मी महाजाल (Internet) प्रेमी आहे, त्यामुळे नजरेतुन ठळक बदल निसटणे जरा अवघड आहे.
आर्थिक वर्ष २००७ महाजालावर मराठी कवींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. बहुतेक सारे कवी आपल्या रचना फक्त अनुदिनी माध्यमाने प्रसारित करत असल्याचे प्रादुर्भावाने दिसुन येते. गुगलच्या ब्लॉगर ह्या नव्या संकरीत बियाणांचा वापर, वाढता महाजालाचा वापर आणि कविता सोडुन इतर महत्वाच्या विषयांवर कमी प्रादुर्भाव ही मुख्य कारणे असल्याचे दिसुन येत आहे. "प्रेम" या पारंपारिक आणि मुबलक खताच्या वापराने पीकाची वाढ चांगली झाल्याचे दावे करण्यात येत आहेत.
फुकटचे सेवादाते (Servers) आणि फुकटच्या प्रणाली (Software) यामुळे अनुदिनीकारांची संख्या वाढणे सहाजिक आहे. आता सगळेच काय लिहिणार, पण बरेच जण कविता लिहितात झाले. कदाचित कवी तेवढेच होते पण आता प्रसिध्दी माध्यम आवक्यात आले आहे. कवीला आता प्रकाशकाची गरज राहिली नाही, ते स्वतःच प्रकाशन करुन लोकांपर्यंत कविता पोहोचवतात. झकास!! नियम साधा आवडत नसेल तर वाचु नका. पण तुम्ही सांगा, हा सामान्य वाचकांवर अन्याय नाही का? अनेक विषय आहेत, समस्या आहेत, नव्या कल्पना आहेत, काही नसेल तर वृत्तपत्रे आहेत आणि त्यावर तुमचे विचार आहेत, पण महाजाली कवीच्या मनाला मुख्यतः प्रेम हाच जिव्हाळ्याचा विषय का वाटावा याला अजुन काही शास्त्रीय कारणे सापडलेली नाहीत.
No comments:
Post a Comment