जर हा विषय आताच्या पिढीतील तरुणांना विचारला तर साहजिक त्यांचे उत्तर असेल आंतरजातीयच काय पण आंतरधर्मिय विवाह का नकोत? जगाच्या पाठीवर कोठेही जा सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो, अगदी अमेरिकेत जरी शस्त्रक्रिया करायला गेला तरी तेथील कोणाचेही रक्त चालते, किडनी खराब झाली तर ती सुद्धा कोणाचीही चालते,तर मग लग्नासाठीच हि जाती धर्माची बंधने का असावीत? प्रजननाची क्रिया सर्व धर्मात एकच असते, तर मग मुला मुलींनी आम्तरधर्मिय विवाह केल्यास काय बिघदणार आहे? परंतु काही कर्मठ प्रामाण्यांना हा प्रकार पटत नाही, आणि का पटत नाही त्याचे समर्पक उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते.
प्रेमावर आज जग चालले आहे, प्रेम ही भावना असते, तेथे जात, पात किंवा धर्माचा विचार होत नाही. त्याप्रेमातून ज्या नवबालकाचा जन्म होतो तो सोबत धर्म घेऊन येत नाही. खरे तर आता सरकारनेच नोकरीतून, शाळेत प्रवेश देताना, अगर कोनतीही सवलत देताना जात आणि धर्माचा उल्लेख टाळायला पाहिजे. जेव्हा सरकार अशी पावले उचलील तेव्हाच समाजातून जाती धर्माचे उच्चाटन होईल. मोठमोठी भाषणे देनारे मात्र घरातील मुलामुलींवर संस्कार वेगळेच करतात. त्यांची मुले परजातीच्या प्रेमात पडली तर कोण आकांडतांडव करतात, त्यांना सर्व बाजूंनी विरोध करतात. आता हे थांबले पाहिजे. आताची पिढी जी प्रेमात जात, पात धर्म पाळत नाही ती एक प्रकारे ही संकल्पनाच नष्ट करीत आहे.
ही जी जात आहे, ही जाता जाता जात राहिली तर जाताना जातीच्या समस्या सोडवून जाईल.