राजकपूरचा अवलिया

आम्हांला राज कपूरच्या सिनेमांचे वेड लावणारा एक अवलिया होता, तो म्हणजे पोवळे. आम्ही जिथे काम करत होतो, तेथे तो वेल्डरचे काम करायचा, आणि रहायचा वडगावला. कंपनीपासून साधारण २० कि. मी. वर. त्यावेळेस म्हणजे १९६८चा सुमार असेल, त्याकाळी त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता. एक एक रेकॉर्ड १५ रू. ना मिळायची, आणि तो ती विकत आणायचा. राजकपूरचे चित्रपट आह, श्री ४२०, चोरी चोरी, बरसात, आवारा, जागते रहो, जिस देशमे गंगा बहती है, बूट पॉलिश, अनाडी, अंदाज वगैरे. बस त्याच्या समोर विषय काढायचा.

एक एक गाणे तो अक्षरशः म्हणून दाखवायचा, नव्हे तर रसग्रहण करायचा. बरसात चे गाणे हमसे मिले तुम आणि त्यातील राजकपूरचे व्हायोलीन वाजवणे, आवरा मध्ये दम भर जो उधर या गाण्यातील राजकपूर नर्गिसच्या केसातून जे हात फिरवतो, आह मध्ये राजकपूर आजारी असतो आणि आजारे अब मेरा या गाण्यातील त्याचा आर्त अभिनय, संगम मधील जेव्हा त्याला वैजयंतीमालाचे राजेंद्रकुमारने लिहीलेले पत्र सापडते त्यावेळेसचा त्याचा सर्दी झालेला अभिनय, चोरी चोरीतील गाणे आठवते, ये रात भिगी भिगी किंवा आजा सनम मधील अभिनय, किती किती तो सांगायचा. राजकपूर त्याचे दैवतच होते. खरोखरच त्यावेळेस माणसे अशी रसिक होती. त्याकाळी गाण्यांच्या  तबकड्या मिळायच्या आणि त्या आम्ही जुन्या बाजारात शोधत असू. तो काळच वेगळा होता. प्रवाह वेगळा होता.

Unknown

1 comment:

Yogi Rele said...

110 PERCENT AGREE MAN... THOSE DAY AINT GONE... THEY ARE IN YOUR HEART
MERA NAAM JOKER
YOGI RELE
NEW JERSEY
1=855-287-4646