खरी ओळख पटली
"गांधीवादाचा बुरखा पडला गळून' या अग्रलेखातून अण्णा हजारे या स्वयंघोषित महात्म्याचा बुरखा फाडला, याचे कौतुक वाटले. ज्या देशातील पंतप्रधानांवर खटले दाखल होतात, न्यायाधीशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते किंवा काही मंत्री, खासदारांना सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळत नाही, त्या देशातील लोकशाहीस्वीकृत संसदेला आपण म्हणू तसा कायदा लागू करू पाहणाऱ्या अण्णा हजारे यांची खरी ओळख आता पटली. शरद पवार व्यक्ती म्हणून किती स्थितप्रज्ञ आहेत हे त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर लक्षात आले; पण अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला मात्र आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलताना काय बोलावे हे कळत नाही. हजारेंचा ढोंगी व बुरख्याआडचा गांधीवाद लक्षात आला. श्री. पवार यांच्यासारखा संयमी नेता जनतेला पाहायला मिळाला, तर वाचाळ "समाजनेता' जनतेने अण्णांच्या रूपाने पाहिला. अशा अण्णांना महात्मा पदवी देऊन खऱ्या महात्म्याची मात्र पुन्हा नाचक्की केली आहे
.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.
http://www.esakal.com/esakal/20111208/4813577296417256611.htm
दैनिक सकाळ मधील अनेक पत्रांपैकी हे एक पत्र. अण्णांबद्दल काय काय लोकांनी विचार केले होते. पण यश अण्णांच्या डोक्यात गेले. काही जणांनी अण्णांना महात्मा गांधींबरोबर नेऊन ठेवले, त्यांनीच विचार करावा गांधी असे बोलले असते काय? त्यांची योग्यता काय? अण्णांची काय? अण्णा आता हे बास झाले. लोक तुमची साथ सोडू लागलेत. तुम्ही संयम बाळगायला हवा. कारण भारतीय जनता कधी कोणाला पायदळी तुडवेल सांगता येत नाही. तेव्हा अण्णा सांभाळून, बरं का!