एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार
राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? आता यावर काय उपयायोजना आखल्या म्हणजे रोगाचा फैलाव थांबेल? सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ राहते, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
सिकेल सेल अनिमिया हा एक जनुकिय दॊष आहे. रक्तात असणाऱ्या तांबड्या पेशींमध्ये हीमोग्लोबिन नावाचे प्रोटिन असते.हे प्रोटिन शरीरात ऑक्सिजन वाहायचे काम करते. हीमोग्लोबिन ४ वेगवेगळ्या प्रोटिन भागांनी(subunits) बनलेले असते. २ भाग अल्फ़ा आणि २ बेटा प्रकारचे असतात. अल्फ़ा आणि बेटा हे प्रोटिनच्या structures साखळीचे प्रकार आहेत. बेटा साखळीत जेव्हा एक nucleotide glutamateची जागा valine नावाचा दुसरा nucleotide घेतो, तेव्हा हीमोग्लोबिनचे structure बदलते. याचा परिणाम म्हणजे सगळॆ हीमोग्लोबिनचे रेणू एक्मेकांना चिकटतात. या आकार बदललेल्या हीमोग्लोबिन रेणुंमुळे तांबड्या पेशींचा गोल आकार खुरप्याच्या आकाराप्रमाणॆ होतो. य़ामुळॆ तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांना चिकटु लागतात आणि परिणाम ऑक्सिजन पुरवठ्यावर होतो.
Sickle-shaped red blood cells
प्रत्येक माणसाला एक gene आई आणि एक gene वडिलांकडून मिळ्तो. जर दोन्ही genes मध्ये वरच्याप्रमाणॆ बदललेला nucleotide असेल तर त्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो. पण जर फ़क्त एकच gene कमतरता असलेला असेल आणि दुसरा gene चांगला असेल तर त्या माणसाला carrier म्हणतात. अशा माणसाला अनिमियाचा त्रास होत नाही.
सिकेल सेल अनिमियाचा मलेरियाशी जवळचा संबंध आहे. सिकेल सेल अनिमिया मलेरिया असणाऱ्या सर्व भागात आढळ्तो. मलेरियाचा जीवाणु एक प्रकारच्या मादी डासाच्या चावण्यामुळे पसरतो. मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करतो आणि तिथेच वाढतो. पण जर सिकेल सेल अनिमियामुळॆ तांबड्या पेशींचा आकार बदललेला असेल तर मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करु शकत नाही. ज्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो किंवा जो माणुस सिकेल सेल अनिमियाचा carrier असतो त्याला, मलेरिया होण्याचे chances कमी असतात.
भारतात जिथे मलेरिया अतिशय मोठ्या प्रमाणात आढळ्तो तिथे सिकेल सेल अनिमिया असणं,आश्चर्याचं नाही. बहुतेक आपले gene मलेरियापसुन वाचण्यासाठी तांबड्या पेशींचा आकार बदलतात,पण त्याचा परिणाम सिकेल सेल अनिमियात होतो. हि फार चांगली गोष्ट आहे कि, आता या रोगाची गंभीरता लक्षात घेउन त्यावरती आता ठोस पावलं उचलली जातील.
No comments:
Post a Comment