कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब

************CLARIFICATION*******************

बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की....

मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अजिबात घेत नाहीये. मला तशी इच्छा पण नाही. ट्युलीपच्या लेखांचा मी पण खुप चाहता आहे. मला फक पर्याय सुचवायचे आहेत की ज्या द्वारे तुम्ही तुमचे लेखन वाचवु शकता. मला नक्की हेच म्हणायचे आहे की चोर कशीही चोरी करणारच. तुम्ही सतर्क असावे. आज मराठी ब्लॉग विश्व लहान आहे, म्हणुन असे प्रकार सापडतात, जर ती इंग्रजी इतकी मोठी झाली तर ते सापडणे अशक्य आहे.

************ORIGINAL POST*******************
मराठी अनुदिनी विश्वात कोणीतरी लेखनाची चोरी केली. पण कोणी कसली चोरी केली याचा शहानिशा न करता सारे आरोप करायला सरसावले. मुळ लेखनाचा हक्क दर्शवणार्‍यांनी सुद्धा अजुनही चोरी झालेली कविता ही त्यांचे स्वतःचे लेखन आहे असा दावा केलेला नाही.

संशयपात्र लेख:

http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post_10.html

http://gauraviprabhudesai.blogspot.com/2008/03/blog-post_2471.html

निषेधक:

http://kasakaay.blogspot.com/2008/03/blog-post_07.html

http://marathisahitya.blogspot.com/2008/03/blog-post.html http://tulipsintwilight.blogspot.com/2008/03/blog-post.html
आणि आता मी पण!!!

संदर्भ:
http://vidagdha.wordpress.com/2007/11/23/vidagdh_copyright/

  1. महत्वाचे म्हणजे, "चोरी करणे पाप आहे" असे आपण सार्‍यांना लहानपणी शिकवले असताना पण चोरी होते आणि महाजालाच्या स्वरुपाप्रमाणे ते पकडली पण जाते.

  2. लेखनाची चोरी हा साहित्यिक समाजात अक्षम्य गुन्हा मानला जातो.

  3. नवजात महाजाली साहित्यिकांमध्ये इतक्या पटकन उग्र पतिक्रिया उमटल्या.

  4. हे कार्य फक्त अप्रतिभावंतच करु शकतात हे नक्की.

  5. महाजालाच्या खुपशा फायद्याबरोबर एक सर्वात मोठा तोटा म्हणजे "कोणीही सर्व काही चोरु शकतो" हा आहे. हे मायाजाल जेव्हापासुन जन्माला आले आहे तेव्हा पासुन e-चोरी चालु आहेत.

  6. खरे सांगावे तर, जनाची नाही तरी मनाची थोडी ठेवावी आणि अशी चोरी करु नये.

फार झाले तत्वज्ञान,

  1. लेखाच्या खाली "© सोम्या-गोम्या" असे लिहुन तुम्हास त्याचे प्रतिहक्क मिळत नाहीत.

  2. तुम्ही अगोदर प्रसिद्ध केलेला लेख तुमचा असेल असा आशय बांधणे चुक आहे. उदा. तुकाराम गाथा प्रथम देहु संस्थानाने प्रसिद्ध केली तरी त्यांच्याकडे गाथेचे पतिहक्क नाहीत.

  3. जो पर्यंत तुम्ही तुमचे लेख "Copyrights" (प्रतिहक्क) चा अर्ज सरकारी दफ्तरात करत नाही तो पर्यंत तुमच्याकडे त्याचे प्रतिहक्क आहेत असे नाही.

  4. जर तुमचा लेख चोरी झालाच तर, तुम्हास ते सिध्द करणे अतिशय अवघड आहे आणि जर तुमच्याकडे तो सरकारी कागद नाही तर नक्की कठीण आहे. अर्थात हे ध्यानी ठेवा की "Cyber Forensics" (मराठी काय म्हणणार कोण जाणे) हा एक खुप सखोल ज्ञानाचा विषय आहे.

