कृषीमंत्री शरद पवारांवर दुर्दैवी हल्ला झाला आणि काही म्हटले तरी हे दुर्दैवीच. म्हणजे लोकशाहीत हे दुर्दैवी्च. श्री. अण्णा हजारेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तर अण्णा पटकन म्हणाले, एकही मारा क्या? हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात? सगळं खोटं आहे. ढोंग आहे. यामुळे सर्व युवकांचा पाठिंबा अण्णा गमावतील हे नक्की.
आता प्रश्न असा आहे, हाच हल्ला अण्णांवर झाला असता तर? ते हेच म्हणाले असते काय? या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात? कमाल आहे.
भारतात हा प्रकार अजिबात खपवून घेऊ नये. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावतो आहे त्याचे काय?
No comments:
Post a Comment