तुम्हाला हा जर अमिताभचा हम मधला डायलॉग आठवत असेल तर सांगतो, भारताबाहेर अमेरीकेत दोन प्रकारचे भारतीय असतात, एक जे जन्माने भारतीय असतात, दुसरे फक्त भारतात जन्मलेले असतात. मी तर भारतात बाहेर जन्मलेल्यांना भारतीय समजतच नाही. अहो त्यांना भारत फक्त "Third World Country" वाटतो. ते हिंदी चित्रपटात दाखवतात तसे भारताबाहेर जन्मलेले आणि भारतावर प्रेम करणारे मला अजुन भेटायचे आहेत. आई-वडील किंवा आजी-आजोबा अमेरीकेत पोटापाण्यासठी आलेले, आणि आता ते म्हणतात म्हणुन ४-५ वर्षात देशात येतात. रंग बदलता येत नाही आणि आडनाव तर लगेच दाखवते ... तु तर देसी. पण अशांनी तोंड उघडले अरे हा तर ABCD (America Born Confused Desi). त्यांचा काय दोष जन्मले इथॆ ... शिकले इथे. आई-बापाने खूप प्रयत्न केले पण ते काही बदलले नाहीत.
ते असो, पण आपले कीडे दोनच प्रकारचे, माझा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक मित्र होता. पंजाबी ... त्याला अमेरीकेचा भलताच शौक, म्हणायचा, अमेरीकेत जायचे, खुप कमावयचे, मग खुप पुण्य कमवता येईल, जास्त पुण्य म्हणजे एक तर स्वर्ग किंवा पुढचा जन्म चांगल्या ठिकाणी, म्हणजे अमेरीकेत. दोन - तीन जन्मात नक्की स्वर्ग मिळणार. माझ्या अगोदर आला, पुण्य किती कमावले ते माहीत नाही पण त्याच्या मते स्वर्गाच्या जवळ आला. असे बरेच आहेत हो. ज्यांना भारत म्हणजे घाणच दिसते.या लोकांची चिडचिड होते. सर्वात वाईट भारतीय जमात म्हणजे ही. अमेरीकेत अजून ग्रीन कार्ड नाही, भारतात जायची इछा नाही. गोरी कातडी म्हणजे यांना फार प्रिय. अरे देसी दिसला रे दिसला की यांचे चेहरे बदलतात. का ते यांनाच माहीत. यांचे संकट असे की हे ग्रीन कार्डच्या रांगेत उशीरा आले. आता ती रांग ५-६ वर्षे लांब असल्याने मनातच आपला देश दुर दिसू लागतो. धुळ -धूर-पाणी सगळेच नको वाटते. मनापासुन नको वाटते त्यांना. "ऎसा लगता है तो लगने मैं कोई बुराई नही। ..." काही दोष नाही. परीस्थिती वाईट बनवते. देशात एवढी गरीबी आहे, भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीला स्पर्धा आहे. भारतातले मित्र छान म्हणतात, कारण अमेरीका अजुनही प्रतिष्ठाप्रतीक आहे. जरी पुण्यात प्रत्येक घरातला कोण ना कोण अमेरीकेत आहे. आज काल सगळ्या मुली लग्ना अगोदर GC आहे का विचारतात. यांना लग्नासाठी GCवाला/वालीच मिळावी लागते, नाहीतर त्या नवविवाहीत जोडप्याचे खूप हाल व्हायची संभावना दाट असते. यांची लग्ने "Arranged" झाली तर त्यांच्या आईने अमेरीकेत असणारी(रा) शोधलेला(ली) असते. आजकाल सगळ्या मराठी नट्यापण अमेरीकेतच आहेत. इथे चितळेच्या बाकरवडी पासुन हाजमोलाच्या गोळीपर्यंत सगळे मिळते. सारे भेसळ शून्य. "एक्सपोर्ट क्वालिटी", लोकसंख्या कमी त्यामुळे लोकांना लोकांची किम्मत आहे. जर नीट बघितले तर आयुष्य एकंदरीत चांगले आहे. GC असेल तर पगार पण चांगलाच मिळतो. इथल्या वर्षाच्या बचतीमध्ये भारतात घरे बनवता येतात. माझे बरेचसे नातेवाईक भारतात आहेत, त्यामुळे मी भारतात जायची इच्छा करतो. पण मला माहीत नाही कसे, यांचे खुप नातेवाईक पण अमेरीकेतच असतात. भारतात गेले तरी, अर्थात सुटीलाच, तन साथ देत नाही, सर्दी-पड्से परत येईपर्यंत सुटत नाही. याप्रकारच्या लोकांनी फक्त अमेरीका बघितलेली असते, त्यामुळे सिडनी, सिंगापोर, किंवा जपान खुपशा गोष्टीत अमेरीकेपेक्षा पुढे असु शकतो हे ते कधीच मानु शकत नाहीत. पासपोर्ट अजुन भारतीय असला तर तन-मन-डॉलररुपी धनाने हे अमेरीकन असतात.