  5. कोणी चोरी केली हे समजणे अशक्य आहे, कारण मला जेव्हढे समजते त्यावरुन Tulip पण चोरी करु शकतात. मुळ लेख कोणाचे हे समजणे अवघड आहे कारण तो लेख मी घेऊन मागील तारखेला (जानेवारी २००७ ला) प्रसिद्ध करु शकतो. दोन्ही बाजुचे लेखक Blogger वापरत असल्याने, कृपया हा संदर्भ बघावा. या नव्या सुविधे प्रमाणे, हे चोर कोण हे सिद्ध करणे जरा अवघड आहे.

  6. एखाद्याने प्रथम तक्रार केली म्हणुन त्याला मुळ लेख मानणे बरोबर नाही.

  7. Tulip आणि गौरवी यांच्यापैकी कोणीही ती वादग्रस्त कविता त्यांची स्वतःची आहे असे लिहिलेले नाही, किंवा त्यांची आहे असे सुद्धा लिहिलेले नाही.

  8. दोन्ही लेखातील कोणीही प्रतिहक्काची नोंदणी केलेली नसुन, त्यांनी स्वतःच्या लेखात प्रतिहक्काची मागणीसुद्धा केलेली नाही.

  9. जर तुम्हाला असे वाटत असेल की कुणीही तुमचे लेख चोरु नयेत, तर त्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहे, हे तुम्हाला माहीत आहे. स्वतःच्या अनुदिनीमधुन अथवा मराठी ब्लॉग विश्वातुन त्याला वाचा फोडणे हे जरा मेंगळटपणाचे वाटते.

  10. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, माझ्या अनुदिनी प्रमाणे तुम्हीही करु शकता, माझ्या अनुदिनीवर तुम्ही काहीही निवडु शकत नसुन, तुम्ही उजवी टिचकी पण मारु शकत नाही.

  11. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुम्ही तुमचे ब्लॉग फुकट्च्या अनुदिनीपासुन काढुन स्वतः उभारण्याचा (web hosting) विचार करा. उदा. Blogspot, Wordpress वापरु नका. फुकटच्या अनुदिनीतुन तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी चोर चोरी नक्की करु शकतो, हे ध्यानी ठेवा. जर तुम्ही अनुदिनी स्वतः उभारत असाल तर इतर अनेक प्रकारे तुम्ही तुमचे लेख सुरक्षित करु शकता.

  12.  जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमचे Feed बंद करा, अथवा अर्धे feed ठेवा.

  13. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या ब्लॉगची एक प्रत U.S. Copyright Office अथवा Indian Copyrights कार्यालयात जमा करत रहा.

  14. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या प्रत्येक लेखना बरोबर प्रतिहक्काची नोंद ठेवा. कमीत कमी Creative Commons License नोंद करा.

तुमचे विचार नक्की कळवा!!! आभारी आहे.

Vishal Khapre

10 comments:

Raj said...

आपल्या सूचना चांगल्या आहेत. फक्त एकच मुद्दा. ट्युलिप यांचे पोस्ट १० जुलै, २००६चे आहे आणि गौरवी यांचे पोस्ट ७ मार्च, २००८चे आहे. यावरून कुणी कुणाची चोरी केली हे स्पष्ट होत नाही का? (टाइम मशीन अजून अस्तित्वात नाही हे गृहीत धरलेले आहे.)

Kamini Phadnis Kembhavi said...

santaap aaNataat he uchale lok :(

A woman from India said...

