फाशी आणि भारतात ?

१९९३ च्या मुंबई बॉम्ब खटल्याचा निकाल लागला, आणि तीन आरोपींना फाशीची सजा झाली. म्हणून भारतीयांनी अथवा ज्या कुटुंबाची हानी झाली त्यांनी आनंदी होण्याचे कारण नाही, कारण संसदेवरील हल्ल्यातला आरोपी अजूनही सहा वर्षानंतर, फाशीची शिक्षा होऊनही, आजपर्यंत तुरुंगात सरकारी खर्चाने बिर्यानी झोडत आहे, अगदी सर्व भारतीयांच्या नाकावर टिच्चून. याचा सर्व बोजा आपणासर्वांवरच पर्यायाने पडतो आहे. आता हे आरोपी सुद्धा जेल मध्ये सुरक्षितरित्या पाहुणचार झोडत बसतील.

भारतात हिंसाचार केल्यावर कायदाच संरक्षण देतो, आणि नंतरचे आयुष्य कामधंदा न करता मजेत घालवता येते म्हणल्यावर, पाकिस्तानातून काम नसणारे गरीब दहशतवादी बनून भारतात घुसतील नाहीतर काय? पाकिस्तानातील खेड्यात एवढे दारिद्र्य आहे की एकवेळच्या भुकेलाही अन्न नाही, मग पाकिस्तान तो बोजा सहन करणार नाही, तर त्यांना भारतात पाठवणार आणि भारतातल्या तुरूंगात त्यांच्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची सोय करणार अगदी माणसे मारून. जर त्याला शिक्षा झाली नाहीतर तो पुन्हा घातपाती कारवाया करायला तयार. हा आपल्या कायदाव्यवस्थेचा दुबळेपणा, आणि कमजोरपणा आहे. अजूनही आपण इंग्रजांच्या कायद्या व्यवस्थेला चिकटून आहोत. आपल्याला हे माहितच नाही की त्यावेळेस आतंकवादी नव्हते. भारतीय कायदाव्यवस्था पाहिल्यास कायदा पाळणे तापदायक आणि न पाळणे लाभदायक, असे चित्र ह्या आतंकवाद्यांनी सिद्ध केले आहे.

म्हणून म्हणतो भारतीयांनो कोणाला फाशी झाली, तर आनंदाने नाचू नका, खरा आनंद त्याला, त्या फाशी झालेल्याला झालेला असेल.

खालच्या कोर्टात शिक्षा झाली तर अपिलाला वरचे कोर्ट आहेच की. कधी कधी खालच्या कोर्टातील निकाल वरचे कोर्ट बदलते, आणि खालच्या कोर्टावर ताशेरे ओढते, आणि खालच्या कोर्टाला चूक ठरवते, म्हणजे गरीब माणूस जर वरच्या कोर्टात काही कारणामुळे जाऊ शकत नाही तर त्याने न्याय न मिळता नशिबाला दोष देत आयुष्य घालवायचे.

Unknown

1 comment:

Unknown said...

Very true & factual.
every indian should be made aware of this.