स्वाईन फ्ल्यू

’स्वाईन फ्लू’ ला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, गर्दी करण्याचे टाळा. पण ही गर्दी कशामुळे झाली याचा विचार कुणी केला आहे काय? मतांच्या राजकारणासाठी याच राजकारण्यांनी झोपटपट्ट्या नियोमीत करण्यासठी प्रयत्न केले. परराज्यातून माणसांचा लोंढा मुंबईत येत होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी धोक्याचा इशारा दिला होता त्यावेळी याच काही मराठ्यांनी, जे स्वतःला बुद्धीजीवी समजतात त्यांनी विरोध केला होता. तो मराठी आक्रमणावरचा बाळासाहेबांचा इशारा समजला असता तर आज ही पाळी आली नसती.  या लोंढ्यामुळे बकालपणा वाढला. स्वाईन फ्लू ला पोषक वातावरण मिळाले. कसे लोक गर्दी करण्याचे टाळणार. कारण आपणच या धार्मिक कार्यक्रमांना फाजील महत्व देऊन ठेवले आहे. शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीची दहीहंडी होणार नाही. म्हणजे श्रीकृष्णाची दहीहंडी राष्ट्रवादीची झाली काय?

आताआताच सरकारणे २००० पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या नियमित करण्याची घोषणा केली, त्यावेळी त्या लोकांच्या सुविधांचा विचार केला काय? नाही. हे सर्व घाणेरडे राजकारण फक्त मतांसाठीच असते.

गर्दी करायची नाहीतर या लोकांनी जायचे कुठे? औषध घ्यायला जायचे तर तिथे गर्दी, दवाखान्यात तपासायला जायचे तर तिथे गर्दी, मास्क खरेदी करायला गर्दी, एवढेच काय सकाळी प्रातर्विधी उरकायलाही गर्दी. कुठे थांबणार? महाराष्ट्राचे समीकरण आहे, शहर म्हणजे झोपडपट्टी म्हणजे गर्दी.

स्वाईन फ्लूचे भयानक सत्य काय तर, मानवी लोंढे, वाढती लोकसंख्या, अज्ञान, बकालीकरण, राजकारण, भ्रष्टाचार, कामचुकारपणा अगदी डॉक्टरांचासुद्धा, आणि झोपलेले सरकार.

पण एक आहे स्वाईन फ्लूने सर्वांना उघडे पाडले. 

 

Unknown

No comments: