Sunday, March 30, 2008

विश्रामबागवाडा ग्रंथालयाचे संकेतस्थळ

{Khapre.org} च्या माध्यमातुन आम्ही मागील ६ महिन्यात जवळपास ८००० पाने संकेस्थळावरुन लोकांपर्यंत पोहोचविली आहेत. त्यात सुमारे १५०० अभंग, १४०० भजने, १०००+ गोष्टी, २०००+ कविता-गाणी-रचनांचा समावेश आहे.  यासाठी आम्ही अनेक ग्रंथालयांची मदत घेत आहोत त्यातील महत्वाचा वाटा पुण्याच्या शासकीय विभागीय ग्रंथालयाचा आहे. आम्ही शासनाच्या या ग्रंथालयाला जगभरात उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

विश्रामबागवाडा ग्रंथालयाचे संकेतस्थळ लवकरच
(दै. सकाळ बातमी दि. ३० मार्च २००८)
पुणे, ता. २९ - विश्रामबागवाडा येथील शासकीय ग्रंथालयाचे संकेतस्थळ लवकरच विकसित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने स्वतःचे संकेतस्थळ असणारे हे राज्यातील पहिलेच ग्रंथालय ठरणार आहे.
संतसाहित्याचा अमूल्य ठेवा इंटरनेटवर नेण्याचे काम करणारे "ट्रान्सलिटरल टेक्‍नॉलॉजीज"चे दिलीप खापरे यांनी शासकीय ग्रंथालयाचे संकेतस्थळ विकसित करण्यासंबंधीची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यांनी याबाबतचा प्रस्तावदेखील दिला आहे. यासंदर्भात शासनाची मंजुरी मिळाल्यावर संकेतस्थळ विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल, अशी माहिती प्रमुख ग्रंथपाल गणेश तायडे यांनी दिली.
प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्‍ट आणि डिलिव्हरी ऑफ बुक्‍स ऍक्‍टनुसार नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या प्रती मुद्रक-प्रकाशक यांनी शासकीय ग्रंथालयास देणे बंधनकारक आहे. ही पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे ही पुस्तके संकेतस्थळाच्या माध्यमातून वाचकांसाठी खुले करता येणे शक्‍य होईल, असे तायडे यांनी सांगितले.
ग्रंथालयात सध्या चार लाख पुस्तकांचा संग्रह आहे. ग्रंथ देवघेव व्यवहार ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सॉफ्टवेअर घेण्याबाबतची विनंती शासनाला करण्यात आली आहे. वाचकांकडून अभिप्राय मागवून त्यानुसार पुस्तकांच्या खरेदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. भविष्यात पुस्तकांसाठी बारकोडिंग पद्धती राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तायडे यांनी दिली. ग्रंथालयाचे सध्या दहा हजार सभासद आहेत. सभासद नूतनीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मे महिन्यापासून प्रत्येक इच्छुकास ग्रंथालयाचे सभासदत्व मिळू शकेल, असे तायडे यांनी सांगितले.

 

या प्रयत्नात आम्ही अनेक नव्या सुविधा देण्याव्यतिरिक्त देशातील सामान्य वाचकांमध्ये मराठी साहित्यावर नवा संवाद सुरु करणार आहोत. ज्याद्वारे त्यांना त्यांचे विचार दुरवर पोचवता येणार आहेत.

Saturday, March 08, 2008

कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब

************CLARIFICATION*******************

बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की....


मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अजिबात घेत नाहीये. मला तशी इच्छा पण नाही. ट्युलीपच्या लेखांचा मी पण खुप चाहता आहे. मला फक पर्याय सुचवायचे आहेत की ज्या द्वारे तुम्ही तुमचे लेखन वाचवु शकता. मला नक्की हेच म्हणायचे आहे की चोर कशीही चोरी करणारच. तुम्ही सतर्क असावे. आज मराठी ब्लॉग विश्व लहान आहे, म्हणुन असे प्रकार सापडतात, जर ती इंग्रजी इतकी मोठी झाली तर ते सापडणे अशक्य आहे.


************ORIGINAL POST*******************
मराठी अनुदिनी विश्वात कोणीतरी लेखनाची चोरी केली. पण कोणी कसली चोरी केली याचा शहानिशा न करता सारे आरोप करायला सरसावले. मुळ लेखनाचा हक्क दर्शवणार्‍यांनी सुद्धा अजुनही चोरी झालेली कविता ही त्यांचे स्वतःचे लेखन आहे असा दावा केलेला नाही.


संशयपात्र लेख:

http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post_10.html

http://gauraviprabhudesai.blogspot.com/2008/03/blog-post_2471.html

निषेधक:

http://kasakaay.blogspot.com/2008/03/blog-post_07.html

http://marathisahitya.blogspot.com/2008/03/blog-post.html http://tulipsintwilight.blogspot.com/2008/03/blog-post.html
आणि आता मी पण!!!