दुसरा कीडा हा भरकटलेला, पोटापाण्यासाठी अमेरीकेत आलेला. भारतात बरेच मित्र-मैत्रिणी GRE-TOEFL चा अभ्यास करतात म्हणून आपणही करणारा. अमेरीकेत आल्याच्या पहील्या दिवसापासुन परत जाण्याच्या गोष्टी करणारा. थोडा पैसा कमवून जाईन असे मनी बाळगणारा. कदाचीत, एखाद्या प्रतिष्ठीत भारतीय संगणकीय कंपनीतुन अमेरीकेत आलेला. GC चे महत्व यांना उशीरा कळते, जर कळले तर त्या मॄगजळाच्या लागतात, बरेचदा डोळे उघडेपर्यंत व्हीसाची ६ वर्षे संपत आलेली असतात, मग एखादे मूल अमेरीकेत जन्माला घालतात. ते मूल अमेरीकन नागरीक असते, त्याला नंतर फायदा होईल असा प्रांजळ भाव मनी ठेवतात. मूलं लवकर मोठी झाली तर ती भारतात राहू शकत नाही. मग कुठे कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये नागरीकत्व पण मिळते का बघतात. काही नाही झाले तर भारतीय आहोत असे म्हणत भारतात जातात. जाण्या अगोदर यांची चिडचिड बघवत नाही. जे येणकेण प्रकारेण राहतात, ते GC ची वाट बघत म्हातारे होत राहतात. पण तोंडी कायम परत जाण्याच्या कथा असतात, यांचे परत जाण्याच्या अटीला हवे इतके पैसे कधीच साठत नाहीत. मग दर वर्षी सहल म्हणुन देशाला जातात, येताना मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके नक्की आणतात. पुण्यातल्या तुळशीबागेत खरेदी केलेली तोरणे भाड्याच्या घराच्या दारावर लावून मराठीपण आणतात. यांना परदेशात देशाचा खुप पुळका येतो, त्यामुळे बरेच देशी सणवार पण करतात, सत्यनारायण काय, आणि दिवाळीत घरावर कंदील काय. मुले जर शाळेत जाणारी असतील तर त्यांना गणेशोत्सवाऎवजी, नाताळाचे जास्त कौतुक असते. जर लग्न झाले नसेल (अर्थात लग्न झाले असेल तरीसुद्धा) तर अमेरीकन उघड्या अंगाच्या मुली बघण्याची गम्मत न्यारीच असते. जमले तर अमेरीकन पटवायची इच्छा कायम मनी असते. आई-वडिलांना आवडणार नाही अमेरीकन सुन असे म्हणुन काही जण मन मारतात, काही जण आपल्या जमणार नाही असे मनी समजून घेऊन फक्त देसीच जमतात का ते बघतात. काहींचे नक्की असते की "Arranged" च करणार. काही ABCD मिळतात का ते पण बघतात, एक तीर मॆं दो पंछी. जमले नाही तर भारतात आईने जीवनसाथी - रोहिणी अशा ठिकाणी प्रयत्न चालु ठेवलेले असतात. scanned photo गठ्ठ्याने येतात. सारासार विचार हॊतो, भारतात लग्न करून तीच्या/त्याच्या बरोबर परत अमेरीकाप्रयाण करतात. मनाने नसले तरी देहाने अमेरीकन झालेले असतात.
माझ्यामते, अमेरीका हा एक रॊग आहे, मलाही याची लागण झाली आहे, काही जणांवर परीणाम उठून दिसतात, काही जणांवर फक्त मानसिक जखमा दिसतात. याला मात्रा नाही, भारत यांचा रहात नाही, आणि अमेरीका यांची होत नाही. काहीही म्हणा, वय वाढू लागलं की आठवणी घिरट्या घालु लागतात. मुले अमेरीकेची झालेली असतात, तुम्ही मात्र मनाच्या कुठेतरी कोनाड्यात भारतीय असता. मला माहीत नाही याला उपाय काय, पण यातुन सुटका फारच कमी जणांची होते. पोटापाई त्रिशंकू होणारी ही जमात अमेरीकेत बरीच मोठी आहे, आणि दरदिवसागणी ही शिरगणती वाढत आहे....
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock...
2 comments:
Go to Roman... Live like Roman.
Go to Australia.. Live like Australian...
Vishal,
Chhan lihilays! Donhi prakarche kide pahilyamule concept ekdum patla. :-) Aajkal far thode, pan tisrya prakarche loka hi ahet.. those who actually go back to India after their studies are complete! Feels good to see such people :-)
I Stumbled upon your blog while surfing. The layout, design et al is good! Just like the headline of your blog: Just perfect, nothing more, nothing less! Keep it up!
Post a Comment