाले, "मी नेताजी'
गुणा, ता. २९ - बाबा लालजी महाराज सव्वाशे वर्षांचे होऊन गेले... पण मृत्यूशय्येवर असताना त्यांनी स्वतःबद्दलचे गुपित उघड केल्याने एकच खळबळ उडाली. .....
..... ते म्हणाले, ""मीच नेताजी सुभाषचंद्र बोस.'' अर्थात हे गुपित स्वतःच्या मृत्यूनंतरच उघड करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी ही बाब उघड करण्यात आली आणि सरकारी तपासाची चक्रे फिरूही लागली.
बाबा लालजी महाराज हे मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील सईजी गावात राहात होते. त्यांच्याबद्दल गावातील कोणालाच फारशी माहिती नव्हती. उलट ते स्वतःच म्हणत, "मी स्वतःबद्दलची माहिती उघड केली, तर येथे मला पाहायला जनसागर उसळेल.' प्रत्यक्षात बाबा २७ ऑक्टोबरला गेल्यानंतर सईजीमध्ये जनसागर उसळला नाही, तरी सरकारी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
आजची ही बातमी सरकारला जशी हलवणारी आहे, तशी अनेकांना प्रेरणापण देणारी आहे. आता बाबा लालजी खरेच नेताजी होते की नाही हे सरकार ठरवणार असल्याने, शेवटी सरकारी शोधकार्य ज्यावेगात होईल त्या वेगात होईल. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा" हे वाक्य कितीही दबवले तरी दबणारे नाही आणि त्याबरोबर लोकांची मने अजुनही प्रज्वलित होत रहातील.
1 comment:
Bharatat shetkari atmahatya karit ahet. Tyabaddal kadhi wichar kelat?
Dhanya, bhaji, phale mahag zalit ki aapan oradto. Petrol kitihi mahag zale tari car waprache sodat nahi. Guilty feel hota ka nahi?
Post a Comment