आजकाल मी फीरतीवर आहे. दर सोमवार ते गुरुवार शिकागोत आणि बाकीचे दिवस क्लिव्हलॅंड मध्ये. Consultant चे आयुष्य असेच हो. दररोज १० तास पाटया टाकायच्या, ४० झाले की घरी परत. दररोज नवीन उपहारगृह शोधावे. देसी मिळाले तर उत्तमच. Starbucks च्या ताझो चायवर झोप टाळावी, कधी कंटाळ्लो तर समोरच्या सीअर्स इमारती भोवती एक चक्कर टाकावी. बरेच घाई गडबड असते ती काम-धंद्यावाल्यांची, पर्यटक मात्र सारे निवांत असतात. दूरुन सीअर्स कसा दिसतो, आणि त्याची छायाचित्रे घेण्यात मग्न असतात. मध्येच कोणी भिकारी जेवणासाठी डॉलर मागतो. लोक सहजतेने दुर्लक्ष करतात. सुना-मुलींच्या बाळंतपणाला आलेले एखादे म्हातारे जोडपे बघुन न बघितल्यासारखे करत कुजबुजतात, "अमेरीकेत पण भिकारी?". मुलगा किंवा सून म्हणते, बरेच असतात. पण आजोबांना आश्चर्य वाटते डॉलरची भीक म्हणजे ५० रुपये. एवढ्या श्रीमंत देशात पण कुणी बेघर असू शकतो. भारतात जाऊन मित्रांना सांगण्यासाठी मानसिक नोंद करतात.
अशाच एका मंगळवारी काम संपले, निघताना Chipotle मध्ये Burrito घ्यायचा ठरवला. उपवासाचा दिवस, घराबाहेर असताना पण पाळ्तो, शाकाहारी खाऊन सोडतो. बाकी काही पाळणे होत नाही. निघताना कुठुन तरी एक गोरी बाई सामोरी आली आणि हात पसरुन म्हणाली, "जेवायला काही घेऊन द्याल का?, मला घर नाहीये". पट्कन तोंडातुन नाही निघून गेले. मनात काहीतरी चुकले. आई म्हणायची जेवायच्या वेळेला कोणी मागितले तर नाही म्हणू नये, उपवासाच्या दिवशी तर दिल्याशिवाय स्वतः जेवू नये. मागे वळलो तो पर्यंत ती बाई जशी आली तशी गायब झाली होती. आईची शिकवण वापरायची संधी जशी आली तशी गेली. हुरहुर बराच वेळ राहीली, ही वेळ परत येईल त्यावेळी देवू असा विचार करत पाय उचलते घेतले. राहायच्या ठिकाणापर्यंत चालत जाताना, भूतकाळ डोळ्यांसमोरुन धावू लागला, चालता चालता आठवला रसिकलाल त्रिवेदी. ठाण्याला मोल्डींगचा व्यवसाय करणार मारवाडी माणूस. वडलांचा मित्र, तो त्याच्या ऎन चाळीशीत. मुंबईत मुरलेला. स्वभावाने रगेल आणि रंगेल. मी मात्र १५-१६ वर्षांचा. त्याच्या गाडीतुन जाताना सिग्नलवर एक म्हातारी भीक मागत होती. नेमकी आमच्या गाडीला लाल बत्ती मिळाली. "बेटा, वडापाव के लिये दो रुपॆ दे दे". रसिकलाल म्हणे, "आगे जाओ, पॆसा लेके दारु पियेगी". म्हातारी काही ऎकेना, दारु नाही पीत म्हणाली. रसिकलाल पण पेटला. तिला गाडीत बसवून वडापावच्या स्टॉलपाशी घेऊन गेला, दुकानदाराला म्हणे, हि जेवढे खाईल तेवढ्याचे पॆसे मी देतो. म्हातारी काही खाईना, तीला दोन रुपयेच हवे. नंतर रसिकालाल मला म्हणाला "अरे, आजकल भिक मांगना भी एक धंदा हॆ। दो मॆंसे एक रुपीया बुढी उसके ठेकेदार को देगी, एक में मस्त दारु पिके फुटपाथ पे सोयेगी". खरे किती खोटे किती देव जाणे. मी मात्र पुढची संधी न सोडण्याचा निर्णय घेतला.
अमेरीकेन सरकार असे भिकारी काही शहरातुन हाकलुन लावते. त्यांची काही संघटना नसल्याने जावे तर लागतेच. आधीच घर नाही. मग एका ठिकाणाहुन निघतो आणि दुसरीकडे तो उभा राहतो. पण शेवटी हा भिकारी आणि तुळजापूरचा भिकारी सारखाच. दोघे पोटाला मागतात्त. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीथे जास्त दिसतात. सगळे जण मात्र भारताला वाईट म्हणतात. जगात सगळीकडे भूक मात्र सारखीच असते, कोणी देवचे नाव घेऊन हात पसरतो, कोणी नुसतेच पोटाला मागतो. कधी कधी वाटते, ही लोक भुकेची भीक मागुन पोटाचाच धंदा करतात. सरकार फक्त करदायकांचे ऎकते, भिकेवर कर लागला तर त्यांना शहराबाहेर काढणार नाही. पण मग भीकेचा व्यवसाय मात्र चालणार नाही.
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
2 comments:
वाचून वाईट वाटलं. तुमचं म्हणण खरे आहे, भुक सगळीकडची सारखीच. भिक मागणारी माणसं काही ठीकाणी जास्त असतील किंवा काही ठीकाणी कमी, एवढाच काय तो फरक!
मुकुल
Great blog. Can not beleive that you are a COEPian. you should share.. Visit www.aarewah.com
Post a Comment