आपण काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत.
कृपया माझ्या ब्लॉगवरील भाग २ वाचा.
ब्लॉगवरील तारीख हा पोस्ट मुळ असल्याचा पुरावा ट्युलिपने दिलेला नाही. तर ट्युलिपचा लेख आधी वाचलेल्या वाचकाने ट्युलिपला चोरीची माहिती दिली असे तिने म्हंटले आहे.
कोर्टात जायचे असेल तर रचना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कॉपीराईट कार्यालयात नोंदणे आवश्यक आहे. परंतु रचनाकाराकडे प्रताधिकार by default असतात हे नाकारून चालणार नाही.
चोरी टाळण्यासाठी तुम्ही सुचवलेले इतर उपाय हे टेक्निकल आहेत. कायद्याच्या दृष्टिने
प्रसिद्ध करण्याचे माध्यम फुकट आहे का विकत घेतलेले आहे, हा मुद्दा गौण आहे. ब्लॉगस्पॉटवरील प्रत्येक पोस्ट पब्लिक डोमेन आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

Anamika Joshi said...

ani tumache mudde kitihi valid asale tarihee tumhee gauravi aiwajee tulipla ch dosh deta ahat ani tichya original likhanavar doubt gheta ahat , he tar safach chuk ahe . tichyakade kahi purava nasael ti courtat case jinkanar nahi pan nidan apan baki bloggers ni tila saath tari dyavala pahije na ki ulat ashi tichich tingal cheshta karayachi ashi? kamal ch ahe tumahi pan.

Vishal Khapre said...

राज,
कृपया ही कडी बघा. तुम्हाला टाइम मशीन गरज नाहीये.

विदुषी,
मला ट्युलीपला अजिबात प्रश्नात बाधायचे नाही. पण मला गौरवीला दोषही द्यायचा नाही. कारण हे सिद्ध कसे होणार की कोणाचा लेख प्रथम लिहिला आहे? Cyber Forensics च्या पद्धतीने ते करता येईल पण प्रश्न आहे की ते ट्युलीप करणार आहे का?

Raj said...

विशाल,

कृपया ट्युलिपच्या पोस्टला आलेले प्रतिसाद पाहावेत. जर पोस्टची तारीख बदलली असेल तर त्याला आलेल्या प्रतिसादांचे काय? कारण जर हे पोस्ट गौरवींनी लिहीले असे मानले तर ट्युलिप यांना या पोस्टवर दोन वर्षे आधीची तारीख टाकावी लागेल. अशा परिस्थितीत हे प्रतिसाद येणे शक्य नाही. शिवाय हे प्रतिसाद खोट्या नावाने दिलेले नाहीत. यातील गायत्री ह्या स्वतः मराठी अनुदिनीविश्वातील एक उत्कृष्ट लेखिका आहेत.

Raj said...

Found another interesting coincidence.

http://gauraviprabhudesai.blogspot.com/2008/03/blog-post_07.html

http://ashisht4u.blogspot.com/2006/07/blog-post.html

http://anandkshan.blogspot.com/

Pawan said...

खापरे साहेब,

तुम्ही सांगितलेल्या मुद्दयांपैकी "क्रिएटिव कॉमन्स" वापरा यामध्ये फार तथ्य आहे.

तुम्हाला कदाचित भारतीय कॉपिराईट कायदा चारचौघांपेक्षा जास्त माहिती असू शकतो. त्यामुळे मी आत्ताच त्याला "चॅलेंज" करणार नाही.

परंतु, इतर बाबींमध्ये व्यक्त केलेल्या गोष्टी खरंच कितपत प्रभावी आहेत हे याप्रमाणे:

काही लक्षात येणार्‍या गोष्टी:

- टयुलिप तुम्ही तुमची वेबसाईट सुरु करण्याच्या बरेच महिने अगोदर पासून त्यांच्या अनुदिनीवर लिहितायत. त्यांचा मोठा वाचकवर्ग त्यांच्या लेखांना ऍन्जॉय तर करतोच - पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेल्या ingenuity कदर पण करतो. त्यामुळे एका नवोदित ब्लॉगकर्त्याच्या ब्लॉगवर जेव्हा एखाद्या वाचकप्रिय ब्लॉगकर्त्याचे उचललेले लिखाण येते, तेव्हा स्वतः वाचकवर्गच ती चोरी लक्षात आणून देतो.

- मान्य की चोरी आहे की नाही त्याची योग्य तेवढी तपासणी झाली नाही, परंतु त्यावरून ते लेखन गौरवीचे मूळचे आहे व ट्युलिपने नाही असेदेखील सिद्ध होत नाही.

- जरी एखाद्या "पोस्ट"चा दिनांक बदलता येतो - तसे त्यावरील प्रतिसादाचा दिनांक बदलता येतो काय? किंवा प्रतिसाद देताना ब्लॉगरवर "अमुक दिवशीच" प्रतिसाद प्रसिद्ध करा अशी सोय प्रतिसाद देणार्‍याला आहे काय? सरळ उत्तर आहे. "नाही"

- पण प्रश्न हा एका चोरीचा नाही. आजपर्यंत अशा अनेक चोर्‍या लक्षात आल्या आहेत आणि त्या पुढेही होत राहातील. नंदन (मराठी ब्लॉग विश्वातील पहिल्या पंधरा अनुदिनीकारांमध्ये ज्यांचा उल्लेख येतो) ने सुद्धा त्यांच्या साहित्याशी मिळतेजुळते लेखन शोधून काढले आहे : http://marathisahitya.blogspot.com/2008/03/blog-post.html. विदग्धवरील लेखसुद्धा ह्या साहित्यचौर्याला बळी पडले आहेत. ते करणे हे फार चुकीचे आहे असे लोकांना कळले तर आणखीन चांगले नाही का?

आणखी असे इतर प्रसंग आहेत. त्यांना आळा बसावा याकरिता चर्चा सुरू आहे - त्यामध्ये तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत त्यापैकी "क्रिएटिव कॉमन्स" हा खरोखरच पात्रता असणारा मुद्दा आहे. अगदी स्वत:च्या लिखाणांची तांत्रिकरित्या सुरक्षासंयोजना वगैरे उपाय स्तुत्य आहे - पण ते म्हणजे बंदूकीला "सेफ्टी लॉक" असल्यासारखे आहे. कुणाला एखादा खून करायचा आहेच तर "सेफ्टी लॉक" निष्प्रभावी करणे म्हणजे हातचा मळ आहे, नाही? कसंकाय(संगीता)ने म्हटल्याप्रमाणे तो उपायच गौण आहे. ह्या प्रवृत्तीला चालनाच मिळायला नको, 'हा' मूळ बोंबेचा विषय आहे. ट्युलिपच्या लेखाची चोरी झाली हा तो एक विषय नव्हेच!

साहित्यचोरांना तुमच्या सारख्या 'प्रतिभा'शाली अनुदिनिकाराकडून थारा मिळणे म्हणजे त्यांच्या कृतीला दुजोरा दिल्यासारखेच नव्हे काय? मग तुम्ही कितीही उपाय करा - साहित्यचोरी चालते - असा गैरसमज झाल्यास तुमचे लाख उपाय अस्तित्वात असूनही मूळ प्रश्न सुटणार नाही.

तुमच्या मुद्दे क्र. १२ प्रमाणे प्रत्येकाला वाटेल असे नाही. एखादी अनुदिनीलेखिका तिचे लेखन वाचले जाते म्हणून आणखी हुरूपाने लिहिते. आपल्यापर्यंत वाचक पोहोचू नयेत असे तिला वाटत नाही - उलट जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपला लेख पोहोचावा असेच तिला वाटत असते. अशा वेळेस फीड बंद करणे म्हणजे उलट कारभार होऊन जातो. अर्ध्या पोस्ट्नी काय आळा बसणार आहे? जर संकेतस्थळावरूनच कॉपी करता येत असेल तर फीडवरील प्रतिबंध काय कामाचा?

