पुरस्कार, प्रसिद्धीचे साधन

वाचकहो, खालील बातमी वाचलीत, पुरस्कार. बहिणीवा पुरस्कार भावालाच. आता पुरेना, नवीन उभारणार्‍या संगीतकारांना द्या ना पुरस्कार. यांचे नाव झाले, यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात आणखी एकाची भर. खरे तर पंडितांनीच म्हणायला पाहिजे होते की, आता बस कोणा दुसर्‍याला द्या पुरस्कार. पण हा  मानव  स्वभाव आहे प्रसिद्धीसाठीची कोणतीही संधी माणूस सोडत नाही.  खरे तर अजूनही संगीतकार होते ते नक्कीच पुरस्काराच्या तोडीचे होते. आता यापुढे तरी पुरस्कार देणार्‍यांनी, आणि घेणार्‍यांनी विचार करावा.
 
हृदयनाथ मंगेशकरांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

पिंपरी, ता. ९ - आशाताई आणि माझे नाते हे केवळ बहीण-भावाचे नसून आई-मुलासारखे आहे. तिच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा लतादीदी आणि मास्टर दीनानाथांच्या स्वरांचा सन्मान आहे, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज येथे व्यक्त केली. .......
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखा व कलारंग प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा "आशा भोसले पुरस्कार' ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या वेळी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, हेमेंद्र शहा, दीपक पायगुडे, विजय जोशी, रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे व्यासपीठावर होते. वक्‍त्यांची अनौपचारिक भाषणे आणि त्यांनी सांगितलेल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या विविध आठवणींमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ""आशाताईंच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच तिच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. लतादीदीच्या आणि आशाताईंच्या अमृतमहोत्सवाचा आनंद तर आहेच; आशाताईंनी संगीताचे सर्व प्रकार समर्थपणे हाताळले. विलक्षण उत्साही असलेली आशाताई पंचाहत्तरीची झाल्याचे अजिबात वाटत नाही. सुरवातीपासून तिला खूप धडपड करावी लागली आहे. मी लहान असताना पायाच्या दुखण्यामुळे ती मला कडेवर घेऊन सर्व कामे करत असे. मी संगीतबद्ध केलेले तिचे पहिले गाजलेले "जिवलगा राहिले रे दूर घर माझे..' हे गाणे तिने विलक्षण गायले
 
राज ठाकरे म्हणाले, ""मंगेशकर आणि पुरंदरे कुटुंबाचे माझ्यावर व्यक्तिगत मोठे ऋण आहेत. या दोन घरांना मी कधीही नकार देऊ शकत नाही. अपमान, वेदना, दुःख सहन केल्याशिवाय नवीन मूर्ती आजपर्यंत झालेली नाही. हृदय पिळवटून टाकल्यावर असा कलाकार जन्माला येतो. बाळासाहेबांनी (हृदयनाथ) संगीतबद्ध केलेली लतादीदींनी गायलेले ज्ञानेश्‍वरांचे अभंग, अशा कलाकृती समाधी लागल्याशिवाय घडू शकत नाहीत.''

श्री. पुरंदरे म्हणाले, ""मंगेशकर कुटुंबाची पाच भावंडे म्हणजे स्वर्गात सरस्वतीवर वाहिलेल्या सोनचाफ्यातील फुलांमधून पृथ्वीवर घरंगळत आलेली ही फुले आहेत. बालगंधर्व सुद्धा मास्टर दीनानाथांचे हेवा करत, यातच त्यांच्या आवाजाचे महत्त्व समजून येते. त्यांच्या आवाजात विलक्षण गोडवा होता. आशाताईंचा आवाज म्हणजे पंचामृतातील मध आहे. त्यांच्या गायनातील असामान्य आवाजाप्रमाणेच त्यांचे गद्य शब्दही अलौकिक अनुभूती देतात. त्यांना मानवी दुःखाची जाण आहे.''

श्री. भोईर यांनी प्रास्ताविक केले. श्री. घांगुर्डे यांनी परिचय करून दिला. सतीश दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सांकला यांनी आभार मानले.

विलक्षण उत्साह अन्‌ जिद्द
हृदयनाथ म्हणाले, ""विलक्षण उत्साही असलेली आशाताई पंचाहत्तरीची झाल्याचे अजिबात वाटत नाही. सुरवातीपासून तिला खूप धडपड करावी लागली. अनेक प्रकारची आव्हाने तिने समर्थपणे पेलली. मी लहान असताना पायाच्या दुखण्यामुळे ती मला कडेवर घेऊन सर्व कामे करत असे, हे मी कधीही विसरू शकत नाही.''

Unknown

No comments: