काही वर्षांपुर्वी एका मित्राचे आई वडील अमेरीका फिरायला आले होते, जन्माने मारवाडी हा मित्र. आई वडीलांनी आयुष्यात पहिल्यांदा जोधपुर सोडले आणि सरळ अमेरीकेत आले. त्यांच्या बरोबर न्युयॉर्कला जाण्याचा प्रसंग आला आणि मी घाबरलॊ, एवढा तर मी मलेशियात सापाचे सार (snake soup) पिताना पण घाबरलॊ नव्हतो. त्या चार दिवसांच्या प्रवासात काका-काकूंनी तीन उपवास केले किंवा करावे लागले. जन्मात कधी अभक्ष भक्षण न केलेल्याना हा अनुभव म्हणजे सामाजीक, मानसिक आणि सांस्कृतीक धक्का होता. त्यांना देसी मध्ये जेवायला घेऊन गेलॊ, अहॊ त्यांना त्या बफ़ेवर दुसऱ्या बाजूला असणारे मांसाहारी पदार्थ बघुनच भोवळ यायला लागली. काका उठूनच गेले.... यात त्यांचा दोष नाही. पण अमेरीकेत असे हॊणे सहाजीक आहे. आता प्रश्न राहीला खाण्याचा, इच्छा असेल तर अमेरीकेत पण शाकाहारी पोटाचे लवकरच ढेरपोट नक्कीच हॊऊ शकते.
नातवाला/नातीला पहिला दात आल्यावर आजोबा मटण घेऊन येतात, अगदी सालंकृतपणे त्याला मांसाहारी बनवणा~या घरातला मी. ते एवढेसे पिल्लु नळी चोकुन आतले ऒढायचा प्रयत्न करते, आजोबा किंवा आजी नळी फोडुन आतले मऊ मांस खाऊ घालतात. असे आजोबा पण एथले मांसाहारी पदार्थ नको म्हणतील.मी मलेशियात प्रथम जेव्हा मॅकडोनाल्ड मध्ये बिग मॅक खाल्ला, बस्स तेव्हापासुन काही ठेवले नाही, खाण्यासाठी पाळलेले सारे खाऊन झाले. भारतातली मॅकडोनाल्ड आवड बघुन आश्चर्य वाटते, अरे ज्यांनी बिग मॅक खाल्ला नाही त्यांनी अजुन मॅकडोनाल्ड मध्ये काहीच खाल्ले नाही. ते असो. अमेरीकेत सगळ्यात आवडते मांस म्हणजे "beef", गायीचे, ब~याचदा डुकराचे. आवडते म्हणजे हॅमबर्गर, किंवा हॉट डॉग. किती प्रकारचे मांस हो. चिकन, बीफ, सॉसेज, बेकोन, पोर्क, हॅम. भारतीय माणसाच्या जीभेला हाड नसेल, पण धर्म नक्की असतो. बहुतेक भारतीय जगभर फिरतात, त्यांना पैशाचा विचार नसतो, फक्त विचार असतो, जेवणाचा. भारतात, पनीरने बनवलेला अमेरीकन वडापाव (बर्गर हो!) विकणारा रोनाल्ड मॅकडोनाल्ड, अमेरीकेत मात्र सगळे मांसाहारीच विकतो. जर तुम्ही शाकाहारी असाल तर घरूनच जेवण घेऊन गेलेले बरे. हिंदु धर्माचा गाय खाऊ शकत नाही, मुसलमान पोर्क खात नाही, आणि हलालशिवाय काहीच नाही. एकंदरीत सगळीकडे भारतीय वंशाच्या लोकांना अमेरीकेत जेवणाचा त्रास होतो. पन काहीजण ठराविक दिवशी खात नाहीत, तर काहीजण ठराविक महिन्यात. काहीजण तर कधीच खात नाहीत. अमेरीकन माणसाला हे शास्त्र समजवण्याचा प्रयत्न करा, जमले तर मला पण सांगा कसे समजवलेत ते.
आजकाल तरी बरेच सुधारले आहे, बहुतेक देसी लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे. अगोदर शाकाहारी म्हणजे काय हे ब~याच अमेरीकन लोकांना कळतच नसे. बीफ म्हणजे त्यांच्या मते "veg" असायचे. अजुनही माझे बरेच अमेरीकन मित्रमंडळी शाकाहारी जेवणाची कल्पनाच करू शकत नाहीत. आई लहानपणी म्हणायची, "जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारू नयेत, अन्नाचा अपमान होतो. पानात वाढलेले सारे खावे." आता नाही, ही शिकवण थोडी घरापुरतीच वापरावी. अशा या दुष्ट अमेरीकेत, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल तर जेवणाच्या ताटावर प्रश्न विचारणे ही तुमची गरज आहे. Foie Gras म्हणुन बघा जमते क बरे, खरा उच्चार "फ्वा ग्रा". झकास, चवीष्ट पाकपदार्थ अर्थातच तोंडाला पाणी. पाणी येण्या अगोदर काय आहे ते समजुन तर घ्यायला नको का? खुप चरबी असलेल्या बदकाच्या यकृतापासुन बनवलेली ही पाकक्रीया अगदी चविष्ट असते. अशा अनेक पाकक्रिया आहेत ज्या माहीत केल्या तर नको वाटतात. त्यामुळे प्रश्न विचारा, अंडे, मांस किंवा अजुन काही तुम्हाला चालत नसेल तर वेटरला स्पष्ट सांगणे फार आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात सलाड खाल्ले की झाले, पण त्यावर जे dressing ओततात त्याचे काय? बरेच जणांना इटालीयन किंवा मेक्सिकन जेवण आवडायला लागले आहे. हवे तर शाकाहारी आणि जमले तर थोडेसे तीखट पण जेवयाला मिळते. पण अमेरीकेत काही उडुपी सारखी उपहारगृहे पुर्ण शाकाहारी जेवण बनवतात. तुम्हाला "veggie burger" मिळॆल पण तो आणि हॅमबर्गर एकाच तव्यावर बनवला नसेल कशावरून? मॅकडोनाल्डच्या फ़्राईज मध्ये बीफ असते हे आता सगळ्यांना माहीत असेल. तर मग तुम्ही थाई उपहारगृहे पण ढुंढाळु शकता. तेथे पण तुम्हाला काही मिळण्याची शक्यता असते.
आजकाल वीगन (Vegan) हा नवा प्रकार आला आहे, हे लोक प्राणीजन्य काहीही खात नाहीत, वापरत नाहीत. मध, दुध किंवा त्यापासुन बनवलेले पदार्थ पण खात नाही. नशीब असे काही भारतात नाही. आपण आपली साधी माणसे. भारतातले अमेरीकन प्रेम लक्षात घेता तेथे पण वीगन सापडत असतीलच. तुम्हाला जर असे काही पाळायचे असेल तर तुम्ही खुशाल पाळा. मी मात्र पुर्ण मांसाहारी रहायला तयार आहे. माझे काही मित्र ज्यांना beef खुप आवडते, अशांच्या घरी समजले की beef खातो, आईला समजवताना हे म्हणे "अगं आई, भारतातली गाय निषिद्ध आहे, अमेरीकेतली नाही". हे आमचे नवे संगणकी मित्र ज्यांना सगळीकडे फक्त "if... else.." अशा आज्ञावल्याच दिसतात, म्हणे की " if(!India) hiduism="allow everything" else hinduism="strict" ". हे जरा संगणकीवाल्यांना समजेल. आई म्हणते तुला काय हवे ते कर, पण आमच्या समोर नकॊ आणि आम्हाला सांगु पण नकॊ. काही झाले तरी शेवटी निर्णय आपला आहे. शाकहारी आणि मांसाहारी ही फक्त जीभेची आवड आहे, धर्मात काय आहे त्याचा विचार करा, जर मानत नसाल तर जीभेचा करा. पण असे खा की ज्यामुळे निरोगी रहाल, आणि खुप वर्षे जगाल. धाराची जाहिरात आठवली, "हम कमाते किस लिये है? खाने के लिये". त्यामुळे आयुश्यभर खाता यावे, शारीरिक बंधनाने अर्धे आयुष्य अळणी खावे लागणार असेल तर आजच जीभेवर ताबा नको का?
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock...
1 comment:
विशाल,
तुमच्या या लेखात अमेरिकेत येणार्या शाकाहारी लोकांना इथल्या खानपानाबद्द्ल चांगला सल्ला दिला आहे.
असे म्हणतात की You are what you eat - त्यामुळे विशाल म्हणतात त्याप्रमाणे, खाण्यासाठी पदार्थांची निवड करताना चवीप्रमाणेच प्रक्रुतीवर काय परिणाम होईल हे बघणे तितकेच जरुरी आहे. अमेरिकेन लोकांनी काय खावे हे मॅकडोनाल्ड सारख्या कंपन्या ठरवत असल्यामुळे इथे obesity epidemic झालेला आहे.
निव्वळ नफ़्यासाठी सुरु असलेल्या या मोठ्या कंपन्यांना ग्राहकांच्या आरोग्याचीच जिथे काळजी नाही, तिथे इतर नैतिक प्रश्नं त्यांना कोण विचारणार?
उदा. अमेरिकेतील बाजारपेठेला मांस पुरवण्यासाठी रोज कित्येक एकर रेन फ़ॉरेस्ट नष्टं होते आहे. आज नेवाडा, कॅलिओर्नियात जे वाळवंट आहे तिथे एकेकाळी जंगल होते हे आज कोणाला सांगुन सुद्धा पटणार नाही - तीच अवस्था अमेझॉनच्या जंगलाची होते आहे. एक पाऊंड खाण्यायोग्यं मांस बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिन, पाणि ई रिसोर्सेसमधे तितक्याच उर्जेचे शाकाहारी पदार्थ दहा पटीने तयार होऊ शकतात. थोड्क्यात, आपल्या आहाराचा पर्यावरणावर काय परिणाम होतो आहे हे ही तपासुन बघायला हवे.
मांस खाणे तुम्हाला आवडत असले तरी जिवंत प्राण्यांना क्रुरतेने वागवणे नैतिकतेमधे बसते का हे ही बघायला हवे. नुकत्याच जन्मलेल्या कोंबडीच्या पिल्लांची चोच कापणे योग्य आहे का? प्राण्यांना जन्मंभर छोट्याश्या खुराड्यात डांबुन कुठलीही निसर्ग सुलभ हालचाल नं करु देणे, लवकरात लवकर आणि जास्तीत जास्तं मांस मिळवण्यासाठी सतत हार्मोन्सचा मारा करुन प्राण्यांचे आयुष्यमान कमी करणे हे माणुसकीमधे बसते का याचाही विचार करायला हवा.
बरं नुसते शाकाहारी असल्याने आपण या सगळ्या गोष्टी टाळु शकतो असेही नाही - कारण भाज्यांवरही भरमसाठ किटकनाशके, जेनेटिकल मॉडिइकेशन्स ई प्रयोग सतत होत असतात.
शक्यतो organic खाद्यपदार्थ विकत घ्यावेत - महाग असतात खरे - पण केवळ स्वस्तं आहेत म्हणुन किटकनाशके खाउ नयेत.
Post a Comment