तुमचे मुद्दे क्र. १० आणि ११ खाली केलेल्या कॉपीमुळे कितपत यशस्वी ठरले ते पहा (मान्य की तुमच्या योजनेमुळे नेभळट लोक ते लेख कॉपी करू शकत नाहीत. परंतु जरा डोके लावले की चोर घरात घुसतोच):

तुमच्या ह्या संपूर्ण पोस्टची सरळसरळ कॉपी: ही सरळ सोर्स कॉपी आहे - हाताने टाईप केले नाही. ज्याप्रमाणे हा लेख तुम्हीच लिहिला आहे आणि स्वत:च्या नावाने क्रिएटिव कॉमन्सच्या सहयोगाने स्वतःच्या नावाखाली टाकून उचललेला नाही - तेवढ्याच इमानदारीने खालील तुमच्या पोस्टची कॉपी मी फक्त सरळ सोर्स कॉपी करून मिळविलेली आहे:

"

कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब

मराठी अनुदिनी विश्वात कोणीतरी लेखनाची चोरी केली. पण कोणी कसली चोरी केली याचा शहानिशा न करता सारे आरोप करायला सरसावले. मुळ लेखनाचा हक्क दर्शवणार्‍यांनी सुद्धा अजुनही चोरी झालेली कविता ही त्यांचे स्वतःचे लेखन आहे असा दावा केलेला नाही.

संशयपात्र लेख:

http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post_10.html

http://gauraviprabhudesai.blogspot.com/2008/03/blog-post_2471.html

निषेधक:

http://kasakaay.blogspot.com/2008/03/blog-post_07.html

http://marathisahitya.blogspot.com/2008/03/blog-post.html http://tulipsintwilight.blogspot.com/2008/03/blog-post.html
आणि आता मी पण!!!

संदर्भ:
http://vidagdha.wordpress.com/2007/11/23/vidagdh_copyright/

1. महत्वाचे म्हणजे, "चोरी करणे पाप आहे" असे आपण सार्‍यांना लहानपणी शिकवले असताना पण चोरी होते आणि महाजालाच्या स्वरुपाप्रमाणे ते पकडली पण जाते.

2. लेखनाची चोरी हा साहित्यिक समाजात अक्षम्य गुन्हा मानला जातो.

3. नवजात महाजाली साहित्यिकांमध्ये इतक्या पटकन उग्र पतिक्रिया उमटल्या.

4. हे कार्य फक्त अप्रतिभावंतच करु शकतात हे नक्की.

5. महाजालाच्या खुपशा फायद्याबरोबर एक सर्वात मोठा तोटा म्हणजे "कोणीही सर्व काही चोरु शकतो" हा आहे. हे मायाजाल जेव्हापासुन जन्माला आले आहे तेव्हा पासुन e-चोरी चालु आहेत.

6. खरे सांगावे तर, जनाची नाही तरी मनाची थोडी ठेवावी आणि अशी चोरी करु नये.

फार झाले तत्वज्ञान,

1. लेखाच्या खाली "© सोम्या-गोम्या" असे लिहुन तुम्हास त्याचे प्रतिहक्क मिळत नाहीत.

2. तुम्ही अगोदर प्रसिद्ध केलेला लेख तुमचा असेल असा आशय बांधणे चुक आहे. उदा. तुकाराम गाथा प्रथम देहु संस्थानाने प्रसिद्ध केली तरी त्यांच्याकडे गाथेचे पतिहक्क नाहीत.

3. जो पर्यंत तुम्ही तुमचे लेख "Copyrights" (प्रतिहक्क) चा अर्ज सरकारी दफ्तरात करत नाही तो पर्यंत तुमच्याकडे त्याचे प्रतिहक्क आहेत असे नाही.