संदर्भ:
http://vidagdha.wordpress.com/2007/11/23/vidagdh_copyright/ 1. महत्वाचे म्हणजे, "चोरी करणे पाप आहे" असे आपण सार्‍यांना लहानपणी शिकवले असताना पण चोरी होते आणि महाजालाच्या स्वरुपाप्रमाणे ते पकडली पण जाते.

 2. लेखनाची चोरी हा साहित्यिक समाजात अक्षम्य गुन्हा मानला जातो.

 3. नवजात महाजाली साहित्यिकांमध्ये इतक्या पटकन उग्र पतिक्रिया उमटल्या.

 4. हे कार्य फक्त अप्रतिभावंतच करु शकतात हे नक्की.

 5. महाजालाच्या खुपशा फायद्याबरोबर एक सर्वात मोठा तोटा म्हणजे "कोणीही सर्व काही चोरु शकतो" हा आहे. हे मायाजाल जेव्हापासुन जन्माला आले आहे तेव्हा पासुन e-चोरी चालु आहेत.

 6. खरे सांगावे तर, जनाची नाही तरी मनाची थोडी ठेवावी आणि अशी चोरी करु नये.


फार झाले तत्वज्ञान,

 1. लेखाच्या खाली "© सोम्या-गोम्या" असे लिहुन तुम्हास त्याचे प्रतिहक्क मिळत नाहीत.

 2. तुम्ही अगोदर प्रसिद्ध केलेला लेख तुमचा असेल असा आशय बांधणे चुक आहे. उदा. तुकाराम गाथा प्रथम देहु संस्थानाने प्रसिद्ध केली तरी त्यांच्याकडे गाथेचे पतिहक्क नाहीत.

 3. जो पर्यंत तुम्ही तुमचे लेख "Copyrights" (प्रतिहक्क) चा अर्ज सरकारी दफ्तरात करत नाही तो पर्यंत तुमच्याकडे त्याचे प्रतिहक्क आहेत असे नाही.

 4. जर तुमचा लेख चोरी झालाच तर, तुम्हास ते सिध्द करणे अतिशय अवघड आहे आणि जर तुमच्याकडे तो सरकारी कागद नाही तर नक्की कठीण आहे. अर्थात हे ध्यानी ठेवा की "Cyber Forensics" (मराठी काय म्हणणार कोण जाणे) हा एक खुप सखोल ज्ञानाचा विषय आहे.

 5. कोणी चोरी केली हे समजणे अशक्य आहे, कारण मला जेव्हढे समजते त्यावरुन Tulip पण चोरी करु शकतात. मुळ लेख कोणाचे हे समजणे अवघड आहे कारण तो लेख मी घेऊन मागील तारखेला (जानेवारी २००७ ला) प्रसिद्ध करु शकतो. दोन्ही बाजुचे लेखक Blogger वापरत असल्याने, कृपया हा संदर्भ बघावा. या नव्या सुविधे प्रमाणे, हे चोर कोण हे सिद्ध करणे जरा अवघड आहे.

 6. एखाद्याने प्रथम तक्रार केली म्हणुन त्याला मुळ लेख मानणे बरोबर नाही.

 7. Tulip आणि गौरवी यांच्यापैकी कोणीही ती वादग्रस्त कविता त्यांची स्वतःची आहे असे लिहिलेले नाही, किंवा त्यांची आहे असे सुद्धा लिहिलेले नाही.

 8. दोन्ही लेखातील कोणीही प्रतिहक्काची नोंदणी केलेली नसुन, त्यांनी स्वतःच्या लेखात प्रतिहक्काची मागणीसुद्धा केलेली नाही.

 9. जर तुम्हाला असे वाटत असेल की कुणीही तुमचे लेख चोरु नयेत, तर त्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहे, हे तुम्हाला माहीत आहे. स्वतःच्या अनुदिनीमधुन अथवा मराठी ब्लॉग विश्वातुन त्याला वाचा फोडणे हे जरा मेंगळटपणाचे वाटते.

 10. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, माझ्या अनुदिनी प्रमाणे तुम्हीही करु शकता, माझ्या अनुदिनीवर तुम्ही काहीही निवडु शकत नसुन, तुम्ही उजवी टिचकी पण मारु शकत नाही.

 11. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुम्ही तुमचे ब्लॉग फुकट्च्या अनुदिनीपासुन काढुन स्वतः उभारण्याचा (web hosting) विचार करा. उदा. Blogspot, Wordpress वापरु नका. फुकटच्या अनुदिनीतुन तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी चोर चोरी नक्की करु शकतो, हे ध्यानी ठेवा. जर तुम्ही अनुदिनी स्वतः उभारत असाल तर इतर अनेक प्रकारे तुम्ही तुमचे लेख सुरक्षित करु शकता.

 12.  जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमचे Feed बंद करा, अथवा अर्धे feed ठेवा.

 13. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या ब्लॉगची एक प्रत U.S. Copyright Office अथवा Indian Copyrights कार्यालयात जमा करत रहा.

 14. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या प्रत्येक लेखना बरोबर प्रतिहक्काची नोंद ठेवा. कमीत कमी Creative Commons License नोंद करा.
तुमचे विचार नक्की कळवा!!! आभारी आहे.