जया बच्चन म्हणाल्या, "हम तो यूपी के है, हिंदीमेंही बोलेंगे. महाराष्ट्रके लोग हमें माफ करना...'
असं सहा तारखेला जया बच्चन म्हणाल्या आणि झाले राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला. बरोबर आहे. काय गरज आहे असे भडक शब्द उच्चारण्याचे. आपण महाराष्ट्रात राहतो, रोजी रोटी इथली आहे. हिंदीतच बोलायचे आहे ना, मग त्यावर ही फोडणी कशासाठी. आणि यांची जीभ रेटते कशी हे बोलायला. याला मराठी राजकारणीच जबाबदार आहेत. एका तरी आमदार खासदाराने यावर साधा निषेध नोंदवला काय? मराठी माणूस म्हणे रागाने पेटून उठला तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही, अरे पण त्याला कधी रागच येत नाही त्याचे काय. सर्वांना एक गोष्ट ठणकावून सांगावी, महाराष्ट्रात राहायचे आहे, तर मराठी आलीच पाहिजे, तुम्ही आमच्या दारात आलात तर आमचा कायदा चालणार, बस्स. घरी आलेला पाहुणा जर जास्त आगाऊपणा करू लागला तर त्याला आपण बाहेरचा रस्ता दाखवतो, आणि जास्तच करू लागला तर, पेकाटात लाथ घालतो ना? तुमच्या राज्यात दुष्काळ आहे, रोजगार नाही, त्याला मराठी माणूस काय करणार? एका इमारतीत २८ कुटुंबे आहेत, त्यापैकी काही सधन आहेत, तर काही गरीब आहेत, म्हणून काय बाकीच्यांनी या सधन घरात घुसखोरी करावी? मदत मागावी पण अदबीने, आर्जवाने, मस्ती केली तर हाकलून लावण्यात येईल. एका मराठी कुटुंबाकडे जर हिंदी कुटुंबीय मदत मागत असेल तर त्याने मराठीतच मागावी ना? भीक मागणार्याने भीक देणार्याच्या भाषेत मागावी, नाहितर भीक मिळणार नाही.
जया बच्चन महाराष्ट्रात राहतात, त्यांचा विकास इथेच झाला, मग ही अरेरावी का? बरे यावर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किंवा ऐश्वर्या राय यांचे काहीच वक्तव्य नाही हे कसे काय? त्यांची ही मूक संमती असणार, हे म्हणणे धाडसाचे होणार नाही काय?
काय न्याय आहे, राज ठाकरे आपल्या भाषेबद्दल बोलतात तर त्यांच्यावर भाषणबंदी येते, आणि बाकी मनसोक्तपणे विधाने करतात. जया बच्चन यांनी विधान केले म्हणून राज ठाकरे आंदोलन करतात, म्हणजे पर्यायाने याला जबाबदार जया बच्चनच आहेत. राज ठाकरेंच्या रूपाने मराठी भाषेला वाली मिळाला, हीच परमेश्वराची कृपा म्हणायची.
आठ तारखेला जयाबच्चन यांनी माफी मागीतली, मागणारच, महाराष्ट्रात बच्चन कुटुंबीयांचे चित्रपट बंद पडू लागले ना? नाक दाबल्यावर तोंड उघडले.
2 comments:
Sahi aplyala Avadle he lihalele pan yat mala vatya ki apan Raj Thakarena madat keli pahije tya shivay he bakiche rajkarni vathnivar yenar nahit ani yana marathi manus kay karu shakto ke pan kalnar nahi
खरच ही बाहेअरची लोक येऊन इथे आरेरावी करतात. त्यांना धडा शिकवायाळाच हवा. मला खूप पटला तुम्ही बोललेला.
Post a Comment