4. जर तुमचा लेख चोरी झालाच तर, तुम्हास ते सिध्द करणे अतिशय अवघड आहे आणि जर तुमच्याकडे तो सरकारी कागद नाही तर नक्की कठीण आहे. अर्थात हे ध्यानी ठेवा की "Cyber Forensics" (मराठी काय म्हणणार कोण जाणे) हा एक खुप सखोल ज्ञानाचा विषय आहे.

5. कोणी चोरी केली हे समजणे अशक्य आहे, कारण मला जेव्हढे समजते त्यावरुन Tulip पण चोरी करु शकतात. मुळ लेख कोणाचे हे समजणे अवघड आहे कारण तो लेख मी घेऊन मागील तारखेला (जानेवारी २००७ ला) प्रसिद्ध करु शकतो. दोन्ही बाजुचे लेखक Blogger वापरत असल्याने, कृपया हा संदर्भ बघावा. या नव्या सुविधे प्रमाणे, हे चोर कोण हे सिद्ध करणे जरा अवघड आहे.

6. एखाद्याने प्रथम तक्रार केली म्हणुन त्याला मुळ लेख मानणे बरोबर नाही.

7. Tulip आणि गौरवी यांच्यापैकी कोणीही ती वादग्रस्त कविता त्यांची स्वतःची आहे असे लिहिलेले नाही, किंवा त्यांची आहे असे सुद्धा लिहिलेले नाही.

8. दोन्ही लेखातील कोणीही प्रतिहक्काची नोंदणी केलेली नसुन, त्यांनी स्वतःच्या लेखात प्रतिहक्काची मागणीसुद्धा केलेली नाही.

9. जर तुम्हाला असे वाटत असेल की कुणीही तुमचे लेख चोरु नयेत, तर त्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहे, हे तुम्हाला माहीत आहे. स्वतःच्या अनुदिनीमधुन अथवा मराठी ब्लॉग विश्वातुन त्याला वाचा फोडणे हे जरा मेंगळटपणाचे वाटते.

10. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, माझ्या अनुदिनी प्रमाणे तुम्हीही करु शकता, माझ्या अनुदिनीवर तुम्ही काहीही निवडु शकत नसुन, तुम्ही उजवी टिचकी पण मारु शकत नाही.

11. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुम्ही तुमचे ब्लॉग फुकट्च्या अनुदिनीपासुन काढुन स्वतः उभारण्याचा (web hosting) विचार करा. उदा. Blogspot, Wordpress वापरु नका. फुकटच्या अनुदिनीतुन तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी चोर चोरी नक्की करु शकतो, हे ध्यानी ठेवा. जर तुम्ही अनुदिनी स्वतः उभारत असाल तर इतर अनेक प्रकारे तुम्ही तुमचे लेख सुरक्षित करु शकता.

12. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमचे Feed बंद करा, अथवा अर्धे feed ठेवा.

13. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या ब्लॉगची एक प्रत U.S. Copyright Office अथवा Indian Copyrights कार्यालयात जमा करत रहा.

14. जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर, तुमच्या प्रत्येक लेखना बरोबर प्रतिहक्काची नोंद ठेवा. कमीत कमी Creative Commons License नोंद करा.

Vishal Khapre said...

पवन,
मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अजिबात घेत नाहीये. मला तशी इच्छा पण नाही. ट्युलीपच्या लेखांचा मी पण खुप चाहता आहे. मला फक पर्याय सुचवायचे आहेत की ज्या द्वारे तुम्ही तुमचे लेखन वाचवु शकता. मला नक्की हेच म्हणायचे आहे की चोर कशीही चोरी करणारच. तुम्ही सतर्क असावे. आज मराठी ब्लॉग विश्व लहान आहे, म्हणुन असे प्रकार सापडतात, जर ती इंग्रजी इतकी मोठी झाली तर ते सापडणे अशक्य आहे.

Vishal Khapre said...

Wow See this!!

Google Search for "मोठी अजब चीज आहे"
Yahoo!! Search for "मोठी अजब चीज आहे"