दिनांक २२ मे २०१० रोजीच्या वर्तमानपत्रात एक प्रमुख बातमी होती, अमेरिकेतील डॉ. क्रेग व्हेंटर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रयोगशाळेत सजीव प्रजातीची निर्मिती केली. खरोखर त्यांनी निर्जीव वस्तुमधून सजीव निर्माण केला काय? मग जणू ते साक्षात विश्वामित्रच झाले म्हणा ना! आता आपणा जीव आणी जीवन समजावून घेऊ यात. पेशी हा जीवनाच सर्वात मुलभूत घटक आहे. पेशींचे कार्य म्हणजेच जीवनकार्य. मानवासारखा प्राणी बहुपेशीय आहे. या पेशी वेगवेगळ्या समूहात कार्य करतात. पेशींची अंतर्गत रचना फार गुंतागुंतीची असते. यात बाह्यावरण, आंतर आवरण, पेशीद्रव्य, रासायनिक संयुगे, आणि लाखो प्रथिने असतात. पेशीत केंद्रक असते, आणि या केंद्रकात डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे असतात. ह्या DNA मध्ये A-अडेनाईन, T- थायमाईन, G-गॉनाईन, C-सायटोसीन अशा चार मूळ रसायनांच्या साखळ्या असतात. DNAचा रेणू म्हणजे चार अक्षरसमूहांची करोडे बेस असलेली साखळीच.
अशा काही हजार बेसेस प्रयोग शाळेत तयार करणे शक्य आहे, पण सलग गुणसूत्र तयार करणे शक्य नाही. मग यावर उपाय काय तर हे छोटे तुकडे एकत्र जोडणे, आणि हेच अवघड काम आहे. सध्याच्या प्रयोगात डॉ. व्हेंटर यांनी १०८६ बेसे लांबीचे छोटे DNA चे तुकडे करून ते मग एकत्र जोडून मोठा DNA तयार करण्याचे तंत्र विकसित केले. आणि हेच फार महत्वाचे आहे. डॉक्टरांनी प्रयोगशाळेत मायकेप्लाज्मा मायकोडीस ह्या जिवाणूचा १० लाखाहून जास्त बेसेस लांब असलेला संपूर्ण DNA तयार केला. आणि हा DNA मायकोप्लाज्मा काप्रिकोलम ह्या जिवाणूच्या पेशीत, शरीरात म्हणू यात संक्रमित केला. आता त्यांच्या असे लक्षात आलेकी, नव्या प्रत्यारोपित मायकोप्लाज्मा मायकोडीसचा DNA घेऊन वाढणार्या पेशी मायकोप्लाज्मा काप्रीकोलमच्या मिळाल्या. त्याचा त्यांनी अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, ह्या पेशी काप्रीकोलमच्या नसून मायकोडीसच्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केले, DNAची लांब साखळी तयार केली, जी कोणालाही शक्य नव्हती, आणि तिचे दुसर्या पेशीत प्रत्यारोपण करून, त्या पेशीची वाढ केली. A पदार्थाचे DNA काढून B पदार्थात घालून A चे B त रूपांतर केले, पण लक्षात घ्या B पदार्थ तयार केला नाही. प्रयोगशाळेत DNA चे रूपांतर करता आले,पण ’सजीव’ निर्माण करता आलेला नाही. म्हणजेच नवी पेशी निर्माण करून तिची वाढ करता आलेली नाही. DNA म्हणजे संपूर्ण पेशी नव्हे. कारण पेशीत इतर अनेक घटकही असतात.
No comments:
Post a Comment