मकर संक्रांत

आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस.
भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्ता मिळाली, आणि मला वाटते आता राजकीय संक्रमण सुरू झाले आहे.
कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत खूप देशाचे नुकसान केले, आणि आता त्यांच्यावरच संक्रांत आली आहे. सर्व सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. आधार कार्डाचे भूत डोक्यावर ठेवले आहे.
गॅस साठी पहिल्यांदा पूर्ण पैसे साधारण १००० पर्यंत द्यायचे आणि नंतर ते अनुदानाचे पैसे बॅंकेतून परत घ्यायचे. गरीब माणसाने प्रथम एवढे पैसे कोठून आणायचे याचा विचार नाहीच.  किती किती समस्या करून ठेवल्यात या पक्षाने.
असो पण आता वेळ आली आहे, संक्रमण करण्याची आणि आता खर्‍या अर्थाने तिळगूळ वाटायचेत ते एप्रिल मधील लोकसभा निवडणूक झाल्यावरच.
पुन्हा एकदा तिलगूळ घ्या गोड बोला.

Unknown

No comments: